Deepali Thete-Rao

Classics Children

4  

Deepali Thete-Rao

Classics Children

सोमेश्वराची कहाणी

सोमेश्वराची कहाणी

3 mins
306


"सोमेश्वर"....गंगा आत्याचा एकुलता एक मुलगा. गावी वाढलेला. एकदम खोडकर... उचापती. तरीही सगळ्यांचा लाडका. 

  आत्याचं गाव. . कोकणातलं एक खेडं. सुट्टीला आम्ही कधी आत्याकडे जायचो. नुसतीच धम्माल....

गावाकडचं वातावरण, नारळी पोफळीच्या बागा, समुद्राच्या पाण्याची गाज...मोकळं आकाश

सगळच भारी.. 

रात्री अंगणात झोपताना भुतांच्या गप्पा

सगळे तंतरलेले

कोकणची स्पेशालिटी.. 

सोम्या रंगवून रंगवून सांगायचा. 

इतकं ऐकल्यावर रात्रीत अचानक लागली तरी घराच्या परसात टॉयलेटला जायची भिती.. 

जाने के लिए हिम्मत नही ..ना गए तो बनता नही। 

त्रिशंकू.... 

कसतरी मोठ्या कुणालातरी उठवायचं

शिव्या खात खात एकदाच जाऊन यायचं.. 

मोकळा श्वास

किती ठरवलं उद्यापासून ऐकायच नाही तरी रात्री.. पहिले पाढे पंचावन्न

   एकदा सोम्यानं आंब्याच्या झाडावर चढून हेsss इतक्या साऱ्या कैऱ्या तोडून दिल्या..

आम्हीही खुशीत 

 इकडची तोड...तिकडची तोड 

 सगळं झाड भुंड करून टाकलं.

"अरे ! आत्या ओरडेल ना"

"ती कशाला ओरडेल? "

 आम्ही चकीत. 

तितक्यात दूरवरून आवाज आला. ........ 

............................ 

" चला लवकर! नाहीतर खाल मार. 

सोनबाचं झाड आहे हे. "

 काहीच न केल्यासारखा सोम्या पटकन झाडावरून उतरून चालायला लागला.

आता खरी गोम कळली

आमची फजिती ...कैऱ्यांचा मोह...

सोडताही येईना आणि पळताही येईना....

आम्ही सोनबाच्या तावडीत आणि सोम्या दुरून गम्मत पहात होता

..अंग ठणकत होतं दिवसभर.. 

 असा हा सोम्या... झंगडच

विहीरीत पोहायला गेलो तर पाण्याखालून जाऊन नान्याचं धोतरच सोडलं. बायकांची धुणी-भांडी होईतो नान्या पाण्यातच. 

वर हा विचारतोय.. " नान्या वर्षाची आंघोळ एकदमच करणार का? ये की वर बाबा आता"

कसं येणार.. बसला कुडकुडत नाना दोन तास पाण्याच्या आतच

................... 

दिवाळीच्या सुट्टीत सोम्या पुण्याला आला. सकाळी बागेत गेलो होतो. 

 काय झालं कोण जाणे? 

हा सरसर बाजूच्या झाडावर चढला. पक्षांची पिल्लं घरट्यात ओरडत होती..ते पाहायला. 

खालच्यांचा एकच गलका....

" बहुतेक झाडावर साप आहे "

" वर काय करतोय हा? "

..................... 

आरडाओरडा....भरपूर पब्लिक गोळा....

वॉचमनची दमदाटी 

.............. 

 दादाने दम भरून खाली उतरवला. बागेतून वॉचमनने याच्यामुळे हात धरून बाहेर काढले सगळ्यांना


    नंतर ठरल्याप्रमाणे मिसळ खायला. सोम्याने दणकून हाणली. 

   रात्री सगळे एकत्र गच्चीत झोपलो होतो. मध्यरात्री रडण्याचा आवाज. "कोण?"

" सोम्या".... 

" काय झालं? "

"कळत नाही...काय होतंय. छातीत दुखतंय खूप" सोम्यानं गळा काढला

असं त्यानं म्हटल्याबरोबर घराचं चित्रच पालटलं....

काका स्कूटर काढून डॉक्टरांना आणायला..... 

आई-काकू देवघरात देवाशी दिवा लावायला....

आजीनं रामरक्षा चालू केलेली....

सोम्याचं डोकं बाबांच्या मांडीत...

 आम्ही उगाचच रडून सोम्याला कंपनी देत होतो..... 

   गोंधळ ऐकून आजूबाजूच्या घरातले लोकही जागे झाले. 

डॉक्टर आले...त्यांनी तपासून गोळी दिली. 

  आणि लोकहो ! 

औषधाचा महिमा तरी पहा .........

 केवळ गंधाने आपले अस्तित्व प्रकट करून पूssर्रsssss आवाज करत दाब्बून मिसळ खाल्ल्याने तयार झालेला, सोम्याच्या छातीत..पोटात अडकून बसलेला गॅस... अखेर निसर्गात विलिन झाला.

अन् सोम्यासकट सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. 

 मग त्याच्या खाण्यापिण्यावर प्रत्येकाचं 'विशेष' लक्ष. 

  नरकचतुर्दशीच्या आदल्या दिवशी आजी त्याला म्हणाली

 " केस किती वाढलेत रे? भुवईपर्यंत आलेत. आधीच तुझ्या भुवया जाड. जाऊन बारीक करून ये, आज भाकड दिवस आहे तर...." त्याला आला राग. 

   घरापासून थोडं पुढे न्हाव्याचं दुकान.  सोम्या.... भेट देऊन आला. 

  संध्याकाळी दिवे गेलेले. 

कंदिलाच्या उजेडात नीट लक्षात आले नाही. 

दुसऱ्यादिवशी पहाटेच आजीने मुलांना एका ओळीत बसवलं...तेल , उटणं लावायला. 

 सोम्यापाशी आली...आणि भीतीने तेलाची वाटीच हातातून पडली.

 मग सगळ्यांचं लक्ष सोम्याकडे गेलं. स्वारी डोक्यावरचे सगळे केस भादरून आली होती... भुवयांसकट

त्याचं ते ध्यान बघून सगळेच हसू लागले.

   प्रत्येकजण केस आणि भुवया वाढवण्यासाठीचे सर्व उपाय सोम्यावर करू लागला. 

   काही दिवसातच आत्या-काका सोम्याला न्यायला पुण्यात आले. 

हा उत्साहाने त्यांना आणायला बाबांबरोबर एसटी स्टँडवर गेला. उन्हामुळे बाबांनी टोपी घातलेली तर याच ध्यान असं. 

एसटीमधून खाली उतरताना आत्याने पाहिलं.. तिला काय वाटलं कोण जाणे? रडायलाच लागली. 

"काहीच कसं कळवलं नाहीस रे? " जोरजोराने बाबांना म्हणाली. सुतकी चेहऱ्याने रडत रडत घरापर्यंत आली. बाबांनाही कळेचना ..... घरी जाऊन बोलू म्हणून ते गप्प. 

दारात आल्या आल्या आत्याने गळा काढला. तशी आजी म्हातार्या नानीला घेऊन बाहेर आली. 

"अगोबाई! नानी तर इथेच आहे. मग कोण गेलं रे ? तुम्ही असे केस काढलेत ते" 

 हळूच तिनं बाबांना विचारलं. सारा घोळ उलघडला. 

 आत्याला घरात नेऊन सोमेश्वर पुराण ऐकवले. बाबांनी टोपी काढून त्यांचे शाबूत असलेले केस दाखवले. 

पुन्हा एकदा हास्यकल्लोळ

 आडवे होईतो..... 

अशीही सोमेश्वराची कहाणी...

संपूर्ण कधीच होणार नाही....

 वयपरत्वे हसण्याचे संदर्भ मात्र बदलत जातील ..... 



Rate this content
Log in

Similar marathi story from Classics