Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Ashvini Duragkar

Abstract


4.5  

Ashvini Duragkar

Abstract


पालकांनो जरा सांभाळुन......

पालकांनो जरा सांभाळुन......

6 mins 718 6 mins 718

सम्यक इयत्ता सातवीत शिकत होता. शहराच्या नामांकित सीबीएसई शाळेत त्याच नाव दाखल होतं. बॅगच्या ऐवजी तो रोलींग सुटकेस न्यायचा शाळेत. बाजारात त्याच्या पुस्तकांच ओझ झेपून नेणारी बॅगच उपलब्ध नव्हती. शाळेत आठवड्याला एकूण तीन ड्रेस लागयचे. तसा युनीफाॅर्म काळा कोट, काळा पॅंट आणि पांढरा शर्ट होता. बुधवारी तो त्याच्या हाऊसचा ड्रेस (ग्रीन हाऊस) घालायचा जो की हिरवा पॅंट आणि हिरवा शर्ट होता. शनिवारी पांढरा पॅंट आणि पांढरा शर्ट. अशी त्याची वेगवेगळया कपड्यांचे वेगवेगळे दिवस ठरलेले होते.


अरे होssssss वेगवेगळया कपड्यांवर मॅचिंग त्याच रंगाचे शुज ही असायचे म्हणजे काळा, हिरवा आणि पांढरा. ठरलेल्या दिवशी ठरलेलेच रंग घालणे अगदीच कंपल्सरी होते नाही तर १००/- रूपयांचा दंड होता. बरं आता झाल कपड्यांच. जेवणाच्या डब्यात, प्रत्येक वारानुसार डायरीमध्ये नमुद केल्याप्रमाणे त्यांना वेगवेगळे पदार्थ डब्यात द्यावे लागतात. जसे; स्प्राऊट ला मोड आलेले पदार्थ, पराठा डे ला पराठा, फ्रुट डे ला फळ, पोळी भाजी डे, ग्रीन सॅलड डे, नको सको ते दुनियाभराचे सगळे डे. त्यानुसारच त्याचा शाळेचा डब्बा बनायचा. बरं एवढी या डे त्या डे ची खटाटोप करून ही तो रोज अर्धा डबा परत आणतो. फक्त खातो भाजी पोळीच.

 

  त्याचे शेड्युल इतका टाईट की सकाळी ८:३० ची शाळा म्हणून बस ७ ला येणार तर ६ लाच उठायचं मग ८:३० ते ३:०० शाळा. घरी बस येत पर्यंत ४:३० घरी आल्या. आल्या जेवण मग लगेच शिकवणी वर्ग ५:०० ते ७:०० नंतर घरी आला की जेवण अन मोबाईलचा गेम मग लगेच ८ ला झोप. असा त्याला एक मिनीटं ही फावला वेळ नसणारा टाईट शेड्युल.

 

याच्या सारखाच आई बाबांचा ही शेड्युल टाईटच. त्याची आणि त्यांची भेट फक्त कामापुरतीच. ईतर वेळेस तो ही व्यस्त आणि ते ही. त्याची सर्वथा त्याच्या घरी त्याची काळजी घेणारी आयाच. तिनेच त्याला लहाण्याचा मोठा केला. त्याचे हवे नको ते सगळेच लाड ती पुरविते. जे जे आईने करावं तिचं करते त्याचं. तो ही काही दुखलं खुपलं की तिलाच गाठतो आईएवजी. एकंदरीत हे त्याच छोटस जग. ज्यात कुणीच कोणाच नाही. त्याच्याशी प्रेमाने बोलायला कोणाच्या जवळ सवड नाही. एक दिवसही आराम नाही. ती गंमत जंमत, मित्रांबरोबरचे खेळ, आजी आजोबांच्या गोष्टी, आई बाबांसोबत वेळ घालवणे, नातेवाईंकांच्या भेटी गाठी यातल काहीच त्याला करता नाही यायचं.


सुट्या ही अगदीच मोजक्याच. दिवाळीत जेमतेम पाच दिवसांच्या सुट्या. रविवारी ही जादा वर्ग. किती हो दडपण त्या लहानग्या जीवावर. वय असंच भरभर चाललय आणि त्याच बालपण जगायचचं राहुन गेलंय. शिवाय त्याच बालपण रम्य करायला त्याच्या आई बाबांजवळ ही सवड नाही. मग त्याने कराव तरी काय. करमणुकीची वाटेल तेवढी साधने त्याच्या पायथ्याशी पडुन असायची आणि काही नाही तर मोबाईल होताच वेळ घालवायसाठी.


अशाच एका रात्री जेवण करून तो बेडवर लेटुन मोबाईलमध्ये गेम खेळत होता. खेळता खेळता एक जाहिरात आली निरोधची. निर्वस्त्र जोडप्याच्या प्रणयाची. दिसताच तो भेदरला आणि लगेच त्याने ती जाहिरात बंद केली. व परत आपला गेम खेळु लागला. तस त्या जाहिरातीमध्ये काय होत हे त्याला चांगलाच माहिती होतं. आपली विकसित प्रसार माध्यमे मोठ्या लहान सर्वांनाच त्याचा उजाडा देत असतातच. म्हणून हलकी हलकी उडती उडती कल्पना होतीच त्याला. थोड्या वेळात ती जाहिरात परत आली. आता त्यात अजुनच अधिक मादक दृश्य दाखवले. बघुन त्याला कसंतरी झाले. अलगद रक्त प्रवाह वेगाने झाल्यासारख वाटलं. अंग शहारलं. थोडया वेळाने ती परत लागली आता त्या जाहिरातीचा कालावधी वाढत चालला होता. परत त्याच्या भावना उफाळून आल्या. आता ती जाहिरात परत परत लागावी अशी त्याची इच्छा होऊ लागली. पण त्या ऍडला क्लिक करून उघडायची हिम्मत त्याची होत नव्हती. चुकून कोणी खोलीत आलं आणि तो पकडला गेला, तर त्याची ख़ैर नाही याची कल्पना ही होती त्याला. पण तरीही त्याच मन मानेना. त्याने खोलीच दार आतुन लाॅक केलं आणि मग बाथरूममध्ये गेला. आता तो परत गेम खेळायला लागला. त्याच पुर्ण लक्ष त्या येणाऱ्या जाहिरातीकडे होतं. तो घामाघुम झाला होता. केसातन घाम ठपठप ओसंडत होता. खेळता खेळता जाहिरात परत लागली त्याने क्षणाचाही विलंब न करता चटकण जाहिरातीवर क्लिक केल. Open होताच एका मुलीचा live video आला. ती अर्धनग्न अवस्थेत खूप मादक संवाद साधीत होती. आवाज बाथरूमभर फिरत होता.


     ऐकून त्याच्या हृदयाचे ठोके सपाट्याने धडधडू लागले. अंगात आग संचारू लागली. एकदम धडकी भरली. भितीने त्याने पटकन मोबाईल बंद केला. ड़्रोवरमध्ये ठेवला आणि बेडवर जाऊन तोंडभर पांघरुन घट्ट डोळे बंद करुन स्वतःला शांत करू लागला. पण तेच तेच दृश्य त्याच्या डोळयांपुढे वारंवार ओझरते होत आणि कानात तो आवाज आदळत होता. आता त्याने आणखीन डोळे घट्ट केले अन् कान हातांनी झाकून घेतले. पण ते दृश्य डोक्यातून आणि तो आवाज कानातून जाईना. कशीबशी त्याने रात्र काढली परत दुसरा दिवस उगवला. पुन्हा मनात तिच हुरहुर. हृदयाचे ठोके तसेच वाढलेले. डोळयांसमोर तेच मादक दृश्य. शाळेतही आणि शिकवणी वर्गात ही मन लागेना. अक्खा दिवसच बेचैनीत गेला. रात्र झाली अर्धे जेवण संपवुन तो लगबगीने खोलीत आला. रुम आतून लाॅक केली. ड़्रावमधन मोबाईल काढला. हात थरथर कापत होते. धीर एकवटुन त्याने मोबाईल सुरु केला. सुरु करताच कालचाच अर्धवट बघीतलेला पेज उघडला. बघून त्याला अजून थरकाप सुटला.

 

    त्याने एका पाॅर्न व्हिडिओवर क्लिक केले. लगेच व्हिडिओ सुरु झाला. त्यात सगळच बिभत्सपणे दाखवित होते. या आधी पण चित्रपट आणि सीरियल मध्ये त्याने बघीतले होते पण त्यात एवढ किळसवाणे नाही दाखविल. ते बघुन त्याला कधी न आलेल्या सगळ्याच भावना उफाळून आल्या. थोड्या वेळ त्याने ते व्हिडिओ बघीतले आणि मग झोपला. आता त्याला शांत झोप आली पण स्वप्नात आपणही त्याच विश्वात आहो हेच त्याला जाणवले. हळुहळु तो रोजच ते बघू लागला. त्याला खात्री पटली होती आपला मोबाईल कोणीच चेक करत नाही. खोलीत ही कोणी ढुंकून बघत नाही. तो त्याच्या राज्याचा राजकुमार होता. त्याची भिती नाहीशी झाली. त्याचा व्हिडिओ बघायचा कालावधी ही हळुहळु वाढु लागला. ते बघीतल्या शिवाय त्याला झोप येईना. त्त्याने एका वेगळ्याच विश्वाला आपलंसं केलं होते. त्याच्या वागण्यात व्यवहारात बदल होवु लागले. शाळेतील मुलींशी त्याची जवळीक वाढली. त्यांना ही तो त्याच नजरेने बघु लागला. त्या व्हिडिओमध्ये तो शाळेतील मुलींना बघू लागला. वाढत्या वयाला एक वेगळी संगत भेटली होती.

 

त्याच्यात प्रकर्षाने बदल होत होते. अचानक तो मोठ्यांप्रमाणे वागु लागला. याची त्याच्या घरच्यांना काही कल्पना नव्हतीच. ते त्यांच्या विश्वात आणि तो त्याच्या ... मस्त होते. आता त्याने पुढचा उच्चांक गाठला होता वाढत्या वर्गासोबत त्याची अश्लील वृत्तीही वाढु लागली. आता वेगवेगळया porn site तो search करायला शिकला. त्याच वय वर्ष १३. इयत्ता ८ वी. हळुहळु तो मोबाईल शाळेत न्यायला लागला. सोबतच्या मित्रांना ही व्हिडिओ दाखवु लागला. “संगत तशी पंगत” अगदीच खरी असणारी म्हण. मुलं ही आतुरतेने बघु लागले. वय असं की प्रत्येक गोष्टींच कुतूहल. त्यात विरुद्ध लिंगाच आकर्षण, भटकणारं वय, त्यात मिळालेली वाईट संगत सगळच जोडाला जोड देणारे. 

   

त्यांचं आता हे रोजचंच होवु लागलं. ब्रेक झाला की सगळी मुल एकत्र येवुन सम्यकच्या मोबाईलवर अश्लील व्हिडिओ बघायची. त्यांच्या लाजा कधीच्याच टप्पी देवुन लांब पळाल्या होत्या. आपलं वय काय आणि आपण करतो काय याची जाणीव करुन देणार आसपास कोणीच नव्हत. मन उधाण वाऱ्यासारख स्वच्छंद गोतावळ घेत होतं. मनात नवनवीन विचार उत्स्फूर्त होत होते. कुठली ही मुलगी बघीतली की त्यांचे ईशारे सुरु होवुन जायचे. बरेचदा मुली त्यांची तक्रार करायच्या पण श्रीमंत बापाचे लेक आहे म्हणून शिक्षक दुर्लक्ष करायचे.

 

    शाळेत मुलांची एक गॅंग बनली. सम्यक त्या गॅंगचा बाॅस होता. सर्वे ब्रेकमध्ये धावत पळत मुलींच्या बाथरुम समोर जावुन बसायचे आणि एकामेकांला इशारे करायचे. त्यांचा नित्यनेम ठरला होता. मनात आणि तनात झपाट्याने बदल होत होते. आता नुसतंच बघुन बघुन त्याच मन भरलं होत. त्याला ते व्हिडिओत घडणारं प्रत्यक्षात घडवुन आणायचं होतं. त्याचा परिणाम काय होईल ? कसा होईल ? याच्याशी त्याला काही घेणं देणं नव्हतं. फक्त डोक्यात एकच विचार ....करायचं म्हणजे करायचं मनातल्या भावना ओसंडून येत होत्या. त्याने ठरवलंच उद्या रविवारच्या जादा वर्गाला जेव्हा शाळेत वर्दळ कमी असेल तेव्हा संधी साधून प्रात्यक्षिक करायचं. आदल्या दिवशी त्याने रात्रभर व्हिडिओ बघीतले.


क्रमशः 


Rate this content
Log in

More marathi story from Ashvini Duragkar

Similar marathi story from Abstract