अलक - 2
अलक - 2
फॅक्टरीत नव्यानेच रूजू झालेल्या किरणच्या हातून मोठी चूक झाली कामात. सगळ्यांसमोर सरांचा ओरडा बसल्याने त्याला शरमेनं मेल्याहून मेल्यासारखं होत होतं. तो राजीनामा देणार तेवढ्यात हाताखाली काम करणाऱ्या जुन्या अनुभवी क्लार्कनं म्हटलं,"परफेक्ट तर देवही नसतो साहेब नाहीतर अपंग माणसं जन्मालाच आली नसती." एक तरूण उमदं रक्त जगाला टक्कर द्यायला नव्याने उभं ठाकलं.