अलक
अलक
दीपक आणि अश्विनीची रोज कुठल्या ना कुठल्या कारणावरून वादावादी व्हायची. आजी तिच्याकडे रहायला आली. काम करताना अश्विनीच्या हातून खाली पडलेलं घरंगळत, लवंडत आवाज करत पुढे जाणार पातेलं आजीनं चटकन उचललं आणि म्हणाली, "घरातली भांडी पडली तर लगेच शांत करावीत गो! फार वाजू देऊ नयेत."