Supriya Devkar

Drama Romance

3  

Supriya Devkar

Drama Romance

सरप्राईज

सरप्राईज

3 mins
133


आज माई आणि दादा बागेतल्या ट्रॅकवरून चालता चालता एका गहन विषयावर चर्चा करू लागले होते ,विषय तसा गंभीर होता. दोघांचं त्या विषयावरून जवळपास भांडण न चालू होतं ."उद्या 14 फेब्रुवारी आणि तुम्ही मला काहीच सरप्राईज दिलं नाही आज पर्यंत" असंच म्हणणं होतं माईच. 

हे म्हणणं तोडत दादा म्हणाले,"अगं आपली केस पिकली आता ,चालताना गुडघे दुखतात आणि अशा अवस्थेत काय ग तुला व्हॅलेंटाईन डेे साजरा करायचा आहे".

माई आपलं नाक उडवत म्हणाली ,"गुडघे बिडघेेेे दुखत असतील तुमचेच मी काही साठी उलटलेली नाही आणि आपण म्हातारे झालो असंं का वाटते तुम्हाला".

माई चा सुर आज भलताच वाढला होता पण दादा आपल्या मनातल्या मनात माईच्या बोलण्यावर खुदुखुदू हसत होते.

खरंं तर हे जोडपं अतिशय प्रेमळ आणि मवाळ बोलणार होत. यांची दोन्ही मुलं शिक्षणासाठी घरापासून बाहेर होती त्यामुळे या दोघांना एकमेकांची सोबत होती.

मोबाईलच्या जमान्यात फोन वरती अनेक प्रेमाचे संदेश पाहायला मिळत होते आणि पेपरात ही या दिवसांचे मोठ्या प्रमाणावरती लेेख बातम्या येत असत यामुळे माईंच्या मनात आपण न केलेल्या गोष्टी करण्याची,

जगण्याची, इच्छा निर्माण झाली होती आणि त्यामुळेच त्यांना असंं वाटत होत की का नाही आपण या गोष्टी 

करायच्या?लग्न जरी घरच्या लोकांच्या परवानगीने झाले असले तरीही इतक्या वर्षांच्या सहवासात नक्कीच प्रेम ,जिव्हाळा ,मैत्री आपल्या दोघात निर्माण झालीच आलीच की आणि म्हणूनच आपणही हे दिवस आपल्या पद्धतीने साजरे करू शकतो . 

दादा नही माईच मत पटलं होतं दोघांना एकमेकांशिवाय होतं तरी कोण मग दादा ही म्हणाले ठीक आहेे म आज माईला आपण सरप्राईज द्यायचंच.

माईला कळू न देता दादा शेजारच्या गिफ्ट शॉप मध्ये गेले आणि माईला काय आवडेल यावर विचार करू लागले आजवर तिला न दिलेली वस्तू पण तिला तिच्या लक्षात राहणारी अशी वस्तू तिलाा द्यावी असं दादांच्या मनात होतं पण गिफ्ट शॉप मध्ये काय घ्यावं हेच त्यांना सुचेना शेवटी न राहवून त्यांनी तिथे असलेल्या एका मुलीला विचारलं त्यावर ती गोड हसली आणि तिने तिथं असलेल्या ग्रीटिंग मधून एक छान ग्रीटिंग शोधून दादांच्या हाती दिलं दादांनी त्यावर ला मजकूर वाचला आणि त्यांना आनंद झाला. कारण इतक्या दिवसात दादा कधीच माईला आय लव यूू म्हटले नव्हते .मात्र आज आज तो योग जुळून आला होता तेही त्या एका रंगीत कागदामुळे. दुकानातून बाहेर पडताच फुलांचे दुकान दादांच्या डोळ्यासमोर आलं आणि त्यांना आठवलं कित्येक दिवसात माईने गजरा घातलाच नव्हता .चटकन त्या दुकानाकडे वळत त्यांनी एक सुंदर गजरा खरेदी केला.

तिकडे माईने सुद्धा ठरवलं होतं काही का होईना पण आज आपण दादांना सरप्राइज द्यायचं म्हणून त्यांनी घरात जेवणाचा जंगी बेत ठरवला होता दादांनाा आवडणाऱ्य सर्व पदार्थ त्यांनी बनवून ठेवले होते मात्र हे सरप्राईज असल्यामुळे त्यांनी चेहऱ्यावरती अजिबात येऊ दिलं नाही.

दादांनी पिशवी मध्ये लपवलेले ग्रीटिंग कार्ड आणि खिशातला गजरा घरी जाऊन घरी जाऊन माईला सापडेल अशा ठिकाणी ठेवला मात्र स्वयंपाक घरात असल्यामुळे माईच्या हाती या वस्तू थोड्या उशिराच मिळाल्या.

आज कित्येक दिवसांनी दोघांच्या मनात एकमेकांविषयीच प्रेम वस्तू रुपी बाहेर आल होत .

जेवायला बसण्यापूर्वी दादांनी माईला हाक मारली आणि माईच्या हातात ते कार्ड देत हॅप्पी व्हॅलेंटााइन डे म्हणणाऱ्या दादांचा खुललेला चेहरा पहात माई खूपच खूष झाल्या होत्या पण खरं सरप्राईज तर पुढे होतं माईला आवडणारा गजरा तिच्या केसात माळतांना माईला खूपच आनंद झाला हेच का ते व्हॅलेंटाईन डे खरंच असं व्हॅलेंटाईन डे असेल तर मला खूप आवडेल असं ती मनातल्या मनातच म्हणाली खरेतर ती आज खूपच सुखावली होती पुढे होऊन तिने ताटे वाढायला घेतली आणि ताटामध्ये सर्व आवडीचे पदार्थ पाहून दादांना तर आश्चर्याचा मोठा धक्काच बसला इतके सारे पदार्थ आणि तेही एकाच वेळी आज खऱ्या अर्थाने गोड दिवस आहे दादांना आज खूप वर्षांनी असंं वाटल की का नाही आपण आपल्यासाठी जगत का आपण इतरांचा विचार करतो का आपण आपल्या सोबतच्या व्यक्तींना प्रेमानं एखादी गोष्ट आणून देऊ शकत नाही.हा छोटासा आनंद जगण्याची नवी उमेद देऊन जातो हे आज दोघांनाही समजलं होतं.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama