Deepali Thete-Rao

Classics

4.6  

Deepali Thete-Rao

Classics

मनभर स्माईल

मनभर स्माईल

2 mins
251



जुनीच सवय तिची. 

ऑफीसमध्ये जाताना त्याला विचारायचं,

 " कशी दिसतेय रे?". 

त्याने दिलखुलास स्माईली दिला की आवरल्याचं सार्थक व्हायचं. 

ती खल्लास.

दिवस झक्कास.

त्याच्याबद्दलची ओढ मग दिवस सरताना पावलं घराकडे ओढायची.

आग दोनो तरफ बराबर लगी थी।

हिरो की हालत भी बेकरार टाईप

नया नया लव्ह..नई नई शादी

मग घरी येताना तो गजरा आणणार

धुंद मोगरा.. 

घरच्यांची नजर चुकवत हळूच तिच्या केसांत माळणार.

चोरटे कटाक्ष

संध्याकाळ रंगीन...

दिवस फुलपाखरू.....

प्रेमात आकंठ बुडालेलं एकत्र कुटुंबातलं वेगळं छोटंसं जग

दोघांच्या घरच्यांनाही कळतंय की सगळंच...

तो एकुलता एक लाडाचा 

तशीच ती ही एकुलतीच आईवडिलांची.

ते ही मनमुराद सगळं आस्वादतात. ... हिस्टरी रिपीट्स म्हणत.

आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे

खरंतर कित्येकदा ठरवूनही द्रुष्ट काढायची राहूनच जाते... 

या सुखाला कोणाची नजर न लागो

नांदा सौख्यभरे. 

पण सुखाची किंमत कळायला दु:ख वाट्यात येतच.....

...................

... खूप दिवसांनी ती परत ऑफिसला निघाली आणि सवयीने आजही तिने विचारलं....

 अॅक्सीडेंटमध्ये काही दिवसांपूर्वीच गेलेल्या त्याच्या, फोटोतल्या हास्याने तिचा दिवस सुरू झाला.

तो गेला होता... जगासाठी.‌ 

तिच्यासाठी... तिचं हक्काचं स्माईल त्यानं कधीचं ओठांवर पेरून ठेवलं होतं.. फोटोतही...कायमसाठी.


घरचेही दु:खात चूर

पण आता त्यांच्या एकुलत्या एक लेकाचा 'जीव' जीवापाड सांभाळणारे. 

तिला जपण्यासाठी आता आई वडिल झालेले.

आई-वडील ..दोन दोन

माया डबल

काही दिवसांत तिला आयुष्य परत भरभरून जगण्यासाठी तयार केलं.

हो आज पुन्हा संसार थाटतिये ती....

सगळ्यांना मनापासून वाटतंय म्हणून.

लग्नात कौतुक करायला दोन आई-बाबा.

कोर्टात लग्न...

हट्टाने पहिल्या सासरहूनच नवर्या घरी जाईन म्हणाली.

आवरलं आणि निघताना परत नेहमीचाच प्रश्न..

"कशी दिसतेय रे?"

त्यांच्या फोटोतलं स्माईल आज जास्तच फुललेलं वाटलं.

मागून खांद्यावर आईंचा हात.. विश्वासाने ओथंबलेला. 

आज त्यांनाही त्याचं स्माईल जाणवलं..समाधान पावलेलं.

ते बघून आई वडिलांच्या डोळ्यांतील अश्रूंबरोबरच चेहर्यावर कर्यव्यपूर्तीचं हलकं हसू तरळलेलं.

घरभर परत एकदा आनंदी आनंद

गाडीचा हॉर्न वाजला...

तिला लग्नासाठी नेण्यासाठी 'तो' आला होता.

तेवढ्यात पाठवणी आधी आईंनी तिला हात धरून आतल्या खोलीत नेलं.

पाटावर बसवलं.

ती आश्र्चर्यचकित...

त्या मात्र तेव्हा काढायची राहून गेलेली द्रुष्ट काढत होत्या..आठवणीने.

तिने भरल्या डोळ्यांनी कटाक्ष टाकला..

तिकडे स्माईल ओठांच्या कक्षा रूंदावत फोटोभर पससरलेलं....

नांदा सौख्यभरे....


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics