ऋचा Pathak

Inspirational

3.5  

ऋचा Pathak

Inspirational

मानवता परमो धर्म - भाग 1

मानवता परमो धर्म - भाग 1

1 min
173


आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की आपल्या हाताची मूठ ही फक्त एका दुसऱ्या बोटाने नाही तर पाची बोटाने बनते, पाची बोटं एकत्र आली की त्याचा होतो पंजा व ती एकजूट झाली की बनते मूठ... अगदी आपल्या समाजाची जडणघडण ही त्याच प्रकारे आहे बरं! डॉक्टर, इंजिनिअर, वकील, शेफ, नर्स, सफाई कामगार सगळेच जण महत्वाचे आहेत...


जर कोणी असं म्हणलं की नाही,समाजात फक्त एकच पेशा सगळीकडे हवा, असं चालेल का? नाही ,मुळीच नाही, विविधता आहे म्हणून तर प्रगती आहे.. उद्या सगळ्यांनीच जर ठरवलं की माझ्या मुलांना मी फक्त आणि फक्त डॉक्टर, वकीलच करणार, तर असं म्हणून चालेल का? नाही, बिलकुल नाही.. कारण प्रत्येक क्षेत्र हे तितकच महान असतं, कोणतंच क्षेत्र श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतंच, आपापल्या समजुतीने आपण तशी विचारसरणी निर्माण केलेली असते, विचार करा जर कोणी सफाई कामगार नसतील तर आज आपण स्वछ वातावरणात काम करू शकतो का? नाही.... त्यामुळं कोणतंच काम हे त्याकडे पाहणाऱ्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं.. बघा ना आज कोरोनाच्या काळात सफाई कामगार यांचं सुद्धा किती मोठं योगदान आपल्याला दिसून येतंय... डॉक्टर ,नर्स, ,रुग्णवाहिका कर्मचारी, सफाई कामगार या सगळ्यांच्यामुळेच तर आज आपला देश कोरोनाशी लढतोय... हो ना?? आज खऱ्या अर्थाने आपण मानवता परमो धर्म:


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational