शीरोज... आयडियल वुमन
शीरोज... आयडियल वुमन
जीवनातला अत्यंत आनंदाचा सत्कार समारंभाचा क्षण साजरा करुन सुहिता विमानात बसली होती.तिच्या डोळ्यापुढे पुन्हा पुन्हा आजचा सोहळा साकार होत होता.तिच्या प्रबंधाला राष्ट्रीय पारितोषिक मिळेल अशी स्वप्नातही तिने कधी कल्पना केली नव्हती.ती खूप आनंदात होती. तिच्या मनात एअरपोर्टवर विचारलेला प्रश्न सारखा रेंगाळत होता." मॅडम आपल्या या यशामागे कुणाचा हात आहे? असं म्हणतात पुरुषाच्या यशामागे एका स्त्रीचा हात असतो.तुमच्या यशामागे पुरूषाचा हात आहे कां?"
"साॅरी ..माझ्या फ्लाईटची वेळ झाली " असं म्हणूत ती पटकन तेथून सटकली.पण मनात तो प्रश्न रेंगाळत होताच.
आजचा सत्कार समारंभ,स्मृतीचिन्ह, ती ,आणि तिचा नवरा तिच्या डोळ्यापुढे सारखे येत होते! विमानाच्या गतीबरोबर तिचे मनही धावत होते. तिला आठवले....डोळ्यापुढे एकेक प्रसंग साकार होत होता.... मोबाईलची रिंग वाजत होती. सुहिताने तिचा फोन बघितला.
अमूल्या ?...
"हं बोल अमू .."
" गुड माॅर्निंग मॅडम .काय करतेस? "
" अग काही नाही.पुस्तक वाचतेय..."
" कुठलं ?."
" उत्तरयोगी ...योगी अरविंदांचे आहे ।
" अग ऐक न...दिल थाम के सुन...अग तुझी पसंती आलीय . तू अक्षयला पसंत आहेस.Congrats ! आता पुढचे प्लॅन करू. चल आता मी आॅफिसला पळते. .."
सुहिताला काही समजेना...पसंती आली, ही फार मोठी आनंदाची बातमी होती...पण मन खुश नव्हत. मुलीच्या जीवनात पसंती येणं आनंदाची बाब असते ! ....काय करावं ? .... विचार तर करायलाच हवा .स्थळ सोडणं म्हणजे मूर्खपणा होईल .पण स्विकारणं कठिण जाईल.समजा स्विकारल तर संसार सुखाचा होईल कां? भावी आयुष्य सुखात जाईल कां? आपण अॅडजेस्ट करू शकू कां? काय करु? दिसायला देखणा ,गोरा,पण फक्त इंटर शिकलेला, चेहर्यावर थोडा बावळटपणा! बोलण्याचे ,वागण्याचे मॅनर्स तसे नाही!...पण अमूल्या म्हणाली होती स्वभावाने खूप चांगला आहे. साधा सरळ आहे .खूप शांत आहे...काय करावं?....तिच्या मनात हो-नाही चे विचार हेलकावत होते.
आत्ताच योगी अरविंदाची " उत्तरयोगी " कादंबरी वाचता वाचता तिला मजा वाटली.' घर सांभाळणारी,स्वयंपाक करणारी ,शांत स्वभावाची वधू हवी '.... ती समाजातही बघत होती बर्याच माणसांना घर सांभाळणारी, स्वयंपाक करणारी ,मुलांकडे लक्ष देणारी,गरजा पूर्ण करणारी बायको हवी असते. मग मी ही हाच दृष्टीकोन ठेवला तर?...घर सांभाळणारा देखणा नवरा स्त्रीने स्विकारला तर?....पैसा प्रतिष्ठा करिअर मी बघेन! तो घर बघेल !....अशी भूमिकांची अदलाबदल केली तर? तिला एकदम आठवलं...मागल्या वर्षी काॅलेजचे श्रीकांत सर प्रॅक्टीकलला पुण्याला गेले होते. त्यांना घ्यायला तिथल्या प्रोफेसरांच्या मिसेस आल्या होत्या.सर सांगत होते....
"मिस्टर कुळकर्णी नाही आलेत?" विचारले
".मी आलेली बघून तुम्हाला आश्चर्य वाटल असेल! मिस्टर कुळकर्णी घरीच आहेत...खरं सांगायच तर आम्ही कधी कधी आमच्या भूमिका बदलतो.ते घरचं बघतात आणि मी बाहेरच बघते."
सर म्हणाले होते " मला फार आवडलं. आयडिया झकास आहे ! नुसती आयडिया नाही इम्प्लिमेंटेशन आहे तिथे ! अहो खरोखर ते दोघं अशा भूमिका कधी कधी जगतात. It'sGreat!!! हे सारं आठवून विचार केला... आपणही असं केल तर !.... काय हरकत आहे ...हे सारं डोक्यात ठेऊन, मनाची पूर्ण तयारी करून विचारांती होकार पक्का केला.
एकदा वाटलं चुलत बहिणीला इंजिनिअर नवरा मिळाला.आत्या म्हणाली होती "आपली रेवती भाग्यवान आहे .शिकलेली नाही तरी छान नवरा मिळाला." काकू म्हणाल्या होत्या " वन्स अहो आपली पोरगी गोरी आहे .स्वभावाने शांत आहे.कामात हुशार आहे.छान संसार करील . " आताही हे तेच आहे !.... अक्षय गोरा आहे. स्वभावाने चांगला आहे .छान घर सांभाळेल.फक्त भूमिकांची अदलाबदल आहे.
होकार देणं अगदी योग्य आहे. कारण पुन्हा पसंती फार कठिण !.पुन्हा मुलगी दाखवणे, पत्रिका पहाणे ! सगळं कठिण होतं.... पुन्हा पुन्हा तिने आपला चेहरा आरशात बघितला.!रंग काळा सावळा होता ! नाक डोळे ठिक ठिक होते.!... रुप सामान्य होतं !&nb
sp;बुद्धी असामान्य होती. खूप शिकायचं ,खूप मोठ व्हायचं.नांव कमवायचं. प्रतिष्ठा मिळवायची हे स्वप्न आणि जिद्द होती. एम फिल सुरु होत. काॅलेजमध्ये छान नोकरी मिळाली होती...मनांत असे विचार सुरु होते. तेवढ्यात दारावरची काॅलबेल वाजली.दार उघडले...साक्षात अमूल्या उभी होती.
" काॅंग्रॅटस् सुहिता ! तुझी पसंती आली.किती छान झालंय ग! काय विचार केला? अग तुझा स्विकार करणारा तो देव माणूस आहे.!"
"खरंय अमूल्या ! मी खूप विचार केला .मी स्विकारलयं अक्षयला. ! "
" वाॅव! सुहिता.." आणि तिने मिठीच मारली.
"शुभमंगल सावधान झालं.! हॅन्डसम नवरा मिळाल्याच काहींना कौतुक वाटत होतं, तर काहींना वैषम्य वाटत होत! कमी शिकलेला नवरा मिळाला हे ऐकून त्यावर उपहासिक काॅमेंटस् होत्या!
कुछ तो लोग कहेंगे
लोगों का काम है कहना
छोडो ये बेकार की बाते....लोकांकडे लक्ष न देता जगायच, चांगल्या लोकांशी चांगल वागायचं आणि आपल्या विचारांशी प्रामाणिक राहून अपल्या मतांवर ,निर्णयावर पक्क रहायच हे जीवनाच तत्व होतं! लग्न झालं ...संसार सुरु झाला. नवरा खूष होता.त्याने आनंदाने सारे स्विकारले. संसारात आनंदी राहून स्वतःचं करिअर सांभाळायचं हेच जीवनाच उद्दिष्ट होते. बघता बघता पहिला मुलगा झाला .खूप गोड चुणचुणीत स्मार्ट ...जन्म झाल्यावर मुलाला पहिल्यांदा बघितलं. ईश्वराने खूप छान देणं दिलं होत.मातृत्वाच दान मिळाल होतं .देवाचे मनापासून आभार मानले.
नोकरी, छोटा अथर्व, करिअर, सोशल वर्क सारं कसं सांभाळायच प्रश्नच होता.मला करीअर सांभाळणं गरजेच होत.आणि घर सांभाळण आवश्यक होत. हा प्रश्न अक्षयने सोडवला. आता मी चतुर्भुज होते. चार हातानी संसाराचे शिल्प सांभाळायचे होते.
घर दोघांचे असते
दोघांनी सांभाळायचे असते
संसाराचे सुंदर शिल्प
चार हातांनी कोरायचे असते,
अक्षय म्हणाला घर माझ आहे ,मुलगा माझा आहे, संसार माझा आहे.मी जबाबडाघदारी उचलायलाच हवी .अक्षयची घर आणि अथर्वला सांभाळण्यात खूप मदत झाली. अथर्व मोठा होता. शाळेत हुशार विद्यार्थी म्हणून त्याला ओळखत होते. पुढे पी.एचडी मिळवली. सामाजिक कार्य सुरु होते. मिटींग असायच्या, पेपर रिडिंग असायचे,दौरे असायचे .तो घर आणि मुलगा सांभाळत होता .मी पैसा प्रतिष्ठा सांभाळत होते. तिच्या डोळ्यासमोरुन सारे प्रसंग सरकत गेले..ती त्यात रमून गेली होती.
तेवढ्यात सूचना झाली.."फासन युवर बेल्ट. आता विमान थोड्याच वेळात लॅंड होईल. "..... बापरे! विचारांना एकदम ब्रेक बसला .
ती एअरपोर्टवर उतरली..कुणी तरी तिला उद्देशून म्हणाले .."शीरोज"
येस ..मॅम ऽ ! मेन हिरोज असतात ..तशाच वुमन शीरोज असतात...तुम्ही ' शीरोज ' आयडिअल वुमन आहात .अभिनंदन ."
" थॅक यू." मॅडम एक प्रश्न विचारते प्लिज..
"विचारा"
" मॅडम आपल्या या यशामागे कुणाचा हात आहे? असं म्हणतात यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्रीचा हात असतो.तुमच्या यशामागे पुरूषाचा हात आहे कां?"
"प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो.मला सांगायला अभिमान वाटेल की माझ्या यशात माझ्या नवर्याचा नक्कीच सहकार्याचा फार मोठा हात आहे!"
"सहकार्य म्हणजे ते तुम्हाला घरात सर्व प्रकारची मदत करतात कां?"
"आॅफकोर्स!...आम्ही या स्री -पुरुष कर्मकांडाच्या रुढी परंपरेच्या संकल्पनेतून बाहेर पडलोय. त्याला पुरूषी प्रभावी प्रवृत्ती ,पुरुषी अहंकार वगैरे नाही आवडत.! आणि स्रीआहे ,स्रीत्वाच बिरुद मिरवून जगणं मला नाही पटतं. आम्ही दोघं साथीने एकमेकांना समजून जगतो."
"तुमच्या बरोबर सत्कार समारंभाला ते आले नाहीत?"
"या वेळी मुलाच्या परीक्षेमुळे नाही जमलं.पण कधीतरी संधी मिळेल तेंव्हा माझ्या सत्काराचा मानकरी माझ्या बाजूला जरुर बसेल .
धन्यवाद!"
"मॅडम यु आर सो ग्रेट!तुम्ही दोघंही क्रांतीकारी सुधारक आहात! "
तिने मोठा बुके हाती दिला.
त्या बुकेच्या फुलातील गंध काही वेगळाच होता. तो गंध खूप सांगून गेला.