STORYMIRROR

डॉ.संजय तांबे

Classics

3.7  

डॉ.संजय तांबे

Classics

’न्यूड’ - माझं मत..!

’न्यूड’ - माझं मत..!

2 mins
23.3K


काल 'न्यूड' पाहिला, एकदा पाहून खूप सार नोंद करता येणं शक्य नव्हतं पण जमेल तितकं नोंद करण्याचा प्रयत्न केला. न्यूड’ या चित्रपटातून दिग्दर्शकाने न्यूड मॉडेलिंग या विषयाला अतिशय संवेदनशीलपणे हाताळत प्रत्ययकारी रुपात प्रेक्षकांसमोर सादर केलं आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेला आपलं अस्तित्वं असून, अक्षरश: निर्जीव वस्तूंनासुद्धा या चित्रपटाने वाचा फोडली आहे असं म्हणायला हरकत नाही. एखाद्या स्त्रीकडे पाहणाऱ्या पुरुषांच्या भेदक नजरा आणि त्याच स्त्रीकडे किंबहुना नग्न स्त्रीकडे एका कलाकाराची रोखलेली नजर यात असणारा फरक चित्रपटातून लक्षात येतोच. पण, त्यासोबतच विचारसरणीमध्ये असणाऱ्या असुरी वृत्तीला सणसणीत चपराक देतो हेसुद्धा तितकच खरं.

मानवी भावना, समाज, संवेदना, वासना, कलात्मक नजर आणि आईची उत्कट तडफड अशा अनेक बाबींभोवती तळमळत फिरणाऱ्या फ्रेम्स पाहून कुठेतरी मन सुन्न झालं !

प्रत्येक फ्रेम सामाजिक विषमतेवर अजाणतेपणे एक चपराक मा

रण्याचा प्रयत्न करते मग तिच्या नवऱ्याचा तो पान खाऊन तिच्यावर थुंकणारा सीन असो किंवा शेवटी आपलाच मुलगा आपल्याच आईची अजाणतेपणे चित्र पाहून वासनांध झालेला भाव असो, देहाकडे देह म्हणुन न पाहता एक निर्मिती म्हणुन पाहण्याची पराकोटीची वैचारिक नजर आपल्याला कशी प्राप्त होईल?

वखवखलेल्या भावनांनी नजरांचा आणि दृष्टीचा पूर्ण चकनाचुर झालेला असताना बरबटलेल्या नजरेला नेमकं कुठला चष्म्यातून नीट दिसेल? कितीही तन्मयतेने तिने काहीही करो ती 'रांड' आणि उन्मत्तपणे तो कसाही वागो तो 'पुरुष' , कुठेतरी या व्याख्या बदलल्या पाहिजे ना....बाकी अश्लील जोक्सवर फिदीफिदी हसुन नंतर समाजाला आपण सभ्य असल्याचा पुरावा देणाऱ्याना हा चित्रपट 'न्यूड' वाटेल यात शंकाच नाही कारण काय पहावं हे समजण्यासाठीही नजरेवर योग्य संस्कार लागतात !

नेमकं न्यूड काय? आपली विचारसरणी की हा समाज? हाच प्रश्न चित्रपगृहातून बाहेर पडताना सर्वांच्याच मनात घर करुन जातोय.


Rate this content
Log in

More marathi story from डॉ.संजय तांबे

Similar marathi story from Classics