भोवरा
भोवरा
भोवऱ्यात सापडलेला माणूस गटांगळ्या खात बुडतो, सहसा सावरू शकत नाही आयुष्यात असे भोवरे खूपदा भेटतात. पण आपण गाफील राहतो म्हणून ... चूक करून बसतो आणि सावरायचं तेव्हा वेळ निघून गेलेली असते. मग केवळ बघत राहण्यापलीकडे आपल्या हातात काहीच उरत नाही. भोवऱ्यातला माणूस जसा पिळवटून गुरफ़टत जातो तास काहीस प्रत्येकाच्या आयुष्यात प्रसंग येतात आणि काही कळण्याच्या आत बरंच काही घडून जातं. आपल्या आकलनाच्या पलीकडचं असत सारं. भोगण्यापलीकडे त्याच्या हाती काही उरत नाही .असंच काहीसं सुमतीच्या आयुष्यात घडलं . क्षणात होत्याच नव्हतं झालं. भरल्या संसारातून सुशांत तिला सोडून गेला. वर्षभराचं त्याच आजारपण, दोन चिमुकल्यांच संगोपन करता करता तिला नाकेनऊ येत होते. पण ती खंबीर होऊन परिस्तिथीशी दोन हात करत होती. सासू सास-याचाही म्हणावा तसा सहारा तिला मिळाला नाही. पण ती उभी राहिली त्याच आजारपण कुरबुर न करता करत होती.
त्यादिवशी सुमती दोन्ही मुलांचंआवरून ती मुलांना शाळेत सोडून आली. आणि बघते तर सुशांत वेदनेने तळमळत असताना तिने पहिले का हो काय झालं. बरं वाटत नाही नाही का ? विचारल तर तो अचानक विशुद्ध पडला . ती घाबरली शेजारच्या काकूंना बोलावून त्यांच्या मदतीने सुशांतला दवाखान्यत ऍडमिट केलं. आणि गावाकडे घरच्यांना फोन करवून निरोप धाडला. तीच मन थाऱ्यावर नव्हतं. किती तरी वेळ ती त्याच्या पायथाशी बसून होती. डॉक्टरांनी येऊन टर्टमेन्ट चालू केली होती पण अजून तो शुद्धीवर आला नव्हता. तीच घड्यालाकडे लक्ष गेलं अन मुलं शाळेतून आणण्यासाठी शेजराच्या बंटीला फोन करून त्यांना दवाखान्यात घेऊन येण्यास सांगितलं. पुन्हा सुशांतकडे येऊन पाहते तर तो अद्यापही शुद्धीवर आला नव्हता. तिची मनाची घालमेल, अस्वस्थता तिच्या चेहऱ्यावर जाणवत होती. तिला सुशांतची काळजी वाटत होती. ती उठली अन डॉक्टरचाय केबिनमध्ये गेली. अरे या या बसा. डॉक्टर साहेब ह्यांना बरं वाटेल ना ? काय झालं त्यांना ? आरे हो हो तुम्ही बसा अगोदर म्हणत डॉक्टरानी तिला पाणी प्यायला दिल.. हे बघा अजूनही १२ तासात ते शुद्धीवर येतील बहुदा . नाही तर त्यांना दुसरीकडे हलवावं लागेल. तशी सुमती आणखीच विचारांत पडली. सुशांतच्या पायथ्याशी बसली. भीतीने आणि काळजीने तिचा चेहरा काळवंडला होता . आता दवाखाण्याचा खर्च कसं होईल ? दुसरीकडे हलवायचा तर तो खर्च ? कसा उभा करावा याच्या काळजीने तिच्या मनात घर केला होत . सासू सासऱ्याकडून मदतीची अपेक्षा म्हटलं तर बघूया काय होत ते... तिला आठवलं सारं सारं मागील १० वर्षांच्या संसारात तिला सुशांतने काहीही कमी पडू दिला नव्हतं तो तिला त्याच्यापरीन हौस मौज ऐपतीनुसार कधी मधी पिक्चरला घेऊन जातं असे . पै पै जमवून त्याने गावाकडे सुमतीच्या नावावर २ एकर जमीनही घेतली होती . तेव्हा सुमतीच्या नावावर शेती केल्यामुळे त्याचे आई वडील नाराज झाले होते. का कुणास ठाऊक त्यावेळी सुशांत बोलून दाखवत नव्हतं पण ... माझ्या माघारी आपल्या मुलाबाळांसाठी तुझ्यासाठी ती शेती कमी येईल असं बोलून गेला होता. तेव्हा आपण किती भांडलो होतो त्याचाशी काय गरज होती माझ्या नावावर शेती तुमच्या नावावर कर असं म्हटल्यावर .. पुन्हा तुझ्या नावावर करण्याचा खर्च कशाला करायचं ? अन तुला वाटते तितके माझे आई - बाबा सरळ नाही बरं असंही तो का म्हणाला असेल ? असे विचार तिच्या मनात येऊन गेले. त्याला त्याच्या आजाराचे त्याला माहित असेल का ? तो असे का म्हणाला ? माझ्या माघारी तुला कमी येईल . तू नोकरी करून आपल्या मुलाचं शिक्षण करू शकतेस. मी बँकेत बोलून ठेवलं आहे. सारं सारं आठवून ती अक्षरशः वेडीपिशी झाली. समोर सुशांतचे आई - बाबा पाहताच तिने हंबरडा फोडला. आई - अण्णा हे काय झालं ? असं म्हणत ती सासूबाईच्या गळ्यात पडून रडू लागली . सुशांतचे बाबा म्हणाले सुनबाई डॉक्टर काय म्हणाले ? अण्णा .... म्हणत तिने रडत रडत सांगितले कि ते म्हणाले १२ तासात जर शुधद आली नाही तर दुसरीकडे हलवावे लागेल . तसे अण्णा विचारांत गढून गेले .. अण्णा मी बँकेचे एटीएम घेऊन येते गडबडीत घरीच विसरले म्हटले. मुलंही आले असतील घरी तेव्हा त्यांनाही घेऊन येते म्हणत ती निघून गेली.
आज दुसरा दिवस उजाडून गेला तरी सुशांत शुद्धीवर आला नाही हे पाहून सुमती अन्नाला म्हणाली अण्णा ह्यांना ना दुसरीकडे हलवायला हवं . तसा अण्णा म्हणाले हो ग पण पैसे नकोत का मोठ्या दवाखानयेत ऍडमिट करायला ? माझ्याकडे आहेत तुम्ही फक्त चला डॉक्टरांना भेटायला ... आग सुनबाई तुझा फोन आल्यावर मी हातातले कामे टाकून तसाच आलो. मला जायला हवं गावाकडे सुगीचे दिवस आहेत धान्याची रस ताशीच पडलेली सोडून आलो ते नीटनेटकं करून मी पर्वाला येतो मग बघू काय करायचं ते .... असं म्हणून चाल आम्हाला निघायला हवं आम्ही पर्वाला येतो असे म्हणत ते ती काय बोलते याची वाट न पाहताच निघून हि गेले. तिला काय करावा तेच सुचेनासं झालं होत . रक्ताचे नातीही इतके कशी निसठुर असू शकतात ? पोटचा मुलगा शेवटच्या घटक मोजतोय आणि ह्यांना त्या धान्ययाची काळजी. ती एकांतात हमसून हमसून रडली. डोळे पुसत पदर खोचून पुन्हा खंबीर होत डॉक्टर कडे गेली. डॉक्टर साहेब हे काय लावलं. तुमच्याकडून विलाज होत नाही तर मग काय पेशंट मरणाची वाट पाहताय काय ? आम्हाला सुट्टी देऊन टाका. बिल सांगा पटकन माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. यावर पटपट म्हणत डोळे वटारून बघत ती उद्गारली. तिचा रणचंडीचा अवतार बघून डॉक्टर गारद झाले. अहो पण .. आधी बिल काढा बस्स झाले तुमचे उपचार ... तिने सुशांतला मोठा शहरात एकटीने हलवले आणि उपचार चालू झाले ... जवळचे सर्व बँक बॅलन्स उपचारासाठी पुरेसा नाही हे तिला समजत होत पण होईल काही तरी म्हणून तिने हिम्मत एकवटली. गावाकडन आई बाबा येण्याची वाट न बघताच ती एकटीच लढत राहिली कुंकवाचा धनी शेवट घटका
गावाकडन आई बाबा येण्याची वाट न बघताच ती एकटीच लढत राहिली कुंकवाचा धनी शेवट घटका मोजत असताना ... तिने हार मानली नाही. लढत राहिली पण ... तिच्या नावावर असलेली गावाकडची जमीन विकून का होईना त्यांना बरं करीनच असा निश्चय मनाशी करून ती त्याच्या पायत्याशी बसून होती. शेवटी तिसऱ्या दिवशी त्याची थोडीशी हालचाल जाणवली. ती बघून डॉक्टर डॉक्टर त्यांना शुद्ध आली म्हणत तिने (आनंदाने नाचणेच तेवढे बाकी होते ?.. अक्षरशः हॊस्पिटल दणाणून सोडले. जगातले सर्व सुखे तिचं पायाशी लोळण घेत असल्याचा भास तिला झाला ..डॉक्टर येऊन तपासून गेले ..सुमतीनं मनाशी खूणगाठ बांधली माझ्या नावावरही शेती विकेंन पण मी तुम्हाला विचविन असं मनात पुटपुटत ती कितीतरी वेळ बसून होती . तिने आई अण्णांना फोन लावून सर्व हकीकत सांगितली . त्यांना सुशांतला शुधद आल्याची बातमी दिली आणि शेती विकू पण त्यांना वाचवू अशी इच्छया बोलून दाखवली. आग सुनबाई शेत घ्या म्हणल्या म्हणल्या थोडी कोणी घेत ? पडून मागत असं बोलू लागले. तिला अन्नाचा भयंकर राग आला पण तो आवरत तीन पण ते करावंच लागेल असं ठासून सांगितलं. आणि सुशांजवळ येऊन बसली. सुशांतने तिच्याकडे एकदा पाहिलं आणि जवळ येण्याचा इशारा केला तिचा हातात हात घेत तो तू नोकरी कर .. मुलांना सांभाळ .. कसबस म्हणाला ... अन पुन्हा कोमात गेला .. डॉक्टर डॉक्टर तिने आरडाओरड केली तेव्हा सगळे धावत आले चेकअप करून डॉक्टरानि आय एम सौरी एवढाच म्हटलं तिने हंबरठा फोडला ... सुशांत .. तू हवा आहेस मला तू असा एकटा सोडून नाही जाऊ शकत मला ...तिच्या जिवाच्या आकांताने रडताना हंबरडा फोडताना पाहून सारं हौस्पिटल गहिवरून गेलं होत ... तिची ती छोटी छोटी मुलं फक्त टकमक पाहत होती. त्या बिचा-या निरागस मुलांना काय माहिती होत आपले बाबा गेले सोडून आपल्याला कायमचंच ...