बंधन
बंधन


राजू यंदा दहावीला आहे, खूप हुशार आणि अभ्यासू आहे. त्याची आई गृहिणी आहे. शिवाय आईच शिक्षण पूर्ण नाही झालं, म्हणून राजूने आईला जबरदस्ती दहावीच्या परीक्षेला बसवलं. आई त्याला नको म्हणत होती पण तरीही तो आईचा अभ्यास घ्यायचा, आई म्हणायची की आता हे माझं शिकायचं वय आहे का? पण तरीही राजू आईचं न ऐकता तिला शिकवायचा, स्वतः ही खूप अभ्यास करायचा...
राजूला दहावीला 94 टक्के व आईला 75 टक्के मार्क मिळाले. शिकण्यासाठी वयाचं बंधन नसतं हे आईला आता समजलं होतं.