Neha Ranalkar(Nawate)

Abstract Inspirational

4.0  

Neha Ranalkar(Nawate)

Abstract Inspirational

तुळशी विवाह

तुळशी विवाह

1 min
167


शुभ मंगल सावधान ऐकू येतात

स्वर तुळशी विवाहाच्या नंतर |

तुळशी शाळीग्राम विवाह होताच

इतर शुभमुहूर्तांत कमीच अंतर | |१| |


जालिंदर दैत्याची पत्नी होती 

गत जन्मीची वृंदा तुळशी सती |

विष्णूने जालिंदर रुपात मानभंग

करुन युक्तीने मारला तिचा पती | |२| |


राखेतून संजीवनी मंत्राने उठवून

दिले रूप तुळशी दिव्य वनस्पतीचे |

शाळीग्राम रुपातच तुलसी विवाह

करून पावित्र्य राखले त्या सतीचे | |३| |


करता तुलसी विवाह मिळे घरा 

समाधान सौभाग्य स्थैर्य शांती |

तुळशी सौभाग्यदायीनी,दिव्य वनस्पती

हवा प्रदुषणांत घडवीते क्रांती | |४| |


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract