Ashvini Duragkar

Romance

3.4  

Ashvini Duragkar

Romance

त्या बेधुंद सरी

त्या बेधुंद सरी

3 mins
408


आभाळ गच्च भरलेलं होत..

सोसाट्याचा वारा खिडक्यांची उघड - झाप करीत होता,

जणू कळलं होतं त्याला मन बसलंय तिचं ,

विजेच्या कडकडाटाने हृदयाची स्पंदन गतीने वाढू लागली होती,

गर्द काळ्या ढगांमधून पावसाच्या सरी कोसळू लागल्या ,

त्या अतृप्त सरी धरती मातेची तृष्णा भागवीत होत्या,

एरवी प्राणप्रिय असणारा पाऊस, 

आज मात्र तिला बोचायला आला होता ,

भरलेल्या आभाळाप्रमाणे तिचं मनही ओसरून आलं होत,

जणू त्या टपोऱ्या थेंबाच्या सरी, 

तिच्या भरलेल्या मनात अजून काहूर माजवायला आल्या होत्या , 

मन खालवर व्हायला लागलं ,

राहून राहून त्याचा चेहरा डोळ्यांसमोर येतं होता, 

ती सतत घरात येरझाऱ्या मारीत होती ,

सकाळपासून पायाला पाय नव्हता,

पण....!!!!!

"तिच्या मनाला मात्र ठाऊक होतं ..

तो नक्कीच परत येईल. त्यानी प्रॉमिस केलंय...

न भेटता नाही जायचा तो",...

मनाचाच मनाशी वाद सुरु होता..

पण गेल्या आठ दिवसांपासून त्याच्याशी काहीच

संवाद नव्हता...

बेसवर संपर्क केला पण धड कोणीच सांगे ना...

"कुठे असेल, कसा असेल?"..

गॉड जीव जातोय माझा इथे...

कसं कळायचं?

कसा शोध लावू?

तिने स्वामी जवळ दिवा लागला...

दोघांचाही समर्थांवर मोठा विश्वास..

तिने मोठ्या श्रद्धेने स्वामी समर्थांजवळ अखंड दिवा लावला...

आणि श्री गुरु चरणा अमृत वाचायला काढली..

 शब्दनशब्द वाचतांनी तिच्या डोळ्यांना धारा लागल्या...

"स्वामी तुम्हाला सगळं माहिती आहे..

माझी व्यथा कळते...

अजून नको अंत पाहूस रे...

मी नाही जगू शकतं त्याच्याविना...

त्याला सुखरूप घरी परत आण",

डोळ्यातील पाणी पुसत ती प्रार्थना करू लागली...

सियाचिन ला गेलाय ...

म्हणे युद्ध सुरु आहे सियाचिनच्या बॉर्डरवर...

या आधी ही तो गेलाय युद्धाला ...

पण असं कधी नाही झालंय...

तो परत यायचाच...

पापणी मिटवली कि तोच दिसतो...

जीव आकांताला आलाय आता....

तिने भावाला कॉल केला...

"यश आठ दिवसांपासन यांचा काहीच पत्ता नाही.

तू बघ ना जरा..

धीर खचतो आहे रे माझा आता",

त्याने नुसतंच हम्म्म्म म्हणून फोन ठेवला...

जणू त्याला कळलं होतं..

तो परतणार नाही...

ती बसली आपली डोळे बंद करून स्वामींचा जप करायला...

थोड्या वेळाने त्याचा कॉल आला...

"ताई शांत हो.. तू एका सैनिकाची बायको आहेस.

तुझं असं धीर हारून चालणार नाही"...

"ह्म्म्म", तिच्याकडन नुसतं एवढंच...

"युद्धात काही जण जखमी झालेत,

तर काही अजूनही बेपत्ता आहेत",

"काय...?",

"तू स्ट्रॉंग राहा भाऊजी येतील परत"...

तिने लगेच फोन कापला...

आणि ढसाढसा रडू लागली...

"तू श्वास आहेस रे माझा,

तुझ्याविना मी कशी जगू...

जीवनाची आस आहे रे माझ्या,

तुझा स्पर्श कसा विसरू"....

ती अजूनही त्याच्या प्रतीक्षेत... 

 न्युज वर रोजच्या बातम्या...

 वृत्तपत्रातही तेच ...

सगळीकडे चर्चा...

काही तुकड्या गेल्या होत्या..

बेपत्ता जवानांना शोधायला...

पण काहीच माहिती आहे...

 तरीही तिला बरा विश्वास...

 स्वामींवर आणि आपल्या प्रेमावरही...

ती आपली अखंड दिवा जपत होती

अन... 

श्रीपाद श्रीवल्लभ श्रीगुरुचरणामृत वाचत होती..

तो येणारंच...

तिचं मन अजूनही त्याच्या आसेत जिवंत...

आता तर टीव्ही आणि वर्तमानपत्र ही बघणं बंद...

कित्येक दिवसांपासन वर्तमानपत्राची घडी ही न मोडलेली...

 टीव्हीच रिमोट कुठे गडप झालं तिलाच माहिती नाही...

खाण्यापिण्याचा होश नाही....

ती तशी जिवंत पण ध्यास त्याचाच...

मनात अजूनही ठाम...

"तो परत येईल"....

नजर दारावर आणि मोबाईल सतत हातात...

काही तरी कळेल...

महिन्याचा दिढ महिना झाला...

लोकांनी ठरवलंच तो नाही येणार...

सगळ्यांनी स्वीकार केला...

तो नाही परतणार...

पण ती मात्र अजूनही खंबीर...

आज पारायणाचा शेवटचा दिवस....

तिने समाप्तीची पूर्ण तयारी केली...

डोळ्यातील अश्रू अजूनही तिच्या

पापण्यांवर तळ माजवून बसले होते..

तिने पोथीचा शेवटचा शब्द वाचला...

अन तिचा फोन वाजला...

"आवाज अगदी दबका...

मी ठीक आहे"...

तिच्या आनंदाला पारावर नाही...

"तू कसा आहेस. किती घाबरले होते मी.

किती दिवस झालेत. तू आहे तरी कुठे",

अन ती ढसाढसा रडू लागली..

"शांत तो राणी...

मी लवकरच घरी येणार..

सध्या हॉस्पिटलमध्ये आहे...

तू काळजी घे"...

"हो पण तू लवकर ये"...

"मी लवकर परतणार"...

एवढं बोलून त्याने फोन ठेवला...

 तिचे आनंदाश्रू खळाखळा वाहत होते...

तिने माथा टेकवून स्वामींचे आभार मानले...

 स्वामींवरच्या अढळ श्रद्धेने तिला निराश केले नाही...

 स्वामींचा महिमा अपरंपार आहे...

 श्री स्वामी समर्थ!!!!!

त्या दिवशी परत आभाळ भरून आलं,

वाऱ्याचा गारवा तिला भारावू लागला,

मिलनाची आस वाढू लागली,

परत तश्याच टपोऱ्या थेंबाच्या सरी कोसळल्या,

पण या वेळेला तिला बोचायला नाहीत,

तर त्यांच्या प्रेमाची साक्ष देत, तिला ओल चिंब करायला!!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance