STORYMIRROR

🤩ऋचा lyrics

Inspirational

3  

🤩ऋचा lyrics

Inspirational

Prompt 6: दृढ प्रेम

Prompt 6: दृढ प्रेम

2 mins
243

नर्स ताबडतोब डॉक्टर राधा याना पाठवा, पेशंट ची तब्बेत अधिकच खालावत चाललीय. असं डॉक्टर श्रीनिवास बोलले. नुकत्याच Operation theater मधून बाहेर आलेल्या डॉक्टर राधा ताबडतोब पेशंट जवळ आल्या. त्यांनी पटकन पेंशट ला saline मधून इंजेकॅशन सोडलं व आता पेशंट ला झोपेची गरज आहे असं म्हणून त्यांनी नातेवाईकांना बाहेर पाठवलं व स्वतः ही बाहेर पडल्या. डॉक्टर राधा चा मोबाइल आत केबिन मध्ये होता,तो पिउनने आणून दिला, आणि बघते तर काय तब्बल 45 मिस्ड कॉल येऊन गेले होते पियुष चे..राधा ने पियुष ला फोन लावला व म्हणाली, अरे दोन emergency केसेस होत्या, त्यामुळं उशीर झाला.. सॉरी ..निघतेय मी आता, तिकडून

पियुष: आग हो हो जरा श्वास तरी घे, किती ते घाईने बोलतेयस, तू ये बाहेर मी आलोय हॉस्पिटल च्या बाहेर च आलोय..

राधा : हो आलेच!

राधा पर्स घेऊन बाहेर आली तितक्यात च एक कोरोनाच Serious Patient आलं होतं, राधा ने पियुष कड बघितलं व पियुष ने तिला smile करून पटकन जा ,तुझी गरज patient ला आहे आपण नंतर जाऊ फिरायला असं बोलला व राधा ताबडतोब Apron अडकवून patient ला तपासायला गेली...राधा डॉक्टर असल्याने कोरोनामुळे गेले 4 दिवस हॉस्पिटल मध्ये जास्त असायची कारण वाढत्या patients मुळे तिला घरी च जायचं जमलं नव्हतं व पियुष म्हणजेच तिचा नवरा तो आज तिला फिरायला घेऊन जाणार होता पण ,आजही तिला वेळ नव्हताच, म्हणतात ना खरं प्रेम हे संकटकाळात खम्बीर साथ देतं ,राधाला वेळ मिळत नव्हता पण तरीही दुरूनच त्यांचं प्रेम अधिक दृढ होत होतं...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational