पावभाजी
पावभाजी


सायलीची शाळा सुटली. सायलीने पटापट खडू,डस्टर ड्राॅवरमध्ये ठेवल आणि पर्स घेऊन घराचा रस्ता पायाखाली तुडवत झपाझप पावले ती टाकू लागली. तोंडाला चागंलीच कोरड पडली होती तिच्या. पोटातले कावळेही भलतेच कोकलत होते, असा भास तिला होत होता. सायलीला जाताजाता रस्त्यावर पावभाजीची गाडी दिसली आणि तिला प्रबळ इच्छा झाली की पावभाजी खाऊन घ्यावी का?
पण कसलं काय झटकन आईचा चेेहरा समोर आला आणि तिच्या लक्षात आले की आपण घरी गेेेेल्या शिवाय आई काही जेवायला घेेणार नाही. मग काय मन मारून तशीच ती घरात पोहचली. भूक तर खूप लागली होती. हात पाय धूूवून ती स्वयंपाक घरात आली आणि गॅॅसवरच्या कढईत डोकावता डोकावता घरात सुटलेला वास घेेऊनच ती खूप खूूश झाली.
तिला कळेचना की मला पावभाजी खायची आहे हे आईला कसे कळले. मनात तर प्रचंड उकळ्या फुटू लागल्या होत्या. इच्छा पूर्ण झाली म्हणून आनंद झाला होता सायलीला.