Gaurangi Gujar- Mehta

Inspirational

4.5  

Gaurangi Gujar- Mehta

Inspirational

आजची हिरकणी

आजची हिरकणी

4 mins
435


रोज संध्याकाळ सारखीच आज पण तिची घरी जाण्याची तयारी सुरु झाली होती. ६ वाजायला अजुन २० minute होती . पण जर emergency case आली असती तर अडकली असती ती. मग वेळ पडली तर night duty पण करावी लागली असती. कामाचा कंटाळा तिला कधीच नव्हता, लोकांची सेवा सुक्षृषा करण्यात तिला देव भेटायचा. म्हणुन तर तिने फार पूर्वीपासून नर्स बनायचे ठरवले होते. पण २ वर्षा पूर्वी आस्थाचा जन्म झाला आणि तिच्यातल्या आई आणि नर्स मधे रोजच्या संघर्षाची सुरुवात झाली. तिची छोटी आता आजीच्या कडेवर खिडकीत ऊभी राहुन तिची वाट बघत असेल. डॉक्टर सहसा तिला थांबवत नसले तरी क्वचित कधीतरी एखादी accident case आली तर सर्वांना थांबावे लागे. म्हणून तिची ६ च्या ठोक्याला निघायची घाई.


आस्था पण लबाड झाली होती अलिकडे. आई ला बघितल्या शिवाय संध्याकाळची दुधाची बाटली तोंडात घ्यायची नाही. सासूबाईंना हि संध्याकाळी देवळात जायला मिळत असे, ती वेळेत घरी गेली की. बिचार्या दिवसभर अडकून पडायच्या. आस्था झाली तेव्हा नवरोबानी तिला “घरी रहा २ वर्षे” असे सुचवले होते. त्याची नोकरी तशी चांगली होती, पगार ही पुरेसा मिळत असे. ६ महिने तसा प्रयत्न केला तिनी. पण आजारी माणसांची काळजी तिला स्वस्थ बसू देईना. मग एक दिवस सासू बाईंना हिची तडफड लक्षात आली. त्यांनी आस्था ची जबाबदारी घ्यायची तयारी दाखवली आणि ती परत हॉस्पिटल मध्ये रुजू झाली.


आता दीड वर्ष सगळं routine सुरळीत चालू होते. आज पण ती वेळेवर घरी आली. पण कोणालाही, पुढच्या काही दिवसात येणाऱ्या विचित्र घडामोडींची काहीच कल्पना येणे शक्य नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी रोज प्रमाणे ती हॉस्पिटल मध्ये पोचली. डॉक्टर सगळे rounds मधे बिझी होते. ती आल्या आल्या नाईट च्या मावशी बोलल्या ‘काय ग? आज सगळे डॉक्टर सकाळी कायतरी बोलत हुते- नवा काय फायरस का वायरस काय आलाय! तुला काय ठाउक हाय?’ ‘काय मावशी, किती वर्ष झाली आपल्याला हॉस्पिटल मध्ये! नविन आजार काय नवीन आहेत का आपल्याला? आजार कोणताही असो, आपण आपलं काम करत राहतो. लोक बरे झाले की आपलं काम झालं,’ हसत हसत ती बोलली. ‘ते बी खरं हाय तुजं’, असं म्हणत मावशी घरी निघुन गेल्या आणि ती दिवसभराच्या कामात हे बोलणं विसरून गेली.


पण हा वायरस विसरून देणारा नव्हता. बघता बघता, महिना भरात त्याने सगळ्या जगाला विळखा घालायला सुरुवात केली. कोविड 19 असं त्याचं बारसं पण झालं. आता मात्र हॉस्पिटल मध्ये पण सगळे घाबरले होते कारण हा आजार श्वासातून फार पटापट पसरत होता आणि डॉक्टर ना पण नक्की औषधोपचार काय करावे कळत नव्हते. अजून पर्यंत सुदैवाने तिच्या हॉस्पिटल मधे कोव्हिड दाखल झाला नव्हता. पण रोज सकाळी घरातुन निघताना तिला गलबलून येई. आज जर कोरोना ने गाठलं तर? हा विचार पण ती करू शकत नव्हती. अशाच भरल्या डोळ्यांनी ती रोज आस्था ला टाटा करून कामावर जाई.


आज उठल्यापासून आस्था तीला बिलगून राहिली. आवरून देईना, स्वयंपाक करु देईना, आजीकडे रहायला तयार होईना. मग सासू बाईंनी डब्बे बनवून दिले. कशीतरी आस्था चे हात गळ्यातून काढून ती घराबाहेर पडली. हॉस्पिटल मधे जाऊन नविन पेशंटचे चार्ट बघायला घेतले तीनी. तिसऱ्या चार्ट ला पोहोचली आणि थबकली ती. डॉक्टर नी ट्रेनिंग मध्ये सांगितलेली सगळी लक्षणं या पेशंट मधे होती. काळजात धस्स झालं तिच्या. क्षणभरचं घाबरली ती. पण लगेच सावरली. जसे ट्रेनिंग मधे सांगितलं होतं, तसं भराभर तिनी आधी डॉक्टर ना कळवले. मग पी पी ई किट घालून पेशंटच्या खोलीत जाऊन पेशेंटचं रक्त तपासायला दिलं . त्याच्या सोबत आलेल्या नातेवाईकांना पण वेगळ्या खोलीत हलवलं आणि त्यांचं रक्त सुद्धा चाचणीसाठी पाठवले. तोपर्यंत मुनिसिपालिटीचे लोक तपासणी साठी आले . सगळं सुरळीत होईपर्यंत ४ वाजत आले. पि पि इ किट काढून तिनी सर्वात आधी नवऱ्याला फोने केला. त्याला कल्पना दिली आणि संगीतलं कि अश्या कंडिशन मधे तिचं घरी येणं सगळ्यांसाठी risky आहे.


तिने आपणहून हॉस्पिटलमध्ये राहायचा निर्णय घेतला. कारण तिला म्हाताऱ्या सासू आणि लहानग्या आस्थाला या विचित्र आणि क्रूर आजारापासून लांब ठेवायलाच हवं होतं. त्या दिवसापासून पेशंटचा आकडा वाढत गेला, तब्बल ३ महिने ती हॉस्पिटल मध्ये राहीली. नवरा घरी गेला कि तिला रोज विडिओ कॉल करत … आस्थाला अशी एवढ्याशा स्क्रीनवर आई का दिसते आणि आपल्याला जवळ का घेत नाही हे कळायचं नाही आणि ती रडायला लागे. आस्था अशी रडली की तीला पण रडू कोसळे.


ती आणि तिच्या इतर नर्स मैत्रिणी एकमेकींना धीर देत दिवस काढत होत्या. कामाचा ताण वाढतच गेला. पण तीने धीर सोडला नाही. डोळ्यासमोर सतत हिरकणीचा आदर्श ठेवून ती लढत राहिली. आणि तब्बल ३ महिन्यानंतर कोरोना ला हरवून आजची हिरकणी तिच्या घरट्यातल्या पिल्लाकडे परतली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational