Supriya Devkar

Inspirational

3  

Supriya Devkar

Inspirational

विश्व

विश्व

2 mins
16


सुजितच घर गावाच्या वरल्या आंगाला होतं.वड्याच्या पड्याल छोटीशी वस्ती होती तिथ चार पाच घरांचा मळा होता त्याच मळ्यात सुजितच घर होतं.आई ,वडील, आज्जा आणि रंगी असा परिवार रहात होता.सुजितचे वडील शेती करत.आज्जा आता थकला होता पण तरीही बा ला कामात मदत करत असायचा त्यामुळे त्यो चांगलाच काटक होता.

सुजित काॅलेजला दुसऱ्या वर्षाला होता.घरी आल्यावर तो सुद्धा बाला पडल ती मदत करायचा. काॅलेजला जायला लागल्यापासून त्याने काॅलेजच्या प्राध्यापकांकडून माहिती घेत घेत शेतीत प्रयोग करायला सुरुवात केली होती. त्याचा फायदा म्हणून का काय शेतीत प्रगती होत होती आणि चार पैसे सुद्धा सुटत होते.

एक दोन वर्षातच पिकं चांगले निघायला लागले होते पण हे काही शेजाराच्यांना बघवत नव्हते.काहीतरी कुरापती काढत नुकसान कसे होईल याकडे त्यांचे लक्ष असायचं. सुजित आणि त्याचे घरचे माञ दुर्लक्ष करत होते.

         सुजितने शेतीबरोबरच जोड व्यवसाय म्हणून आणखी दोन दुभत्या जनावरांना खरेदी केले.आता आणखी एक काम घरातल्यांना वाढले होते.सगळा वेळ शेतं आणि जनावर यातच निघून जात होता.कामाचा व्याप सांभाळून सुजित आपलं शिक्षण घेत होता. सुजितच्या शिक्षकांना त्याचे कौतुक वाटत असे.सुजित अभ्यासातही हुशार होता.

नवनवे प्रयोग तो करत रहायचा.घरातल्या अडगळीतल्या वस्तू घेऊन तो नवनवी अवजारे बनवत असे.

   एक दिवस त्याने घरातल्या वस्तू पासून शेंगा फोडायचे यंत्र तयार केले. पुढे जाऊन त्याने दोन तीन आणखी यंत्र तयार केली. काॅलेजने आयोजित केलेल्या प्रदर्शनात सहभाग घेऊन ती त्याने प्रदर्शित केली लोकांना ती फार आवडली.प्रदर्शनात सुजित ला त्याचे पारितोषिक मिळालं.

या प्रदर्शनाचा फायदा म्हणून त्याचे यंत्र एका मोठ्या कंपनीने बनवून विकण्याचा व्यवसाय त्याला सुरू करून दिला.

गेली आठ दहा वर्षे सुजित ही कंपनी मोठ्या उत्साहात चालवत होता.गावावरुन आलेला मुलगा आपल्या जवळच्या मेहनतीने, कर्तुत्वाने आणि जिद्दीने काय करू शकतो हे सुजित ने दाखवून दिले होते.त्याच्या आई, वडीलांना त्याचे कौतुक होते.सुजित मात्र अजूनही पुर्वीच्या सुजित सारखाच जमिनीवर होता.फरक एवढाच होता की तो आता आणखी कामात व्यस्त झाला होता.

गावावरुन येणाऱ्या प्रत्येकाला तो मदत करत असायचा.सुजितने स्वतः चे विश्व उभे केले होते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational