Chandanlal Bisen

Action

4.0  

Chandanlal Bisen

Action

पर्यावरण रक्षण काळाची गरज

पर्यावरण रक्षण काळाची गरज

3 mins
8.2K


आदी-अनादी काळापासून पर्यावरण आणि मानव याचे नाते घनिष्ठ अतूट आहे. पर्यावरण हा मानवाचा खरा मित्र राहिलेला आहे; पण मानवच आपल्या खऱ्या मित्राला धोखा देत आहे. खऱ्या मित्राला काळाच्या ओघात विसरत चालला आहे. आपल्या स्वार्थयुक्त आसक्ती मुळे खऱ्या मित्राच्या अस्तित्त्वावर घाव घालण्यास थोडाही संकोच दिसून येत नाही. 


    आपल्या बुद्धी सामर्थ्याच्या बाळावर संस्कृतीची उभारणी करणारा आणि प्रचंड प्रगतीची उडान भरणारा एकमेव प्राणी म्हणजे मानव..! आधुनिक काळात एकीकडे मानवाने प्रगतीची उत्तुंग शिखरे सर केली. दुसरीकडे नसर्गिक व सामाजिक पर्यावरणाविषयी गुंतागुंतीच्या समस्या उभ्या राहिल्या. त्या पार्श्वभूमीवर पर्यावरण विषयक समाज जाणीवा जागृत होऊ लागल्या. 


   पर्यावरणीय घटक मुख्यस्वरुपाने पाणी, हवा, जंगल, पर्वत, नदी, झाडे, भूमी, सूर्य, चंद्र, आकाश, समुद्र इत्यादी असून; समस्त घटक मिळून जो व्यापक स्वरूपात समुदाय बनतो, त्याला निसर्ग/पर्यावरण संबोधण्यात येत असते. या पर्यावरणातून अन्न, वस्त्र, निवारा, प्राणवायू, औषधीय वस्तू,....! अशा अन् गिनत मूलभूत,व भौतिक गरजांच्या वस्तू विपुल प्रमाणात प्राप्त होत असतात. 


    स्वार्थी मानव नैसर्गिकरित्या गरजात्मक वस्तूंचा उपभोग घेत नसून, अति लालसा मनी बाळगून अतिरेक दुष्कृत्य करून गरजोपरांत वस्तू प्राप्त करून घेतो. या अवैचारिक कृत्यांमुळे एके काळचे घणे जंगल, माळरान स्वरूपी उदयास आले. मोठमोठे डोंगर पोखरल्या गेले. अशा करोडो नैसर्गिक साधन संपत्तीचा अति वापर, अतोनात नासधूस करून, मानव हा पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी करीत सुटला आहे. यामुळेच कि काय? निसर्ग बेतालपणे, आक्राल-विक्रालतेने वागतानाचे दृश्य अनेक दशकांपासून दिसून येत आहे. दुष्काळ-अवर्षने नित्याची बाब होऊ लागली. त्याची झळ सर्व प्राणिमात्राला सोसावी लागत आहे. या पार्श्वभूमीतून पर्यावरणाविषयक जाणिवा मानवाच्या डोक्यात जागृत होऊ लागल्या. विशेषतः 1970 च्या दशकांपासून जगभर पर्यावरणीय स्वंरक्षण विचारमंथनाला चालना मिळाली. पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे. मानवी अस्तित्व टिकविले पाहिजे. आणि ते आपण समृद्धही केले पाहिजे. अशी सकारात्मक दृष्टी विकसित होऊ लागली. तरी ही विचारधारा टोकडीच म्हणावी लागेल. 


    फक्त विचारवंतांच्या मनात नाही, तर प्रत्येक व्यक्तींच्या मनात ही बाब रूजने आवश्यक आहे. कमीतकमी विद्यार्थ्यांच्या मनात तरी रूजने आवश्यक आहे. म्हणूनच ही गोष्ट हेरून सन 1986 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणापासून यापर्यंतचा अभ्यासक्रम आराखडा पर्यंत पर्यावरणाविषयक जाणिवावर भर देण्यात आला आहे. तसेच पर्यावरण वाचविण्याकरिता भ्रष्टाचाराच्या मुद्द्याप्रमाणेच व्यापक लोकचळवळ निर्माण करण्याची गरज आहे. प्रत्येक व्यक्तींनी या क्षणार्धापासून स्वतः प्रेरित होऊन तत्पर राहून, इमाने इतबारे सक्रियतेने कृती करण्याची गरज आहे. नुसत्या बोंबा हाकून काही साध्य होणार नाही.


 "केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे." 

    भयावह वेळ येऊ नये म्हणून निसर्गाची झालेली झीज भरून काढण्यास सजग व्हायला पाहिजे. "म्हणून मानावांनो वेळ आपल्या हाती आहे. चला उठा, जागे व्हा, पर्यावरणाशी आपुलकीचे नाते जोडा..!!"


    ऋषीमुनी साधुसंतांनी, वृक्षवल्ली, जंगल, पशुपक्षी, निसर्ग यांचे महत्त्व जाणले होते. अनेक साहित्य ग्रंथातून पर्यावरणाचे महत्त्व विषद करण्यात आल्याचे दिसून येते. संत तुकोबारायांनी आपल्या काव्य रचनेत म्हटले आहे, 

"वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे!"


   खरंच निसर्गच आपला सर्वकाही पूर्णरूपी दाता आहे. निसर्गात अमाप संपत्ती दडलेली आहे. निसर्ग आपला समाज आहे. त्या समाजाचे आपण घटक आहोत. मग समाजाला हानी कशी पोहचवू शकतो? आपण बुद्धिमान घटक असल्यामुळे, पर्यावरणाचे रक्षण करणे आपले आद्य कर्तव्य आहे, नैतिक जबाबदारी आहे.


    प्राचीन काळात पशुपक्षी, वृक्ष, डोंगर, इतर.. हे देवाचे अवतार किंवा देवाची वाहने अशी अगाध श्रद्धा मानवाची होती. झाडे तोडल्यामुळे, प्राण्यांची हत्या केल्यामुळे देवीदेवतांचा कोप होईल, अशी मानवाच्या मनात श्रध्दात्मक भीती होती. म्हणून त्या काळात भारताच्या एकूण जमिनिपैकी ४७ टक्के जमीन जंगलाने व्यापलेली होती. असंख्य पशुधन स्वछंद रित्या नांदत होते. 


   इंग्रजांनी सत्ता स्थापन केले व आपल्या परंपरागत श्रद्धेवर आक्रमण झाले. देवीचे वाहन म्हणून ज्यांच्याकडे श्रद्धायुक्त भीतीने पाहीले जायचे, अशा हजारो वाघांची शिकार करण्यात आली. गेल्या शतकात तर मानवाने सुधारणेच्या नावाखाली व निसर्गावर विजय मिळविण्याच्या हव्यासापायी जंगलाचा आणि वन्य प्राण्यांचा व मोठमोठया डोंगराचा, इतर साधन संपत्तीचा प्रचंड प्रमाणावर विनाश केला. वन्य प्राणिजीवन या परमेश्वराच्याच विभूती आहेत, ह्या मानवीय मनातील कल्पनाच नाहीशा झाल्यात. भारतात ऐकूण भूमीपैकी फक्त ८% भागावर जंगल शिल्लक राहिले आहे. पुढील काही दशकात तेही नष्ट होणार. शिकार, मासभक्ष्य, युद्ध, अणुस्फोट, वायुगळती सारख्या मानव निर्मित दुर्घटना यामुळे बहुतांश वन्यप्राणी नामशेष होतांना दिसून येत आहेत.


   उदाहरण महाराष्ट्रात शेकरू नावाचा प्राणी मुबलक प्रमाणात होता. तो राज्यस्तरीय प्राणी आहे. जुन्या नाण्यांवर प्रतिमा कोरलेल्या दिसून येतात. हा प्राणी नामशेष झाल्यातच आहे. याचप्रमाणे अनेक प्राणी जात, नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. काही प्राणी पूर्णतः नामशेषही झालेत. या प्राण्यांचे वर्णन पुढील पिढींना फक्त चित्र प्रतिकृतीतून करावे लागणार! असले अशुभ चिंतक जटील प्रसंग भविष्यात ओढवणार आहेत. 


    म्हणून थांबवा, या भयावह विनाशाला..! वृक्ष लावा, संवर्धन करा..! यातच तुमचे व भावी पिढीचे हित दडलेले आहे. पर्यावरण रक्षण, काळाची गरज आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Action