Harshad Molishree

Romance

1.7  

Harshad Molishree

Romance

तुझ्या मिठित...

तुझ्या मिठित...

43 mins
19.6K


तपत्या उन्हाड्याच्या गर्मीत, निशांत चालता चालता खूप दमला होता.... त्याला खूप तहान लागली होती, अगदी घसा सुखला होता त्याचा.... तेव्हाच त्याने समोर एक मोठा झाड बघितला... निशांत ने विचार केला की झाडा खाली सावलीत बसून थोड़ आराम करावा व येऊन तो त्या झाडा खाली बसला... बसल्यावर निशांत विचार करू लागला...

"भरपूर लांब निघून आलोय आपण... पण तरी शहर अजून खूप लांब आहे... जाऊदे थोडं वेळ बसून इथंच आराम करतो"....

निशांत झाडा ला टेकुन डोळे बंद करून झोपला.... तेव्हाच त्याला ढोल चा आवाज ऐकू आला... एक वेगळ्याच प्रकारचा संगीत होता हा, जे त्याला खूप आवडला..... निशांत उठला व समोर पाहिलं कि एक काफला जात आहे, काफला म्हणजेच बंजारे लोकांचा समूह.... निशांत ने विचार केला कि ह्यांचा जवळ नक्कीच पाणी भेटेन, निशांत ने मदती साठी काफला सोबत जात असतांना एका माणसाला थांबवलं आणि त्यांचा जवळ पाणी मांगीतलं...

"बाबा.... ओ बाबा, ऐका ना मला खूप तहान लागली आहे थोडं पाणी मिळेल का"....

"हो बाळा थांब देतो"... त्या मांसनी सहज उत्तर दिले आणि त्यांनी निशांत ला प्यायला पाणी दिलं

निशांत ने पाणी पिलं व त्याला पाणी पिउन जरा बरं वाटलं....

"बाळा तू इथं काय करतोय, वाट चुकलास कि काय"...?? त्या माणसाने निशांत ला विचारलं

"नाही बाबा, वाट नाही चुकलो मि गाव सोडून, शहरात जातोय रहायला"....

"गाव सोडून..... असं का बरं, लोक आपलं गाव सोडून असेच शहरात जाऊन रहायला लागले तर म गावात तर काही राहणारच नाही"...

"हो बाबा अगदी बरोबर आहे तुमचं, पण माझं गावात कोण नाहीये, ना तर माझं घरदार आहे.... मग मी गावात राहून तरी काय करू"....

"कोण नाहीये म्हणजे"...???

"म्हणजेच..... म्हणजेच कि मी अनाथ आहे, गावातल्या आश्रम मध्ये रहायचो, पण आता माझं शिक्षण ही झालं व आज मी आश्रम सोडून नवीन सुरवात करायचं ठरवलं आणि त्याच साठी मी गाव सोडून जातोय"...

"बाळा बघ मी तुझा एवढं शिकलेलो तर नाही, पण जर नवीन सुरवात करायची आहे तर शहरात जाऊनच का, गावात ही तू नवीन सुरवात करू शकतोस ना" ???....

"हो बाबा तुमचं म्हणनं पण बरोबर आहे"..... निशांत ने प्रेमाने उत्तर दिले...

"जर तुझी इच्छा असेल तर अमच्या काफला सोबत चल, व जर तुला पुढ काही वाटलंच तर तू जा शहरात.... आम्ही तर बंजारे आहोत आम्ही गावो गावी फिरून लोकांना नाट्य दाखवत असतो जर तुला हवं तर चल सोबत".... त्या माणसाने निशांत ला त्यांचा सोबत यायला विचारलं...

निशांत ने हे ऐकल्यावर थोडं विचार केला व मग ठरवलं की....

"ठीक आहे हीच बहुतेक जीवनाची एक नवीन सुरवात असेल व निशांत ने त्या माणसाचा प्रस्ताव स्वीकारला"...

"हे बाबा ज्यांनी निशांत ला त्यांचा सोबत यायचं विचारलं ते स्वतः या काफल्याचे सरदार होते"...

काफला येऊन एका डोंगरा वर थांबला.... जिथं त्या डोंगराला लागून एक मोठा पाण्याचा धबधबा होता, आणि जवळच एक नदी होती.... निसर्ग जणु इथंच येऊन थांबला आहे अगदी सुंदर दृश्य होता, हिरवेगार झाड़, ठंड़गार वारा, चिमीनिचा... चु चु चा आवाज़, कानात मात्र... जणु काय नवीन सुर प्रकट करत होता......

निशांत ला हि जागा खूप आवडली व लोकहि खुप छान होते... ह्या डोंगरावर लोकांनी आप आपल्या झोपड्या बांधल्या व लोकं राहू लागले... सरदार नेच नव्हे पण सगळळ्यांनी निशांत ची मदत केली, आणि त्याला हि एक झोपडी बांधून दिली...

निशांतला सगळे खूप आवडले, सगळे लोक खूप चांगले होते आणि निशांत तिथे ख़ुशी ख़ुशी राहत होता, पण निशांत अगदी शांत शांत रहायचा, व फक्त सरदार सोबत बोलायचा ते हि खूप कमी... गावात निशांत त्याचा शांत स्वभावा मुळे खूप प्रशिद होता... निशांत दिसायला हि खूप

सुंदर होता..... "श्वेत रंग, घारे डोळे आणि त्याचा हसनं, त्याचा हसू तर फुला सारख होतं", गावच्या सगळ्या मुलींना निशांत खूप आवडायचा, पण निशांत कधी कोणत्या मुलीवर लक्ष नाही दयाचा, किती तरी मुली निशांत ला लग्ना साठी विचारायची पण निशांत त्यांना काय बोलायचा नाही बस्स नेहमी एक सुरेख स्मित द्यायचा..... मुलींना त्याचा खूप राग यायचा कि या ला... किती घमंड आहे पण तरी निशांत होताच तसा कि सगळळे त्याचा वर खूप मन लावायचे....

निशांत ज्या झोपडीत रहायचा ती झोपडी अगदी कोपऱ्यात म्हणजेच डोंगर च्या टोकावर होती व त्याचा झोपडी समोर एक दगड होता निशांत ची सवय होती तो रोज रात्री त्या दगडावर येऊन बसून रहायचा...

एक दिवस निशांत नेहमी सारखंच त्या दगडावर बसला होता, तेव्हा नुसताच त्याचा मनात विचार आला कि आपण अस का जगतोय.....??? तो स्वतः च्या विचारात गुंतला....

"का जगतोय मी, न माझ्या पाटी कोण आहे ना पुढे, मग उगाच का जगु, कोणासाठी जगू,

माझ्या जगण्याचा काय कारणच नाहीये, का जगू मी....?? कस तरी वाटतं, इकडचे सरदार हे गावातले लोक सगळे खूप चांगले आहे त्यांनी मला झोपडी बांधून दिली व त्यांचा सोबत काम करण्याची परवानगी दिली, पण हे सगळ असूनही मला माझा आयुष्य व्यर्थ वाटतं..... जगयनाची इच्छा नाही मला, नेहमी काय तरी सुटल्या सारखं वाटतं ना आई चा पत्ता आहे ना बापाचा... मी कोण आहे जन्म कुठे झाला नाही माहीत तरी आश्रमा मध्ये राहून इतके वर्ष शिक्षण घेतलं..... सुशिक्षित झालो, की जर शहरात गेलो, गाव सोडून तर चांगला राहू शकेन मी, पण मनच नाहीये काय करायचं, काय करू..... ?? या गावात असं पडून आहे मी लाज वाटली पाहिजे मला स्वताची, सोड..... का इतकं विचार करतोय मि, सगळ जाऊदे बस्ससस नाही जगायचं मला"....

निशांत ने ठरवलं की त्याला नाही जगायचं आता, आणि निशांत त्या दगडा वर उभा रहायला आणि डोंगरा वरून खाली पाहू लागला... निशांत ने आपले डोळे बंद केले आणि लांब स्वाश घेतला आणि जसा तो पहिलाच पाऊल पूड टाकायला गेला, तेव्हाच पाठून कोणी तरी निशांत चा हाथ धरला आणि त्याला पाटी ओढला आणि निशांत तिथं त्या दगडा वरून खाली पडला... निशांत चे डोळे बंद होते अगदी अंधार फक्त चंद्रा चा उजेळ निशांत जसा तसा उठून त्याचा गूढ़घ्यांवर बसला आणि डोळे उघडताच त्याची नजर समोर पायांवर पडली आणि हे पाय कोणाचे आहे हे न बगताच निशांत बोलला...

"वाहहहहहहह...... किती सुंदर पाय आहे, चांदण्या रात्रीत पाय कशे चमकत आहे, बस्स काही क्षण आधी विचार केला होता कि या डोंगरा वरून उडी मारून जीव देऊन टाकतो..... पण आता हे पाय बगून असं वाटतं कि जर मेलो तर या पायांवर डोक ठेऊनच मरु".....

एवढं म्हंणत जेव्हा निशांत ने त्या पायांना स्पर्श करण्यासाठी हाथ पुढे घेतला तर बघताच ते पाय पाटी सरकले, आणि जेव्हा निशांत ने वर मान करून पाहिलं.... तर त्यानी बघितलं की एक सुंदर मुलगी त्याच्या समोर थांबली आहे.... निशांत तर त्या मुलीला बघतच रहायला...

त्या मुलीचा चेहरा असा जणु......... "चंद्रा चा तेज तिच्या चेहरात उतरलं आहे, लांब लचक केसं कमरे पर्यंत, चमकदार सफेद रंगाची साडी नेसलेली व खूप सुंदर दिसत होती अगदी स्वप्न सुंदरी सारखी"...

निशांत अजूनही त्या मुली समोर गूढ़घ्यांवर बसून होता आणि त्या मुलीला एक टक पाहत होता... ती मुलगी अगदी शांत थांबून निशांत कडे बघत होती... निशांत ने त्या मुलीला विचारलं...

"तू कोण आहेस... काय नाव आहे तुझं, इथं काय करत आहेस, ह्याच गावात राहतेस का"...???

त्या मुलीने हे सगळ ऐकलं पण काहीच उत्तर न देता ती वळून निघुण गेली.... निशांत ने तिला थांबवायचा प्रयत्नं केला पण ती नाही थांबली व रात्री च्या काढोक मध्ये ती कुठे गेली निशांत ला ते कळलंच नाही....

निशांत येऊन त्या दगडा वर बसला व विचार करू लागला की..... ती मुलगी कोण होती??

इतकी सुंदर...... निशांत डोळे बंद करून तिच्या चेहरा आठवत होता... आणि अस करत सकाळ झाली... निशांतला त्याचा विचारात हे कळलंच नाही कि सकाळ झाली.. मग निशांत उठला तिथून आणि गाव भरात चौकशी करू लागला... कि रात्री कोणी मुलगी त्याचा झोपडी जवळ आली होती का... निशांत गावात सगळ्यांना त्या मुली चा वर्णन करून सांगत होता कि "चंद्रा सारखी सुंदर दिसते ती लांब लचक कमरे पर्यंत तिचे केसं आहेत सफेद रंगाची साडी नेसली होती"... पण कोणालाच अश्या मुली बद्दल माहित नव्हतं...

निशांत सगळ्यांना विचारून विचारून थकला आणि कंटाळून मग सरदार कडे आला... सरदार ने निशांत ला बघताच विचारलं...

"ये बाळा बस्स, आणि हे काय चालू केलाय नवीन मी ऐकलं कि गाव भरात तू कोणत्या तरी सुंदर मुलीला शोधतोय, आज पर्यंत तुझा मागे मुली फिरायचे आणि आज तू मुलींच्या मागे फिरतोय, कोण आहै हि नक्की सांग जरा मला पण"...

"हो बाबा बरोबर ऐकलं आहे तुम्ही, पण काय सांगू आता तुम्हाला"..... निशांत ने सरदार ला रात्री घडलेलं सगळ शांत पणे बसून सांगितलं सगळ ऐकल्यावर सरदार ने थोडं वेळ घेतलं आणि मग निशांत ला बोलले...

"बाळा बघ आपण जंगलात रहातो, आणि मला माहित नाही कि तू भूत किंवा आत्मा अश्या गोष्टींवर विश्वास ठेवतो कि नाही पण अश्या जाग्यावर, अश्या जंगलात भूत वगैरे हे फक्त बोलण्या साठी नव्हे खरच असतात.... अश्या डोंगरांवर किती तरी लोक अशी असतील ज्यांनी आपला जीव इथं गमवला असेल... म्हणून तू त्या पोरी चा नाद सोड... आणि विचार करू नकोस आणि घाबरू पण नकोस, हव तर आज ची रात्र तू इथं थांब माझा घरात"...

निशांत हे ऐकून विचारात पडला, पण... त्याला हे पटत नव्हतं कि ती मुलगी भूत असेल निशांत सरदार ला... बोलला

"नाही बाबा मी येतो, मी नाही घाबरत, चला येतो मी".... एवढं म्हणत निशांत झटकन तिथुन निघुन आला....

निशांत घरी आला, त्याला सारखं त्या मुलीचं ते सुंदर पाय आणि तिचं रुपेरी चेहरा दिसत होता... विचार करत निशांत झोपला, आज काय माहित पण त्याला झोप लागली, रात्र-रात्र जागनारा निशांत आज निवांत होऊन झोपी गेला.....

अचानक मध्य रात्री निशांत ची झोप मोड झाली, निशांत घरा बाहेर येऊन दगडा वर बसला... मस्त वातावरण होता थंड गार वारा आणि चांदणी रात्र, निशांत त्या मुलीला.. आठवत बोलला....

"जगण्याची ओळ तू, तू जगण्याची आस...

पायी तुझ्या मन माझं, तुझ्या हाती माझं स्वास".......

निशांतचा हा वाक्य पूर्ण होताच जेव्हा निशांत ने समोर बघितलं तर.... लांब कुठून तरी एका कालोखातून, "श्वेत चाँदनी जणु चालत येत आहे"....

ती मुलगी निशांत च्या समोर येऊन थांबली आणि निशांत ला अत्यंत शांत नजरेने पाहू लागली.....

"मला माहित होतं की तू येशील, खात्री होती मला विश्वास होता आणि माझा विश्वास खरा निघाला"... निशांत त्या मूली समोर बघत अतुरते ने बोलला......

ती मुलगी हे ऐकून ही शांत होती, काहीच बोलत नव्हती.... अगदी शांत वातावरण होता, व निशांत ही अगदी शांत होऊन बस्स त्या मुलीला बघत होता, आणि ती मुलगी ही निशांत ला बघत होती... काही क्षण असेच गेले व काही क्षणांनन्तर स्वताःची शांतता मोडत ती मुलगी बोलली.....

"तू इथं रात्रि च्या वेळी रोज असा का बसून रहातो, तुला झोप नाही का येत"....???

"किती सुरेख आवाज आहे तुझा.... असं वाटतं की कानात कोणीतरी सरगम छेडली आहे... मला तर वाटत होतं की तू बोलनारच नाही माझ्यासोबत, पण तुझा आवाज ऐकून.... आवडलं खूप आवडलं".......... निशांत अगदीच प्रेमाने बोलला....

"जीवन जगन्यासाठी असतं, है जीवन जे तुला भेटलं आहे त्याला तू खुश होऊन जगला पाहिजे, अस काय आहे की तुला जगायचं नाहीये"...... ती मुलगी बोलली

"हो बरोबर बोलतेस तू, पण काय करू, कोणासाठी जगु मि, माझ्या कड़े जीवंत रहान्याचं काहीच कारण नाहीये"..... निशांत खाली मां टाकून एकदम शांत स्वरात, उदास होऊन बोलला.....

"स्वतः साठी जग, स्वतः आपलं आयुष घडव है कारण कमी आहे का जगण्याचं".......

"स्वतः साठी नको, पण तुझ्यासाठी जगनार, हेच कारण बस्स आहे"....... त्या मुलीला बघत निशांत अगदी प्रेमाने बोलला....

निशांतचे है असे प्रेमळ शब्द ऐकून ति मुलगी जरा हसली व निशांत कड़े प्रेमाने बघत बोलली....

"खूप प्रश्न असतील ना तुझ्या मनात, की मी कोण आहे इथं कशी एवढ्या मध रात्री"....???

"हो आहेत ना, मनात भरपूर प्रश्न आहेत, पण या क्षणी मला काहीच विचारायचं नाहीये, अस वाटतं की हा क्षण इथंच थांबून जावं.... मी तुला असाच बघत राहू... तुझ्या रूपाची तारीफ करत बसू".....

"बरं अस आहे का... माझा रूप एवढा आवडला तुला"...

"हो खूप, तुला.. तुला माहित आहे, काल जेव्हा मी खाली पडलो बघ... डोळे उघडताच मी पाहिलं की समोर अत्यंत सुंदर पाय, जणु मी माझ्या देवाच्या चरणात येऊन पडलो... तुझे हे सुंदर पाय बघून मला मनात असा वाटलं की.... यां पायांवर माझा जीवन आहे व यावरच माझा मरण"...

हे ऐकताच त्या मुलीने निशांत ला बोलताना अडवलं आणि बोलली.....

"नाही... मी तुला मरू नाही देणार, मि आहे ना, मि असताना असं कस तुझा जीव जाऊ देनार, तुला नाही मरू देनार मी, असा विचार ही करू नको कधी"......

निशांत हे ऐकून शांत झाला... ती मुलगी येऊन निशांत च्या बाजूला त्या दगडावर बसली आणि निशांत ला... एकदम शांत स्वरात बोलली...

"बघ ही चांदणी रात्र, हे चांदणे हे.... हे आपल्या साठीच आहे, आज चा हा चंद्र, हा चंद्र बघ किती सुंदर आहे, हे.... हे आपल्या साठीच आहे, हा थंडगार वारा हा शांत वातावरण किती मस्त आहे, हे.... हे आपल्या साठीच आहे".......

निशांत हे सगळ ऐकून खूप खुश झाला आणि तिला बोलला...

"हो,हे आपल्या साठीच आहे"...

ती मुलगी त्या दगडावरून उठली, आणि निशांत ला बघत अगदी शांत स्वरात, प्रेमाने त्याच्या जवळ हात देत बोलली...

"चल माझं हात पकड मी तुला आपल्या सुंदर स्वप्न वनात घेऊन जाते"......

निशांत ने काही विचार न करता त्या मुलीच्या चेहर्या समोर बघत हळूच तिचा हाथ धरला, आणि तिच्या मागे मागे चालू लागला, चालत चालत ते दोघं थेट वनात आले इथं एका बाजूला पाण्याच्या मोठा धबधबा तर दुसऱ्या बाजूला... हिरवं गार रान... नदीच्या किनाऱ्या ला लागून सुंदर सुंदर फुलं, निशांत ला अस वाटत होतं की स्वर्गात आलोय आपण......

त्या मुलीने निशांत ला विचारलं..... "हे बघ आपलं स्वप्न वन, कस वाटलं तुला"...???

"खूप सुंदर आहे आपला हा स्वप्न वन, मला खूप आवडलं... खूप सुंदर आहे"...

"तुला वर्क सांगू का"....?? ती मुलगी

"हो बोलना"...... निशांत

"मी रोज लपून तुला बघते, किती तरी दिवसा पासून, आणि नशीब माझं की मी काल वेळेवर

आली नाहीतर".....

"हो नशीब माझं की तू आलीस... मला जगण्याची आस मिळाली, बस्स आता एकच इच्छा आहे माझी".....

"मी आली ना, आता तुझी सर्व इच्छा पूर्ण होतील... बोल तर फक्त काय हवं आहे तुला"...

"काय नाही, बस्स आता मला तू भेटलीस जग भेटलं, आता बस्स मी जर मेलो तरी हरकत नाही माझी एकच इच्छा आहे जर काय मी कधी मेलो तर तुझ्या पायावर डोकं ठेवूनच मरू"...

ती मुलगी हे ऐकून अगदी रागात बोलली... "परत कधी मारण्याचा बोलू नकोस... माझं जीव आहेस तू... मी जीव देईन पण तुला काय होऊ देणार नाही"...... एवढं बोलताच ति मुलगी शांत झाली.. निशांत ही शांत उभा होता... तेवाच त्या मुलीने निशांत जवळ बघितलं आणि शांत स्वरात... अगदी प्रेमाने बोलली....

"बस्स तू बोलतोस ना माझ्या पायी तुझा मन आहे... तसच तुझ्या मिठीत माझं जग आहे"....

हे बोलून त्या मुलीने आपले दोन हात लांब करून निशांत ला मिठीत घेण्याचा इशारा केला... निशांत हळूच त्या मुलीचा मिठीत शिरेल तितक्यात ती मुलगी मागे सरकली आणि जाऊ लागली...

निशांत ने तिचा हात धरला आणि तिला थांबवत बोलला...

"कुठे जातेय तू, थांब... मला सॊडून जाशील"...

"हो पहाट होणार आहे मला जावं लागणार, जाऊदे मला"...

"नाही मी तुला नाही जाऊ देणार"...

"जर आज नाही जाऊ दिलं तर उद्या मी काशी भेटेन माझ्या राजा ला"....

"पण मी तुला तोवर कुठे शोधू"...

"मला कुठेच शोदायची गरज नाहीये, मी तर तुझ्या जवळच आहे नेहमी, तुझ्या हृदयात, तुझ्या मिठीत... तुझी सावली"...

हे ऐकताच निशांत ने सावली चा हाथ सोडला... आणि ती तिथून निघून गेली... निशांत तिचा पाठलाग करू लागला नेमकं ती कुठे जातेय ते बघायला... पण नेमकं निशांत त्याचा झोपडीच्या इथं येऊन थांबला व सावली त्याला कुठेच दिसली नाही....

निशांत विचारात पडला की सावली गेली कुटे, निशांत ला काय कळे ना कि काय करावं... उडवस्त होऊन निशांत दगडा वर येऊन बसला.... काही वेळ नन्तर निशांत उठला आणि गाव कड आला, निशांतनि ठरवलं की आज तर नक्कीच हे माहीत करून रहाणार की नेमकं सावली

कोण आहे, निशांत ला हे तर खात्री झाली की सावली भूत किंवा आत्मा नाहीये....

निशांत ठरवल्या प्रमाणे गावात प्रत्येक घरात सावली ला शोधू लागला... निशांत गावत सगळ्या मुलींना नीट बघत होता व ज्या मुली निशांत कडून चेहरा लपवत होते, निशांत त्यांचे पाय बघुन ठरवायचं की ही सावली आहे की नाही... असं करत सकाळ ची संध्याकाळ झाली व निशांत चौकशी करून दमला.....

निशांत कंटाळून सरदारच्या घरी पोचला... सरदार ने निशांत लांबून येतानाच ओळखलं व जसा तो आला तसच त्याला विचारलं.....

"ये आज परत चौकशी करत होता"...

"हो बाबा,आज पण त्याच मुलीला शोधत होतो, बर आधी जरा पाणी द्या, तहान लागली आहे खुप"....

"बरं थांब"... ऐ बाळा ऐक जरा, निशांत आलय पाणी दे त्याला"...

निशांत ला पाणी आणून दिलं, निशांत पाणी पिऊन शांत बसला... थोडा वेळ पाणी पिल्या नन्तर निशांत च्या चेहऱ्यावर एक स्मिथ हाश्य आलं.... जणु जस त्यांनी त्याचा अभाड जिंकलं....

निशांत ला असा गालातल्या गालात हसताना बघुन सरदार ने विचारलं....

"अरे काय झालं तुला.... बोल, काय झालं असं अचानक हसायला लागलास"...

"काय नाही बाबा बस्स तुम्ही विचारत होते ना त्या मुली बदल"...

"हो बोल की काय झाला बाबा त्या मुलीचं"....

"ती काय भूत किंवा आत्मा नाहीये... माझी स्वप्न सुंदरी आहे".....

"म्हणजे, तुला ती मुलगी भेटली"....

"हो बाबा मला माझी स्वप्न सुंदरी भेटली".....

"कोण आहे मग ही मुलगी आपल्याच गावात रहाते की".....???

"हो आपल्याच गावात रहाते".....

"मग कोण आहे ती सांग मला"......

"सांगायचं काय बाबा तिला घेऊन येईन मी इथे तुम्हाला भेटवायला"...

"बरं..... अस व्हय, तरी एकदा सांग तर आहे कोण तुझी स्वप्न सुंदरी"....

निशांत शांत होऊन सरदार कडे पाहू लागला आणि मग झटकन बोलला.....

"बाबा मी निघतो, पण उदया येईन मी आणि मग तुम्हाला सगळ सांगतो, पण आता मी निघतो"...

सरदार निशांत ला हाक मारू लागले..... "अरे बाळा थांब"... पण निशांत थांबला नाही आणि तिथून निगुन गेला....

निशांत खूप खुश होता... नुसतं सावली चा विचारात हसत होता... घरी आल्यावर आरसा समोर उभा राहून स्वतः सोबत बोलू लागला...

"बघ शोधून काडलं ना तुला, माझी सावली फक्त न फक्त माझी"....

आणि शांत होऊन आरश्यात पाहू लागला... बघत बघत निशांत ला आरश्यात सावली दिसू लागली... आणि तिला बघताच निशांत बोलला...

"पाहता तुला एक क्षणी, मन वेळे गुंतले....

वाट सुचे ना मनाला, जाऊ आता मि कुठे...

सोडून तुला एक क्षण, जगता येई ना मला..

साथ मिळे तुझा बस्स, हेच मनाला कळे".....

निशांत हे बोलताच सावली कडे पाहू लागला... आणि एक क्षण डोळे बंद केले व नन्तर डोळे उघडताच निशांत ने पाहिलं... की आरश्यात कोण नाहीये ना कोण त्याचा आजू बाजूला आहे... निशांत हसत हसत बोलला...

"बघ कसा वेडा झालोय मी जिथं तिथं बस्स तूच दिसतेस, सारखे तुझेच भास होत असतात मला"......

निशांत आता बस्स रात्र होण्याची वाट पाहत होता... वेळ जाता जात नव्हता, निशांत नुसतं चकरा मारत होता घरा बाहेर... आणि मग शेवटी ती वेळ आली जेव्हा.......

"चांदयणाचा चमक्ता प्रकाश हिरव्या जमिनी वर शोभु लागला"... आणि निशांत स्वप्न वनात जिथं त्याला सावली भेटणार होती तिथं येऊन थांबला...

वनात नदीच्या किनाऱ्या जवळ निशांत येऊन बसला... आणि दुसऱ्याच क्षणीं सावली आली... सावली ला बघताच निशांत उभा रहायला आणि सावली बोलली...

"बघ आली ना मी".......

"नाही कुठे गेलीच नाहीस तू, दिवसभर जवळच होतीस... जेव्हा वाटलं डोळे बंद करून तुला मन भरून पाहिलं मी"...... निशांत

"अच्छा"........

"हो मग काय"......

निशांत ने सावली चा हाथ पकडला आणि तिला खाली बसवलं व स्वतः ही तिच्या समोर बसला... अगदी शांत वातावरण आणि सुंदर दृश्य होता.... निशांत आणि सावली एक मेकां मध्ये गुंतून गेले... निशांत बोलला...

"स्वप्न जाणून पाहिलं तुला...

मन जाणून जपलं...

जीवन जाणून शोधलं तुला

प्रेम जाणून मनात भरलं".....

"अच्छा... वाहहह, मस्तच".... निशांत चे अशे प्रेमाचे शब्द ऐकून सावली लाजली आणि बोलली.... "बरं.... अजुनही फक्त मनात भरलं आहे मला".....

"मनात तुला ठेवून, पाहिलं मी बस्स तुला...

जगात दुसरं ना दिसे कोणी, दिसे बस्स तूच मला....

मन आहे माझं तू, तूच माझ्या जगण्याची आस.....

जीवन माझं तू, तूच पाहिला प्रेमाचा स्वाश".........

हे ऐकून निशांत अगदी प्रेमाने सावली समोर पाहू लागला.... व बोलला "पहिला प्रेमाचा स्वाश हम्म्म्म थांब"....

"स्वप्नात दिसे जशी, प्रत्यक्षात आण...

किती आहे प्रेम तुझ्यावर, हे न बोलता जाण"...

"अच्छा असं आहे का, नुसतं स्वप्नं आहे का मी"...... सावली थोड़ चीडून बोलली

"स्वप्न नाही आहे हे, जरा प्रत्यक्षात बघ...

समोर उभी आहे मी, मन भरून प्रेम कर...

हृदयाला हृदय अस जोड, की जीव एक होउदे...

तुझ्या मिठीत मला अस भर, की स्वाशही एक होउदे"......

निशांत है ऐकून प्रेमाने भरला, शांत होऊन सवाली कड़े प्रेमाने पाहू लागला, निशांत कड़े सवाली च्या उत्तर साठी शब्दच नव्हते......

"वाहह! जशी तू आहेस तसेच तुझे शब्द ही तुझ्यासारखेच सुंदर आहे".... निशांत

अश्याच सुंदर प्रकारे प्रेम शब्दांन च्या भाषेत सावली आणि निशांत आपलं प्रेम व्यक्त करत होते...

निशांत मग सावलीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला.... व सकाळ झाली आणि सावली तिथून निघून गेली परत रात्री यायच्या वाचन देऊन.....

दिवस असेच जात होते... निशांत रोज रात्री स्वप्न वनात येऊन थांबायचा, आणि सावली तिथं त्याला भेटायची व पहाटे सावली निघून जायची.....

निशांत चा प्रेम सावली साठी दिवसं दिवस वाडत होता, निशांत सावली सोबत भविष्य बघत होता... तेव्हाच एक दिवस निशांत ने ठरवलं की सावली आज सग सांगावं...

निशांत येऊन स्वप्न वनात आला... सावली इथं त्याची वाट बघत थांबली होती...

"आज मात्र तुला उशीर कसं झालं"..... सावली

"काय नाय असच"....

"कसं गेला आजचा दिवस तुझा".... "जेवलास तू, काय झालं माझ्या शोनाला, आज खूप शांत शांत दिसतोय"....

"काय नाही".....

निशांत ने सावलीचा हात पकडून तिला खाली बसवलं व तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला... तिला बोलला... "डोकं दुखतंय खूप"......

"अरे डोकं दुखतंय बरं थांब मी चेपून देते"..... सावली निशांत चा केसात हात फिरवत होती व निशांत निवांत होऊन झोपी गेला... तशीच सावली ही निशांत छातीवर डोकं ठेवून झोपी गेली....

सकाळ झाली... पहाटे सूर्याच्या प्रकाश पडताच सावली तिथून जाऊ लागली पण निशांत ने तिचा हात धरला व तिला थांबवत बोलला...

"सावली हे असं लपून लपूनच भेटायचं का...??? मला हे नाही आवडत की आपण असे लपून लपून भेटू, मला तुझ्या सोबत जगायचं आहे... माझा जीव आहेस तू, तुझा सोबत लग्न करून एक सुखाचा जीवन हवं आहे मला"......

सावली हे ऐकताच थांबली व निशांत चे दोनी हाथ पकडून बोलली...

"हो मला ही आवडेल पण हेच बरं आहे".... "आपले लग्न कस..?? कस शक्य होईल हे"...

"होईल, सगळ होईल .... तू काळजी करू नकोस"...... "सावली शांत होऊन ऐक, मला हे माहीत आहे की तू कोण आहे, त्या दिवशी गावात जेव्हा मी तुला शोधत होतो तेव्हाच कळलं मला आणि तू काळजी करू नकोस मी स्वतः तुझा घरी येऊन तुझा बाबा सोबत बोलनं करेन"...

हे ऐकून सावली घाबरून बोलली.... "नाही निशांत नको... मला खूप भित्ती वाटते, बाबा ला काय सांगू नको".... "तू आधी मला वचन दे की, तू घरी नाही येणार या विषयावर बाबां सोबत काही नाय बोलणार"...

"अरे माझी शोना शांत हो, शांत हो माझी सावली का घाबरतेस, अरे मी आहे ना... काय नाय होणार, मी बोलतो ना बाबा सोबत, हे असं किती दिवस चालणार आणि जर चुकून बाबांना माहीत पडलं तर त्यांना किती वाईट वाटलं".......

"नाही निशांत आपण असच भेटत जाऊ, पण आता काही नको... ऐकना माझा तू बाबांना काय सांगू नको, पुढचं नन्तर बघूया ना आता के एवढी घाय कराची, आता नको ना निशांत मला भीती वाटते".......

"बरं नाही सांगत मी बाबांना काय, शांत हो तू, शांत हो"...

सावली शांत झाली व निशांत ला बोलली.... "चल जाते मी, खूप उशीर झालं आज तर"...

"हो जा सावकाश जा... आणि काळजी करू नकोस".....

"हा जाते".... सावली वळून जात होती व निशांत तिला बघत होता... सावली कही पाउल चालत पुढे गेली, तितक्यातच निशांत ने सावली ला हाक मारली आणि बोलला... "सावली काळजी करू नकोस शांत होऊन जा"......

सावलीने हे ऐकून निशांत कडे पाहिलं व काय न बोलताच निघून गेली... अस वाटत होतं जस सावली चा मनात काय तरी आहे, जे सावली तिच्या सोबत घेऊन जात आहे......

भरपूर विचार केल्यावर निशांत ने ठरवलं की थोडे दिवस असेच जाऊदेत मग पुढचं पूड ठरवायचं... निशांत ने हे ठरवल्या वर... दुपारी निशांत सरदार च्या घरी आला व सरदार ला.. हाक मारली

"बाबा आहात का घरी".....???

"हो बाळा"..... घरातून सरदारने उत्तर दिले, सरदार बाहेर आले व खाट टाकून दोघे बसले...

"आज दुपारचं इथं, सगळ ठीक आहे ना, एवढं उन्हात इथं, असा अचानक काय झालं बाळा"... सरदार

"काय नाही बाबा असच आलो"..... निशांत

"बर बर बस्स, काय चहा वगैरे घे".... सरदार ने हाक मारली अरे ऐ बाळा निशांत आलाय जरा चहा ठेव...

"हो बाबा "... घरातून आवाज़ आला...

"मग बाकी काय, बोल बाळा, बर ते जाऊदे त्या मुलीचं काय तू बोलत होतास की भेटायला आणशील भेटली का ती मुलगी"...

"हो बाबा भेटली ना ती मुलगी"........

"वाहहह चांगलाय की मग, पण आहे कोण ती मुलगी"......???

"बाबा आपल्याच गावातली आहे आणि वेळ आल्यावर कळवतो तुम्हाला नक्की काय ते"......

तितक्यात..... "हे घ्या बाबा चहा"...

"हा आधी निशांत ले दे"......

"नको बाबा, चहा नको आता, मी जातो घरी...... खूप थकलोय, जरा आराम हवाय".....

"अरे चहा पिउन जा"...

"नाको बाबा एवढ्या गरमीत चहा नको आता... यतो मि"

"बरं बाळा संभाडून जा"...

"हो बाबा येतो"... निशांत घरी आला... विचारांच्या चालत निशांत झोपी गेला.......

--------------------------------------------------------------------------------------------------------

रात्र झाली, निशांत सावली ची वाट बघत स्वप्न वनात येऊन थांबला होता... "रोज रात्री कधी इतका काळोख नसतो जेवढा आज वाटत होता... चंद्र जणु कुठं रुसून बसला होता"...

निशांत रात्र भर सावली ची वाट बघत थांबला, पण सावली आली नाही आणि वाट पाहता सकाळ झाली... निशांत रात्र भर तिथं तसाच थांबला होता, निशांत ला खूप राग येत होता की

सावली का नाही आली... आणि त्याला तितकीच काळजी वाटत होती सावली बद्दल... असेच विचार करत निशांत तिथून उदास होऊन निघून आला.....

निशांत सावली च्या घरा च्या इथं येऊन लपून लपून सावलीला बघत होता, पण जस सावली ला कळलं की निशांत बघतोय सावली ने निशांत कड़े दुर्लक्ष केलं आणि जाऊन लपली.... है बघून निशांत गरगरला, त्याला कस तरी वाटत होतं, निशांत खुप उदास झाला व तिथुन निघुन आला.....

निशांत आता रोज असच करायचा, रोज सावली ची वाट बघत.... रात्र रात्र भर थांबायचा, कधी स्वप्न वनात तर कधी घराच्या इथं बसून रहायचा.... पण सावली,ती नाही यायची, रोज सकाळ झाल्यावर निशांत नुसतं गावात जाऊन लपून सावली ला एक नजर पाहण्यासाठी फिरत रहायचं पण सावली निशांत ला पाहताच लपून जायची... नुसतं ती निशांत ला पाहून दुर्लक्ष करायची.....

निशांत आता खूप कंटाळला होता, त्याला खूप राग यायचा की सावली अस करते पण तरी तो नुसतं तिचाच विचार करत रहायचा.... निशांत ला काय कळे ना की नेमकं काय होत आहे, सावली च्या मनात काय आहे..... ना ती मनातलं काय सांगते, ना काय समजतंय, करायचं तर काय.......

एक दिवस रोज सारखच, निशांत सावली ची वाट बघत घरा बाहेर बसला होता, रात्रीचा कालोख त्याचा जोरावर होता, निशांत विचारात गुंतून अगदी उडवस्त झाला होता... न सुट्टा त्याचा डोळ्यातून पाणी आलं... आणि निशांत रडू लागला... व रडत रडत निशांत बोलला....

"सावली बस्स मी विचार केला होता की तू भेटलीस जग भेटलं, पण न तू काय बोलतेस न काय मला समजतंय, मला नाही कळत की माझी काय चूक झाली, की तू असं मला सोडून गेलीस... पण जर तू मला सोडून खुश राहू शकतेस तर ठीक आहे, मी इथंच तुझी वाट पाहणार नेहमी कधी तरी तुझा मनात येईल... कधी तरी तुला वाटेल आणि तू येशील तुझ्या राजा समोर, तुझ्या निशांत कड़े आणि मला तुझ्या मिठित घेशील, मला खात्री आहे की तू येशील, मी विचार केला होता की आता कधी रडायची वेळ येणार नाही, माझ्या मनात परत कधी मारायचे विचार येणार नाही,पण हे काय होत आहे तू अस का करतेस त्याची मला काहीच जाणीव नाहीये, न तर मी तुला चुकुचं बोलू शकतो पण मला मात्र हे ही कळत नाहीये की माझी काय चुकी झाली आहे".........

निशांत हे बोलताच शांत झाला आणि डोंगरयाच्या टोकावर येऊन थांबला... निशांत डॉगरावरून खाली पाहू लागला... उंच डोंगरावरून खाली जमीन ची टोक ही दिसे ना, निशांत ने वर आभाळा कडे बघितलं जस त्याने मनातल्या मनात काय तरी ठरवलं आणि मग समोर पाहता निशांत ने लांब स्वाश घेतला आणि पुढे पाऊल टाकताच डोळे बंद केले..........

"है अरे.... काय करतोय पळ न लवकर, अरे शांत बसा न नाहीतर तो येड़ा उठला तर दगड़ फेकन आपल्यावर"....

छोटे छोटे पोरं, खेळत होते... व समोर झाड़ा खाली एक मानुस झोपला होता, है पोरं सारखं त्या माणसाला हैरान करत होते, रोज है पोरं त्या माणसाला चिड़वायचे, व त्याची गमत करायचे..... आज पण ही पोरं तेच करत होते... एका मुलाने त्या माणसाला दगड़ फेकून मारला,त्या माणसाला तो दगड़ डोक्यावर लागला, मार लागल्या मुळे त्याला डोक्यावरुन रक्त निघू लागलं, तो मानुस झटकन उठला आणि त्या पोरांन च्या मागे लागला, त्याना शिव्या डेत त्यांचा मांगे मांगे धावत होता, आणि तो मानुसही त्यांचा पाटी दगड़ फेकायला लागला.... ते छोटे छोटे पोरं, त्याच्या वर हसत होते, त्याला पागल... मंद म्हणत चिदवत होते, त्या मूलांचा पाटलाग करत तो मानुस दामला आणि धावता धावता अचानक पडला... पडल्या सकट खुप जोराने ओरडला..... "सवाली...... ईईईईईईईई".......

हा मंद मानुस दूसरा कोण नव्हे हा निशांत होता.... निशांतच्या डोक्यावरुन रक्त येत होतं, रक्ताने त्याचा चेहरा लाल झाला होता... धावताना पडल्या मुळे त्याला पाया ला पन मार लागला होता, पण तरी तो सावली सावली करत जसा तसा उठला.... पायला लागल्या मुळे निशांत ला चालता

येत नवतं... तो बिचारा जसा तसा लंगदत लंगदत चालत एका झाड़ा खाली येऊन बसला....निशांत ची तर हालात झाली होती... फाटलेले कपड़े... किती तरी दिवस बिना अघोलीचा असाच फिरत होता तो.....आख्या गाव भरात निशांत असाच फिरत रहायचा.....

निशांत त्या झाड़ा खाली येऊन बसला... आणि रडत रडत त्या मुलाना शिव्या देउ लागला...

"साले कुतरे कुठले, मला मरालं, साल्यानो समोर येऊन माराना हिम्मत असेल तर, साले हलकट कुठले... सोड़नार नाही मि कोणाला, मी सावली ला सांगेन ना, खुप मारेन ती मग, एका एका ला पकड़ूँ पकड़ूँ मारेन साले मेले कुठले मला मारलं"......

"सावली खुप दुखतय सावली"..... निशांत खुप रडत होता... आणि रडता रडताच निशांत झोपी गेला....

निशांत त्या झाडाला टेकुन आरामात झोपला, अचानक गरम हवाचा.... ठंड गार वाऱ्या मध्ये परिवर्तन झाला.... सगी कड़े शांतता पसरली, आभाळा चा पांढऱ्या रंगात केसरी रंग उमटून दिसू लागला... तेवाच एका बाजूने ठंड वारया सोबत सावली हळू हळू चालत येत होती.....

अत्यंत शांत वातावरण झाला होता, सावली निशांत च्या बाजूला येऊन बसली, सावली च्या चेहऱ्यावर तीच चंद्रा ची चमक दिसत होती व पांढऱ्या रंगाच्या साड़ी मधे सावली च रूप अत्यंत विस्मयकारक वाटत होतं.... सावली निशांत च्या बाजूला येऊन बसली, निशांत झोपुनच होता... त्याला तर सुधच नव्हती....

निशांत ला अश्या अवस्था मधे बघून सावली गरगरली, तिच्या डोळ्यातून झलकते अश्रु तिच्या मनाची भावना व्यक्त करू लागले... सावली उठली व जवडूनच पानी घेऊन आली व परत येऊन निशांत च्या बाजूला बसली, सावली ने निशांतचं डॉक तिच्या मांडिवर ठेवलं, निशांत च्या केसान मध्ये हात फिरवत सावली बोलली....

"खुप दुखतय ना...??? माहित आहे मला, पण काळजी करू नकोस, मि आहे न तुझ्यासोबत तुला काहीच नाय होऊ देणार मि"..... " काय हाल करून ठेवलं आहेस तू स्वतःचं, आणि बघ रक्त किती.... बाबा, आणि तू... राहुदे तू कधी काय बोलणार नहिस".... सावली थोड़ चिडूनच बोलली

मग सावली ने पाण्याने निशांत च्या चेहऱ्यावरुन रक्त साफ केलं, आणि त्याचा झखम ही पाण्याने साफ केले, मग निशांतचं डॉक मांडिवर ठेवून त्याचा केसात हात फिरवत... त्याचा समोर पाहू लागली.... सावली निशांत ला अगदी प्रेमाने निरखुन पाहत होती... सवालीच्या डोळ्यात स्पस्ट दिसत होतं निशांत साठी तिचं प्रेम आणि काळजी....

निशांत हळू हळू कलमळत उठला... आणि हल्के से डोळे उघाड़ताच त्याची नजर सावली च्या सुंदर चेहऱ्यावर पडली...... आणि निशांत ने एकदा परत डोळे बन्द केले, डोळे बन्द केल्या सकट निशांत ने बघितलं की सावली त्याचा समोर थाम्बली आहे आणि निशांत ला बघून गलतल्या गालत हसत निशांत ला बोलली.......

"मिठित घे ना तुझ्या शोना ला"...... व एवढं म्हणत सावली ने तिचे दोनी हात लांब केले व निशांत अचानक दचकुन उठला....

उटल्यावर निशांत ने पहिला की त्याचा आजु बाजूला कोणच नहिये... व सावली ही तिथ नव्हती.... निशांत चा चेहरा उतरला, लहान पोरांना जसं काय आवदीचं न भेटल्यावर चेहरा फुगुन बस्तात, अगदी तसाच तोड़ करून सावली सावली ओरडू लागला.... पण सावली तिथ नव्हती....

निशांत मोठ मोठ्याने सावली सावली ओरडत होता, तेवाच तिथुन एक मानुस जात होता, त्याने निशांत ला अस ओरडताना पाहिलं व जिज्ञासाने त्यानी निशांत ला येऊन विचारल....

"अरे मित्रा, काय झालं तुला, कोण आहेस तू, डोक्यावर मार लागल आहे आणि कपड़े ही फाटलेल आहेत, काय झालं काय नक्की तुझ्यासोबत"......

निशांत ने त्या माणसाच्या शब्दांकड़े दुर्लक्ष केलं, व तो इथ तिथ बघत सावली सावली ओरडू लागला...

"अरे बाबा कोण आहे ही सावली, कुठे आहे ति"..... तो मानुस जरा चिडूनच बोलला

सावलीचं नाव ऐकताच निशांत ने झटकन त्या माणसाचा हात धरला आणि एकदम प्रेमाने अगदी

लहान मुलांसरख गोंड अश्या हसू सोबत त्या माणसाला म्हणाला....

"सावली.... बाबा सावली ती सोडून नाही गेली सावली, सवालीईईईई"..... असं ओरडत परत बोलला... "ति कुठे नाही जाणार, सावली येईल, मला बोलली मिठित घेना बोलली"........

त्या माणसाने मनातल्या मनात विचार केला... "हा नक्कीच पागल आहे.. बावलट कुठला, मि ही कुठे फसलो यार, नक्कीच ही कोण...... हां सावली या ला प्रेमात दगा देऊन गेली असेल आणि हा बिचारा तिच्या मागे येड़ा झाला आहे.... देवा काळजी असुदेत जरा ह्याची"..... तो मानुस मनातल्या मनात स्वतः सोबतच बोलत होता...

त्या माणसांच्या हातात पिशवी होती, त्याने त्या पिशवितुन कागड़ा मध्ये बांधलेल्या २ चपात्या निशांत च्या हातात दिल्या व निशांत ला... इशारा करत म्हणाला...

"सावली ची वाट बघू नकोस... ह्यात चपाती आहे भूक लागली की खा".....

निशांत ने हसत हसत त्या चपात्या हातात घेतल्या, आणि तो मानुस मग तिथुन निघाला...

थोड़ पुढं गेल्यावर त्या माणसाने वळून बघितलं निशांत त्या झाडा खाली बसून चपाती खात होता... व अजूनही तो सावली सावली करत होता...

निशांत ला असं बघून तो मानुस बोलला...

"देवा असंही प्रेम नको देउस कोणाला की".... "शरीर मात्र शरीर, आणि जीव मात्र प्रेमाचा भदिर"...... "देवा जर प्रेम असं अस्त, तर असं प्रेम कोणाला अर्पण करू नकोस"...... स्वतः च्या मनाच्या भावना सोबत भांडत, अगदी रागात, निराश होऊन तो मानुस स्वतः सोबतच, अश्या कडव्या शब्दात बोलला... आणि मग तिथुन निघुन गेला....

निशांत असाच फिरत असायचा गावात, निशांत ला सावली ला सोडून दूसरा काहीच लक्षात नव्हतं, निशांत वेडा झाला होता, तो त्याच्या गावत जितः तो रहायचा, तिथुन खुप लांब निघुन आला होता, ह्या गावत निशांत ला कोण ओळखत नव्हतं, सगळे त्याला वेडा समजून हकलायचे, लोकं त्याला वेडा म्हणत शिव्या दयायचे, तर कोन त्याच्यावर दया करुण त्याला जेवन वगेरे दयायचे, छोटे छोटे मूलं त्याची मज्जा घ्यायचे, वेडा, पागल, मंद म्हणून त्याला चिड़वायचे, सारखं त्याला हैरान करायचे...

निशांत ची तर हालात झाली होती, त्याची अवस्था अशी झाली होती कि त्याला कोण ओलखु पण नाही शकणार की हा निशांत आहे, निशांत म्हणजेच अगदी शांत स्वभावा चा, त्याचे तो गोळ हसू, अधिचा निशांत व ह्या निशांत मध्ये अगदी जमीन आसमान चा अंतर होता... नेमकं वेळ माणसाला कुठे घेऊन येते हे कोणच समजू शकत नाही...

फिरता फिरता निशांत जवळच्या एका मंदिर पाशी पोहचला, मंदिराचा इथ येऊन तो इथ तिथ खायला काय तरी शोधू लागला पण त्याला काय भेटत नवतं, निशांत ला खुप भूक लागली होती.... निशांत खायचं शोधता शोधता, मंदिराच्या पाटी आला...

मंदिराच्या पाटी एक मोठा तलाव होता आणि तलवाच्या एका कोपर्या ला कचरा पडलेला होता, निशांत त्या कचर्या मध्ये काय खायला भेटतं का..?? ते शोधू लागला व त्याला त्या कचरयातून एक पिशवी भेटलि ज्यात थोडी चपाती व प्रसादी चे लाडू होते निशांत ते घेऊन तलवाच्या इथ बसला आणि त्या पिशवितुन लाडू काढून खायला लागला..... आणि खायच्या नन्तर निशांत तलाव च्या इतच कोपर्यात एका जागी झोपला....

रात्र झाली... सूर्या चा प्रकाशा ला खाली दाबत रात्रि चा अंधार पसरला... कालोखात तलवाच्या पाण्यात चंद्राचा प्रतिबिम्ब दिसत होतं... सगी कड़े शांतता होती... अगदीच शांत वातावरण आणि ठंड गार वारा, वारया मुळे पाल्या पाचोल्याचा अत्यंत घबरावनारा आवाज़ ऐकू येत होता... लांब लांब जितः परंत मानवीय नजर जाते, तिथ परंत कोणच दिसत नव्हतं....

निशांत तर गारटला होता, ठंड वातावरण आणि ठंड वारया मुळे निशांत ठंडीत कुड़कुड़त होता... तेवाच..... अचानक सगळ शांत झालं.... सगळी कड़े अंधार होता, तेवाच एक बाजूला चांदण्याच्या प्रकाश दिसू लागला... आणि त्या प्रकाशासोबत हळू हळू सावली चालत येत होती....

सावली येऊन निशांत जवळ बसली, जशिच सावली निशांत च्या बाजूला येऊन बसली निशांत ला थोडं बरं वाटलं, सावली ने निशांत च्या चेहऱ्यावर हात फिरवला, तसीच निशांत च्या अंगात उष्णता भरली, निशांत ला आता बर वाटत होतं....

सावली ने निशांत च डॉक जमीनावरुन तिच्या मांडिवार ठेवलं... आणि त्याच्या केसात हात फिरवू लागली.... सावली एकटक निशांत ला पाहत होती, मग तिने डोळे बन्द केले व स्वतः त्यांच्या जुन्या अठवनित गुंतून गेली....

"सावली, किती सुंदर आहेस तू, जेव्हा जेव्हा तुला पाहतो अस वाटतं की पहिल्यांदाच पाहतोय"...... निशांत

"अच्छा, असं का"...??? सावली

"असं का.... सांगतो, पन आधी जवळ ये".......

"जवळ"....???

"हा जवळ ये... नाही का येऊ शकत".....

"असं काय नाहीये"....

"हां मग येना जवळ"....

"हो बाबा येते बस्स खुश, घे आली'.....

"नाही अजुन जवळ"...

"बर है घे... आता बस्ससस"....

"थोडं अजुन जवळ ये ना"... सावली चक्क नजरेने ने निशांत ला पाहू लागली व हळूच निशांत च्या जवळ आली... सावली निशांत च्या अगदी जवळ होती, सावली च्या हृदयाचे ठोके वाढले, ति एकदम शांत झाली, निशांत ने सवालीचा हात पकडला आणि तिला खाली बसवलं, व स्वतः ही तिच्या समोर खाली बसला... दोघे एकटक एक मेकाना बघत होते... निशांत नजर ना चुकवता सावली समोर अत्यंत प्रेमाने... बघत होता, तेच सावली ने लाजून डोळे मिटून घेतले.....

निशांत ने पुढाकार घेत सवालीच्या गालावर हाथ फिरावला... तेच तितक्यात सावली ने निशांतचा हात तिच्या हातात घेतला आणि प्रेमाने स्वतः निशांत चा हात पकडून स्वतः च्या चेहऱ्यावर स्पर्श करू लागली...

निशांत सवालीच्या जवळ गेला आणि तिच्या मानिवर हात टाकून तीला जवळ ओडून घेतली, आणि हळूच तिच्या होटा ला होट स्पर्श केलं... स्पर्श करता मात्रच डोगांचा स्वास ही एक झाला... आणि दोगेहि प्रेमकीड़ा मध्ये गुंतले... काही वेळ नन्तर निशांत संतुस्ट होऊन सावली च्या मांडिवार डॉक ठेवून झोपला...

सावली च्या डोळ्यातून पाणी वाहु लागलं, जुन्या आठवणी आठवून सावलीचा मन भरून आलं व ति निशांत च्या चेहऱ्यावर हात फिरवत रडु लागली...

पहाट बस होणारच होती सावली ने डोळे पुसले व तिथुन निघुन गेली.....

दिवस असेच जात होते...... निशांत जेव्हा जेव्हा सावली ला आठवायचा सावली तेव्हा तेव्हा निस्वार्थ मनाने निशांत जवळ यायची......

दिवस आता असेच जात होते, मग हे दिवस वर्षांत बदले आणि १० वर्ष होऊन गेले..... निशांत तलावाच्या इतच पडून असायचा, मंदिराच्या इथून कधी भीक मध्ये जेवण तर पैसे मिळून जायचे....

एक दिवस निशांत त्याच मंदिराच्या तलवा पाशी बसला होता... व तेवाच काय तवाड पोरं तिथं तलावत पोहायला आले... त्यातून एक मुलगा निशांत ला बघताच बोलला...

"ऐ अरे तो बघ तो डोकरा, तो बघ ना तो येड़ा बसला आहे तिथं.... चल त्याची गंमत घ्याची का"....

"हो चला रे थोड़ी मज्जा करूया".... बाकीचे पोरं म्हणाले

पोर निशांत ला पागल, मंद, येड़ा... करून हॉक मरु लागले....

निशांत है ऐकून दगड़े उचलून त्या पोरांना मारू लागला....

तेवाच समोरून ही एका मुलाने निशांत ला दगड़ फेकून मारलं आणि निशांत ला दगड़ डोक्यावर लागला... जसच निशांत ला डोक्यावर मार लागलं... निशांत च्या डोळ्यासमोर अंधार पसरला, त्याला वाटत होतं की आखं जग गोल फिरत आहे, निशांत ला काहीच दिसत न्हवतं आणि तो बेशुद्ध होऊन तलावात पडला......

निशांत ला पाण्यात पडताना पाहून पोरं घाबरले आणि निशांत ला वाचवायच्या एवजी तिथुन पळत सुटले, निशांत बेशुद्ध झाला होता जणु त्याचात जीवच रहायला नव्हता, त्याचा शरीर अगदी खोल पाण्यात बूडत चालला होता... त्याच क्षणी खोल पाण्याच्या ठंड वातावरण अजुन ठंड झाला, निशांतचा अंग अगदी गाराटलं, आणि पाण्यात अचानक एका बाजूने प्रकाश उठुन निशांत च्या जवळ येऊ लागला.... समुद्रा मधली एखाद्या जल परी सारखी सावली निशांत जवळ पोचली आणि त्याच्या हाथ पकडून त्याला जवळ घेतलं.... निशांत ने मात्र एका क्षणा साठी डोळे उघडले, आणि पाहिलं तर सावली त्याच्या समोर होती... पण निशांत काय करण्याच्या मनास्तिति मध्ये नव्हता त्याचे डोळे परत बन्द झाले...

सावली त्याला पाण्याच्या बाहेर घेऊन आली, निशांत शुद्धित नव्हता... कही वेळ नन्तर निशांत ला सावली चा तो चेहरा जो त्याने पाण्यात बघितलं होतं ते अठावलं.... तेवाच निशांत च्या कानात लोकांच्या चाव चाव चा आवाज पडला आणि त्याने डोळे उघडले, डोळे उघडून बघतोय तर तलवाच्या इथ गावच्या लोकांची भीड़ जमली होती... त्या मुलानी गावत जाऊन लोकांना सांगितलं की तो वेडा पाण्यात पडला, म्हणून सगळे निशांत ला वाचवायला धावत आले... पण लोकांनी पाहिलं की तो तर पाण्याचा बाहेर तलावाच्या काट्यावर पडला होता....

निशांत हड़बदुन उठला, त्याच गर्दीतून एक मानुस निशांत जवळ आला आणि त्याच्या बाजूला बसून त्याला विचारलं....

"बाळा तू ठीक आहेस ना"...???

निशांत ने है ऐकून डोळे बंद केले व पाण्यातला तो दृश्य आठवत बोलला....

"सावली"....

"सावली....?? कोण आहे ही सावली... ??? ति पन पाण्यात पडली होती का, कोण आहे ति, कुठे आहे ति"....

तेवाच सगळे लोक त्या माणसाला बोलू लागले... "अरे जउद्या वेडा आहे हा मानुस, कुठे ऐकता ह्याचा, ह्यो तर नुस्तच त्या सवालीच्या नावाने गाने म्हणत फिरत असतो गाव भरात... जाऊद्या"

निशांत है ऐकून विचारात पडला... "है सगळे है काय बोलत आहे सावली बदल"... निशांत ला काहीच अठावतं नव्हतं... तेवाच निशांत ने त्या माणसाला विचारलं....

"बाबा मि कुठे आहे... कोनता गाव आहे हा"....

त्या बाबांनी है ऐकला आणि बोलले... "देवा तूच काळजी घे... बरं होऊ डे ह्याला".... म्हणत ते बाबा उठले व सगळे तिथुन निघून गेले.....

निशांत ला काही सूचत नव्हतं की काय करावं, तेवाच निशांत ची नजर तलावाच्या पाण्यात पडली, पाण्यात स्वतःच प्रतिबिम्ब बघून निशांत चकित झाला, वाढलेले केसं, दाडी वाडलेली, निशांत स्वतः ला असं बघून आश्चर्य चकित झाला.... स्वतः ला बघून निशांत ला है कळलं की गावचे लोक जे काय बोलत होते त्याच्या पाटी काय तरी सत्य आहे जे त्याला अजून ओळखायचं आहे....

निशांत स्वतः च्या चेहऱ्यावर हाथ फिरवत पाण्यात बघत होता... तेवाच झटकन निशांत उठला... आणि बोलला...

"सावली.... सवालीईईईईई"....... आणि सावली ह्या स्वर ची गूंज आख्या आभाळात पसरली.....

निशांत तिथुन धावत गावत आला, लोक आधी तर त्याच्या सोबत नीट बोलत नव्हते नुसतं त्याला वेडा समजून हकलत होते... पण काही चांगल्या लोकांमुळे त्याला है कळलं की तो त्याच्या गाव पासून अगदी लांब निघुन आला आहे.... व निशांत ला है ही कळलं की गेल्या १० वर्ष पासून वेडा होऊन तो या गावत फिरत होता.... सगळ समजल्यावर निशांत ने ठरवलं की तो शाक्य तो तितक्या लवकर त्याच्या गावत सावली कड़े जाणार...... आणि निशांत वेळ न घालवता स्वतः च्या गावा कड निघाला......

७ दिवसाच्या प्रवास नन्तर, निशांत त्याचा गावात पोचला जितं तो आधी रहायचा, जितं त्याला सावली भेटली होती.... व वेळ न घालवता निशांत धावत धावत त्याच्या झोपडी जवळ पोचला... निशांत सगळी कडे निरखून पाहू लागला...

"अजूनही काय बद्दलं नाहीये, सगळ तसच आहे... इतके वर्ष गाव कडून लांब होतो पण सगळ तसं च तसच आहे... जस वेळ काय मात्र थांबलाच होता"....

निशांत त्याचा घरा समोर पडलेल्या त्या दगड वर येऊन बसला, आणि दीर्घ स्वास घेत.... हळूच बोलला... "सावली".....

निशांत ने डोळे बंद केले, तेवाच अत्यंत ठंडगार वारा निशांत च्या शरीराला.... स्पर्श होऊन गेला, निशांत ला वाटलं जणु सवलीच त्याला हळूच स्पर्श करुण गेली....

निशांत तिथुन उठला, आणि सरदार च्या घरी पॉचला... आणि तिथ येऊन जोर जोराने हॉक मारू लागला...

" बाबा, बाबा आहत का घरी".....

निशांतचा आवाज ऐकताच सरदार झटकन घरा बाहेर पडले.... निशांत ला समोर पाहून सरदार आश्चर्य चकित झाले..... सरदार ला सुचत नव्हतं की नेमकं काय बोलावं, व सरदार काय बोलतील त्याच आधी निशांत ने अति उकसूक्ताने... सरदार ला विचारलं.....

"बाबा सावली कुठे आहे... सांगा ना, माफ करा बाबा मी तुमहाला हे पण नाही विचारलं की तुम्ही कशे आहात... पण आधी सांगा ना, बाबा सांगा ना लवकर सावली कुठे आहे"...... ???

सरदार कडे निशांत च्या प्रश्नाचा काहीच उत्तर नव्हता... सरदार शांत नजरेने निशांत ला बघत होते... सरदार ला हे कळलं की त्या दिवशी जे काय रात्री घडलं निशांत ला त्यातलं काहीच लक्षात नाहीये.... सरदार ची शांतता पाहून निशांत ला कसं तरीच होत होतं... न सुटता निशांत ने परत विचारलं....

"बाबा सांगा ना सावली कुठे आहे.... मला बघायचं आहे तिला"....

पण सरदार काहीच बोलत नव्हते... व काही क्षण नन्तर स्वतः ची शांतता मोडत सरदार बोलले....

"चल मी तुला सावली कडे घेऊन जातो"..... इतकं म्हणत सरदार पुढे निघाले व निशांत त्यांच्या पाटी पाटी....

दोघही थेट स्वप्नवणात पोचले जितं रोज निशांत आणि सावली भेटायचे... स्वप्नवन बघून निशांत खुश झाला... पण त्याला नेमकं हे कळत नव्हतं की सरदार का त्याला इथं घेऊन जात आहे... तेव्हा निशांत ने पाहिलं की सरदार एका जाग्यावर येऊन थांबले... निशांत ही सरदार च्या बाजूला येऊन थांबला..... निशांतला समोर बघून धक्का बसला...

"बाबा हे काय आहे तुम्ही कुठे घेऊन आले मला... मला सावली कडे".... इतकं बोलताच निशांत ने निरखून पाहिलं की ही तीच जागा होती जिथं तो सावली सोबत बसून असायचा.... व काही न

बोलता निशांत सावलीच्या मृत्यू कबर समोर बसला... आणि त्याच क्षणी निशांत च्या डोळयातून अश्रू वाहू लागले....

सरदार बोलले.... "बघ तुझी सावली"....

निशांत ने रडत रडत डोळे बंद केले.... व सरदार ला विचारलं कसं झालं हे सगळ... व तेव्हाच सरदार ने सांगायला सुरवात केली....

"त्या दिवशी जेव्हा तू माझ्या घरी आला.... आणि मी तुला विचारलं की कोण आहे ती मुलगी पण तू काही न सांगता.... असाच निघून गेला... चहा पण नाही पिलास, तुझ्या जायच्या दुसऱ्याच क्षणी... गावातला एक माणूस आला... ज्यांनी मला तुझ्या आणि सावली बद्दल सांगितलं... त्याने तुला व सावली ला इतच बघितलं होतं.... मला खूप राग आला.... की माझी मुलगी अस करतेय आणि तू ज्याला मी रहायला आसरा दिला, तू अस वागतोय..... हे ऐकून मी अत्यंत रागावलो सावली वर, व तिला खूप ओरडलो... मी सावली कडून वचन घेतलं की ती या पुळे तुला कधी भेटणार नाही, सावली तू आलास की तुला बघून दुर्लक्ष करायची, पण रात्री मी झोपल्या नन्तर लपून तुझ्या घरा पाशी येऊन तुला बघायची.... हे किती तरी दिवस असच चाललं.... पण मात्र नियती ला हे स्वीकार नव्हतं... आणि त्या दिवशी हे सगळ घडलं"......

निशांत चे डोळे बंद होते... व निशांत ला स्पस्ट सगळ दिसत होतं, जणू तो एक कोपऱ्यात थांबला आहे आणि सगळ काय त्याचा समोर होत आहे.... निशांत ने पाहिलं की तो एकटा त्याचा घरा बाहेर बसला आहे......

निशांत सावली ची वाट बघत घरा बाहेर बसला होता, रात्रीचा कालोख त्याचा जोरावर होता, निशांत विचारात गुंतून अगदी उडवस्त झाला होता... न सुट्टा त्याचा डोळ्यातून पाणी आलं... आणि निशांत रडू लागला... व रडत रडत निशांत बोलला....

"सावली बस्स मी विचार केला होता की तू भेटलीस जग भेटलं, पण न तू काय बोलतेस न काय मला समजतंय, मला नाही कळत की माझी काय चूक झाली, की तू असं मला सोडून गेलीस... पण जर तू मला सोडून खुश राहू शकतेस तर ठीक आहे, मी इथंच तुझी वाट पाहणार नेहमी कधी तरी तुझा मनात येईल... कधी तरी तुला वाटेल आणि तू येशील तुझ्या राजा समोर, तुझ्या निशांत कड़े आणि मला तुझ्या मिठित घेशील, मला खात्री आहे की तू येशील"....

निशांत हे बोलताच शांत झाला आणि डोंगरयाच्या टोकावर येऊन थांबला... निशांत डॉगरावरून खाली पाहू लागला... उंच डोंगरावरून खाली जमीन ची टोक ही दिसे ना, निशांत ने वर आभाळा कडे बघितलं जस त्याने मनातल्या मनात काय तरी ठरवलं आणि मग समोर पाहता निशांत ने लांब स्वाश घेतला आणि पुढे पाऊल टाकताच डोळे बंद केले..........

पण तितक्यात सावली ने त्याचा हात धरून त्याला... पाटी ओढला, निशांत हडबदला सावली ला समोर बघून चकित झाला... सावली निशांत समोर बघून रडत होती....

"वेडा झाला आहेस का.... तू, मी नाही भेटली तुला तर जीव देशील तू, माझा विचार नाही केला, माझा काय होईल मी काशी जगेन तुझ्याशिवाय".... सावली

सावली असं बोलत निशांत च्या मिठीत शिरली पण निशांत ने तिला अडवलं व दोनी हाताने निशांत ने तिची बाजू पकडली.... व तिला चिडून बोलला.....

"का मी कोण आहे... आणि का राडतेस तू, तू तर खुश आहेस ना... मग का आली आज इथं, मरू देना मला, हे रोज तुझ्या नजरेने दुर्लक्षपणा .... नाही सहन होत मला नाही आवडत, प्रेम आहे माझं तुझ्यावर... पण जेव्हा जेव्हा तू दुर्लक्ष करतेस ना मला बघून, तो प्रत्येक, क्षण प्रत्येक क्षण मला असं वाटतं की माझा जीव जात आहे...... पण तू सोड, कोणत्या हक्काने तुला बोलू काय... आहेस कोण तू माझी"..... निशांत

"शोना असं का बोलतोय तू, हो बरोबर बोलतोय तू चुकी झाली माझी, पण ऐक तर माझं, असं नको बोलूस की मी तुझी कोण नाहीये... मी तुझी सावली आहे, हाना... बोल ना शोना... फक्त तुझीच"..... सावली अगदीच दचकत बोलत होती... रडताना तिचा आवाज ही निघत नव्हता...

"नाय नको मला तुझी सहानुभूती.... काय बोलायची तू ते, तुझ्या मिठीत माझं जग आहे"..... निशांत अगदी रागात बोलला पण एवढं बोलताच तो शांत झाला आणि बोलला...... "सावली काय झालं तुला अचानक असं का वागलीस, सोड सगळ नाही ऐकाचं मला, बस्स तू आलीस माझ्या जवळ, एवढंच बस आहे.... पण ह्या पुढे अस नको करुस.... शोना रडू नकोस शांत हो.... शांत हो ना, माझी सावली, हो माझी सावली".....निशांत अगदी प्रेमाने बोलला....

"नाही मी तुझी गुनेगार आहे, बोल मला... ओरड, चीड माझ्यावर.... पण असं नको बोलूस की मी तुझी कोण नाहीये"....

"हो ग राणी नाही बोलत... आता जरा हस... हस ना"....

सावली शांत होऊन निशांत ला बघत होती... निशांत ही तिच्या डोळ्यात डोळे मिठून पाहत होता... सावली ने निशांत च्या चेहऱ्यावर हात फिरवला... आणि अगदी प्रेमाने बोलली...

"मी तुला काही नाय होऊ देणार.... आला मोठा शना लगेच चालला जीव द्यायला"...... इतकं प्रेम करतोस"....

"स्वतः पेक्षा पण जास्त"......

डोगांचं असं प्रेमळ बोलणं चालूच होतं..... की अचानक सरदार चा... आवाज सावली व निशांत च्या कानात पडला... दोघांनी समोर पाहिलं, सरदार समोर उभे होते अगदी रागात निशांत ला बोलले.....

"भाड्या, अनाथ आहेस ना तू शेवटी तसाच वागलास.... भिकाऱ्या मी तुला राहायला आसरा दिला आणि तू माझ्याच पोरी सोबत.... जीवतं नाही सोडणार मी तुला".... सरदार... अगदीच रागात बोलले

"बाबा हक्क आहे तुमचं बोला... मी आधीच तुमहाला हे सगळ सांगायला हवं होतं... मी आलो ही होतो सगळ तुम्हाला सांगायला... पण मी सावली ला वचन दिलं होतं की मी तुम्हाला काय सांगणार नाही".... "बाबा माफ करा मला... चुकी झाली माझी, तुम्ही मला रहायला आसरा दिला... काम घर सग दिलं, पण बाबा माझं सावली वर प्रेम आहे"......

हे ऐकताच सरदार ने निशांत ला बोलताना अडवलं... व अगदी रागात बोलले...

"एकदा जर परत चुकूनही माझ्या पोरीचं नाव घेतलस, तर आताच तुझा जीव घेईन मी".....

सरदार चा राग अगदी प्रचंड होता... जे शांत होता कामं ना.... सावली खूप घाबरली होती व ती निशांत च्या पाटी लपली....

तितक्यात गावातले काही लोक तिथं हातात काठी व भाले घेऊन जमा झाले... सरदार निशांत जवळ गेले... व सावली चा हात पकडून तिला ओळत निशांत कडून लांब घेऊन आले... सावली निशांत कडे पाहत हात लांब करून निशांत निशांत ओरडत होती... पण निशांत ही काय करू शकतो...

सरदार ने आदेश दिलं व सगळे निशांत ला काठी ने... मारू लागले, निशांत रक्ताने भरला.. ४-५ लोक मिळून निशांत ला एकट्याला मारत होते... तिकडचा दृश्य अतिशय... घाबरवणार होता... निशांत येऊन सरदार च्या पायांवर पडला...

सरदार बोलले "बस्स..... थांबा"

सावली बाबांच्या हात पाय जोडत म्हणत होती... "बाबा सोडा त्याला त्याची काहीच चुकी नाहीये ह्यात... त्याला जाऊद्या... ना बाबा".... पण सरदार त्यांच्या रागात उत्कृस्ट झाले होते.. त्यांना खरं खोटं काहीच समजत नव्हतं....

निशांत सरदार समोर गुडघ्यांवर बसला.... आणि सरदार ला हात जोडत बोलला...

"बाबा मी जे केलं आहे ते माफी च्या लायक नाही, नका माफ करू मला... पण मी सावली शिवाय नाही राहू शकत".....

बोलताना निशांत चा आवाज ही निघत नव्हता... रक्ताने निशांत चा आखा चेहरा लाल झाला होता... त्याचा तोंडातूनही रक्त ची धार चालू होती...

हे ऐकताच सरदार अगदी रागात बोलले... "जर नाही जगू शकत तिच्या शिवाय तर मर".....

व जोराने सरदार ने काठीचा वार निशांत वर केलं... मार लागताच निशांत उडवस्त होऊन जमिनीवर पडला... तशीच सावली सरदार चा हात झटकत निशांत जवळ... येऊन त्याच्या

चेहऱ्यावर हात फिरवत रडत रडत निशांत निशांत ओरडू लागली.... निशांत उठ ना..... निशांत

पण निशांत बेशुद्ध झाला होता... सरदार जवळ आले... व सावली चा हात धरून तिला खेचून घेत जात होते... तेव्हाच त्याच क्षणी निशांत शुद्धीत आला... व पटकन त्याने सावलीचा दुसरा हात पकडला... आणि थांबवलं तिला....

सरदार ने पाटी वळून बघितलं तर निशांत ने सावली चा हात धरला होता... सावली ने सरदार चा हात सोडून निशांत ला उठायला मदत केली व निशांत सावली चा सहारा घेत उभा रहायला...

"सावली फक्त माझी आहे... जर कोणी तिचा आईचा दूध खरच पिलं असेल तर मला... थांबवून दाखवा"..... एवढं म्हणत निशांत ने सावलीचा हात घट्ट पकडला...... व वळून त्याचा घरा पाशी जाऊ लागला...

सरदार शांत थांबून निशांत कडे बघत होते... सावलीच्या खंड्याच्या सहारा घेत निशांत हळू हळू पुढे चालत... होता, सरदार च्या मनाला झालं की.......

"एक मुलगा जर माझ्या मुली साठी त्याचा जीव देऊ शकतो व गरज पडल्यास कोणाचा जीव घेऊ शकतो... तर अजून मला काय हवं आहे, बस्स एकच तर मुलगी आहे माझी, तिची खुशी जर हीच आहे तर मी का..... देवा हे काय करायला... जात होतो मी माझ्याच हाताने माझ्या पोरीचं स्वनसार खराब केला... नाही पण अजून वेळ आहे मी माझ्या सावली चा लग्न निशांत सोबत करून माझी चूक सुधारणार"....

सरदार चा राग शांत झाला... व सरदार ने निशांत ला हाक मारली..... "निशांत".... निशांत आणि सावली दोघे सरदार चा आवाज ऐकून वळले व ... एक मेकाचा हात पकडून थांबले....

तेव्हाच सरदार च्या पाठून गावातल्याच एका मुलाने... निशांत वर भाला फेकला...

सरदार ने हे पाहताच त्या पोरा ला... ढकल व तो कोसडून खाली पडला... पण सरदार किंवा निशांत काही करेन त्याच आधी तो भाला जाऊन सावली च्या पोटाच्या आर पार झाला आणि निशांत तिला संभाडेल त्याच आधी भाल्याचा जोरदार प्रहारने सावली मागे ढकलली गेली.... व तशीच डोंगराच्या खाली पडली....

हे पाहून निशांत डचकून तितच बसला.....

सरदार धावत येऊन डोंगरा वरून खाली पाहू लागले... खाली नुसतं झाडी होती... वरतून पाहणं अशक्य होतं.... सरदार ही.. डोक्या वर हात मारत तितच बसले... गावचे लोक सगे त्या मुलाला... ज्यानी निशांत वर अटक केलती त्याला... पकडून मारू लागले... सरदार तिथून उठले.. व निशांत जवळ आले, निशांत ला हलवून बोलू लागले...

"बाळा उठ बाळा, निशांत सावलीला बघ निशांत"....

"पण निशांत काहीच बोलत नव्हतं बस्स शांत बसून होता".....

निशांत चा तर जग हरवलं.... तितच एका बापाने त्याच्या मुलीला गमावलं.....

गावच्या लोकांनी सावलीचा शव शोधून काढलं... पूर्ण रीती रिवाज ने सावली च्या शव ला नवरी चा श्रींगार केला... व सरदार ने सावली चे लग्न निशांत सोबत केले... निशांत अगदी शांत होता बस्स एक टक सावलीच्या चेहऱ्या समोर बघत रहायचा न तर तो रडला... ना एक शब्द बोलला... निशांत चा हात पकडून एका बाईने... सावली च्या गळ्यात मंगल सूत्र घातला... व तिच्या कपाडि कुंकूम चा टिळक केला....

सरदार ने कन्यादान केले... व सावली च्या शव ला स्वप्न वनात दफन करण्या साठी आणलं... आखा गाव तिथं जमलं होतं...

सावलीच्या शव ला तिथं स्वप्नवनात दफन केलं गेलं... सरदार तिथून निशांत ला घेऊन घरी आले... निशांतच्या तोंडात तर जणू आवाजच नाही रहायला, तो तर शांतच झाला होता...

त्याच दिवशी संध्याकाळी पंचायत जमली... व निर्णय घेतलं गेलं की त्या मुलाने त्याच्या रागाच्या भारात हे करणी केली... जी माफी च्या लायक नाही ह्या साठी त्याला मिरत्युदंड देण्यात आले...

पण सरदार ने हे अस्वीकार केलं... आणि बोलले...

"दंड द्याच आहे तर मला घ्या... रागाच्या भारात मी माझ्या मुलीचं प्रेम, तिची भावना समजू नाही शकलो... हे सगळ माझ्या मुले झाला आहे.... जर तेव्हा मी माझ्या मुलीला... समजून घेतलं असतं तर आज ती जिवंत असली असती, मुलगी मी गमावली आहे, ह्या मुलाला दंड देऊन माझी मुलगी परत येणार नाहीये... ह्याला सोडून द्या".....

सरदार चे हे वचन ऐकून गावच्या लोकांच्या तोंडावर जणू कुलूप लागले... सगळे लोक शांत होऊन खाली मान टाकून थांबले होते... सरदार ने निशांत चा हात पकडला... व त्याला बोलले

"चल बाळा जाऊयात घरी"..... व त्याला घरी घेऊन आले

बरेच दिवस निशांत शांत शांत होता... ना तर जेवायचा न काय बोलायचा, बस एका सुरात सावली चा नाव घेत बसायचा....

सरदार कडून निशांत ची ही अवस्था बगवत नव्हती... हे सगळं जे काही घडलं त्या साठी सरदार स्वतः ला दोषी मानत होते... ह्याच्या पश्चाताप सरदार च्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होतं.....

सरदार निशांत ची खूप काळजी घायचे... निशांत वेडा झाला होता... त्याला फक्त सावली लक्षात होती, बाकीचं सगळ तो विसरला होता.....

एक दिवस सकाळी जेव्हा सरदार नि घरात बघितलं तर निशांत घरात नव्हता.... सरदार ने गाव भरात निशांत ला शोधला... पण तो कुठे गेला... कोणाला त्याची काहीच ठाऊक नव्हती

सरदार डोक्यावर हात मारत रडू लागले... की मुलीला तर गमावलं पण आज मी मुलाला ही गमावलं.... निशांत एकदमच दुर्लभ झाला.... कोणाला काहीच कळलं नाही की तो कुठे आहे....

निशांत वेडा झाला होता, आणि तसाच तो गाव गाव फिरत रहायचा... त्याच तो एक दिवस त्या गावात येऊन वसला... आणि मग त्याच गावात निशांत च्या आयुष्यचे १० अमूल्य वर्ष निघून गेले.........

निशांत च्या डोळ्यातून अश्रू वाहत होते... त्याची भावना, व सावली साठी त्याचा प्रेम त्याच्या अश्रूं मध्ये... वाहून जात होतं...

निशांत ने डोळे उघडले व तो बोलला....

"सावली कसा ना मी, त्या दिवशी तुझं काय न ऐकताच मी तुला मिठीत पण नाही घेतलं, तुला किती सुनवलं, बघ कसा ना मी तुझ्याशिवाय इतके... वर्ष जगलो, पण बस्स तू नाही तर मी नाही"...... निशांत ने मनातल्या मनात ठरवलं की तो ही जिवंत नाही रहाणार व शांत एकदम एक शब्द न बोलता निशांत तिथून उठून निघून गेला....

सरदार ने निशांत ला थांबवलं नाही... सरदार ला मनातल्या मनात हे माहीत होतं, की निशांत आता काय करणार आहे..... पण सरदार ने निशांत ला थांबवलं नाही, व सरदार च्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले...

निशांत त्याचा झोपडी जवळ आला... रात्र झाली होती, निशांत जीतून सावली पडली होती त्याच जाग्यावर येऊन थांबला... आणि तिथून खाली पाहू लागला... निशांत ने डोळे बंद केले व स्वतः चा आत्मविश्वास कायम करून त्याने डोळे उघडून खाली पाहिलं तेव्हाच निशांत ला खाली... सावली दिसली...

सावली निशांत ला बघत होती व तिने हळूच तिचे दोनी हात पुढे केले.... सावली ला पाहताच निशांत ने काही विचार न करता वरतून उडी मारली.. निशांत जमिनीवर पडला आणि जसेच त्यानी डोळे उघडले, त्याला वाटलं की तो मेला... परंतु जेव्हा त्याने आजू बाजूला बघितलं तर तो डोंगऱ्यावरच होता... निशांत ला समजलं नाही की नेमकं काय झालं, त्यांनी परत प्रयत्नं केलं पण नाकाम झाला, निशांत जितक्यांडा खाली उडी मारायचा टिटक्यांदा तो वर येऊनच थांबायचं...

निशांत ला काय कळत नव्हतं की हे नेमकं काय होत आहे... निशांत उठला व समोर मोट्या दगड वर स्वतः चा डोकं आपटू लागला, पण निशांत च्या डोक्या ला एक साधी झखम ही नाही झाली... जेव्हा निशांत ने डोळे उघडून पाहिलं तर निशांत सावली च्या हातावर डोकं आपटत होता... हे बघून निशांत उठला.... आणि परत डोंगरावरून उडी मारायला गेला तर सावली त्याच्या समोर येऊन थांबली.....

निशांत कंटाळून बोलला.... "का वाचवतेस तू मला, बस्स आता नाही जगायचं मला"......

"नाही मी तुला काहीच होऊ देणार नाही, जितं पण तू जाशील माझ्याच मिठीत येशील".... सावली

"सावली नाही जगायचं आता मला... काय करू मी जिवंत रहाऊन, कोणासाठी जगू आता, तूच माझ्या जगण्याची आस होती, पण जर तू नाही तर मी ही नाही"......

"नाही, तुला माहीत आहे त्या दिवशी रात्री जेव्हा उठून तू गावच्या बाहेर निघून गेलतास... गाव गाव फिरत असायचा, पण मी कधीच तुला एकटा नाही सोडला... रोज तू झोपलास की मी येऊन तुझा पाशी बसायची, तुझ्या सोबत बोलायची... जेव्हा जेव्हा तुझ्या जीवाला धक्का बसला तेव्हा तेव्हा मी तुला वाचवलं, गेल्या १० वर्षी पासून तुला मृत्यू पासून लांब ठेवलं मी... आणि जेव्हा आता तुला सगळ आठवलं आणि तू माझ्या जवळ आलास तेव्हा तुला मरू देऊ नाही"......

"हो सावली तू, खूप महान आहेस... तुझं प्रेम अमूल्य आहे, तुझ्या प्रेमाची तुलना नाही होऊ शकत, तू नेहमी मला वाचवलस, पण आज माझ्या इच्छा च्या विरुद्ध मला नको वाचवूस, मी ही तुझ्यावर तेवढच प्रेम करतो जितकं तू माझ्यावर करतेस, पण शोना... तुझ्याशिवाय नाही जगायचं मला"....

सावली, पण काय निशांत चं ऐकत नव्हती... व शांत होऊन निशांत ला बघत होती... निशांत ने सावली ला बघत डोळे बंद केले... डोळे उघडताच त्यांनी पाहिलं की सावली समोर नव्हती....

निशांत ने थोडा वेळ बसून विचार केला... मग उठून निशांत स्वप्न वन च्या बाजूला... चालत जाऊ लागला, निशांत चालत चालत थोडं पुढे गेला तितक्यात त्यांनी पाहिलं की सावली त्याचा बाजूला... चालत होती, सावली ने निशांत चा हात घट्ट पकडला आणि त्याच्या सोबत चालत स्वप्न वनात आली.... निशांत सावली च्या मृत्यू कबर जवळ आला... आणि कबर समोर येऊन बसला... सावली निशांत समोर थांबली होती

निशांत सावली ला बोलला....

"शोना एक विचारू का"......??

"हा विचार ना".....

"मी असं जिवंत रहाऊन काय करू"......??

"असं का बोलतोय तू"......

"तूच विचार कर, माझ्या आवडीच्या विरुद्ध, जागून तरी काय करू... तुला आवडेल का असा निशांत ज्याच्यात जीव नाहीये फक्त जगायचं म्हणून जगेल".....

"निशांत काय झालं तुला, असं का बोलतोय तू"....... "मी काय तुला अडकवून ठेवलं आहे का"....

"नाही, तू मला तुझ्या कडून लांब ठेवलं आहेस"........

तेव्हाच निशांत ला सावली चे ते शब्द आठवले.......

"जसं तू बोलतोस ना माझ्या पाई तुझं मन आहे, तसाच तुझ्या मिठीत माझं जग आहे".....

सावली चे हे शब्द आठवताच निशांत ने डोळे बंद केले... व काही न बोलता उठला व सावली समोर बघितलं आणि तिचा हात हातात घेऊन सावलीच्या जवळ गेला... व सावली ज्या जवळ जाऊन तिच्या कानात बोलला.... तुझ्या पायी माझं मन आहे, माझ्या मिठीत तुझा जग आहे".....

इतकं बोलताच निशांत ने सावली ला... त्याच्या मिठीत घेतलं व घट्ट एकदम सावलीला मिठीत कोंबून घेतलं.....

सावली ने ही पुढाकार घेतला आणि निशांत ला साथ देत त्याच्या मिठीत शांत होऊन थांबली... सावली ची आत्मा शांत झाली... कारण सावलीची इच्छा पूर्ण झाली तिची इच्छा होती की निशांत ने तिला त्याच्या मिठीत घ्यावं... ज्याचं क्षणी निशांत ने सावली ला मिठीत घेतलं सावली एकदम शांत झाली... तेव्हाच निशांत सावलीच्या मिठीतुन सुटून तिच्या पायांवर पडला.... तेव्हाच सावलीला आठवलं की निशांत नेहमी बोलायचा.....

"जगण्याची ओळ तू, तू जगण्याची आस...

पायी तुझ्या मन माझं, तुझ्या हाती माझं स्वास".......

"बस्स तू भेटलीस ना मला माझं जग भेटलं, आता जर मेलो तरी काही हरकत नाही, माझी एकच इच्छा आहे जर काय मी कधी मेलो तर तुझ्या पायांवर डोकं ठेवूनच मरू"......

निशांत सावलीच्या पायांवर पडला... आणि त्याच्या जीव त्याच्या शरीरातून मुक्त झाला......

आभाड कोसडलं.... काळे वादळ वितळून गेले, व सूर्याच्या तेज आकाशात उमटून आला......पहाटे लोकांनी पाहिलं की निशांत सावली च्या मृत्यू कबर वर डोकं ठेवून पडला... आहे लोकांनी सरदार ला ही सूचना दिली, सरदार तिथं पोचले.... सरदार निशांत च्या जवळ गेले आणि त्याचं डोक त्यांच्या मांडीवर ठेवलं....

"इतक्या वर्षां नंतर आलास तू, पण एक दिवस तुला थांबवू नाही शकलो मी... माहीत होतं मला की तू ही जाशील, सावली निशांत माफ करा मला... माफ करा"...... सरदार

सरदार चे अशे शब्द ऐकून व निशांत ला अस पाहून सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रू फुटले.... सगळे आपली भावना मात्र रडून व्यक्त करत होते..... सावली आणि निशांत चा प्रेम सगळ्यांसाठी एक मोठा उदाहरणं बनून रहायला.... ते दोघं न मिळून पण एक झाले.... त्यांच्या प्रेम अधुरं राहून पण पूर्ण झालं.....

निशांत च्या शव ला पूर्ण समान सोबत सावलीच्या मृत्यू कबर च्या बाजूलाच दफन केलं गेलं... व जे जोडपं जिवंत असतांना एक मेकांना नाही भेटू शकले... ते मृत्यू नंतर एक झाले व त्यांच्या सोबत त्यांच्या नाव व त्यांच्या प्रेम अमर करून गेले....

"अभाडात कुठे तरी... श्वेत चांदणीत सावली निशांत ची वाट पाहत बसली होती... आणि निशांत हळूच सावली जवळ गेला.... निशांत ला बघताच सावली उठली व निशांत ला प्रेमाने निरखून

पाहू लागली... निशांत ही तसाच सावली ला बघत होता, दोघ एक मेकांना निरखून बघत होते... आज ते नव्हे त्यांचे डोळे त्यांची भावना व्यक्त करत होते.... तेव्हाच अभाडात सावलीच्या ह्या शब्दांची गुंज ऐकू येत होती".......

"तुझ्या मिठीत माझं जग आहे".....

निशांत ने सावली चा हाथ धरून तिला जवळ घेतलं आणि काही न बोलता सावली ला त्याचा मिठीत घेतलं.....................

अनिश्चित प्रेम पवित्रतेचे लक्षण आहे, पण परिपक्वता नाही .....

Unconditional love is a sign of purity, but not maturity.....


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance