Supriya Devkar

Abstract Tragedy

3  

Supriya Devkar

Abstract Tragedy

समाजाची स्वीकृती

समाजाची स्वीकृती

2 mins
218


रामोजी फिल्म सिटी मध्ये फिरण्यासाठी बसेसची सोय आहे आहे मी आणि माझी मुलं, नवरा, दीर आम्ही सर्वजण ही फिल्म सिटी पाहण्याकरता सकाळी सकाळी लवकर निघालो .साडेअकराची वेळ होती गेट जवळ पोहोचल्यावर तिकीट काढले आणि फ्रेश होऊन आम्ही बस मध्ये चढलो. आमच्या समोरच्या सिटवरती पाच-सहाजण दंगामस्ती करत बसले होते .हे सर्व शिखंडी होते. यातल्या एकाच नाव चंपा. चंपा सोबत दोघे तिघे चुडीदार मध्ये तर उरलेले साडी मध्ये होते. चंपा नीटनेटकी चापून साडी नेसलेली चेहऱ्यावरती अगदी व्यवस्थित रंगरंगोटी केलेली कोणत्याही पुरुषाला भुरळ पाडेल असा तिचा देखणा चेहरा आजही माझ्या नजरेसमोर चटकन उभा राहतो.

         चंपाला लहान मुलं फारच आवडत असावेत त्यामुळेच तिने गाडीत चढतात क्षणी माझ्या मुलाचे गाल ओढले. काही क्षण मला हसू आलं पण सिटवर बसता बसता मी अनेकांचे चेहरे न्याहळत न्याहाळत बसले.बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावर त्यांना पाहून अठ्या होत्या ,तर अनेक जणांनी आपलेे चेहरे दुसरीकडे वळवले होते.

        फिल्मसिटी खूप मोठी असल्याने आणि काही नियमांमुळे आम्हा सर्वांना बस मधूनच सर्व दाखवण्याात येत होते. ज्या ज्या ठिकाणी खाली उतरून पाहता येत होते त्या त्या ठिकाणी सर्व लोक उतरत त्याचप्रमाणे चम्पा आणि तिच्या सोबतचे सर्व लोक ही उतरत होते. सामान्य माणसाप्रमाणे तेही आयुष्याचा आनंद घेत होते .कोणी आईसक्रीम खात होतं कोणी सँडविच खात होतं .

खरेे तरी चंपा आणि तिचा परिवार अगदीी सामान्य वागत होता ना कुणाला त्यांचा त्रास होत होता ना काही पण तरीही एक विचित्र वातावरण आमच्या बसमध्ये होतं.

सगळेच लोक हे फिल्मसिटी पाहण्याकरता त्याचा आनंद घेण्याकरता आले होते मात्र चंपाच्या परिवारामुळे कदाचित त्यांना काहीसे विचित्र वाटत असावे.

पण चंपा आणि तिच्या परिवाराला कसलीच काळजी नव्हती .ते पूर्णता बेफिकीर राहून जगासमोर वावरत होते हाच विचार माझ्या मनी आला की हेेे सर्वजण इतके बिनधास्त वागतात तर आपण का नाही .पहा ना किती थोडस आयुष्य आपल्या हातात आहे आणि आपण इतक्या छोट्या छोट्या गोष्टी चा विचार करतो आणि आपला वेळ वाया घालवतो .

आयुष्य सुंदर आहे जगत रहा. आनंद मिळवत रहा. निसटून जातात क्षण हेेेेेेच क्षण जगायला शिका.



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract