Deepali Thete-Rao

Others

3.4  

Deepali Thete-Rao

Others

फॅशन

फॅशन

2 mins
284


"अग काय हे रीमा? 

आता हे काय नवीन? 

काय खूळ घेतलेय? " आई ओरडत होती. 

"काही नाही. अवदसा आठवलीये. 

ही.. ही असली फॅशन? 

काहीही करावं का माणसानं?" बाबा आईला साथ देत होते. 

 "तुला काही बोलत नाही म्हणून डोक्यावर चढायला लागलीस तू. 

शिंग फुटलीत आता तुम्हाला. 

काहीही करता. 

किती ओंगळवाणं दिसतय ते. 

अभ्यासात लक्ष द्या जरा. 

महत्त्वाच वर्ष आहे. 

ही थेर बंद करा. "

आई बाबा ओरडत होते आणि बारावीच्या वर्षाला असणारी रिमा पायाला बँडेज बांधून..हातात कुबडी घेऊन पाठीवरची सॅक सावरत चालण्याचा प्रयत्न करत कॉलेजला निघाली होती. 


"आई-बाबा समजून घ्या मला. ही फॅशन नाहीये. कोणाचतरी दुःख समजून घेण्याचा प्रयत्न करते आहे. उशीर होतोय. घरी परत आल्यावर नक्की सगळं सांगेन तुम्हाला" म्हणत रीमा गाडीत बसलीही आणि ड्रायव्हरने गाडी सुरु केली. ..चालू पडली कॉलेजच्या दिशेने. 


आई-बाबांना कळेच ना....

खरं काय आहे? कोणाचं दुःख समजून घेतेय? काय भानगड आहे? 

कळायलाच हवं. 

शंकेचा नासूर मनभर गडदला. 

मग तेही थोडावेळातच गाडी काढून तिचा पाठलाग करत कॉलेजला पोहोचले. 

रिमा गाडीतून उतरली. दुसर्या बाजूने अजून कोणीतरी उतरत होतं. 


रिमाची बेस्ट फ्रेंड...कविता

काही महिन्यांपूर्वी अॅक्सिडेंट झाला होता तिच्या कारचा. 

ती वाचली

 पण एक पाय... 

कोणीतरी मागून रिमाच्या बाबांच्या खांद्यावर हात ठेवला. 

कविताचे बाबा... 

कॉलेजमध्ये आले होते.. 

रिमाच्या कारच्या मागून. 


"खरच नशीबवान आहात तुम्ही. तुम्हाला रीमासारखी मुलगी आहे. 

कविता...इतकी हुशार...अॅक्सीडेंट मध्ये पाय गेला आणि सगळा कॉन्फिडन्स हरवून बसली. कॉलेजला यायला..शिकायलाही नाही म्हणायला लागली. 

मग एक दिवस रीमा घरी आली तिला समजवायला. तेव्हा कविताच दुःख कळलं..

हे असं कुबडी घेऊन कॉलेजला यायची लाज वाटत होती कविताला. 

बारावीचं वर्ष. दोनच महिने उरलेत. 

या कारणास्तव वाया नको जायला..

फिकर नॉट

 रिमानेच तिच्या मनात परत एकदा आत्मविश्वासाची ज्योत पेटवली. 

तिला तिच्या स्वत्वाची जाणीव करून दिली.

एक पाय नाही...पण बाकी अवयव तर काम देत आहेत. त्यांच्याच जोरावर तर मोठा पल्ला गाठायचा आहे. 


 कविताच्या डोळ्यातली परत आलेली चमक आम्हालाही आनंद देऊन गेली. 

    कविताला वाईट वाटू नये, लाज वाटू नये यासाठी पुढचे दोन महिने तिच्या बरोबरीने तिच्यासारखंच बनायचं ठरवून कॉलेजमध्ये परत घेऊन आली रिमा तिला.. .. 

    एका हरलेल्या मुलीचं भवितव्य परत उज्ज्वल केलय या सगळ्यांनी मिळून. 

    बघा सगळेच मित्रमैत्रिणी किती काळजी घेताहेत कविताची.  

सगळा ग्रुप...कविता सारखाच...

हे सगळं रिमामुळेच."

    रिमाच्या आई-बाबांना त्यांच्या लेकीची आज नव्याने ओळख झाली होती अन् ही नवी फॅशन कॉलेजमधील प्रत्येकाच्या मनात घर करून गेली...... 

फिर क्या? 

हर एक दोस्त कमिना नही होता है। 


Rate this content
Log in