Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra
Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra

Meena Khond

Others


3  

Meena Khond

Others


बाबा अमुचा आधार

बाबा अमुचा आधार

1 min 191 1 min 191

आमच्या गावाला खूप मोठी जत्रा भरायची. कठपुतलीचा खेळ, भगवान का चमत्कार, आकाशपाळणा, हंसी घर, जादूचे खेळ, भरपूर दुकान! मस्त मजा असायची. एकदा वडिल मला जत्रेत घेऊन गेले.हंसी घर बघितल.ते एक आरसेघर होते.प्रत्येक आरशासमोर उभ रहाव आणि खूप हसाव.

प्रत्येक आरसा हसवत होता.पहिल्या आरशासमोर मी उभी राहिली..हसून हसून पोट दुखल.मी दोन फुट उंचीची आणि चार फुट जाडीची दिसले .खूप खूप हसले. दुसर्‍या आरशासमोर उभे राहिले तर उंचच उंच आणि अतिशय बारिक दिसू लागले.छताला डोक टेकलेल दिसल.असा प्रत्येक आरसा हसवत होता.


भगवानका चमत्कार पाटी बघितली आणि उत्सुकतेने ' भगवान का चमत्कार ' बघायला गेलो.तिथे हात पाय नसलेला एक माणूस बसलेला असून त्याच्या आजूबाजूला दोन व्यक्ती उभ्या होत्या.त्या पैकी एकाने आमच्यापैकी एकाचे नाव विचारले.त्या अपंग व्यक्तीने तोंडात पेन्सिल धरुन समोर धरलेल्या पाटीवर ते नाव स्वच्छ अक्षरात लिहिले आणि आम्हाला वाचायला लावले.आम्ही तेंव्हा खरंच भारावून गेलो.हात पाय नसतांना मुखात पेन धरुन त्याने नाव लिहिले.आम्हाला खूप आश्चर्य वाटलं.!


त्यानंतर दुकान बघत गेलो."मीना,आज तुला काय पाहिजे सांग? काय घ्यायच तुला.?" एरव्ही तसा धाक होता.मोकळीक होती. स्वातंत्र्य होतं. मर्यादा होती. बाबांना कौतुकही फार होत." माझ्या मुली म्हणजे माझे मुलं "असे ते म्हणायचे. अगदी राजकुमारीसारखे वागवायचे. मग त्यांनी मला एक सुंदरसा फ्राॅक घेऊन दिला.एक छानशी पाटी घेऊन दिली .ती वेगळीच होती.आम्ही आईस्क्रिम खाल्लं. आजचा दिवस खूप वेगळा होता.


खरंच बाबा नावाच रसायन वेगळच असत. त्यांना ओळखण कठीण असत.


Rate this content
Log in