Ashvini Duragkar

Drama Tragedy

4.0  

Ashvini Duragkar

Drama Tragedy

नवा गडी... नवा राज्य भाग -२

नवा गडी... नवा राज्य भाग -२

5 mins
236


    मल्हारच्या आईची तब्येत आता बरी होत होती. हाॅस्पिटमधनं सुट्टी झाली. तेजसही त्यांच्या सोबत घरी गेली. घरी येवुन सगळयांनी मोकळा श्वास घेतला. आता वेळ होती तेज़सची निरोप घ्यायची. ती आई जवळ गेली,” चला काकु आला निरोप घ्यायची वेळ आली. मी निघते. तुम्ही आता काळजी घ्या. काही लागल तर नक्कीच कळवा”.

“अग राणी कुठे निघतेस एवढ्या घाईत जरा क्षण भर विश्रांती घे. जरा फ़्रेश हो पोटात दोन घास घाल आणि मग जा घरी. तशीही तू फ़ार वर्षानंतर आली आहेस. आम्हाला ही संधी दे तुझी सरवराई करायची.”

“अग थांब ना तेजू मी तुझे फेवरेट बटाटे वडे आणतो लागलीच”, मल्हार म्हणाला

“अरे वाऽऽऽऽ, जा तेजू मल्हारच्या खोलीत जरा फ़्रेश हो”.

 

  सगळयांच्या आग्रहास्तव ती थांबलीच शेवट. मंदार बटाटेवडे आणायला गेला आणि ती त्याच्या खोलीत फ़्रेश व्हायला. तो परत आला तेव्हा ती त्याच्या बेडवर झोपून होती. अगदी निवांत डोळे टिपले होते त्याने हळूच दार टेकवल आणि हरवला तिच्या चेहऱ्यात. एवढ्या दिवसांची तिने केलेली धावपळ तिच्या चेहऱ्यावर झळकत होती. खरच हे अस कस झाल त्याला कळलच नाही. सगळ क्षणातच घडल. पण आता पुढे काय? असंख्य प्रश्नांचा मारा त्याच्या डोक्यात सुरु झाला. आता परत त्यांच तेच रूटीन सुरू होणार होत. ज्यात ती बाॅस आणि तो एक साधारण कर्मचारी असणार होता. त्याच खरच प्रेम जडल होत तिच्यावर. मनात भिती होती ती राहील काय आपल्या घरी? तिच घर केवढ मोठ आहे? आपल्या घरी अॅडजस्ट होईल काय? आज विचारुनच टाकतो. कल किसने देखा... म्हणून त्याने दाराची कडी लोटली आणि तिच्याजवळ गेला. तिच्या कमरेला विळखा देवुन अलगद बाहुत घेतल. तो स्पर्श दोघांसाठी स्वर्ग अनुभूती देणारा होता.

   तिच्या कपाळावर आपले ओठ माखवत ,”तेज़ू... या घरची राणी बनशील?”

तिने चटकन डोळे घडले व गालातच लाजली. त्याच्या बाहुला आणखीनच घट्ट विळखा देत म्हणाली,”या दिवसाची वाट तर मी काॅलेजमध्ये असल्यापासन बघत होती.”

“काय?? खरंच”.

“ह्म्म्म, पण भिती वाटायची. तू मला स्वीकारशील की नाही याची”.

“मी तर कधीचाच तुझा होऊन बसलोय”


“हृदयात वाजे समथिंग...

 सारे जग वाटे हॅपनिंग...

असते सदा मी ड्रिमिंग...”


    जणू बॅकग्राऊंडमध्ये हे गाण सुरु होत आणि ते दोघ एकामेकाच्या कुशीत हरवायच्या येण क्षणातच बाबांनी दार ठकठकवलं. तसं त्याने तेजूला धपकन खाली पाडलं आणि धावत बाथरुममध्ये पळाला. तेजूला हसू आवरेना. कसंबसं स्वतःला आवरून तिने दार उघडले. 

“अग हा आलाच नाही काय अजून?”

“माहिती नाही बाबा. बघते फोन करुन”.

“बघ जरा. पोटात कावळयांनी थैमान घातलं आहे.”

  तेजूने दार टेकवले व आत गेली. मागनं मल्हार आला आणि तिला घट्ट विळखा देत मानेवर चावू लागला. 

“ऐ सोड ना रे”.

“नको थांबवू ना.”

“अरे पण बाबा वाट बघताय ना”.

“ह्म्म्म्म”

   त्याचा झरकन हात झटकून हसतहसत ती बाहेर पळाली. स्वादिष्ट बटाटेवडे सहकुटूंब खाताना त्याला अजूनच चव आली होती. एकत्र बसून खायचा हा तिचा पहिलाच अनुभव. सगळयांचा निरोप घेवून ती घरी गेली. वाटेभर विचार,”मी निभवू शकेल ना हे नातं? सगळेच किती निरागस आहेत. माझ्या स्वभावामुळे कुणी दुःखी तर नाही होणार? बाबांचं काय? मी गेल्यानंतर ते घरात परत एकटे होतील?” असे असंख्य प्रश्न तिच्या मनावर मारा करू लागले. 

   

गेल्या गेल्या ती बाबांच्या खोलीत गेली अन त्यांच्या मांडीवर डोक ठेवून मल्हारबद्दल सांगितले. बाबा ऎकून अवाकच झाले. एवढी हुशार आणि अनुभवी मुलगी अशा साधारण मुलाच्या प्रेमात कशी काय अड़कली. त्यांच्या पाहाण्या देखतचाच होता तो. पण देव जाणे असं का होतं त्यांना त्याच्या नियतवर शक होता. भावनेच्या आवेशात वाहलेल्या तेजूला त्या वेळी ते काहीच बोलले नाही शिवाय ती ऎकायच्या अवस्थेतही नव्हती. पण काहीतरी गडबड नक्कीच आहे हे मात्र त्यांच्या निदर्शनात नक्कीच आलं होतं. तिला विरोध करुनही काहीच फायदा नव्हता. त्यांना माहिती होतं ती त्यांना ज़ुमानणार नाही. शिवाय ज़िद्दी जे म्हटलं तेच करणार. म्हणून त्यांनी तिच्या गोष्टीला नकार दिला नाही पण होकारही दिला नव्हता. फक्त सावधगिरी राखायची पूर्ण तयारी केली होती.

    

इकडे दोघांच्याही मनात लग्नाचे लाडू फुटत होते. आॅफिसच्या हि वातावरणात बऱ्यापैकी बदल झाले होते. एक साधारण कर्मचारी असणारा मल्हार हळुहळु आपल्या डेस्कची जागा बदलवुन सी॰ई॰ओ॰ च्या कॅबिनमध्ये डेरा जमवु लागला होता. दिवसेंदिवस त्याची हिम्मत वाढत चालली होती. कधी वर मान करुन न बोलणारा आज ईतर कर्मचाऱ्यांवर आपला धाक जमवु लागला. दिवस दिवस भर तिच्या जवळ बसुन राहाणे, विणाकारण बाहेरचे टुर काढणे, कंपनीचे पैसे वैयक्तिक कामाकरीता ख़र्च करणे हे सगळे प्रकार हळुहळु जोमाने वाढु लागले होते. भावनेच्या आहारी गेलेल्या तेजुला काहीच आवेग नव्हाता पण तिच्या बाबांच त्यांच्या एका एका पावलाकडे निरखुन लक्ष होत. आजपर्यन्त मल्हारच्या वागण्यातन कोणालाच काही कळल नव्हत पण तिच्या बाबांनी त्याची एक एक नस ओळखली होती.

 

    ते मुद्दामच लग्नाची बोलणी लांबणीवर टाकत होते पण तेजुच्या हट्टापायी त्यांना वारंवार घुटने टेकावे लागायचे शेवटी तिच्या हट्टापुढ़े नमुन त्यांनी शेवटी बोलणीची तारीख ठरवीली. ठरल्याप्रमाणे सगळे जमले. एकुलती एक मुलगी त्यातल्या त्यात नामांकित कंपनीची सी॰ई॰ओ॰ लग्न तर थाटामाटात होणारच होत. आंदनाच काय अक्ख स्वर्गाच वैभव ती सोबत मिरवणारच होती. मुलांकडन जेवढ जमेल तेवढ तेही करणारच होते. काही न बोलता त्यांना सगळच मिळणार होत. महिन्याच्या शेवटी शेवटीची लग्नाची तारीख ही ठरली. मोठया थाटामाटात राजकुमारी राजकुमाराच लग्न झाला. हृदयावर दगड ठेवुन बापाने लेकिला विदा केल. मन आतल्या आत घुसमळत होत पण तिच्या आनंदापेक्षा मोठ या जगात त्यांच्यासाठी काहीच नव्हत. मंदार घेवुन घेवुन काय घेईल पैस्या पाण्याची तर कमीच नव्हती पण त्यांना भिती होती तिच्या भावनांच्या रखडणाची. त्यांनी हव नको ते सगळच तिला दिल जेणे करून तिला त्रास नको. सोन्या, हिऱ्या, चांदी, मोत्यात लादून साता पिरतीच वैभव ती त्याच्या घरात घेवुन आली. घर हिऱ्यासारखं चकाचौंध लखलखून टाकल. तिच्या येण्याने घराला घरपण मिळाल होत. 

       

सगळं “पहला नशा पहला खुमार वाली” फिलींग होती. नया नया प्यार खुमार चढत होता. तिने फ़रमाइश केली आणि ते तिच्या डोळयांसमोर आल सगळं असच सुरु होत. सासुबाई तिचे भरभरून लाड पुरवित होत्या. तिच्या आवड़ी निवडीची सम्पूर्ण काळजी घ्यायच्या. तिला काहिही अडचण आली तर त्या लगेच असायच्या तिला मदतीला. नवीन घर, नवीन नाती या सगळयांमध्ये ती ताळमेळ घालायचा प्रयत्न करीत होती. शिवाय सगळे तिच्या मदतीला तत्पर होते.

         एका महिन्याच्या सुट्टीनंतर ती ऑफिसला गेली. ऑफिसचा चेहरामोहराच बदलला होता. पंधरा दिवसात त्याने त्याचं कॅबिन, त्याचा डेस्क तिच्या बाजूला शिफ़्ट केला होता. जवळपास सगळेच डेस्क बदलवलेले होते. भिंती, पडदे, सोफ़े, टेबल सगळयांचे रंग बदललेले होते. तिला हलके आणि नाजूक रंग आवडायचे आणि ऑफिस गडद रंगाने गदजबजलेल होत. इव्हन तिच्या कॅबिनचाही नक़्शा बदललेला होता अगदी सगळंच तिला न आवडणारं होतं हे बघून तिला चिडचिड होत होती.

ती डिसअपॉइंटेड झाली आणि खूप चिडली.तिला वाटल बाबांनी केले आसावेत हे सगळे बदल. आल्या आल्या मोठया आवाजात चिडक्या स्वराने तिने मॅनेजरला आवाज दिला. पूर्ण ऑफिस दणाणून गेलं. मंदारला याची कल्पना नव्हती तो बाहेर गाडी पार्क करीत होता आणि तिथेच एक क्लायंट भेटला तर त्याच्याशी बोलत बसला. 

“मला न विचारता हे सगळे बदल कोणी केले”, मोठया आवाजात ती मॅनेज़रवर भडकली. मॅनेज़र मान खाली करून उभे होते. 

“उत्तर हवं आहे मला. बाबांनी मला न विचारता हे सगळे बदल कसे केलेत? आय नीड आन्सर नाऊ... ब्लडी... डॅम इट?”

“मॅडम हे सगळं मोठया सरांनी नाही केलं?”

“व्हाट?”

“येस मॅम”

“देन हू हॅज डन धिस?”

“मल्हार सरांनी केलंय?”

व्हाट द हेल आर यू टॉकींग?”

“हो मॅडम इव्हन सरांनाही हे अजिबातच आवडलेलं नाही आहे. त्यांनी बघितल्यानंतर ते पण खूप चिडले पण मंदार सरांचं नाव सांगितल्यानंतर ते काहीच बोलले नाही”.

“हाऊ डेअर हिम टू डू सच थिंग्स इन माय अबसेन्स?”

     तेवढ्यात मल्हार तिथे आला...

 

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama