Harshad Molishree

Romance

3  

Harshad Molishree

Romance

गोंधळ... भाग ३

गोंधळ... भाग ३

6 mins
1.6K


आता पर्यंत आपण या कथेच्या दुसऱ्या भागात पाहिलं की सरू कशी ऋषी च्या प्रेमाला नकारते, तेच ऋषी त्याच्या जीवनात घडलेल्या प्रकरण आठवत असतो... ऋषी आणि सरू च्या प्रेमात कशे दिन्या आणि इरा पण त्यांच्या या प्रेम कथे चे पात्र बनतात... आणि आता आपण या कथे च्या पुढील भागात बघू की नेमकं कुठल्या चुकान मुळे सरू ऋषि ला सोडून गेली... आणि पुढे सरू कधी ऋषि ला भेटणार की नाही....???

आता पुढे....

संध्याकाळचा वेळ होता, ऋषी, दिन्या आणि इरा तिघंपण मैदानात शांत बसले होते, अगदीच शांत वातावरण होता.... आणि दिन्या आणि इरा पण शांतपणे एकमेकां समोर बघत होते....

तेव्हाच दिन्या आणि इरा जोर जोरात हसायला लागले.... आणि त्यांना असं हसताना बघून ऋषी रागात बोलला....

"ऐ बस यार.... काय कधीचं येड्यावणी हस्ताय नुसतं"... ऋषी

हे ऐकून दिन्या आणि इरा शांत झाले, थोडं वेळ शांत बसल्यानंतर... इरा परत बोलली

"ऐ पण दिन्या वेळा आहेस का... ना आहे माझी ना"..... इरा इतकं बोलताच जोरात हसली, दिन्या पण तिच्या पाटी पाटी जोरात हसायला लागला....

"हो हो... ठीक आहे ना.. झालं ना आता"... ऋषी थोडा रागावलाच

"बाळा पण तिने तर तुझा पचकाच करून टाकला रे".... इरा हसत हसत म्हणाली

"बघ ना यार म्हणजे एक मुलगा यार प्रपोस करतोय, भेंडी त्याची काय value च नाही, अरे भेंडी माहीत आहे किती हिम्मत लागते प्रपोस करायला, स्वतःला किती तयार करावं लागतं".... ऋषी

"हो ना, ऐ पण तुला कळत नाही का".... इरा ऋषी ला चिडवत म्हणाली

"तू ना आता गेली"... ऋषी रागात बोलला...

इरा हे ऐकताच लगेच तिथून धावत सुटली, ऋषी तिच्या मागे मागे पळत होता पण थोडं लांब जाऊन थांबला आणि जोरात ओरडून बोलला....

"आज जा बच्चू, उद्या तर येशीलच ना कॉलेजला तेव्हा बघतो".... ऋषी

दुसऱ्या दिवशी ऋषी, दिन्या आणि इरा कॉलेज कॅन्टीन मध्ये थांबले होते... आणि तिथं सरू आणि तिची मैत्रीण सुरेखा पण कॅन्टीन मध्ये आली... त्यांना येताना बघून दिन्या लगेच बोलला...

"ए ऋषी ती बघ सरू"....

ऋषी सरू ला बघून लाजला आणि तोंड लपवायला लागला.... सरू ने जाताना ऋषी समोर पाहिलं आणि झटकन तिथून निघून गेली...

"ए ऋषी chance मस्त आहे जाऊन परत सांग तिला की तू तिच्या प्रेमात वेळा आहेस".... इरा

"गपतेस का जरा, साला आता तर मला तिच्या समोर जायला पण भीती वाटते".... ऋषी

"काय रे बाळा घाबरतो, तू पण ना साला बच्चूच आहे अजून"... इरा

"भावा हे तर आपल्या इजत चा बलात्कार आहे, असं कसं... शी, मायला तू एक मुलीला घाबरलास"... दिन्या

"ऐ तुम्ही दोघ पण ना शांत बसा, मला झाडावर चढवू नका, मला सगळं कळतंय तुमचं".... ऋषी थोडं चिडून बोलला

"हो का, मग तुला ते कसं नाही कळलं"... इरा दिन्याला इशारा करत म्हणाली

"हा... काय इरा"... दिन्या इरा च्या बोलण्यात होकार देत बोलला...

"अरे तेच कळत नाही का तुला ना आहे माझी ना"..... इरा आणि दिन्या हसत हसत म्हणले

हे ऐकून ऋषी खूप चिडला... आणि मनातल्या मनात बोलला, "भेंडी काय तरी करावं लागणार आता तर"....

ऋषी अगदी शांतपणे वर्गात बसला होता, काही क्षणात वर्गात सरू आली पण ऋषी ने सरू वर अजिबात लक्ष दिलं नाही, सरू ऋषी कड बघत बघत त्याच्या पाटच्या टेबलावर जाऊन बसली....

"शेट आज तर वहिनी आपल्या पाटीच येऊन बसली.... वाटत प्रेमात पडली तुझ्या"... दिन्या हळूच ऋषी च्या कानात बोलला....

पण ऋषी ने दिन्या च्या बोलण्याकड दुर्लक्ष केलं....

दिन्या मग मागे फिरला आणि सरू ला बोलला...

"अरे सरू आज तू इथं बसली आहेस, रोज तर तिथं त्या कोपऱ्यात बसतेस ना".... दिन्या

"हो, पण ही सुरेखा ला तिथून नीट दिसत नाही ना म्हणून आम्ही आज इथं बसलोय"... सरू ने मुदाम सुरेखाच्या अंगावर ओळलं सगळं...

"हो का... काय ग सुरेखा इतक्या दिवस नीट दिसत होतं, आज कसं काय दिसत नाही तुला"... दिन्या

"हो नाही दिसत, तुला काय तू सरळ पुढे बघ ना, दुसऱ्या च्या फाटक्यात का पाय घालतोय".... सुरेखा अगदी रागात बोलली...

"अग हो भवाने, जरा दमाने... नाय ते कसय मला वाटलं तू माझ्या प्रेमात तर नाही ना पडलीस".... दिन्या अगदी लाजत म्हणाला

हे ऐकून ऋषी आणि सरू पण हसायला लागले.... सरू ला असं हसताना पाहून सुरेखा अगदी रागात बोलली...

"थोबाड पाहिलंय का आरश्यात कधी, काळी कुत्री पण तुझ्या प्रेमात पाळणार नाही"... सुरेखा

सरू सुरेखा ला शांत करत म्हणाली... "हो ग बाई शांत हो जरा"

"भाई कश्याला दुसऱ्याच्या फाट्याकत पाय टाकतोय सोड ना जाऊदे... तू ये इथं पुढे बघ"... ऋषी सरू कड दुर्लक्ष करत बोलला

क्लास संपल्यानंतर, ऋषी आणि दिन्या वर्गाच्या बाहेर पडले, सरू पण सुरेखा ला सोबत ओळत त्यांच्या पाटी पाटी आली, ऋषी सारखा सरू ला बघून पण न बघण्यासारखं करत होता, सारखा तिच्या कड दुर्लक्ष करत होता...

ऋषी आणि दिन्या कॅन्टीन मध्ये येऊन बसले, सरू आणि सुरेखा पण त्यांच्या मागे मागे कॅन्टीन च्या आत आले... सरू नुसतं ऋषी ला बघत होती, पण ऋषी सरू वर लक्षच देत नव्हता.... ऋषी तसच सरू ला ignore करत तिथून निघून गेला...

दिवस असेच जात होते, ऋषी रोज कॉलेज ला यायचा, मित्रांसोबत मस्ती मजाक, धमाल करायचा... पण जर सरू दिसली लगेच तिला बघून पण ना बघण्यासारखं वागायचा, जणू हा तिला ओळखतच नाही... सरू ला ऋषीचं हे वागणं बिलकुल पण पटत नव्हतं... तिला ऋषी चा खूप राग यायचा..

एक दिवस कॉलेज जवळच एका चहा च्या टपरीवर ऋषी दिन्या आणि इरा बसून मस्त चहा पित गप्पा मारत होते तेव्हाच सरू तिची मैत्रीण सुरेखा सोबत तिथं आली... सरूला येताना बघून दिन्या बोलला...

"ऋषी सरू आली बघ"...

"हे सुरू आली म्हणजे आपण इथं त्या नरकटी ची वाट पाहत होतो"... इरा थोडं रागवलीच

"इरा गप ना"... ऋषी....

"काय गप, मी नाय मी चालली इथून तुम्ही तुमची काशी घाला"... इरा अगदी चिडून बोलली

"ऐ दिन्या हिला शांत कर जरा"... ऋषी दिन्या ला बोलला

"इरा शांत रहा ना, थोडं वेळ बघतर खरी, आधी काय होतंय ते"... दिन्या

यांचं बोलणं चालूच होत की तेवड्यात सरू तिथं येऊन बोलली...

"ऋषी.. ऐक ना दोन मिनटं जरा येशील थोडं बोलायचं आहे".... सरू

"मी, मला बोलावतेस तू"... ऋषी दिन्या ला बघत बोलला...

"हो ऋषी तुलाच बोलावते"... सरू

"अच्छा.. असं का, मग ठीक आहे"... ऋषी

"काय ठीक आहे चल".. सरू

"चल... म्हणजे कुठे चल, तुला जर काय बोलायचं आहे तर इथंच बोल"... ऋषी

"इथं यांच्या समोर"... सरू

"ऐ यांच्या समोर म्हणजे.... जे बोलायचं ते बोल आणि निघ इथून"... इरा अगदी रागात बोलली

हे ऐकून दिन्या ने लगेच इराला पाटीवर चिमटा काडला, आणि तिला गप रहाण्याच्या इशारा केला... सरू ने इरा च्या बोलण्यावर लक्ष नाही दिलं...

"बघ इथं सगळ्यांसमोर अस, मला थोडं uncomfortable वाटाय"... सरू

"So what... they all are my freinds and come on don't be shy, say it whatever u want to say, hurry up"... ऋषी

सरू जरा वेळ शांत राहवून विचार करू लागली, व काही क्षणानंतर बोलली

"मला असं म्हणायचं होतं की... त्या दिवसा साठी sorry... मी थोडं जास्त overeact केलं, पण त्या मुळे तू मला सारखं ignore का करतोस मला नाही आवडत"... सरू

"Sorry.... ummmm, अच्छा अच्छा ! त्या दिवसा साठी its Ook, अजून काही"... ऋषी

"तू ignore का करतोस मला"... सरू थोडं हळू आवाजात बोलली

"मी, चल काही पण मी कुठे तुला ignore करतोय, तुला का असं वाटाय की मी तुला ignore करतोय"... ऋषी अगदी रुबाबात बोलला

"हो करतोय तू... आता पण माझ्या बोलण्याला तू दुर्लक्ष करतोय"... सरू थोडं रागवूनच बोलली

"काय यार... ऐ ही वेळी झालीय... ऐ सुरेखा घेऊन जा यार हिला बघ वेळ्यावांनी काय पन बोलतेय".... ऋषी

"हो... हो चल सरू जाऊया... सगळे बघताय आपल्यासमोर"... सुरेख हळूच सरू च्या कानात बोलली

सरू... खूप दुःखी झाली, तेच नाही पण तिच्या डोळ्यातून पाणी आलं... पण ती काहीही न बोलता गपचूप सुरेखा सोबत वळून निघून गेली...

"ऋषी यार जास्त झालं, रडली यार ती'... दिन्या

"रडू दे आपल्याला काय"... इरा

ऋषी पण उदास होऊन थांबला होता... तितक्यात सरू जाताना थांबली आणि मागे वळून तिने ऋषीला बघितलं, ऋषी ला तिथं शांत थांबलेला पाहून ती परत ऋषी कळे धाऊन आली... आणि बोलली

"I love uhhh... ऋषी"

ऋषी हे ऐकताच शांत नजरेने सरू समोर बघत होता.... इरा हे ऐकून खूप दुःखी झाली कारण तिचं ही ऋषी वर प्रेम होतं दिन्या हे ऐकून खूप खुश झाला आणि ऋषी ला बोलला....

"ऋषी... ऐकलस, ती तुला love uhh बोलली"... दिन्या

ऋषी ला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता, त्याला हे अगदी स्वप्ना सारखं वाटत होतं... तेव्हाच सरू ने ऋषीचा हाथ पकडला आणि बोलली...

"बाळा समजलं नाही का तुला, थांब स्पस्ट बोलते हा आहे माझी हा".... सरू

ऋषी हे ऐकून हसला आणि प्रेमाने त्याने सरू चा हाथ धरून त्याच्या गालावर फिरवला........

गाडी येऊन सुरू च्या घरा समोर थांबली, सरू कोणासोबत क्षण भर बोलायला पण थांबली नाही, जशीच गाडी थांबली तिने दार उघडला आणि रस्ता क्रॉस करून निघून गेली... ऋषी झोपला होता त्याच्या जुन्या प्रेमाच्या आठवणीत गुंतला होता, इरा ने त्याला उठवलं, डोळे उघडताच त्यांनी पाहिलं की सरू जात होती... ऋषी गाडी च्या बाहेर उतरून थांबला आणि शांत पणे सरू ला जाताना बघत होता... आणि सरू ने एकदा पण मागे वळून बघितलं नाही आणि ती निघून गेली........

क्रमशः


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance