Supriya Devkar

Children Stories Inspirational

3  

Supriya Devkar

Children Stories Inspirational

प्राण्यांची शाळा

प्राण्यांची शाळा

2 mins
19


एका जंगलात प्राण्यांची शाळा रोज भरत असे .या शाळेमध्ये जंगलातले विविध प्राणी आपली मुलं पाठवत असत .त्यामध्ये ससा, कासव ,हरीण ,गाढव ,हत्ती अशी अनेक मुलं येत होती. या शाळेच्या शिक्षिका होत्या बकरीताई त्या रोज मुलांकडून खूप सारे व्यायाम गाणी गोष्टी म्हणून घेत असत.

एके दिवशी लहानगा ससुल्या जोर जोराने त्याच्या आईला हाक मारू लागला. "आई ए आई, अगं लवकर ये किती वेळ झाला? माझी आंघोळ संपत आलीये लवकर ये बरं. असं म्हणत ससुल्या आंघोळ करून पटकन घरात शिरला आणि उडी मारत बेडवर उभा राहिला इतक्या हाका मारून सुद्धा त्याची आई आली नाही.

आज ससुल्या ला खूप उशीर झाला होता शाळेत जायचं होतं आणि आई काही घरात नव्हती आता आपल्याला कपडे कोण घालणार असं म्हणत त्याने पटकन गादीवरले कपडे उचलले आणि उड्या मारत मारत शाळेत पोहोचला.

चालत चालत वर्गात गेला आणि आपल्या जागेवर जाऊन बसला पाहतो तर काय सगळेजण त्याला हसायला लागली होती.

हातातले कपडे त्याने बराच वेळ घालायचा प्रयत्न केला पण त्याला काही ते जमतच नव्हते प्रयत्न करून करून तो चांगलाच थकला होता त्यामुळे त्याला चांगलाच घाम फुटला होता.

बकरी ताई वर्गामध्ये आल्या होत्या त्यांनी पाहिलं सगळी मुलं सशाकडे पाहून हसत होती. "हॅलो ससुल्या ",अशी गोड हाक बकरी ताईंनी सशाला दिली." काय रे आज कपडे घालून आला नाहीस का?"

ते ऐकून ससुल्या ओशाळला आणि हळूच म्हणाला "मला माझे कपडे घालता येत नाहीत ,घरात आईच माझे कपडे घालते".

त्यावर बकरी ताई त्याला म्हणाल्या ,"काय कारण आहे बरं तू स्वतः चे कपडे घालायला का नाही शिकलास"

त्यावर वाईट वाटून ससुल्या म्हणाला" मला कपडे घालताना चूक होईल याची भीती वाटते म्हणून मी नेहमी ऐकून कपडे घालून घेतो".

बकरी ताईंनी त्याला शर्टाचे एक बटन लावून दिले आणि खालील सर्व बटने त्याला लावण्यात सांगितले तसा सशाने पटापट सगळी बटणे लावली आणि पॅन्ट ही त्याने घातली तेव्हा बकरी ताई त्याला म्हणाल्या "तू रोज जर हे काम थोडं थोडं करून करायला लागलास तर तुला तुझ्या पालकांना कपडे घालायला सांगायची गरज पण पडणार नाही ,आता रोज तू तुझे तू कपडे घाल हं करशील ना ?"सशाने मान डोलवली.

त्या दिवसानंतर ससुल्या रोज आपले कपडे घालायचा प्रयत्न करू लागला आणि काही दिवसातच त्याला स्वतःचे कपडे स्वतः घालता येऊ लागले त्यामुळे ससा खूप खुश झाला कोणतेही काम करताना ते स्वतः केले तर त्याचा आनंद आपल्याला मिळतो.


Rate this content
Log in