Ashvini Duragkar

Drama Tragedy

3  

Ashvini Duragkar

Drama Tragedy

नवा गडी... नवा राज्य - भाग ४

नवा गडी... नवा राज्य - भाग ४

4 mins
258


मल्हार रागाने फणफणलेला होता पण आईने सुनावलेले खडे बोल पटले होते त्याला. तिला काही झाल किंवा तिने तिच्या बाबांना काही सांगीतल तर ते खरच आपल्याला जिवंत जाळतील. 

    यांचा आपला हा सगळा संवाद सुरु होता आणि ती मात्र त्रासने तड़पडत होती. सासुबाई आणि सासऱ्यानी मिळुन तिला बेडवर झोपवल. तिचा त्रास बघुन सगळेच घाबरले. अक्षरक्षा: तिचा श्वास वर गेला होता आणि ठोके ही जवळपास थोडेच उरले कि काय अस वाटत होत. तिला लागलीच हाॅस्पिटलला नाही हलवल तर काहीही अनहोनी होवु शकत होती. लागलीच गाड़ीत टाकुन तिला हाॅस्पिटलला आणल. 

    संयोग असा घडुन आला कि तेजुचे बाबा अगदीच हाॅस्पिटलच्या दरातच उभे होते. काल झालेल प्रकरण त्यांना ही भोवल होत. बी॰पी॰ वाढल्यामुळे ते चेकअपला आले होते. मल्हारची सीट्टी पिट्टिंच गुल झाली. सासु - सासऱ्यांचा श्वास वाटेतच अडकला. तेजु त्रासने तडपत होती तिला बघुन ते धावत त्यांच्या दिशेने गेले. ते दिसताच यांचे सोंग सुरु झाले. मंदार कावरा बावरा होवुन रडु लागला. 

“बाबा बघा ना, हिला म्हणाना उठ कसे डोळे बंद केले”.

सासु - सासरे हि तिचा त्रास बघुन तड़पु लागले अगदी अनोळखी माणसालाही सहज त्यांच ढोंग कळेल अस काहीस ते वागत होते. तेजुचे बाबा तर मिल्टरी ऑफ़ीसर अगदी क्षणात त्यांनी ओळखल काही तरी नक्कीच झालाय तेजुसोबत...


“बाळा काय झाल तुला बोल ना... काही तर बोल... ग जीव जातोय ग राणी माझा...का एवढी तड़पतेस उठना”.

    तेजुच्या डोळयातील अश्रु भराभरा सरसावत होते. ती जवळपास बेशुद्ध होण्याच्या परिस्थितीच होती आणि तिच्या डोळयात सरसावलेल्या धारा बघुन त्यांच्याही डोळयातील अश्रु आग बनुन कोसळत होते. 

    तेजुला त्यांच्या तावडीतुन सोडुन त्यांनी डाॅक्टरच्या ताब्यत दिल आणि मग मल्हारची परेड घेतली.. तो बाथरुममध्ये जायच्या बाहाण्याने कटायचा प्रयत्न करीत होता. तेवढ्यात तेजुचे बाबा त्याला आडवे झाले. त्याची घट्ट गच्ची काचकडुन पकडली आणि म्हणालेत,

“हरामXX.... साXX, एका कवडिची औकाद नसलेला नौकर माझ्या मुलीला काही झाल ना.... तुझी कातडीच उधळुन ठेवील”. 

त्याचे आई बाबा त्याला सोडवण्याचा प्रयत्न करित होते पण ते जुमाने ना. 

तेवढ्यत पोलिस आली. तेजुचे बाबा आणि मल्हार यांचा वाद विकोपाला आला होता. लागेलीच पोलिसांनी त्यांना सोडविल.

“ऐ भाड्याsssss तुझा गुन्हा ज़र सिद्ध झाला ना तर बघ तुझी. नाही बाज़ीरावाने तुझ कंबरडं मोडलं तर आणि हो... सुनेच्या जीवाशी खेळणाऱ्या सासु सासऱ्यांना खळखळती शिक्षा आहे”,इंस्पेक्टर बोलले.

“मी काही नाही केलय हो साहेब”, मंदार रडुन बिलगुन विनवण्या करीत होत्या.

  मल्हार आणि त्याच्या आई बाबांच्या फजितीला पारावार उरला नव्हता. ती बोलण्याच्या परिस्थितीत येईस्तोर वाट होती. आल्या आल्या तिचा बयाना घेतला जाणार होता.

सगळेच डोळयात तेल घालुन प्रतीक्षा करित होते. एक एक क्षण अवघड होता. 

जवळपास आठ तासाच्या आरामानंतर ती बोलु शकेल ईतपत तरी बरी झाली होती.

डाॅक्टरांनी लागलीच पोलिसांना कळवले.

ताबडतोब पोलिस आली. ते त्याची पार्श्वभूमी तपासुनच आले होते. काही वर्षापूर्वी त्याच्यावर एका मुलीने फसवे गीरीची केस दर्ज केली होती. त्यामुळे ते आधीच सज्ज झाले होते.

इंस्पेक्टर : मॅडम तुम्ही कश्या आहात.

तेजु : आता बर वाटते आहे.

इंस्पेक्टर : मॅडम आम्ही आहोत तुमच्या पाठीशी फक्त    

कुणालाही न घाबरता हे सांगा तुमच्या सोबत काय घडल?

तेजु: मला काही विशेष आठवत तर नाही आहे पण कदाचित मी पायऱ्यांवरन घसरले. हो कदाचित नाही मी नेमकी पायऱ्यांवरनच घसरले. 

इंस्पेक्टर : अहो, तुम्ही हे काय बोलताय. तुमच्या सासरच्यांनी मारझोड केली ना तुमच्यावर.

तेजु: नाही साहेब हे काय बोलताय तुम्ही. ते तर खूप प्रेमळ आहेत. त्यांनी काय म्हणून माझी मारझोड करावी. 

इंस्पेक्टर : अहो मॅडम, तुम्ही कुणाच्याही दबावात येवु नका. जे आहे ते खर खर सांगा. मंदारला वाचविण्याचा प्रयत्न करू नका. या आधी ही त्याच्यावर असल्या फसवेगीरीची आणि मारपीटीची केस दर्ज आहे. तुम्ही त्याचा गुन्हा लपवुन परत एकदा गुन्हेगारीला प्रोत्साहन देत आहात.

तेजु: हे बघा साहेब जे घडलय मी तेच सांगते आहे. तुम्ही अनअपेक्षित बळ माझ्यावर वापरू शकत नाही.

इंस्पेक्टर : ठीक आहे मॅडम तुमची इच्छा पण मागे पुढे काही झाल्यास आम्ही जवाबदार नसु. तुम्ही आराम करा आता.

   एवढ बोलुन ते निघुन गेलेत आणि तेजु ढसाढसा रडु लागली. 

   “ऐ भाड्य तू फक्त चुकीच्या साक्षेमुळे तू वाचला. नशिब समज तुझ तिने वाचवल तुला नाही तर असा धुतला असता ना परत कोणावर हात उचलायची लायकी नसती. यानंतर कसली हि तक्रार आली ना तर याद रख”, बाहेर येवुन इंस्पेक्टर साहेब मल्हारची कानउघाडणी करू लागले.


     “तिकडे तेजु आपल्याच विचारात होती....

काय चुकल होत..? माझ्या प्रेमात तर काही कमी राहीली नाही ना..? त्याने का अस केल असाव..? उभ्या आयुष्यात पहिल्यांदाच कुणी तरी माझ्या अंगावर हात उगारला.... बाबांना कळल तर ते खूप चिडतील. जीव घेईल मंदारचा. 


    पण माझ खूप प्रेम आहे त्याच्यावर अस कस मी आणि तो हि प्रेम खूप प्रेम करतो अस कस घडल त्याच्या हातुन” तिच्या मनाचा अंतर मनाशी वाद सुरु होता.

मन तळपळत होत. प्रेमात मिळालेल्या धोक्याच्या झळा डोळयांतन आग बनुन बरसत होत्या आणि मनाला प्रश्नांची झळ लागली होती. 


  ईकडे.....

    “त्यांनी आपल्या साक्षेत काहीही सांगीतलेल नाही. पायऱ्यांवरन पडल्यामुळे त्यांना लागल अशी साक्ष दिली”, इंस्पेक्टर साहेब तेजुच्या बाबांना म्हणालेत .

    “हि का अशी करते आहे.? मी बोलतो तिच्याशी”...

बाबा आत आले. तिने आपल्या अश्रुंना लागलीच आवर घातली. 

  पण बाबांच्या अश्रुंचा बाण तिला बघताच फुटला आणि बाबांना अस ओघळतांनी बघुन तिही वितळली. 

दोघेही घणघणीत अश्रु गाळू लागलेत.

“हे काय करुन बसलीस ग राणी?”

“बाबा मला काही नाही झालय मी अगदीच ठणठणीत आहे.”

“आज परत त्याला वाचवते आहेस? का खोटी साक्ष दिली पोलिसांना?”.

“बाबा जे घडल तेच सांगीतलय”.

“तेजु मी बाप आहे तुझा?”.

     तेवढ्यात मल्हार तिथे आला. त्याला बघताच बाबांचा राग अनावर झाला आणि त्यांनी परत त्याची गच्ची धरली.

        “बाबा तो नवरा आहे माझा वारंवार त्याच्या इज़्ज़तीचा खेळ मांडलेला मला आवडणार नाही”, शरीरात होत तेवढ बळ वापरुन तेजु उंच आवाजात बाबांवर खेसकावली.

   एक क्षण तिच्या नजरेला नज़र भिडवून ते खोली बाहेर पडले. वातावरणात भयावह शांतता पसरली होती. तेजुने डोळे घट्ट बंद केलेत अन ढसाढसा रडु लागली... 


(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama