Ashvini Duragkar

Tragedy Thriller

4.0  

Ashvini Duragkar

Tragedy Thriller

नवा गडी... नवा राज्य भाग - १

नवा गडी... नवा राज्य भाग - १

5 mins
270


  तेजस नावासारखीच तेज तररर्ररार. कानापर्यंत केस, लांब उंच बांधा, गोरंगोमटं शरीर, व्यायामाने कमवलेली छरहरी काया, ट्राऊजर आणि कोटमध्ये ती कयामत दिसायची. अगदीच रोखठोक - बिंधास्त - ब्रिलीयंट. आधुनिकता जपणारी यशस्वी आजच्या युगाची मुलगी. एका मोठया कंपनीची सी॰ई॰ओ॰. घरात फक्त बाबा आणि तीच.


     आई लहानपणीच गेली. बाबा मिलिटरी ऑफिसर. कड़क अन् स्वभावाचे काटक. तशीच तीही त्यांच्याच वळणावर. वेळेची पाबंद. नाकावर माशीही न बसू देणारा काटेकोर स्वभाव. पण अंतर्मनाने तेवढीच मऊ, भावनिक, प्रेमळ, मिश्किल अन् दिलखुलास. पण एवढया मोठया पदाचा कार्यभार तिच्या हातून सुरळीत पार पडाव म्हणून वरूनच घातलेल वाघीणीच कातळ. 

     

तिच्याच कंपनीत मॅनेजर पदावर काम करणारा मल्हार. मध्यमवर्गीय अगदीच टिपीकल महाराष्ट्रीयन मम्माज बाॅय. हॅंडसम, धाडधाकट शरीरयष्टी, मंत्रमुग्ध करणारे बादामी डोळे, कोरलेली दाढी, दिलखुलास गप्पा मारणारा, हसमुख, तेवढाच हुशार आणि आपल्या कामानी सगळयांचं मन जिंकणारा. मोठयातली मोठी समस्या युँ चुटकी सरशी सोडवणारा. जणू तो एक जादूगारच अन् त्याच्यात कसली तरी अजाणती जादूच त्याचं वेड लावणारी. सगळे त्याच्या ऑराने भारावून जायचे. 


      तेजसही त्यातली एक. त्याचा जादू तिच्यावरही चढला होता अगदीच नकळत तिच्या मनाला तो भावला होता. ती त्याला दुरूनच न्याहाळायची. तो खळखळ हसत असला की वाकुन अलगद त्याच्यात हरवायची. तो बोलत असला की त्याच्या ओठांकडे बघत कल्पनेतच आपले ओठ त्याच्यावर माखवायची, त्याच्या डब्यातन हळूच दोन घास खाऊन घरच्या अन्नाची चव घ्यायची, येता जाता मनात त्याला टिपायची, तो नसला की तिच मन भटक्रंतीवर असायच त्याच्या शोधात. पण तिच्या प्रेमाची एक टक्काही भनक त्याला नव्हती आणि ती लागावी अशी तिची इच्छा ही नव्हती. 


  दुसऱ्या बाजूला मल्हारला ही ती आवडायची पण ते दोघ जेव्हा काॅलेजला एकत्र शिकायचे तेव्हा आता तो तिच्याकडे एक बाॅस म्हणूनच बघायचा. पण मन तरंगात तो अजूनही मरायचा तिच्यावर. त्याचे आईबाबा ही तिला मनापासून मानायचे. ती खूप कर्तृत्ववान म्हणून तिचं तोंडभर कौतुक करायचे आणि मानही द्यायचे. ऑफिस मीटमध्ये त्यांची बरेचदा भेट व्हायची शिवाय काॅलेजमध्ये असतांनी ती बरेचदा जायची त्याच्या घरी आईच्या हातचं जेवायला. तिला नेहमीच त्याच्या कुटुंबाबद्दल उत्कंठा वाटायची. अगदी काॅलेजच्या वेळेपासूनच. मल्हारचं अन् त्याच्या कुटूंबीयांचं प्रेम बघून तिला नेहमीच वाटायचं घर असावं तर असंच. आई लहान वयातच गेल्यामुळे ती या प्रेमापासून वंचित राहिली. पण लग्न एका संयुक्त कुटुंबात करायची तिची मनापासून इच्छा होती. पण ती इच्छा मनकोंड्यात दळून ठेवायची होती.

   

 एका ऑफिशियल मिटींगकरीता ती एकदा लंडनला गेली. जवळपास दहा दिवसांचा दौरा होता. परतल्यानंतर मल्हार तिला दिसला नाही न व्हाट्सअपवरही ऑफलाईन होता. तो असा एवढे दिवस कधीच ग़ैरहजर नसायचा. तिने त्याची चौकशी केली तर त्याच्या आईला मोठा हृदयविकाराचा झटका आल्याचे कळले. ती लागलीच निघाली हाॅस्पिटला. ती आंतरिक भावनेने त्यांच्या कुटुंबीयांशी खोलवर जुळलेली होती. म्हणून काळजीपोटी मन तळमळलं तिचं. तशी संवेदनशील होतीच.


      मल्हार आई॰सी॰यू॰ च्या बाहेरच उभा होता. त्याला बघताच ती धावत त्याच्याजवळ गेली. त्याचे डोळे पाणावलेलेच होते. तिच्या सगळया भावना अगदी उफाळून आल्यात आणि तिने त्याला चटकन मिठीत घेतलं. तो एक क्षण तिच्यावर खूप भारी पडला आणि तिचा संयम सुटला. त्या क्षणाची ती आदी झाली. त्यावर कसं रिअॅक्ट करावं मल्हारला क्षणभर कळलंच नाही. पहिल्यांदाच झालेल्या स्त्री स्पर्शाने तो अगदीच शहारलेला होता. रक्त संचार झपाट्याने होत होता. जणू करंट लागला की काय. तिने त्याला घट्ट मिठीत घेतलं होतं. क्षणभर ती हरवलीच होती त्याच्या बाहुपाशात. आजूबाजूच्या आवाजाने ती भानावर आली. 

   

तिला खूप अन्कम्फर्टेबल वाटलं. आपल्या हातून अशी चूक कशी घडली म्हणून खूप संतापही आला होता. ती मल्हारच्या नजरेशी नज़र मिळवेना. त्यानेच पहल केली. “आई अजुनही बोलली नाही. तीन ब्लाॅकेज आहेत. बायपास झाली पण अजून ती पूर्ण शुद्धीवर नाही”, त्याच्या डोळयांना धारा लागल्या. आई जणू त्याचा जीव की प्राण होती. तिचेही अश्रू निरखळले. तिने त्याचा हात आपल्या हाती घेतला आणि म्हणाली, ”मंदार काळजी करू नकोस मी आहे तुझ्यासोबत सदैव. आई होतील नक्कीच बऱ्या. आपण बघू अजुन काही करता येईल काय”. तिच्या अचानक अशा वागण्यामुळे तो भारावलेला होता. पण तिच्या या स्पर्शाने तो सुखावलादेखील. त्याला थोड़ी का ना होईना धीर आली होती. कोणीतरी आहे आपलं असं वाटलं.


   तिचे बाबा त्या हाॅस्पिटलचे ट्रस्टी होते. तिने लगेच सगळी चौकशी केली. त्यांना श्वास घ्यायला खूप त्रास होत होता शिवाय अचानक शरीरावर एवढा ताण पडल्यामुळे कमजोरी आली होती. तिने डाॅक्टरांशी चर्चा करून त्यांच्या स्पेशल उपचाराची मागणी केली. ती जवळपास रात्रंदिवस त्याच्या सोबतच होती. तो तिला “जा जरा आराम कर” वारंवार म्हणायचा पण ती जायला तयार नव्हती. ती नेहमी म्हणायची, ”तुला काही अडचण होते आहे काय मला इथे बघून”. तर तो हळूच तिच्या ओठांवर हात ठेवायचा. 

   

प्रेम दोघांचं आधीपासनच होतं ऐकामेकांवर. पण या दरम्यान दोघांमध्ये खूप जवळीक निर्माण झाली होती. कधी ती त्याला भरवायची तर कधी तो तिला. कधी तो तर कधी ती त्याच्या खांद्यांवर निवांत डोळे टिपायचे. एकामेकांचे हात हातात घेवून रस्ता क्राॅस करायचे. एकामेकांविषयीची काळजी आणि प्रेम दोन्ही त्यांच्या नात्यात भरभरून होतं. त्यांचं नातं एक वेगळ रूप घेत होतं. प्रेमाला मोहोर येत होती. व्यक्त दोघांनीही केलं नव्हतंच त्यांना तसली गरजही नाही वाटली कधी.

 

  तो नेहमीच तिच्या भावनांचा आदर करायचा शिवाय त्याचे आई-बाबा आणि इतर नातेवाईकांच्या ही मनात तिने आपली विशेष जागा निर्माण केली. आईच्या तब्येतीत हळूवार सुधारणा होत होत्या. तसतसं दोघांच्या प्रेमाची कळीही हळूहळू फुलू लागली होती. अगदीच वसंत ऋतुचा मोहोर दोघांच्या जीवनात आला होता. सगळं तिच्या दीपलेल्या स्वप्नांप्रमाणे रंगलं होतं.

अगदीच....

“स्वप्नातल्या साऱ्या कळ्यांनी...

उमलून यावेसे वाटते...

न कळे मला या मोरपंखी...

हुरहूर जीवाला लागते...

मन हे असे का होते रे वेडेपिसे...

रंगली प्रेमवेडी सखी स्वप्नात या रंगली”


 ती वेडयासारख़ी त्याच्या प्रेमात हरवली होती. श्वासात श्वास गुंफलेले दो दिल एक जान... सगळं मस्तच सुरु होतं. ती त्यांची अगदी घरच्या मुलीप्रमाणे सेवा करीत होती. सगळयांना प्रथमच तिचं एवढं प्रेमळ आणि काळजीवाहू रूप बघायला मिळालं होतं. तिचं असलं वागणं सगळयांसाठीच संशयास्पद होतंच शिवाय आता ऑफिसमध्येही कुजबूज सुरु झाली होती. दोघांच्या प्रेमाचा विषय सगळयांसाठीच चर्चेचा विषय बनला होता.

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy