STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Tragedy

4  

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Tragedy

विषय:- अवकाळी पाऊस

विषय:- अवकाळी पाऊस

1 min
245

     दोन महिन्यांपासून राब राबून गुढीपाडव्यासाठी तिने साखरेचे रंगीबेरंगी,हार,कंगण नारळ केलेले.सर्व सामान हातगाडीवर ठेवून ती विकावयास बसली.थोडी विक्री झाली नि अचानक मोठ मोठ्ठाल्ल्या गारा विजांच्या प्रचंड कडकडाटासह कोसळू लागल्या तिचं सारं सामान सावरण्याच्या आतच पार पाण्यानं रंगासह विरघळून एकमेकांत मिसळलं होते.तिनं रंगवलेले स्वप्न अवकाळी पावसाने भंग पावून तिचे डोळे आता अवेळीच बरसत होते त्या अवकाळी पावसासारखेच!


दोन महिने दिवसरात्र मेहनत घेऊन गुढी पाडव्यासाठी तयार केलेले साखरेचे हार कंगण अवकाळी पावसामुळे पार वाया गेल्याने त्या स्रीच्या डोळ्यातनं अवेळी आलेल्या अश्रूंची अवकाळी पावसाशी स्पर्धा लागलीय जणू काही!


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract