Supriya Devkar

Romance

3  

Supriya Devkar

Romance

गुलाबी पत्र

गुलाबी पत्र

7 mins
163


शाळा जीवन म्हणजे लहानपणापासून ते अगदी तरुणपणापर्यंतचा काळ यामध्ये अ ब क ड पासून ते प्रेमाच्या अबकडपर्यंत अनेक गोष्टी घडत असतात ज्या शिकल्या जातात आपल्या मित्रांसोबत अजाणतेपणे घडणाऱ्या अनेक गोष्टी या शाळेमध्ये घडत असतात आणि त्यावर अंकुश ठेवण्याचं काम शाळेमधले शिक्षक करत असतात आपली मुलं शाळेतली वाया जाऊ नये किंवा त्यांना कोणत्याही वाईट सवयी लागू नयेत यासाठी शिक्षकांची धडपड होत चालूच असते ही अशी कथा आहे ज्यामध्ये शिक्षकांनी कसा वचक बसवला आहे याचं दर्शन घडतं.

नववी अ चा वर्ग आणि या वर्गात एकाच नावाच्या तीन मुली नाव जरी एक असलं तरी आडनाव मात्र वेगळं वेगळं बर का एकीचं नाव

 माया शिंदे

माया गुरव

माया पाटील

हा निव्वळ योगायोगच म्हणायचा की या तिघी मुली सुद्धा तशा हुशार होत्या हुशार म्हणजे प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळे त्यांचा अस्तित्व होतं माया पाटील ही खेळात उत्तम होती तशीच ती शाळेतल्या सर्व शिक्षकांची लाडकी विद्यार्थिनी होती कारण ती सर्वात अगदी उत्साहाने भाग घ्यायची अभ्यासात ती मध्यमच होती पण अभ्यासाव्यतिरिक्त ती गाण्यात खेळात खूप प्राविण्य मिळवायची सगळीकडे पुढे पुढे असायची आणि त्यामुळेच ती लाडकी विद्यार्थिनी म्हणून सर्व परिचित होती ती जशी लाडकी होती तशीच ती थोडी स्वभावाने तापट होती तिला कोणत्याही वाईट घटना घडत असेल किंवा कोणी चांगली वागणूक देत नसेल तर तिला ते आवडायचं नाही ती लगेचच त्याला विरोध करायची अशी होती माया पाटील.

माया गुरव ही शिक्षकांची मुलगी होती तिचे वडील दुसऱ्या शाळेमध्ये शिक्षक होते मात्र ती सुद्धा सर्वांना माहिती होती ते तिच्या वडिलांमुळे स्वभावाने अतिशय शांत कोणाच्याही अध्यात मध्यात नसणारी माया गुरव ही रहायला शाळेपासून अडीच तीन किलोमीटर वर असणाऱ्या भागात होती त्यामुळे ती रोज सिटी बस ने प्रवास करत असे.

माया शिंदे ही देखील अतिशय शांत कामापुरताच बोलणारी आणि नेहमी आपल्याच विश्वात गुंग असणारी मुलगी होती दिसायला तशी सावळ्या रंगाची माया खूपच अभ्यासू वृत्तीची मुलगी होती. तिचे वडीलही जवळच्याच कॉलेज वरती प्राध्यापक होते त्यामुळे त्यांचे सदैव लक्ष आपल्या मुलांकडे असे तिचा भाऊ देखील आमच्या शाळेत होता.

तर अशा ह्या तिघी एकाच वर्गात पाचवीपासून एकत्र शिकत होत्या त्यामुळे प्रत्येकीचा स्वभाव प्रत्येकालाच माहिती होता. आता त्यात तिघी सुद्धा एकाच वर्गात म्हणजे नववी अ च्या वर्गात शिकत होत्या या तिघींमधले पाटील आणि गुरव या दोघींचे हिंदी होते तर शिंदे बाईंचा संस्कृत होते त्यामुळे हिंदी आणि संस्कृतचा तास जेव्हा असायचा तेव्हा हिंदीची मुलं दुसऱ्या वर्गात तो तास करायला जायचे आता हा तास दुसऱ्या वर्गातल्या मुलांसोबत असायचा त्यामुळे हिंदीचा तासाला माया पाटील आणि माया गुरव सोबत जायच्या त्यांच्या सोबतच्या मैत्रिणी ही वेगळ्या असायच्या पण त्या सगळ्या एकत्रच जायच्या.

याच हिंदीच्या वर्गात एक चंदन साळुंखे नावाचा विद्यार्थी होता ज्याला माया पाटील आवडू लागली होती मात्र तिच्याशी कसं बोलावं तिला आपल्या मनातलं कसं सांगावं हेच त्याला कळत नव्हतं त्यात त्याचे मित्र हे कधीही अभ्यासात रस नसणारे असे होते त्यामुळे उनाड पोरांमध्ये त्यांची नावे सगळ्यात शिक्षकांच्या तोंडात होती.

चंदन हा नेहमी माया पाटील वर्गात आली की ती ज्या

बेंचवर ती बसली आहे त्याच्या समोरच्याच बेंचवर बसून तो तिला चोरून पाहात राहायचा.

आता त्याला राहवतच नव्हतं त्याला वाटत होतं की आपण आपल्या प्रेमाबद्दलची कबुली मायाजवळ द्यावी आणि त्याकरता तो वाट पाहत होता एका क्षणाची जेव्हा तो हे तिला सगळं सांगणार होता. पण मायाला यातलं काहीच माहिती नव्हतं चंदन हा तिला तिच्या घरापासून तिचा पाठलाग करायचा तेही तिला पाहण्यासाठी पण हे तिला बिलकुलच माहिती नव्हतं कारण तो नेहमी मुलांच्या घोळक्यात असायचा.

बरेच दिवस गेल्यानंतर एक दिवस चंदनच्या मित्रांना त्याला चिठ्ठी लिहिण्याबद्दल सुचवलं हा पर्याय चंदनला आवडला आणि त्याने चिट्टी लिहिण्याची तयारी सुरू केली आता चिठ्ठी लिहायची म्हटलं तर अक्षर चांगलं हवं आणि वहीच्या पानावर चिठ्ठी कशी लिहायची यावर त्याच्या मित्रांनी त्याला गुलाबी कागदावर लिहून पाठवावं असं सुचवलं त्याच पद्धतीने चंदन ने त्याच्या मित्राकडून चिठ्ठी लिहून घेतली आणि त्याच पेपरवर अत्तर लावले आता हा गुलाबी सुगंधी पेपर म्हणजे चिट्ठी माया पर्यंत पोचवायची जबाबदारी त्याने एका मित्राकडे सोपवली.

वर्गामध्ये माया पाटील आणि माया गुरव या दोघी हिंदीच्या लेक्चर साठी आल्या . आजचा दिवस असा होता की आज दोन्हीही माया एकाच बेंचवर शेजारी शेजारी बसल्या होत्या आणि सर येईपर्यंत आपली पुस्तक ठेवून त्या वरंड्यात थांबल्या होत्या.

याच संधीचा फायदा घ्यायचा चंदन ने ठरवला आणि त्याने मित्रा करवी ती चिठ्ठी मायाच्या पुस्तकात ठेवायला सांगितली मित्राने पण घाईगडबडीत ती चिठ्ठी मायाच्या म्हणजे माया गुरव च्या पुस्तकात ठेवून दिली आणि इथेच सुरवात झाली गैरसमजाला.

हिंदीचा तास संपला मुली आपल्या वर्गात परत निघाल्या बेंचवर जाऊन बसल्यानंतर माया गुरवला तिच्या पुस्तकातील तिची मिळाली तास संपल्यानंतर जेवणाची सुट्टी असल्याने तिने तिची सुट्टीत वाचली आणि वाचल्यानंतर ती रडू लागली तिच्या मैत्रिणीने तिला खूप विचारलं" काय झालं का रडतेस". तेव्हा तिने तिची तिच्या मैत्रिणीला दाखवली यावर काय करावं हे तिला सुचतच नव्हतं आणि रडायचं तर ती काय थांबत नाही माया पाटील ने सुद्धा मागून पाहिलं की ही का रडते तिनेही तिच्या बेंचवर जाऊन विचारलं. आता हळूहळू सगळ्याच जणी तिच्याजवळ जमू लागल्या होत्या तोवर माया पाटीलने ती चिठ्ठी वाचली होती आणि तिला बरोबर त्या मुलावर शंका आली जाने ती चिट्ठी मायाच्या पुस्तकात ठेवली होती पण आता काय करायचं हा विचार करत असतानाच तिने तिला शांत केले आणि ती माया गुरवला म्हणाली "अशी रडली तर कोणीही तुला येऊन रोजच्या देत बसेल मग काय रोज चिठ्ठ्या घेणार आहेस का"

त्यापेक्षा तोंड धुवून ये आणि वर्हांड्यातून चिठ्ठी फाडून फेकून दे म्हणजे ज्याने ती चिठ्ठी लिहिली आहे त्याला तुझे उत्तर नाही हे कळेल.

ही गोष्ट मायाला पटली तिने जेवण केल्यानंतर लगेचच वर्हांड्यातून त्या चिट्ठी चे तुकडे करून फेकून दिले बर हे चिठ्ठी चे तुकडे फेकून देताना माया गुरव सोबत माया पाटील तिथेच उभी होती तिला यातलं काहीच डोक्यात नव्हतं की ही चिठ्ठी तिच्यासाठी असेल. आणि यानंतर त्यांनी याबद्दल आपल्या सरांकडे माहिती द्यावी असं ठरवलं आणि त्या दोघी सरांकडे निघाल्या माया पाटील सरांची लाडकी विद्यार्थिनी असल्याकारणाने सरांनी लगेचच त्यांचं बोलणं ऐकून घेतलं आणि त्यांचा जावा मुलावर संशय होता त्याला खाली स्टेजवर बोलवून घेतलं.

   ज्याने चिठ्ठी ठेवली होती त्याच्यासोबत चंदनही तिथे आला होता कारण त्याला बहुतेक कोण कोण लागली होती की हे काहीतरी आपल्याबद्दलच असावं आणि म्हणूनच तो सुद्धा त्याच्यासोबत आला होता आता

मात्र सरांनी सगळी माहिती विचारपूस करून घेतली थोडं दम देऊन पाहिल्यानंतर चंदन आणि त्याचा मित्र कबूल झाले की त्यांनीच ती चिठ्ठी लिहिली होती. मग मात्र सरांनी माया गुरवला आणि माया पाटील दोघींनाही त्या मुलांसमोर उभा केलं आणि एक एक कानाखाली लावून द्या अशी शिक्षा त्यांना दिली. चिठ्ठी देणाऱ्या मुलाला माया गुरवणे कानाखाली दिली तर चंदन ला माया पाटील ने कानाखाली दिली.

त्यानंतर सगळे आपापल्या वर्गात निघून गेले पण सरांनी चंदन साळुंखेला थांबून घेतले कारण तो सरांच्या घरा जवळच राहिला होता आणि त्यांनी अगदी खोदून खोदून त्याला विचारले की तू चिठ्ठी कोणाला लिहिली होतीस तेव्हा त्याने कबूल केले की ती चिठ्ठी त्याने माया पाटील

साठी लिहिली होती आणि चुकून ती माया गुरवच्या पुस्तकात ठेवली गेली.

सरांनी त्याला मायाला त्रास न देण्यासाठी सांगितले आणि ते तिथून निघून गेले. चंदन मायावर खूपच प्रेम करत होता त्यामुळे तिने मारले तरी त्याला त्याचे काही दुःख नव्हते.

नेहमीप्रमाणे तो तिचा घरापासून पाठलाग करतच असेल फक्त आता मात्र तो एकटा येत असे. आता मात्र मायाला भीती वाटू लागली होती की मी याला कानाखाली मारल्यामुळे हा माझा पाठलाग तर करत नसेल ना.

पण तिने एक दिवस धाडस करून त्याला विचारले "काय रे तू माझ्या मागे मागे का येतोस मी तुला मारले म्हणून का"

पण माझी काही चुकी यात मला सरांनी सांगितले म्हणून मी तुला मारले मग तू माझा पाठलाग का करतोस यावर चंदन एका शब्दानेही काहीही बोलला नाही त्याचं धाडसच होत नव्हतं की हिला आपल्या प्रेमाबद्दल सांगावं काय माहिती सांगितल्यावर हिने पुन्हा एखादी कानाखाली दिली तर.

पण तो एवढेच बोलला की तुम्ही मला आवडता आणि तो निघून गेला तेव्हा मायाला त्या चिठ्ठीतला अर्थ उमगला आणि त्याच्या मनातल कळलं. माया खेळाडू असल्यामुळे ती विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यायची आणि ती जिथे जिथे जायची तिथे चंदन तिच्या पाठीमागे तिला पाहायला जायचं आणि ही गोष्ट तिला या चिठ्ठी प्रकरणानंतर प्रकर्षानं जाणवू लागली होती. चंदन दिसायला अतिशय देखणा होता त्यामुळे त्याच्या प्रेमात सहज कोणीही पडेल असा तो होता ती मायाच्या नकळत तो तिच्या अवतीभवती सतत फिरत राहायचा तिला पाहण्यासाठी तिच्या घराच्या जवळपास सदैव घिरट्या घालत राहायचा

         अभ्यास करण्याच्या वयामध्ये हे असले चाळे नकोत या करता मायाने त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं ठरवलं होतं पण चंदन सतत तिच्या आसपास तिला दिसायचा त्यामुळे तिचंही मन विचलित होत होतं कारण ते वयच असं होतं की कोणाचाही तोल ढासळू शकणार असं होतं ते.

दिवाळीची सुट्टी आता जवळ आली होती आणि पंधरा दिवस माया समोर दिसणार नव्हती त्यामुळे चंदन थोडा बेचेन झाला होता त्याला काय करावं हे सुचतच नव्हतं त्याने मायाला काहीतरी गिफ्ट द्यावं असं त्याला वाटत होतं आणि म्हणूनच त्याने तिच्यासाठी एक छान राधा कृष्णाची मूर्ती गिफ्ट म्हणून आणली होती. शाळेला सुट्टी लागणार त्या दिवशी त्याने तिला एकटीला पाहून अडवलं आणि तिला दिवाळीचं गिफ्ट तिच्या हातात ठेवलं ठेवताना तिच्या हाताचा झालेला स्पर्श त्याच्यामुळे त्याच्या अंगात जणू बिजली संचारावी असा तो क्षण होता.

चंदन कावराबावरा झाला होता पण त्याला मायाला ते सुंदर गिफ्ट उघडायला लावायचं होतं आणि तिच्या चेहऱ्यावरचे भाव त्याला पाहायचे होते माया थोडी घाबरली होती पण सततच्या त्याला पाहण्यामुळे ती लगेचच सावरली तिने त्याला गिफ्ट देण्यास नकार दिला पण तो ऐकायला तयारच नव्हता .

त्याने तिला जबरदस्ती ते गिफ्ट उघडायला लावलं गिफ्ट उघडताच त्यातली ती सुंदर मूर्ती पाहताच माळ्याच्या मनात एक आपलेपणाची जाणीव चंदन बद्दल निर्माण झाली. नकार देणारी माया ती मूर्ती घेऊन घराकडे निघाली. तिच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य होतं जणू काय ती त्याच्या प्रेमाला स्वीकारल्याची कबुलीच देत होती.

           मात्र मायाने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं आणि तिने चंदन नाही समजावून सांगितलं की हे वय आपला अभ्यास करण्याचा आहे या वयात अशा गोष्टी करून आपलं नुकसान आपण करत आहोत तेव्हा तू सुद्धा अभ्यासाकडे लक्ष दे आणि तुला खरंच तुझं प्रेम सिद्ध करायचं असेल तर तू नक्कीच मी सांगितलं आहे त्या ऐकशील. आणि खरोखर मायाने सांगितलं प्रमाणे चंदनने अभ्यास करायला सुरुवात केली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance