Chandanlal Bisen

Abstract

4.5  

Chandanlal Bisen

Abstract

आत्मा अमर आहे..!

आत्मा अमर आहे..!

1 min
539


इसवीसनापूर्वीची गोष्ट आहे. एकदा सॉक्रेटिसला विष देऊन मारावे, अशी शिक्षा देण्यात आली. तेंव्हा तो म्हणाला, "मी आता वृद्ध झालो आहे. चार दिवसांनी देह मरणारच होता. जो मरणार होता, त्याला मारून तुम्ही काय पुरुषार्थ साधणार, तो तुम्हासच माहित. विचार तर करून पहाल की नाही?"


     "देह मरणार हे नक्कीच होते. मर्त्य वस्तूला तुम्ही मारणार यात कोणती प्रौढी?" ज्या दिवशी सॉक्रेटिस मरावयाचा होता त्याच्या आदल्या रात्री तो आत्म्याच्या अमरत्वाविषयी शिष्यांना सांगत होता. स्वतःच्या शरीरात विष भिनल्यावर कशा वेदना होतील, हे तो मौजेने सांगत होता. 


     आत्म्याच्या अमरत्वाविषयी चर्चा संपल्यानंतर त्याच्या एका शिष्याने विचारले, "तुम्ही मेल्यावर तुम्हाला कसे पुरायचे?" 


     तेव्हा सॉक्रेटिस म्हणाला, ते मला मारणार व तू मला पुरणार होय? मी तुम्हा सर्वांस पुरून उरणार आहे. कशात मला पुरणार? मातीत की तपकिरीत? मला कोणी मारू शकत नाही. कोणी पुरु शकत नाही. "आत्मा, हा अमर आहे. त्याला कोण मारणार, कोण पुरणार?" 


    आणि खरोखरच आज दोन अडीच हजार वर्षे तो महान सॉक्रेटिस सर्वांना पुरून उरला आहे. आत्मा अमर आहे. जोपर्यंत देहाची आसक्ती आहे, भिती आहे, तोपर्यंत खरे शिक्षण मिळणार नाही; माणूस फक्त देहाचाच विचार करतो, आत्म्याचा नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract