Harshad Molishree

Romance

2.0  

Harshad Molishree

Romance

गोंधळ... A tale of mistakes

गोंधळ... A tale of mistakes

10 mins
2.4K


"भावा एवढी का आवडते रे ती तुला"... दिन्या

"खर सांगू"... ऋषि

"सुकलेल्या पाण्यासारखा विस्कटलेलो मी.... तिने प्रेमाने ओंजळीत घेतलं"...

"हो आणि मग आग लावून दिली"... इरा

"ऐ इरा गपतेस का....??? माझ्या मिनूबद्दल काहीही बोलू नकोस"... ऋषी

"हम्म्म्म आली मोठी तुझी मिनू"... इरा मनातल्या मनात बोलली

दिनेश उर्फ.. दिन्या ऋषिचा खास मित्र अगदी त्याचावर जीव लावणारा... ऋषी व दिनेश एकाच चाळीत रहायचे, दोघ चड्डी बडी होते, दिन्याला ऋषी शिवाय अजिबात जमायचं नाही...

इरा, दिन्या आणि ऋषिची लहानपणापासूनची मैत्रीण... तिघांची अगदी लहानपणापासूनची जोडी होती, इराचे बाबा खूप श्रीमंत होते, इरा चाळीच्या पुढे मैदानाच्या मागे बंगल्यात रहायची, इराची मैत्री दिन्या आणि ऋषीसोबत होण्यामागे पण वेगळीच गम्मत आहे...

लहानपणी ऋषी आणि दिन्या रोज मैदानाच्या जवळ कैरीच्या झाडावरून कैरी काढायला जात असे, शाळेतून आले की सगळ्यात पाहिलं काम ते कैरी, रोज त्या झाडावर जाऊन बसायचं, हा दोघांचा रोजचं क्रम झाला होता... इरा तिच्या घराच्या बाल्कनीतून रोज ह्या दोघांना बघायची, इराला ही मनात खूप अशी इच्छा होत असे की आपण पण ह्या पोरांसोबत जाऊन त्यांच्यासोबत बसून गप्पा माराव्या, त्यांचासोबत बसून ते आंबट पण जिभेला चव देणारी कैरी खाऊया... तर मग एक दिवस असच इराने ठरवलं की जाऊन त्या पोरंसोबत मैत्री करावी...

इरा सायकल चालवत मैदानात त्या झाडाच्या इथं आली... ऋषी आणि दिन्या झाडावर बसून कैरी खात होते, इराने जवळ येऊन सायकल थांबवली... व बोलली

"ओय ऐक ना मला पण एक कैरी दे ना"... इरा

"मी नाय"... ऋषी

"अरे अस का करतोय हावऱ्यासारखा झाडावरच बसला आहेस ना जर एक आधी कैरी दिलीस तरी काय होईल"...

"ए हावऱ्या कोणाला बोलते, जा आता तर नाही देणार"...

तितक्यात दिन्या बोलला...

"तुला एक कैरी देऊ पण मला आधी सायकलचा एक राऊंड दे मगच"...

"ए दिन्या काय बे तू".... ऋषी

"ऋषी थांब ना मला सायकल चालवायची आहे रे"... दिन्या अगदी गरीब सारखा तोंड करत बोलला

"बरं, ऐकलास का माझा मित्र काय बोलला... देतेस का त्याला तुझी सायकल चालवायला"..... ऋषी

"हो घे की मी कुठे नाय म्हणलंय... घे रे बाबा सायकल"..... इरा अगदी संतुष्ट भावाने बोलली

दिन्या लगेच उडी मारून खाली उतरला आणि इराकडून सायकल घेऊन राऊंड मारू लागला...

इरा बोलली...

"आता तर दे मला कैरी"...

"हो घे"...

"नाव काय तुझं"... इरा ने ऋषीला विचारलं

"आधी तुझं नाव सांग"... ऋषी नुसताच नाक वर करून बोलला

"माझं नाव इरा, मी त्या समोरच्या बंगल्यात राहते... माझसोबत मैत्री करशील का"...??? इरा ने अगदी सहज पणे मैत्रीचा हात पुढे केला...

"तुझ्यासोबत मैत्री, का करू"..... ?? "तुला तर झाडावर चढायला पण येत नाही, मग"...

"मग काय तू आहेस की तुला येत ना मग तू तोडून देशील ना मला कैरी"....

"म्हणजे तुला सगळं फुकट हवं का"...??

"अरे मैत्रीमध्ये पण काय असतं का असं".....

"सोड जाऊ दे, पण लक्षात ठेव जेव्हा पण मला गरज पडेल ना माझी मदत करावी लागेल तुला".....

"हो करेन की बस्स का"...???

"चल आता नाव सांग तुझा"...

"ऋषी"... ऋषी अगदी तोंड वर करत बोलला....

तितक्यात दिन्या आला आणि सायकल थांबवत झटकन बोलला...

"आणि मी दिन्या ऋषीचा खास मित्र"...

अश्याप्रकारे इरा आणि ऋषीची मैत्री झाली.... इरा रोज ऋषीचा शाळेतला अभ्यास करून घ्यायची व ऋषी इराला रोज काय न काय खाऊ द्यायचा त्याचा अभ्यास पूर्ण करून देते म्हणून....

इराला कोणत्या ही वस्तुचा राग खुप लवकर यायचा, खास करून जेव्हा ती मिनूचं नाव ऐकायची... इराचं लहानपणापासून ऋषिवर प्रेम होतं... कुठेतरी ही गोष्ट दिन्या आणि ऋषिला माहित होती पण इराने स्वतःहून हे कधी ऋषिला समजू दिल नाही...

मीनल उर्फ मिनू.... ऋषीची प्रेमिका किंवा असं म्हणू शकतात की ex- प्रेमिका, ऋषीचं मिनूवर खूप प्रेम आहे, मिनू ही तितकच प्रेम करते ऋषी वर पण सध्या त्यांचा break up झाला आहे.....

ऋषी.... ऋषिचा स्वभाव अगदी जगा वेगळा होता तो काय करतो, काय बोलतो... त्याचा वागणं बोलण कधी कोण समजू नाही शकलं... कधी खुप चांगला तर कधी खुप वाइट, त्याचे विचार अगदीच जगावेगळे होते...

मिनू आणि ऋषीचं break up झालाय आणि लहानपणीचे हे तिघ मित्र मैत्रीण आज एकत्र ऋषिची प्रेमिका... मिनूला किडनॅप करायला जात आहे... मिनूच्या घरी...

दिन्याने गाडी भाड्यावर आणली होती व तोच ड्राईव करत होता... इरा निकाम पाटच्या सीटवर बसली होती व ऋषि दिन्याच्या बाजूला...

तिघांचं बोलणं चालू होता kidnapping बद्दल...

"ऋषि ऐक ना मी की बोलते"... इरा

"हो इरा बोल"...

"जर ना चुकुन समज आपल्याला पोलिसांनी धरलं ना तर काळजी करू नकोस... माझे बाबा आपल्याला सोडवतील, तुला तर माहितच आहे ना बाबांची खुप ओळख आहे वरून पैशाची तर कमीच नाही, तू काळजी करू नकोस just chill"......

हे ऐकून दिन्या जोर जोराने हसू लागला..........

"ए भिकाऱ्या हसतोस काय, हा हसतोस काय... मी आपल्याच भल्यासाठी बोलतेय ना"... इरा

"हो का यात काय भलं, मायला काम होण्याच्या आधीच भेंडी नसकुंडी लावतेस"... दिन्या

"ऐ ,ऐ नसकुंडी काय, हां नसकुंडी काय"...

यांचं भांडण ऐकून ऋषिने स्वतःच्या डोक्यावर हात मारला व अगदी रागत बोलला..

"दिन्या गप बस, गप एक शब्द बोलू नकोस... आणि इरा बाई तू पण कृपा करून जरा शांत बस"....

"प्रेमाने बोलना चिडतोस काय, बसते की मी शांत".... इरा

बोलत बोलत तिघे मिनूच्या घराकडे पोचले... दिन्याने गाडी बंगल्याच्या मागच्या बाजूला, बंगल्या पासून लांब काळोखात उभी केली... व ठरल्या प्रमाणे ऋषि आणि दिन्या चेहऱ्यावर काळे मुखुटे लावून गाडीच्या बाहेर उतरले.. व इरा गाडीतच ड्राइविंग सीट वर येऊन बसली...

ऋषि आणि दिन्या हळू हळू हातात छोट्या बैटरी... घेऊन बंगल्याच्या जवळ आले व भिंत ओलांडून बंगल्यात शिरले...

"खुप काळोख आहे रे ऋषि".... दिन्या

"हा मग भिकाऱ्या या बैटरी काय शोसाठी आणल्या आहेत, चालू कर भेंडी"... ऋषि एकदम चिडूनच बोलला

"अरे हो भावा हळू बोल की... तुझ्या सासऱ्याला जाग यायची नाहीतर"... दिन्या

"गप तुझ्या मायला पनवती लावू नकोस... आणि गप चल"...

हळू हळू दोघे ही बंगल्याच्या आत शिरले... लपत लपत दोघे अगदी हळू काहीही आवाज न करता मिनूच्या बेडरूम जवळ पोचले....

ऋषि आणि दिन्या हळूच मिनूच्या बेडरूम मधे शिरले... मिनू गाढ झोपेत होती, ऋषिची नजर जशी मिनू वर पडली तो तर तिला बघतच राहीला... मिनू च्या चेहऱ्यावर बैटरी चा तो नुसताच उजेळ... शोभत होता व त्याच क्षणी दिन्या ने रुमाल मध्ये chloroform टाकून ते ऋषि च्या हातात दिलं, ऋषि ने रुमाल हातात घेतला व हळूच बोलला ....

"Sorry मिनू"... व मिनू च्या तोंडावर रुमाल डाबला...

"ऋषि बेशुध्द झाली का ही"... दिन्या हळूच ऋषी च्या कानात बोलला

"माहित नाही आधीच इतकी गाढ झोपली आहे आता झोपली आहे की बेशुद्ध आहे काय माहित"... ऋषी

"एकदा नीट बघ ना मग".....

ऋषि ने मिनू च्या चेहरा वर हाथ फिरवत तिला उठवायच प्रयत्न केलं पण ती शुद्धीत नव्हती......

"हो हो झाली आहे, बेशुद्ध झाली आहे"... ऋषि

"चल चल उचल"..... ऋषी

"मी का उचलू girlfreind तुझी आहे तू उचल".... दिन्या

"मी एकटा कसा उचलू हिला म्हणजे बघ यार चांगली खात्या पित्या घरची आहे आणि चुकून तिला काय झालं तर".....

"काय झालं तर सरळ बोल ना तुला वजन झेपणार नाही"....

"ए असं काय नाही मी उचलू शकतो तिला"...

"हां मग उचल"....

"भिकारी साला थोडी मदत केली असती तर काय गेलं असतं".... ऋषी मनातल्या मनात दिन्या ला शिव्या देत होता....

ऋषि ने मिनू ला त्याचा खांद्यावर उचलून घेतलं आणि दोघे मिनू ला घेऊन बंगल्याचा बाहेर आलेे... जिथे इरा त्यांची वाट पाहत उभी होती...

ऋषि ने मागच्या सीट वर मिनू ला बसवलं व तिचे हात दोरी ने बांधले...

"हाश.... देवा काय खाते ही".... ऋषी एक सुखाचा लांब श्वास घेत म्हणाला

"काय बोललास ऋषी, दमलास ना तू".... इरा नुसतीच ऋषी ची मज्जा घेत होती

"काय दमलो.... काय नाय असं, काय पण, चला चला लवकर बसा निघुया"... ऋषी दिन्या आणि इरा च्या हसण्या कडे दुर्लक्ष करत बोलला...

"इरा ने कार start केली व ते लोक तिथुन निघाले"...

"मी काय बोलतो मिनू जर अचानक शुद्धित आली तर"... ऋषि थोडं घाबरत बोलला...

"Dont worry ऋषि ती इतक्या लवकर शुद्धीत नाही येणार, तोपर्यंत आपण फार्म हाउसवर पोहचू, आणि एकदा तिथ पोचलो की मग काय tension नाही... काळजी करू नकोस तू".... इरा

ऋषी खूप तणावात होता.... तो चुकीचं करतोय त्याची त्याला जाणीव होती, त्याचा चेहऱ्यावरून स्पष्ट हे दिसून येत होतं, इरा ने गाडीतल्या आरश्यातून ऋषी ला पाहिलं आणि ती मनातल्या मनात बोलली....

"यार काय दिवस होते ते"..... मनात असच विचार करत इरा ने आपला एक हात खिडकी च्या बाहेर काढला..... आणि थंड हवेचा स्पर्श होताच इरा विचारात गुंतून गेली....

कॉलेजचा पहिला दिवस....

ऋषी, दिन्या आणि इरा... तिघांनी एकाच कॉलेज मध्ये प्रवेश घेतला.... फरक एवढाच की इरा science ची विद्यार्थी तर ऋषी आणि दिन्या commerce चे....

कॉलेज च्या आत शिरताच ऋषी ने सगळी कडे नजर फिरवली... तेव्हाच दिन्या बोलला..

"अरे ऋषी यार बघ ना काय भारी भारी पोरी आहेत"....

"हो दिन्या, पण नकोच बघू"....

"का रे का नको बघू".....

"कारण की एक पण तुझ्या लायकीची नाय"....

"भावा बस्स का असा बोलशील"....

हे ऐकून इरा जोर जोरात हसू लागली.... व दिन्या ची मजाक उडवायला लागली....

दिन्या रागात बोलला....

"हसतेस काय जा ना निघ ना तुझं तर lecture आहे ना".....दिन्या

"हो जाते की... तसं पण इथं काय तुमच्या सोबत तवाडगिरी करायला थांबू"...इरा

"ए ऋषी ही बघ तुला तवाड बोलली".... दिन्या

"काय ग मला तवाड बोललीस".... ऋषी

"नाय रे शोन्या तुला नाही, तू तर माझा बाळ आहेस".... इरा

"ए इरा गप तू पण काय कुठे पण चालू होतेस लगेच, कॉलेज आहे"....

"मग काय झालं"...

"काय नाय जा तुझा lecture चं वेळ झाला आहे"....

"हो जाते... चला guys bye.... नन्तर भेटूया"...

इरा bye बोलून जशीच वळली, तेव्हाच ऋषी ची नजर कॉलेज च्या एका पोरी वर पडली.... ऋषी तर तिला बघतच रहायला...

"अरे काय झालं रे मित्रा तुला.... चल की आपलं पण lecture आहे class मध्ये जाऊया".... दिन्या

पण ऋषी काय ऐकतोय त्याची नजर तर थेट त्या पोरी वर जाऊन अडकली होती....

दिन्या ने ऋषी ला जोरात चिमटा काडला, आणि ऋषी जोरात ओरडला....

"आईईईईई....... भिकार्या काय करतोय"... ऋषी

"आहेस, मला वाटलं गेलास तू.... इथंच थांबायचं का..?? जायचं नाहीये का वर्गात"... दिन्या

"हो चल जाऊ पण ती मुलगी बघ ना यार".... ऋषी

"कुठली मुलगी".... दिन्या

"अरे ती बघ ती समोर लाल ड्रेस मध्ये आहे उभी"....

"कुठे .... लाल ड्रेस वाली मुलगी"....

"अरे आता तर इथं होती कुठे गेली.... बघ साल्या गेली ती तुझ्या मुळे"...

"अरे चल ती उद्या परत दिसेल.... पण आता वर्गात जाऊया आधी"....

तू पण काय यार... ऋषी

"अरे चल ना".... दिन्या ऋषी ला ओळत नेहून गेला....

वर्गात येऊन बसल्यावर पण.... ऋषी त्याच मुलीचा विचार करत होता... आणि नेमकी तीच पोरगी समोरून वर्गात आली... तिला पाहताच ऋषी बसलेल्या जागेतच उभा रहायला... ती मुलगी पुड्याचा बेंच वर येऊन बसली... व काही वेळ नन्तर सर आले....

सगळे एकदमच उभे... रहायले व अगदीच शाळेतल्या लहान मुलांसारखं...

"Goooooooooood morninggggggg.... sirrrrrr" ...... ते एक मोठा सुरात बोलले....

दिन्या या वर हसायला लागला व जसेच्या सर ओरडले, दिन्या शांत झाला

"Seat down".... सर अगदी रागात बोलले....

"परत तेच तो..... Thankkkkkkk youuuuuuu".... सर चा लांबलचक सूर

ऋषीची नजर नुसतं त्या पोरी वर होती.... तो सारखा तिच्या कडेच पाहत होता.....

ऋषी चा आखा दिवस तिच्या पाठीच गेला...

वर्ग सुटल्यावर ऋषी दिन्या ला काय न सांगताच धावत धावत त्या पोरीच्या मागे... गेला, व अगदी तिच्या जवळ पोचून थांबला... ऋषी तिच्या सोबत बोलायचं प्रयत्न करत होता... पण भीतीमुळे त्याला काय बोलताच येई ना.... शब्द जणू फुटतच नव्हते... जसा ऋषी काय बोलायला जायचा... भित्ती ने मागे फिरून जायचा.... तेव्हाच त्याने तिचं आणि तिच्या मैत्रिणीचं बोलणं ऐकलं.... तिची मैत्रीण बोलली...

"मिनू खरच मला तर आवडला कॉलेज"....

व तिच्या मागेच ऋषी... अगदी लांब श्वास घेत हळूच

बोलला..... "मिनू"......

ऋषी ने त्याचे डोळे बंद केले... व डोळे उघडताच बघतो... तर ती कुठेच नव्हती... ऋषी ने इथं तिथं बघितलं.... तेव्हा मिनू त्याला खाली college campus मध्ये दिसली... ऋषी पटापट खाली उतरला...

पण जसाच खाली आला.... त्याला इरा भेटली... व अगदी चिडून बोलली

"काय आहेस कुठे तू आणि फोन का उचलत नाहीये".... ऋषी ने इरा च्या बोलण्या कड लक्ष दिलं नाही व तो वर मान करत मिनू ला शोधत होता...

"Hello hero तुझ्यासोबत बोलतेय मी... कळतंय का तुला".... इरा थोडं चिडूनच बोलली

"नसेल कळत ह्याला सकाळ पासून नुसतं असाच करतोय भेंडी".... दिन्या

"ए गॅप साल्या".... ऋषी अगदी रंगाच्या भारात बोलला

"काय, मला कोण सांगणार का काय झालंय नक्की... आणि हा काय आणि कसा वागतोय".... इरा ने अगदी आतुरतेने विचारलं

"इरा ते ना".... दिन्या

"गॅप साल्या गप"... ऋषी ने बळजबळी दिन्या च्या तोंड दाबला... आणि बोलला

"काय नाय ग इरा"....

"okay ठीक आहे... आधी त्याला सोड जीव जाईल त्याचा".... इरा

"Ooo sorry".... ऋषी

"Bhikari मेल्या, काय sorry.... मेलो असतो ना मी"... दिन्या

"गप ना आता आहेस ना जिवंत मग बस्स ना शांत"....ऋषी

तिघे पण... आप आपल्या घरी आले.... ऋषी च्या मनात नुसतंच होतं की कसं आता सरू सोबत फ्रेइंडशीप करावी...

दिवस असेच जात होते.... ऋषी रोज नुसताच सरू च्या मागे मागे फिरत असायचा... कधी कॅम्पस मध्ये तर कधी कॅन्टीन मध्ये सारखा तिच्या पाटी.... वरून सोबत दिन्या ला पण त्यांनी कामाला लावलं होतं सोबत...

सगळ चांगलं चालू होतं तेव्हाच...

एक दिवस मैदानात संध्याकाळ च्या सुमारे दिन्या आणि ऋषी शांत बसले होते....

ऋषी दिन्या ला सरू बद्दल सांगत होता.... तेव्हाच तिथं इरा आली

इरा ला बघताच ऋषी आणि दिन्या शांत झाले, तेव्हा इरा चिडून बोलली

"हे काय चालय तुमचं, मी खूप दिवसापासून बघते हे... मी आले की दोघ शांत होऊन जातात, काय लपवताय तुम्ही"..... इरा खूप रागात बोलली

"अरे येडी काय न काही लपवत नाही आम्ही".... दिन्या

"बरोबर ना ऋषी... नाय ना काय लपवत आपण".... दिन्या

ऋषी ने दिन्या समोर बघितलं आणि काय न बोलता जागेवरून उठला, इरा च्या जवळ जाऊन तिचे दोनी हाथ धरून तिला कट्टयावर बसवलं आणि अगदी शांत भावाने बोलला....

"हो लपवतोय मी तुझा कडून काय तरी"....

"तुला सांगितलं ना तरी तुला विश्वास नाही बसणार".... ऋषी

"असं काय आहे सांग ना, तू बोलशील आणि मी विश्वास नाही ठेवणार, एकदा बोल तरी".... इरा

"इरा, इरा.... काय सांगू तुला यार, जेव्हा पासून कॉलेज चालू झालाय ना एक वेगळ्याच जगात जगतोय मी.... ते असतं ना something special आणि someone special तशी feeling येतय"....

"अच्छा".... इरा

"हो यार इरा... मी ना प्रेमात पडलोय, i am in love..... इरा i am in love"..... ऋषी

जोरात गाडीचा हॉर्न वाजला आणि गाडी थांबली...... पहाटे 4.30 च्या आस पास हे लोकं इरा च्या फार्म हाउस वर पोचले... दिन्या आणि ऋषि ने सरु ला गाडीतून बाहेर आणलं व तिला एका बैडरूम मधे नेऊन झोपवलं....

to be cont....


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance