जगणं_बिगणं -1
जगणं_बिगणं -1
नमस्कार
आजपासून मी एक नवीन सिरीज सुरू करत आहे.
ही एखादी दीर्घकथा नसून आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या आणि आपण अनुभवत असलेल्या वेगवेगळ्या गोष्टींची शृंखला आहे.
दर पंधरा दिवसांनी #जगणं_बिगणं या सदराअंतर्गत वेगवेगळ्या विषयांवर लिहीणार आहे.
तेव्हा नक्की वाचा..
आपल्या कमेंटही द्या....
#टेस्ट..._चव_वगैरे_काहीतरी...
शंतनू तुला उपमा करून देऊ का रे भूक लागली आहे तर?
का पोहे करू.. दडपे पोहे?
तू म्हणशील ते.
सांग काय आवडतं तुला?"
गावाहून काही दिवसांसाठी लेकाकडे आलेली आजी मोबाईलमध्ये हरवलेल्या नातवाला विचारत होती.
संध्याकाळचं भूक लागली म्हणून नातवासाठी काहीतरी बनवायचं होतं.
"काय? काय म्हणालीस तू? उपमा?
ह्यॅ! हे असलं कोणी खात का?
आणि काय ते...दडपे पोहे?
ते काय असतं?
हे मी नाही खात. मला नाही आवडत असलं.
तुला सॅन्डविच येत? नाहीतर नगेट्स दे तळून"
____________________
"आम्ही दोघेही नोकरी करतो. दोघांनाही उशीर होतो म्हणून सारिकाला सांभाळण्यासाठी तुम्हाला ठेवलं आहे. संध्याकाळचं तिला काहीतरी खायला देत जा.
ट्रॉलीमध्ये वरच्या कप्प्यात बिस्किटांची बरणी आहे. त्याच्या बाजूच्या डब्यात मॅगीचे पुडे आहेत. ती म्हणेल ते द्या."
अनुजा लेकीला सांभाळायला ठेवलेल्या मावशींना सांगत होती.
____________________
दिवाळीत सोसायटीत नव्याने राहायला आलेल्या संजनाला सुषमाकाकूंनी फराळाच्या पदार्थांचे ताट नेऊन दिले.
"My goodness!!
इतके तेलकट पदार्थ?
आम्ही नाही खात.
मी आपली दिवाळी म्हणून थोडे थोडेच बाहेरून विकत आणते.. तेही diet pro.
या तेलकट खाण्यामुळे you know डाएट पारच बिघडून जाते."
कसानुसा चेहरा करून सुषमाताई परतल्या.
_________________
"आर्या, चिनू चला आज माझ्यातर्फे तुम्हाला पार्टी... प्रमोशन झालं म्हणून. जेवायला
बाहेरच जायचं.
बोला कुठे जायचं?
काय खाणार?
पिझ्झा का बर्गर?" नचिकेतने कामावरून आल्याआल्या मुलांना विचारले.
मुलेही आनंदाने तयार झाली.
त्याच आनंदात मुलांबरोबर नाचता नाचता मुलांच्या हातावर टाळी देत नचिकेत उदगारला.
"हुर्रे!! आज पोळी-भाजी वरण-भाताच्या बोरिंग फुडला गोली मारो."
____________________
या अशा कित्येक उदाहरणांवरून कळून येईल मुलांची #फुड_टेस्ट बदलते आहे.
आपणही त्यांना दुजोरा देतो.
पटकन बनवता येईल आणि सहजरीत्या मिळेल असे खाद्यपदार्थ आज-काल पालकांनाही बरे वाटू लागले आहेत.
मुलांची एकमेकांमधली चर्चाही याला कारण ठरते आहे.
आपल्या घरी आपण मुलांना असे काही पदार्थ नाही खायचे सांगितले किंवा डब्यात नाही दिले तरी दुसऱ्या मुलांचे डबे पाहून मुले हट्टीपणा करतातच.
मग यामध्ये डब्बा तसाच परत घरी आणणे, न जेवणे..असले ब्लॅकमेलिंगचे उपाय मुले बरोबर शोधून काढतात. काहीतरी पोटात जावे म्हणून पालकही बऱ्याचदा शरणागती पत्करतात.
काही मिनिटात तळलेले किंवा शिजवलेले पदार्थ किती आरोग्यदायी असू शकतील?
एखादी बी रूजून, झाड येऊन फळे अथवा भाज्या किंवा कणसं लागण्यासाठीचा काळ बराच मोठा असतो.
मग ते अन्न कुठल्याही ॲडिशनल केमिकल किंवा प्रोसेस शिवाय इतक्या झटपट कसे शिजेल?
आणि आधीच असे काहीतरी प्रोसेस केलेले अन्न किती आरोग्यदायी ठरू शकेल?
सात्विक आणि आरोग्यदायी खाण्यापेक्षा आज-काल झटपट तयार होणाऱ्या किंवा मिळणाऱ्या पदार्थांकडे सगळ्यांचाच कल वाढू लागला आहे.... पण याला कारणीभूत कोण?
मुले की आपणच?
आता आपल्याकडे अनेक पौष्टिक खाऊंचे पर्यायही उपलब्ध आहेत.
आपण आपल्या लहानपणी आई किंवा आजीने तयार केलेले जे पदार्थ खाल्ले आहेत त्यालाच नवीन स्वरूप देऊन मुलांसमोर ठेवता येतील...
बघू...
नाही जमवूच
(सदर पोस्ट नावासहितच शेअर करणे अनिवार्य आहे. कॉपीराइट्स रिझर्व्ड)