आठवण
आठवण


मी जेव्हा लहान होते त्यावेळेस आमच्या शाळेत कल्पना शक्तीला चालना देण्यासाठी अनेक activities घेतल्या जायच्या, विषयाचं बंधन नसायचं, तुम्हाला जे काही सुचतंय ते बनवा आणि ते शाळेत घेऊन या,ज्यांची कुणाची आयडिया सगळ्यात छान असेल त्यांना शाबासकी दिली जायची...मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघींनी पिंपळाच्या पानांचा गणपती बाप्पा तयार केला होता व तो शाळेत नेला होता..आजी सॅम ला तिची बालपणीची आठवण सांगत होती तितक्यातच सॅम बोलला, अगं आजी आज माझ्या स्कूलमध्येदेखील टीचरनी माझं कौतुक केलं कारण मी एक छोटासा रोबोट तयार केला म्हणून... सॅम ने आजीला तो रोबोट दाखवला व म्हणाली खरंच आजकालची पिढी खूप हुशार आहे, आम्हाला त्यावेळेस काही अस सुचतच नव्हतं, त्यावर सॅम म्हणतो, नाही अगं आजी, तुमच्या वेळेसचा काळ वेगळा होता, त्या काळात आणि आज 2050 मध्ये किती फरक आहे की नाही, त्यावर आजी सॅमला मिठी मारून म्हणते हो रे बाळा खरंच काळाची गती थांबणं शक्य नाही...