Made for each other
Made for each other


राघव तसा थोडा विचित्र मुलगा आहे, नेहमी सगळ्यांशी तुसडे पणाने वागतो... का कोणास ठाऊक लग्न बंधन प्रेम या विषयी त्याला नेहमीच घृणा वाटत असल्याने त्याच्या आईबाबांना नेहमीच चिंता त्याची वाटते...तसा चांगल्या कँपणीत त्याला पाच आकडी पगार आहे,दिसायला ही देखणा ,मनमिळाऊ व सुस्वभावी असूनही लग्न नाही करणार असा त्याने पण केल्याने त्याच्या आई बाबांना त्याची फार काळजी वाटतेय... आतापर्यंत त्याने जवळजवळ 26 मुलींना नकार दिलाय.. शेजारीच एक नवं कुटुंब राहायला आलेलं असतं, लेले कुटुंब..
कोणी आहे का घरात? दारा बाहेरून आवाज येतो
राघव दार उघडतो,पाहतो तर काय एक सुंदर मुलगी असते,राघव तिला विचारतो.कोण आपण?
त्यावर ती म्हणते ,मी सुजाता लेले, आम्ही आताच येथे शिफ्ट झालोय नव्या फ्लॅट वर..म्हणलं शेजारी कोण राहतं ते बघावं तरी, साखर ही संपलीय ती मागण्याच्या निमिताने ओळखही होईल म्हणून आलेय.. घरात कोणी नाही का
, म्हणजे काकू वैगेरे?
राघव ला पहिल्यांदाच त्या मुलीचं बोलणं ऐकून अस वाटत होतं जणू यांची खूप जुनी ओळख आहे.. राघव म्हणतो, आई आहे , या ना तुम्ही बसा,
कोण आलंय ,अस म्हणत राघव ची आई म्हणजेच जोशी काकू बाहेर आल्या, त्यावर सुजाता ने लगेच त्या काकूंना नमस्कार केला व तिची ओळख सांगितली व आम्ही आताच येथे आलोय असं ही सांगितलं...
सुजाता साखर घेऊन गेली
काही दिवसांमध्ये सुजाता राघव ची छान गट्टी जमली.. आणि त्याचं रूपांतर प्रेमात झालं... इतके दिवस राघव लग्नाला तयार नव्हता कारण त्याला लग्न ,प्रेम हे बंधन वाटतं होतं पण सुजाताला भेटल्यापासून तो तिच्या मनमोकळ्या वागण्यात इतका हरवून गेला होता की असं वाटत होतं त्याला सुजाता हा त्याचा श्वास आहे.. तिचं मनमोकळं बोलणं, संस्कार, विचार ह्या सगळ्यांनी तिने राघव ला पहिल्याच भेटीत आपलंसं केलं होतं....Made for each other म्हणतात ते हेच वाटतं!!