ऋचा Pathak

Children Stories

4.0  

ऋचा Pathak

Children Stories

जादुई दिवा

जादुई दिवा

3 mins
230


And now the wait is over ज्या राऊंड ची आपण वाट पाहत होतो, तो राऊंड आता आलेला आहे, असं अतिशय उत्साहात निवेदिका म्हणत होती, तिच्या उत्साहा इतकाच आनंद प्रेक्षकांचा टाळ्यांच्या कडकडातीतून दिसून येत होता...तर मंडळी, आपल्या सर्वांना माहितेय तिसऱ्या राउंड मध्ये दुसऱ्या राउंड मध्ये विजयी ठरलेल्या 3 जणांना आपण गुहेतून सोन्याचं बिस्कीट शोधून काढण्याचं टास्क दिलेलं असतं, हे फार कठीण असतं आणि म्हणूनच आपण हे टास्क पूर्ण करण्यासाठी 3 तास वेळ दिलेला असतो..तर दुसऱ्या राउंड चे विजेते आहेत विजय ,विनेश आणि सोमदत्त ...तर चला तिघांनीही समोर डोंगरावर असणाऱ्या त्या गुहेतून सोन्याचं बिस्कीट शोधून काढायचं आहे ,ज्याला कोणाला सोन्याचं बिस्कीट मिळेल त्याने गुहेच्या बाहेर येऊन ते इथे सगळ्यांना दाखवायचं आहे,तो ठरेल या महाअंतिम फेरीचा विजेता त्याला मिळेल 24 caret सोन्याने व हिऱ्याने मढलेली Ali baba चा दिवा जो design केला आहे हिरे आणि सन्स कम्पनींनी त्या सोबत त्याला मिळणार आहे 25 लाखांचा Check ...अस म्हणून निवेदिकेनेAnd now your starts now अस म्हणून शिट्टी फुंकली व तिघेही त्या गुहेत गेले...


विजय ,विनेश गुहेच्या डाव्या बाजूला गेले व सोमदत्त उजव्या... गुहा एकदम भीतीदायक होती, कीटकांचे आवाज च येत होते चिमण्यांचा आवाज मधूनच यायचा... हातात बॅटरी घेऊन हे तिघे गेले होते...सोमदत्त एकटाच होता तो ज्या दिशेला गेला होता तिथे वाटेत च त्याला एक झरा दिसला पाण्याचा वेगही जास्त होता त्यामुळं तो कसा पार करायचा हेच त्याला कळेना ..बऱ्याच वेळा नंतर त्याला कोपऱ्यात एक मोठी काठी दिसली त्या काठीच्या आधारे आपण पार करू शकतो असं मनात येताच तो त्या काठीच्या दिशेला वळला, आणि पुढं पाऊल टाकतोच इतक्यात ठेच लागल्याने खाली पडला .. आई आई ग अस म्हणत त्याची नजर त्याला ठेच लागलेल्या दगडाकडे गेली,आणि तिथे त्याला काहीतरी चमकल्या सारख दिसलं... हातात घेऊन त्याने पाहिलं तर ते होतं जिनीचा दिवा, त्याला विश्वास बसेना...


सोमदत्त ने उगीच गम्मत म्हणून त्या दिव्यावर हात घासला आणि पाहतो तर काय! त्यातून एक मोठा जिनी बाहेर आला,क्या हुकूम है मेरे आका, आपने मुझे क्यूँ बुलाया? सोमदत्त पुरता घाबरला होता,पण त्याने जिनीला सांगितलं की मला अस अस सोन्याचं बिस्कीट शोधयचंय त्यावर जिनी ने सांगितलं की सोन्याचं बिस्कीट म्हणजे मी स्वतः आहे माझ्या पोटात सोन्याची खाण आहे, जर तुम्ही मला त्यांच्या ताब्यात दिलात तर ती लोकं विनाशासाठी माझा वापर करतील, तुम्ही मला त्यांच्या ताब्यात देऊ नये. खरं तर मला मिळवण्यासाठीच तर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, विजेत्यांना रत्नजडित दिवा तर आयोजकांना शोधून आणलेला खरा दिवा म्हणजेच सोन्याचं बिस्कीट असलेला दिवा.. मी तुम्हाला विनंती करतो आका, माझा उपयोग जनकल्याणासाठी व्हावा हीच माझी इच्छा आहे, सोमदत्त ने एक युक्ती लढवली व तो म्हणाला नाही मी देणार कुणाला तुम्ही फक्त सोन्याचं एक बिस्कीट मला काढून द्या आणि तुम्ही पुन्हा यात जाऊन बसा..


जी मेरे आका अस म्हणून जीन ने सोमदत्त ला एक सोन्याचं बिस्कीट दिल व तो पुन्हा दिव्यात गेला... सोमदत्त ने तो दिवा त्याच्या सदर्यात लपवला व तो बिस्कीट घेऊन आला, ठरल्याप्रमाणे आयोजकांना बक्षीस द्यावं लागलं .सोमदत्त ने खुलासा केला सर्वांसमोर की हे आयोजक खूप मोठी दरोडे खोरांची टोळी आहे ,आणि त्यांना खरा जिनी हवा होता जो त्यांच्या पूर्वजांनी बंदिस्त करून ठेवला होता, सोमदत्त ने जिनी ला बाहेर यायला सांगितले ,जिनीने सगळं प्रकार सांगितला,व त्यावरून आयोजकांना म्हणजेच त्या दरोडे खोरांना अटक झाली...सोमदत्त ने तो जिनी व दिवा सरकारची प्रॉपर्टी म्हणून सरकारला बहाल केला....सरकरने सोमदत्त च कौतुक केलं व इतके दिवस ह्या च दिव्याच्या शोधासाठी सगळे कामावर होते,तुम्ही खूप मोठी मदत केली म्हणून त्याला 5 कोटी रुपयांचा बक्षीस देण्यात आलं....


Rate this content
Log in