Harshad Molishree

Inspirational Others Tragedy

1  

Harshad Molishree

Inspirational Others Tragedy

शिक्षण...

शिक्षण...

8 mins
2.3K


कुठे तरी एका सामसुम रस्त्यावर जिथं ना माणूस ना माणसाची जात.... अगदी काळोख, रात्रीच्या सुरेख चांदण्याच्या प्रकाशात एक मुलगा हळू हळू आपले दोन्ही हात खिशात टाकून... चालतोय, थोडं पुढे असंच येऊन मुलगा थांबला व समोर एक विजेच्या खांब्या खाली येऊन बसला खिशातून एक पत्र काढला आणि पत्र बघताच बोलला...

"जगण्याची ओढ न मारण्याची जाणीव आहे...

आलो अश्या रस्त्यावर जिथं ना जीव ना जाती आहे"...

त्या मुलाने पत्र उघडून वाचायला सुरुवात केली...???

"कुणाल अरे चल लवकर उठ बाळा ६ वाजले शाळेत जायला उशीर होईल बाळा".... आई

"यार हे आईचा ना रोज च किट किट आहे मला तर अजिबात इच्छा नाही आहे जायची शाळेत आज, देवा का तू सोमवार आणतो परत, रविवार बरा असतो घरी रहायला मिळतं".... कुणाल मनातल्या मनात स्वतः सोबत बोलत होता

"कुणाल अरे कुणाल उठ की आता चल"....

"हो ग आई उठतो"... कंटाळा करत कुणाल झोप मोडून उठला व थोड्या वेळ नन्तर शाळेला जाण्यासाठी निघाला.....

कुणाल..... आता काय बोलवा या पोराबद्दल अभ्यासात धड नाही... शरीरात बळ नाही... पण तरी म्हणतात ना आम्ही पण किसीसे कम नाही... अगदी शांत स्वभाव पण जर डोक फिरलं तर मग तू कोण नि मी कोण... अशी त्याची ओळख

रोज सारखं आज पण कुणाल वर्गाच्या बाहेर थांबला आहे अभ्यास नाही केलं ते एक कारण तर आहेच पण एक कारण... हे पण आहे की गेल्या २ वर्षापासून कुणालने शाळेची फी नाही भरली... व यासाठी रोज त्याला बाहेर थांबवा लागायचा, आज तर कुणाल खूप रागात आहे, मित्र कुणालला नुसतंच चिडवत होते त्याची मज्जा घेत होते टोमणे मारत त्याला बोलत होते.... कुणालने ठरवलं की काहीही करून उद्या बाबाला शाळेत घेऊन यायचा बस्स... कुणाल असं विचार करत घरी पोचला, आई विचारते कुणालला की काय झालं पण कुणाल रागात फुगून बसला आहे एक शब्दाने काय बोलत नाहीये... संध्याकाळी बाबा आले, बाबांनी कुणालला हाक मारली....

" कुणाल आहेस कुठे ही धर पिशवी.... कुणाल"

कुणाल रागात उठून आला व बाबाच्या हातातून पिशवी घेऊन आतमध्ये जाऊन ठेऊन आला...

"काय झालं कुणाल आज खूप शांत दिसतोय".... बाबांनी अगदी प्रेमाने काळजी घेत विचारलं

"काय माहित शाळेतून आला तेव्हापासून असाच शांत आहे, धड बोलत नाहीये... दुपारी जेवला पण नाही"... आई बाबांना बोलली

"जेवला पण नाही कुणाल काय झाला बेटा सांग तर कोण काही बोललं का काय झालं"...

"मला काय माहित नाही बाबा उद्या, कुठूनपण तुम्ही आधी शाळेत पैसे भरा.... नाहीतर मी शाळेत नाही जाणार बस्स".... कुणाल असं बोलत रडू लागला अणि रडतच घराबाहेर निघून गेला....

कुणालचे आई बाबा विचार करू लागले... की काय करावं, बाबा शांत होऊन बसले अणि विचार करू लागले की काय करावं आता... आई कुणालच्या मागे मागे आली व कुणालला घरी घेऊन आली.... बाबांने कुणालला अगदी प्रेमाने विचारलं...

"कुणाल जेवायचं नाहीये का"... कुणाल ने काय उत्तर नाही दिला रागात

"चल बाळा जेवून घे.. उद्या मी येतो शाळेत, भेटतो मॅडमना आता जेवून घे चल"...

"काय भेटतो, बाबा पैसे भरा ना नाहीतर मला परीक्षेत नाही बसू देणार दहावी आहे... ते मॅडम लोकं पैसे नाही भरले म्हणून वर्गाबाहेर उभे करतात... मी नाय, तुम्ही उद्या या आणि पैसे भरा"....

"बरं चल येतो मी उद्या... जेवून घे आता"...

बाबा विचार करू लागले की काय करावं पैसे तर नाही आहेत... तेव्हाच आई आली बाबाकडे आणि त्यांना समजावलं की होईल सगळं ठीक...

आज कुणालचे बाबा शाळेत आले... मॅडमना भेटायला, कुणाल मॅडमच्या ऑफिसच्या बाहेरच थांबला होता... कुणालच्या बाबांनी मॅडमला हात जोडून भरपूर विनंती केली पण मॅडम काय ऐकायला तयार नव्हती... त्यांचंही अगदी ठीक होतं की २ वर्षापासून पैसे नाही भरले, पण नुसतं पैश्यांमुळे इथं एकाचा आयुष्य निर्भर आहे... त्याचा काय ????

मॅडमने कुणालला शाळेत बसवण्यास ही नाकारलं, कुणालचे बाबा अगदी निराश होऊन ऑफिसच्या बाहेर आले व कुणालचा हात पकडला व त्याला बोलले....

"कुणाल चल बाळा घरी".... हे ऐकून कुणाल रडू लागला, कुणालला हे समजलं की मात्र पैसे नाही भरले या कारणामुळे त्याला शाळेत घेत नाहीये...

कुणाल काही न बोलता बाबांचा हाथ पकडून घरी निघून आला... घरी आल्यावर आईने विचारलं...

"काय झालं ओ... घरी कसा काय हा"...

"हो ते मॅडम काय ऐकत नाहीयेत शाळेचे"...

कुणाल खूप रडत होता व त्याला रडताना बघून आई बोलली...

"बाळा रडू नकोस बघ जे काय होतं ना जगात ते चांगल्यासाठीच होत असतं"... आईने कुणालला जवळ घेतलं

"बाळा रडू नको तू काळजी करू नकोस मला तुझ्यापेक्षा जास्त टेन्शन आहे मी तुला घरी बसवून नाही ठेवणार मी बघतो काय तरी २-३ दिवस थांब तू मी करतो काय तरी"... बाबा

२-३ दिवस म्हणता महिनाभर असाच निघून गेला पण पैश्यांची काही सोय झाली नाही कुणालचे बाबा परत शाळेत मॅडमना भेटून आले पण तरी काय फायदा नाही झाला... पैसे भरल्याशिवाय काय होणार नव्हतं...

कुणाल अगदी शांत शांत राहू लागला... घरात खूप चिडचिड करायचा, बाबा घरी आले की पहिला प्रश्न मात्र एकच की बाबा पैश्याचं काय झाला का... मात्र हे रोजचं झालं होतं आणि रोज बाबा शांतपणे एकच उत्तर द्यायचे की होईल उद्या...

"करतो मी होईल काय तरी करतोय मी होईल"......

रोज आपल्या मित्रांना शाळेत जाताना बघून कुणाल मनातल्या मनात

रडायचं की काय करू... अगदी मित्रांनी विचारलं की खोटं बोलायचं की बरं नाहीये म्हणून येत नाही शाळेत... कधी खूप चीड चीड करायचा कुणाल जेवण पण नाही करायचा आणि हे बघून आई बाबांची तर हालत व्हायची पण आता ते तरी काय करू शकतात... प्रयत्न तर करत आहेत....

बघता बघता, परीक्षेची वेळ आली.... २ महिन्यानंतर परीक्षा आणि कुणाल जसाच्या तसा घरी बसला आहे... शाळेचा काहीच पत्ता नाही....

एक दिवस कुणाल घरी मस्त झोपला होता, आपल्याच स्वप्नेच्या दुनियेत हरवून.... तेव्हाच अचानक आईने कुणाल जोरात हाक मारून उठवलं....

"कुणाल उठ बघ तुझ्या शाळेतून मॅडम आलेत"....

हे ऐकताच कुणाल पटकन उठला,

अगदी गार झोपेतून उठल्यामुळे कुणाल काहीच नीट दिसत नव्हते, विस्कटलेले केस वरतून लाल डोळे.... कुणाल शांतपणे त्या बाईसमोर बघत होता

आईने त्या बाईंना घरात बोलावलं...

"अरे काय शाळेत पाठवायचा आहे की नाही याला आणि हे काय त्याचं दहावीचं वर्ष आहे आणि हा असा झोपला आहे, काय चाललंय नक्की तुमचं शिकवायचा आहे की नाही पोराला".... मॅडम

"हो मॅडमपण आता मोठ्या मॅडमला कुणालचे 'पपा भेटून आले पण, ते आता त्याला परवानगी देतच नाही तर मग कसं पाठवू मी पोराला"....... आई

"अरे परवानगी देत नाही म्हणजे, तुम्ही पैसे भरा ना आधी, अस कसं म्हणताय तुम्ही".....

"पैसे असले असते तर मुलाला का असं घरी बसवून ठेवला असता आम्ही"....

"अरे समजा तुम्ही, पैशामुळे पोराचं आयुष्य वाया घालवू नका"....

"आता त्याला शाळेत पाठवा आज बोर्डचा फॉर्म पाठवण्याची अंतिम तारीख आहे, त्याला लवकर शाळेचा ड्रेस घालून शाळेत पाठवा आणि सोबत त्याचे दोन फोटो फॉर्म ला जोडायला"....

"हो मॅडम पाठवते मी"..... आई

इतकं बोलून मॅडम निघून गेले....

मॅडम आणि आईचं बोलणं संपेपर्यंत तर कुणालने डोळे सुजवून घेतले रडून रडून...

आईने कुणालला शांत केलं व बोलली...

"चल पटकन आंघोळ करून घे आणि जा शाळेत.... चल उठ".....

कुणाल अंघोळ करून शाळेत जाण्यासाठी तयार झाला, आईने त्याच्या जवळ ₹ ५० दिले आणि सांगितलं की जाताना फोटो काढून घे अर्जंट... कुणालने होकार दिला व निघाला....

कुणाल शाळेत फोटो घेऊन पोचला, फोटो मध्ये ही त्याचे डोळे अगदी सुजलेले दिसत होते, कुणाल जसा तसा घाबरत घाबरत, शाळेत मॅडमच्या ऑफिसमध्ये गेला...

"काय आता आलास, कळत नाही का तुला"..... शाळेतल्या बाई

कुणाल एका शब्दाने काही बोलला नाही

कुणालने मॅडमला फोटो दिले व फॉर्मवर हस्ताक्षर केली.... मग त्याला त्या मॅडमने प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये पाठवलं....

"May i come in madam".... कुणाल

"Yes come in"....

"बाबा कुठे आहे तुझे, when he is going to pay your fees, its last term your board exams are coming how will you tackle the exams, what about your studies".....

कुणाल शांतच होता त्याला काहीच कळे ना की काय बोलावे....

"Call Your parents tomorrow".... madam

"Ok mam"..... कुणाल

कुणाल घरी आला.... संध्याकाळी बाबा आल्यावर आईने सगळं बाबांना सांगितलं, दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा कुणाल सोबत शाळेत आले.... आणि प्रिन्सिपलला भेटले....

बाबांकडे फी भरायचे पैसे नव्हते.... पण मॅडमने कुणालला परीक्षेत बसायची परवानगी दिली आणि त्याला रोज exrta class साठी बोलावलं....

मॅडमच्या ह्या निर्णयामुळे कुणाल अत्यंत खुश होता.... आता रोज कुणाल शाळेत जायचा extra classes साठी.... आणि मन लावून अभ्यास करू लागला

बघता बघता 2 महिने निघून गेले आणि परिक्षेचा दिवस आला, कुणालला खूप भीती वाटत होती की काय होईल पेपर कसे जातील, अख्खं वर्षभर काहीच अभ्यास नाही झालाय जे आहे ते थोडं फार Extra classes मध्ये झालं तेच... कुणाल असं विचार करत करत Exam center वर पोचला....

आई बाबा खूप खुश होते की.... आपला मुलगा १० वि ची परीक्षा देतोय

कुणालने कसेबसे पेपर दिले, त्याला जमलं तेवढं त्याने मन लावून पेपर लिहिले पण तरी कुणालला ही अपेक्षा नव्हती की तो पास होणार की नाही....

कुणालने आपल्या आई बाबाला जेव्हा बघितलं तेव्हा दुःखात बघितलं, मनात पास होऊ की नापास पण आता आई बाबांसाठी काय तरी करावं हे त्यांनी मनात ठरवलं.....

आज शेवटचं पेपर देऊन कुणाल घरी आला, आईने रोज प्रमाणे त्याला जेवण दिलं आणि विचारलं....

"पेपर कसा गेला आजचा"...आई

कुणालने काही उत्तर दिले नाही जेवून तो शांतपणे बसला....

कुणालने अख्खा दिवस हेच विचार करण्यात व्यतित करून टाकलं की पैसे कमावण्यासाठी काय करावं, संध्याकाळी हेच विचारात कुणाल बाहेर मित्रांसोबत थांबला होता तेव्हा त्याने एक माणसाकडून ऐकलं की जवळच्या एका Tours & Travels office, मध्ये एक मुलगा हवा आहे कामासाठी, कुणालने काही विचार न करता त्या माणसासोबत कामाचं सगळं बोलून घेतलं....

दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून कुणाल, तयार होऊन बसला.... आईने विचारलं कुणालला...

"सकाळी आज लवकर उठलास आणि एवढा तयार होऊन कुठे चालला"....

"कुठे नाही बस्स इथेच मित्रांसोबत"....

"बरं लवकर ये घरी"....

कुणाल ९:०० वाजता घरातून निघाला व सांगितलेल्या वेळेवर

ऑफिसला पोचला, तिथं त्या ऑफिसमध्ये कुणालला जास्त काही न विचारता निकाम ४००० वर नोकरीवर ठेवलं....

कुणाल खूप खुश होता एवढा खुश की त्याचा आनंद अगदी गगनात मावे ना....

कुणाल घरी आल्यापासून नुसतं आईला विचारत होता की बाबा कधी येतील बाबा कधी येतील, संध्याकाळी बाबा जसे घरी आले कुणालने बाबांना चहा आणून दिला.... आणि अगदी शांत भावाने कुणाल बाबांना बोलला....

"बाबा मी उद्यापासून कामाला जाणार आहे, इथं जवळच ऑफिस आहे travelling ची त्यात"....

कामावर...??? बाबा हे ऐकून आश्चर्याच्या भावाने कुणालकडे पाहू लागले....

"अजून काय तुझं वय आहे का कामावर जायचा".... ???

"बाबाना बोलू नका... काही नाही तर थोडी फार मदत होईल घरासाठी"....

"आई बाबा हे ऐकून खुश झाले"....

"पण बाळा अजून तु लहान आहेस, तुझं वय कमवायचा नाहीये"...

"पण तरी बाबा"...

"काही नाही जाऊद्या त्याला कामाला".... आई अगदी प्रेमाने बोलली, बोलताना आईचे डोळे भरून आले

"Thank you आई".... कुणाल अगदी खुश होऊन बोलला....

कुणालला दुपारी 1 ते रात्री 9 वाजेपर्यंतचा वेळ दिला होता कामाचा, दुपारी १ वाजता वेळेवर कुणाल कामावर पोचला....

To be continued


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational