दुर्गा (अलक)
दुर्गा (अलक)
एरवी मात्र शांत आणि अबोल असणारी दुर्गा आज मात्र चवताळून उठली, स्टँडवरून घरी येताना वाटेत एका मवाल्याने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला होता, पहिल्यांदा तिने दुर्लक्ष केलं, पण आता जेव्हा तिला जाणवलं की ह्याला आपणच धडा शिकवला पाहिजे त्यावेळेस एरवी गप्प असणाऱ्या दुर्गेच्या तोंडून सणसणीत वाक्य बाहेर पडली. फक्त एवढंच नाही, फुलासारख्या नाजूक तिच्या हातांनी त्या मवाल्याच्या कानाखाली एक रेघ उमटवली.
एरवी कोणाशीही बोलताना नजर खाली झुकवून बोलणारी दुर्गा आज मात्र रागाच्या अंगाराने तिच्या डोळ्यांना वेगळीच चमक आली होती आणि आज तिला खरंच पटलं होतं वेळप्रसंगी दुर्गेला खरंच दुर्गा होता येतं...