Dr. Gaurangi Gujar- Mehta

Others

3.5  

Dr. Gaurangi Gujar- Mehta

Others

व्यक्ती स्वातंत्र्य

व्यक्ती स्वातंत्र्य

3 mins
109


इंग्रज जेव्हा भारत सोडून गेले तेव्हा १ सवय मागे सोडून गेले. आपल्या भारतीय लोकांना आधी मुघल राज्य आणि मग इंग्रज राज्य यामुळे जवळ जवळ 400 वर्षांची पारतंत्र्याची अशी काही सवय लागली की आता ७० वर्ष झाली तरी आपण सगळ्या प्रकारच्या स्वातंत्र्या साठी अजून हि Struggle करतोय. नाही म्हणायला , आपण डेमोक्रॅटिक देशात असल्या मूळे सरकारनी आपल्याला भरपूर स्वातंत्र्य दिलंय... जसं Freedom of Movement, freedom of speech, freedom of expression, freedom of residence, वगैरे . पण आपल्या काही हे स्वातंत्र्य अंगवळणी पडत नाही. आपल्याला पारतंत्र्याची अशी सवय लागली आहे की कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य असो- अगदी व्यक्ती स्वातंत्र्य हा विषय असला तरी आपल्या Indian लोकांना थोडा जडंच जातो. म्हणजे बघा कसं, आपल्या कडे काहीही करायला घेतलं एखाद्या व्यक्तीने, तर तो आधी हजार लोकांना विचारणार . घरातल्यांना, बाहेरच्यांना, हल्ली हल्ली तर social मीडिया वर सुद्धा विचारून मग च करायची पद्धत आहे.


कुठे जायचं असेल तरी ही सगळयांची permission घेऊन जाणार. म्हणजे उदाहरण बघा हा... एखाद्या बाईला मैत्रिणीनी जेवायला बोलावलं तर ही म्हणणार "आमच्या ह्यांना विचाराव लागेल ग." आता हे कशाला नाही म्हणतायत? "बर झाल....जाईल तर २-४ तास मला मोकळीक." त्या बाईच्या ह्यांना मित्रांनी पार्टी ला यायचा आग्रह केला तर हे म्हणणार. .. "बायकोला विचारून सांगतो." खरं तर दोघंही एकमेकांना काहीही विचारणार नसतात. बाई ला इतर कोणी मैत्रिणी येणार आहेत का हे माहित करून घ्यायचं असतं तर नवऱ्याला बायकोला अगदी खरं वाटेल अशी थाप मारायची असते. म्हणून आपल्याला कसं व्यक्तिस्वातंत्र्य नाही असं भासवत दोघंही उत्तर द्यायला वेळ मागून घेतात.


बरेचदा आपणचं आपलं freedom of movement अजिबात वापरत नाही.. सवयच ना. साधी भाजी घ्यायला निघालो तर सगळ्या खानदानाला सांगून जाणार. जमल्यास अख्ख्या बिल्डिंग ला पण. आणि समजा नाही सांगितलं तरी हातातल्या झोळ्या बघून येणारे जाणारे विचारणारच "काय, भाजीला का?" आई वडील काळजी करतात म्हणून किव्वा नवरा बायको च्या प्रेमामुळे असेल किव्वा मुलांच्या वेळा सांभाळायच्या असतात म्हणून का होईना पण आपल्या कडे आपला ठाव ठिकाणा सतत कोणा न कोणाला माहित असतोच. त्यामुळे गेला तुमचा constitutional freedom of movement चा हक्क.


ह्या पेक्षा जास्ती band वाजलाय तो आपल्या freedom of speech चा! जोपर्यंत मूल बोलत नाही तोपर्यंत अख्ख्या घरा दाराला चिंता. पण एकदा का बोलायला लागला कि बिचार्याला तोंड उघडू देत नाही कोणी. लहानपणी पासूनच बोलायच्या आधी विचार करायला शिकवतात आणि चुकून एखादा नाही शिकला आणि मनाला येईल ते बोलला कि लगेच त्याच्या जीभेच हाडच पकडतात सरळ. मी लहान असताना "तुझ्या जिभेला काही हाड!" असं ऐकलं कि माझ्याच बोटांनी जीभ चाचपडायचे पण हाड कधी सापडायचं नाही. हाडाचा बोलण्याशी काहीही संबंध का असावा हे तर मला पडलेल मोठ्ठं कोडं होतं. त्यात वर शाळेत सगळ्यात जास्ती मिळालेला रिमार्क म्हणजे 'very talkative'. आपल्या जीभेला बहुतेक हाड नाही म्हणून आपण मनाला येईल ते आणि मनाला वाटेल तेवढं बोलतो असा माझा त्या वयात समज झाला होता.


बरं नुसत्या बोलण्यावर बंधन नाही हो. किती जोरात, कुठल्या सप्तकात, कुठल्या भाषेत, किती स्पष्ट बोलायचं यावर पण rules and regulations तयार आहेत आपल्या कडे. एक टिपिकल rule म्हणजे "अग मुलीच्या जातीने एवढ्या जोरात बोलू नये" इती..पूर्वीचे लोक. आता समस्त स्त्री वर्गाचा आवाज च high pitched असतो... मग हळू कशा बोलणार त्या? नवरा बायकोच्या conversationच तर वेगळच समीकरण. भारतात अशी बायको मिळणं impossible जी कधीच नवऱ्याला "तुम्ही गप्प बसा हो", अस बोलली नसेल. नवरा पण मग बिचारा मूग गिळून बसतो गप्प. सांगणार कोणाला? सगळेच समदुःखी...म्हणजे झालं तर. Freedom of speechची पण बत्ती गूल.


आता राहता राहायला freedom of residence. तर हा concept मला वाटतं मुंबई साठी बनलाच नाहीये. मला भले वाटत असेल कि मस्तपैकी कोलाब्यात किंवा मरीन ड्राईव्ह ला समुद्रकाठी मोठ्याला घरात मी राहावं. पण ते फक्त अंबानी आणि अदानी यांच्या सारख्यानाचं शक्य आहे. तुमच्या माझ्या सारख्या middle क्लास साठी नाही ते फ्रीडम.


तर India मध्ये हे असं आहे व्यक्ती स्वातंत्र्य. आई ला विचारते, बाबा सांगतील तसं , बायको म्हणेल ते, नवरयाच्या मता प्रमाणे, शेजारी येणार असतील तर... अश्या सगळ्या प्रकाराला आपल्या कडे व्यक्तिस्वातंत्र्य म्हणतात! कधी तरी पडू आपण ही यातुन बाहेर आणि जगु स्वच्छंदी आयुष्य, पण तोपर्यंत हीच आपली व्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या!


Rate this content
Log in