भुलभुलैया
भुलभुलैया


अरे झालं की नाही तुमचं आवरून? आपल्याला उशीर होतोय अस म्हणून मिलिंद चे बाबा मिलिंद ला व मेघना ला बोलले, तोवर मिलिंद मेघना ची आई मीनाक्षी पर्स अडकवत आली व म्हणाली चला मी तर तयार आहे,अरे मिलिंद मेघना होतंय का नाही तुमचं आवरून? का घरी बसूनच जंगलाची सफारी करणार आहात का? चला बघू,या पटकन.. आलो आलो आई ,अग कॅमेरा , घेत होतो आणि माझी हॅट सापडत नव्हती तीच शोधत होतो,चला मी तयार आहे..आणि ही मेघी कुठं गेली.. आले आले रे म्हणून मेघना स्वतःचा गॉगल लावून खाली आली..झालं का सगळ्यांच सगळं निघायचं का आता, अस बाबा म्हणाले व सगळे जण आता जंगलातील मज्जा अनुभवण्यासाठी निघाले...गाडी मध्ये गाण्याच्या भेंड्या, आणि मज्जा करत कधी ते जंगलात आले ते त्यांना कळलंच नाही, चुकूनच त्यांची गाडी जंगलाच्या मध्य भागात आली होती... ..
अचानक पणे विजांचा कडकडाट झाला, सकाळचीच वेळ होती,पण सूर्य काळ्या मेघांमध्ये लपून बसला होता त्यामुळे अंधार पसरला होता... आता मात्र चौघे ही घाबरले, google map वरून रस्ता चुकलेला पहावा तर Network बंद पडले होते.. सकाळचे फक्त 11 वाजले होते तरीसुद्धा काळोख पसरला होता आणि जणू रात्र च भासत होती...मिलिंद जरा धाडसी होता त्यामुळं तो आजूबाजूला कोणती वस्ती आहे का हे पाहून येऊया अस म्हणून तो गाडीतून उतरला त्याच्या सोबत मीनाक्षी ,मेघना व बाबा ही येतो म्हणले व चौघेही हातात मोबाईल ची बॅटरी लावून कोण दिसतंय का बघायला चालले... फिरून फिरून ते एकाच जागेवर येत होते, आता मात्र त्यांना काहीच कळेनासं झालं ...मिलिंद जोरात ओरडला व म्हणाला बाबा,आपण या भुलभुलैयात अडकलो... आपण आता बाहेर नाही जाऊ शकत...अहो बाबा मी एका हिंदी चित्रपटात बघितलं होतं, ज्या मध्ये ते Alien असतात, त्यांच्या जागी जर कोण
ीं आलं तर ते त्यांना जंगलातून बाहेर पडू देत नाहीत, बाबा मला वाटतंय आता आपण इथंच ,चूप अस काही नसतं तो चित्रपट होता ते काय खर नसत असं आई म्हणाली तेवढ्यातच आकाशातून दिव्य प्रकाश पडला व आवाज ही आला ,अरे मूर्ख लोकानो, ही जागा आमच्या Aliens ची आहे , तुम्ही इथे आलात ते ही चुकून म्हणून आता आम्ही तुम्हाला येथून जाऊ देत आहोत,पुन्हा जर इथं आलात तर मात्र तुम्ही जिवंत जाणार नाही...चौघेही चपापले ,व आम्हाला मार्ग दाखवा यासाठी विनंती करू लागले...
एक मोठंस चक्र आकाशातून खाली उतरतं व त्यातून एक कुत्रा बाहेर येतो व त्या चक्रातून आवाज येतो की हा कुत्रा तुम्हाला जंगलाच्या बाहेर पडणारा मार्ग दाखवेल..मिलिंद चे बाबा म्हणतात ,पण हा कुत्रा तुमच्याकडे कसा काय आला? त्या चक्रातून आवाज येतो की ,अरे दुष्ट मनुष्य प्राण्यांनो, तुम्ही जगलं ओसाड केलीत, झाडं तोडलीत ,मग ह्या प्राण्यांनी जायचं कुठं म्हणून आम्ही सर्व प्राण्यांनाAliens लोकात घेऊन गेलोय,म्हणून तर पृथ्वीवर ह्या जंगला व्यतिरिक्त दुसरं जंगल उरलं नाहीये..आता हे ही तुम्ही उधवस्थ कराल ...तेवढ्यात मिलिंद व मेघना म्हणतात,नाही नाही,आम्ही असं होऊ देणार नाही..आम्ही झाडं तोडणार नाही व तोडू ही देणार नाही..पण तुम्ही आमच्या सगळ्या प्राण्यांना पुन्हा इथे सोडा खरंच... ठीक आहे, तुम्ही आता या जंगलाच्या बाहेर पडा, हा कुत्रा तुम्हाला मार्ग दाखवेल... कुत्रा पुढे व ह्यांची गाडी मागे अस करत Finally त्यांना रस्ता सापडतो व ते पुन्हा घरी येतात... घडलेली हकीकत सर्वत्र पसरते व तात्काळ लोकं प्राणी वाचवण्यासाठी झाडं लावतात ,आणि खरंच पुन्हा एकदा पृथ्वीवर पक्षी किटक दिसतात...काय मंडळी खरंच आपल्या बाबतीत असं होऊ शकतं का? जर आपण झाडं लावली नाहीतर ,ती जगवली नाहीतर होऊ ही शकत...