Supriya Devkar

Action Inspirational

4.2  

Supriya Devkar

Action Inspirational

ताडोबातील वाघीण

ताडोबातील वाघीण

2 mins
294


माधवी विदर्भातील आदिवासी भागात राहणारी मुलगी. तिच्या कुटुंबातील सर्वजण जंगलातील रानमेवा गोळा करून विकत आणि आपला रोजचा उदरनिर्वाह चालवत.माधवी सुद्धा घरच्यांचा कामात हातभार लावत असे .फाॅरेस्ट अधीकारी लोकांची घरे जंगलाजवळच असल्याने ती नेहमी त्यांच्या भागात जात असे.

    पडेल ते काम माधवी आनंदाने करत असे. चौथीपर्यंत शिक्षण झाल असल्यामुळेच तिला थोडफार वाचता येत होत. ति तशी धिप्पाड होती आणि तितकीच धाडसी ही होती.रात्री अपरात्री एकटीच जंगलातील रस्त्याने घराकडे ती जात असे. या रस्त्यावरून जाताना तिला नेहमी जंगलातलेे प्राणी दिसायचे पण ती त्यांना कधीच घाबरायची नाही.

जंगलातील प्राणी पहायला लोकं जिप्सीतून जात असत याच तिला अप्रूप वाटत असे.तिला वाटायचं की ही लोकं इतक्या दुरून जंगलातले प्राणी पाहायला येतात जे मी रोज पाहत असते. त्यांचे फोटो काढतात त्यांना इतके घाबरतात. मला मात्र यांची कधीच भीती वाटत नाही. अनेक वेळा जातायेता बरीच लोक तिला जंगलातील प्राण्यांबद्दल विचारायची.

अशातच तिला एका फाॅरेस्ट अधिकाऱ्याने शिकण्यास प्रवृत्त केले आणि त्यामुळे माधवी शिक्षणा सोबत कामही करू लागली. शिक्षणाची आवड असल्याकारणाने माधवी पटापट पुढचे वर्ग पास झाली. दहावी पास झाल्यानंतर तिथल्याच एका अधिकाऱ्यांनी तिला गाईड होण्याबद्दल माहिती दिली. माधवीला तर जंगल पूर्णच पाठ होते. अडचण फक्त होती ती घरच्यांची. घरचे लोक त्याला संमती देतील का याची शंकाच तिच्या मनात होती मात्र तिने आपल्या आई-वडिलांना परिस्थितीबद्दल सांगून मिळणाऱ्या पैशांबाबत आणि कामाबद्दल सांगितले आणि त्यांना तयार केले. 

पुढे तिने फॉरेस्ट अधिकाऱ्यांच्या मदतीने गाईडचे ट्रेनिंग घेतले. माधवी एक उत्तम गाईड बनून ताडोबाच्या जंगलात लोकांना प्राणी दाखवत असते .मार्गदर्शन करत असते . तिच्या या जिद्दीने तिला साक्षर बनवले तिच्या या जिद्दीमुळेच तिला आदिवासी असूनही इकडेतिकडे न भटकता एक चांगला व्यवसाय मिळवून दिला .आज ती अनेक स्त्रियांना मार्गदर्शन करून गाईड बनवण्याच्या प्रक्रियेत मदत करते आणि लोकांना प्राण्यांची माहिती परिसराची माहिती देत राहते खरे तर ती ताडोबातली वाघीणच आहे.



Rate this content
Log in

Similar marathi story from Action