Supriya Devkar

Romance Thriller

3  

Supriya Devkar

Romance Thriller

पाऊस प्रीत

पाऊस प्रीत

7 mins
140


गणेश मराठी शाळेत शिक्षकाची नोकरी करत होता.गणेश कवी मनाचा असल्यामुळे कवितांमध्ये रमायचा.कविता लिहायला त्यांनी एक छानशी जागा शोधून काढली होती ही जागा गावाबाहेरच्या टेकडीवर होती. रोज शाळा सुटल्यानंतर टेकडीवरती जायचं आणि वेगवेगळ्या विषयांवर कविता लिहायचा गणेश. कविता मोठ मोठ्याने त्या टेकडीवरल्या पक्षांना, झाडांना ऐकवायचा कारण त्या टेकडीवर सहसा कोणी जायचं नाही.

एक दिवस असाच शाळा सुटल्यानंतर गणेश नेहमीप्रमाणे टेकडीवर जाऊन बसला होता .आज कोणत्या विषयावर कविता लिहायची याचा विचार करत असताना त्याला काही अंतरावर टेेकडी असणाऱ्या थोड्याशा उंच भागावर एक मुलगी चढताना दिसली या मुलीला त्यानी कधीही पाहिल नव्हतं आणि आजच कशी काय ही या ठिकाणी यावी? याबद्दल गणेशच कुतूहल वाढलं आणि तो भरभर त्या मुलीच्या पाठीमागे गेला काही क्षणांचा अवधी ती मुलगी त्या उंच टेकडीवरून खाली उडी मारणार तोच गणेश ने तिला दोन्ही हाताने मागून घट्ट पकडल आणि मागे खेचले.काही क्षण काय घडतय हे दोघांनाही कळल नाही.

     त्याने तिला खाली बसवलं आणि तो जोरात ओरडला "हे काय करत होतीस आणि कशासाठी करत होतीस एवढा तुझा जीव उदार झालाय का"?

 अग तुझ्यासारख्या तरुण मुलींना असा जीव द्यायचा विचार करावा एवढं काय मोठं घडलंय .

त्यावर ती मुलगी रडू लागली. आज आभाळ दाटून आल होत काही क्षणांनी पाऊस पडेल असं वातावरण झालं होतं आणि अशात ही मुलगी जीव द्यायला आली. त्याने तिला परत परत विचारायला सुरुवात केली तुझं नाव काय? कुठून आलीस?

त्यावर ती म्हणाली माझं नाव कविता मी इथे जवळच्या गावात राहते माझ्या वडिलांनी दुसरे लग्न केले .लग्न केल्यानंतर माझी नवीन आई माझी सावत्र आई सुरुवातीला खूप सर्वांची छान छान वागत होती .पण आता तिने आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे .मला दुसऱ्या घरात विकायचं असं ठरवलं होतं तीने हे मला ती कोणाशी तरी फोन वर बोलताना कळल्यानंतर मला खूप वाईट वाटलं आणि मी घरातून ताडकन निघून आले.

 इतकी वर्ष माझ्या वडिलांनी मला फुलाप्रमाणे जपलं होतं . माझ्याच घरातल्या माझ्या काकांनी माझ्या वडिलांचे हे दुसरे लग्न लावून दिलं.

मला ही बाई दुसरीकडे विकणार त्यापेक्षा मी या जगातच नसलेलं बरं नाही का. हे ऐकल्यानंतर गणेश अगदी सुन्न झाला. कविताने गणेशला विचारलं मी आणखी काय करायला हवं होतं या बाईने जर मला विकून टाकला असता तर मी काय करणार होते.

हे ऐकल्यानंतर गणेश स्वतः जवळची पाण्याची बाटली कविता च्या हातात दिली आणि तिला पाणी पिण्यास खुण केली.तसे कवितानी पाणी पिले. त्यावर पाणी पिल्यानंतर कविता गणेश ला म्हणाली तुम्ही इकडे कसे.? का या डोंगरावर आलात येथे तर कोणी सुद्धा येत नाही आणि तुम्ही माझे आज प्राण पण वाचवले पण का प्राण वाचवले. 

तुम्हाला माहिती नाही मी आजवर खूप वेगवेगळ्या तऱ्हेचे कष्ट, काम केलेलं आहे

पण काम केल्यानंतर त्याचा सगळा मोबदला मला माझ्या आईच्या हातात द्यावा लागत होता आणि त्यातला मला एकही रुपया मिळत नसे. अशावेळी मी काय केलं पाहिजे आणि जगून तरी काय करू कोणासाठी मी जगू. माझ्याच घरातले लोक माझ्या जीवावर उठलेली असताना.

      गणेश तिला म्हणाला असा आतेताईपणा करू नकोस तुझ्या सारख्या अनेक मुली आहेत ज्या रोज अशा दबावांखाली येतात. तू अशा प्रश्नांना तोंड द्यायला शिकलं पाहिजे जीव देणार हा काही पर्याय असु शकत नाही.चल आपण आता इथून निघाल पाहीजे. पाऊस केव्हा पडेल नेम नाही. 

      आता चांगलाच पाऊस उतरला होता. कविता मात्र परत जाण्याच्या मनस्थितीत नव्हते तिला कळत नव्हतं आपण काय केलं पाहिजे पण गणेश हे तिला एकट सोडून जाणार नव्हता त्यांनी तिचा हात घट्ट पकडला आणि तिला आपल्या सोबत घेऊन यायला निघाला टेकडी उतरताच पावसाने सुरुवात केली जवळच असलेल्या झोपडी जवळ ते दोघे थांबले. पाऊस खूपच जोरात यायला सुरुवात झाली होती जणू काय आज पावसाने रौद्ररूपच धारण केले होते आभाळ काळवंडून आलो होतो सगळीकडे अंधार पसरला होता आणि अशातच गणेश आणि कविता त्या झोपडी मध्ये अडकले होते तिथे ना उजेड होता ना कोणी लोक. विजांचा कडकडाट ढगांची गर्जना चालूच होती आणि इतक्यातच झोपडीसमोर काही अंतरावर असलेल्या नारळाच्या झाडावर वीज पडली वीज पडल्याचा आवाज इतका प्रचंड होता तिथे दोघेही प्रचंड तणावाखाली आणि घाबरलेले होते त्यांच्या डोळ्यादेखत ते नारळाचे झाड जळून खाक होताना त्यांनी पाहिल.

  विजेचा आवाज इतका प्रचंड होता की कविताने घाबरून गणेशला मिठीत मारली गणेशही तितकाच घाबरला होता त्यालाही काय करावे हे कळत नव्हते पण कविताने मारलेल्या मिठीमुळे त्याला जवळ कोणीतरी आहे यामुळे तो आश्वस्थ झाला होता. झोपडीचा काही भागही विज पडल्यामुळे मोडला गेला होता त्यामुळे आता अगदी थोड्या भागातच त्या दोघांना निवारा मिळाला होता. कविता आता थोडीशी सावरली होती आणि तिने गणेशला मारलेली मिठी सैल केली आणि ते दोघे एकमेकांपासून दूर झाले.

बराच वेळ पाऊस पडल्यानंतर आता पावसाचा वेग मंदावला होता गणेश ने कविताला सोबत चालण्यासाठी खून केले तशी कविताही गणेश सोबत चालू लागली. गणेश ने दिला घराचा पत्ता विचारला आणि त्याप्रमाणे ते दोघेही कविता च्या घराकडे निघाले जाता जाता गणेशने कविताला पुन्हा असे न करण्यासाठी विनवले कविताने हे मग मानेने होकार दिला घर जवळ आल्याबरोबर ती एकटीच घराकडे निघाली मग गणेशही तेथून आपल्या घराकडे निघाला.

त्या रात्री गणेशच्या समोर फक्त आणि फक्त कविताचा चेहराच होता तो फक्त आणि फक्त तिचाच विचार करत होता तिच्यावर उडवलेली परिस्थिती आणि यात आपल्याला काय करता येईल हाच विचार त्याच्या मनात सतत घोळत होता तर कविताची अवस्था काही वेगळी नव्हती तिच्याही डोक्यात गणेश बद्दल तितकाच आदर होता कारण त्याच्यामुळे आज तिचा जीव वाचला होता आणि तिला जगण्याबद्दल पुन्हा एकदा ओढ निर्माण झाली होती विज पडल्यावर मारलेले गणेशला मिठी तिच्या सतत डोळ्यासमोर येत होती आपल्याला असं काय होतंय हे तिला कळतच नव्हतं तिला हे सारं आठवलं की आपसूकच हसू येत होतं कविताने ठरवलं की आपण याबद्दल गणेशला विचारायचं .पण कसं विचारणार त्याचा बद्दल आपल्याला काहीच माहिती नाही किंवा तो कुठे राहतो हे सुद्धा ठाऊक नाही. मग कसं काय आपली परत भेट होणार या विचाराने ती थोडीशी अस्वस्थ झाली होती.

अशातच तिला आठवलं की गणेश कविता लिहायला त्या टेकडीवरती आला होता म्हणजे तो कविता करण्यासाठी नेहमी तिथे येत असेल असा अंदाज तिने मनाशी बांधला. आणि पुन्हा गणेशला भेटायचं निर्णय घेतला.

पुढच्याच दिवशी गणेश नेहमीप्रमाणे टेकडीवरती कविता लिहायला आणि आपल्या जागेवरती बसून त्याचे लिखाण काम चालू होतं आज चक्क त्याच्या डोळ्यासमोर कविता असल्याचा भास त्याला होत होता आणि तो तिच्यावरती कविता लिहीत होता. आपल्याला हे असं काय होते हे गणेशलाही कळत नव्हतं. गणेश ची कविता जवळपास पूर्ण होत आलीच होती की तिथे कविता आली कविताला पाहताच गणेशला सुरुवातीला वाटले की आपल्याला भास होत आहे. कविता मात्र खरोखरच तिथे आली होती आणि त्याच्या समोरच्या एका मोठ्या दगडावरती ती बसली होती तिने सहजच विचारले "झाली का कविता लिहून","ऐकवा बरं कशी झाली आहे ते ".

गणेशला आता खरोखरच कळत नव्हते की हा भास आहे की सत्य परिस्थिती. कविताने पुन्हा विचारले "काय झालं तुम्ही असे का पाहताय तुमचा विश्वास नाही का मी कविताच आहे".

आता गणेश भानावर आला होता आणि तो म्हणाला" तुम्ही इकडे काय करताय आज पण पुन्हा जीव द्यायचा विचार आहे की काय" त्यावर दोघेही हसले.

कविता तशी स्पष्ट होती तिने चटकन गणेशला सांगितले काल मी घरी गेल्यापासून मला फक्त तुमचं बोलणंच आठवत होते. पण मी जिवंत आहे पण मला कळत नाहीये की घरच्यांशी कसं वागावं. आज ना उद्या माझी सावत्र आई मला नक्कीच कोणाच्यातरी हातात सोपं होणार हे मला चांगलं ठाऊक आहे आणि हे मला होऊ द्यायचं नाही.

गणेशा म्हणाला खरं आहे तुमची आई काय शांत बसणार नाही यावर उपाय काढला तर पाहिजे तुम्ही या गोष्टीला विरोध का करत नाही.

या प्रश्नावर कविता म्हणाली मी यापूर्वीही खूप विरोध करून पाहिला आहे पण माझी सावत्र आई माझ्या वडिलांना माझ्याबद्दल काहीही सांगते त्याच्यावर त्यांना विश्वास ठेवावा लागतो अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा मला खरंच कळत नाही की काय करावं.

गणेश म्हणाला तुम्ही स्वतः खंबीर राहा म्हणजे तुम्हाला कोणी त्रास देणार नाही त्रास सहन करणारा तितकाच गुन्हेगार असतो जितका त्रास देणारा. तेव्हा तुम्ही विरोध करायला शिका आणि आपलं मत ठामपणे मांडायला शिका. गणेश च ते बोलन कविताला खूप आवडत होतं आजवर तिला असं कोणीही सांगणार नव्हतं.

जणू काही ती आता गणेशच्या प्रेमात पडली होती.

गणेशला ही कवितेचा सहवास आवडू लागला होता त्या दोघांच्या गाठीभेटी अलीकडे खूप वाढू लागल्या होत्या.

            आजही गणेश शाळा सुटल्यानंतर पुन्हा एकदा त्या टेकडीवर कविता लिहीत बसला होता पुन्हा एकदा पावसाळी वातावरण आणि मंद वारा सुटलेला होता अशातच गणेशच्या मनात एक गोष्ट आली ती म्हणजे कविता जर आज आपल्या सोबत इथे असती तर आणि जादूची कांडी फिरवावी तशी कविता समोर येताना त्याला दिसली. गणेश चा आनंद गगनात मावेना कारण त्याला पाऊस खूप आवडत होता आणि आता कविताही त्याला आवडायला लागली होती आणि म्हणून कोणत्याही चांगलं क्षणी त्याला ती आपल्या सोबत असावी असं वाटायचं.

कविता येताच त्याने तिला एक छानशी कविता ऐकवली आणि कविता ऐकवत असताना पावसाचे थेंब त्यांच्यावर बरसू लागले.

पुन्हा एकदा पावसाने गणेशची साथ दिली होती त्यानं मागितलेली इच्छा आज पुरी होत होती .पावसात चिंब भिजलेली कविता त्याच्या समोर उभी होती तेही त्याला बाहुपाशात घेण्यासाठी. आज दोघेही एकमेकांना भिजताना पाहण्यात दंग झाले होते पाहता पाहता ती कधी एकमेकांच्या मिठीत आले हे त्यांनाच कळलं नाही धडधडणार काळीज आणि घट्ट मिठी सार काही बोलून गेली होती. ओठांना होणारा ओठांचा स्पर्श त्या दोघांनाही हवाहवासा वाटत होता. दोघेही जणू त्या मिलनाची वाटच पाहत होते निसर्गाने सुद्धा जणू काही त्यांच्या प्रेमाचं स्वागतच केलं होतं.

गणेश एकटाच असल्यामुळे त्याला कोणाची परवानगी घ्यायची गरज वाटत नव्हती त्याने कविताला लग्नाबद्दल विचारले आणि तिने सुद्धा लग्नाला लगेचच होकार दिला कारण तिला ही तिच्या घरातून बाहेर पडायचे होते गणेशने लगेच कविताच्या वडिलांना भेटून प्रेम बद्दल सांगितले आणि लग्न करण्याची इच्छा आहे त्याने व्यक्त केली गणेश नोकरीला असल्यामुळे वडिलांनीही लगेच होकार दिला.

          पुढे जाऊन दोघांचाही अगदी साध्या पद्धतीने विवाह झाला आता मात्र गणेशला कविता लिहिण्यासाठी टेकडीवर जाण्याची गरज वाटत नसे. शाळा सुटली की तो कविताला भेटण्याच्या ओढीने घरी येत असे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance