Supriya Devkar

Children Stories

4.0  

Supriya Devkar

Children Stories

आळशी टोनी

आळशी टोनी

2 mins
24


टोनी एक आळशी पक्षी होता. त्याला खायला खेळायला फिरायला आणि निवांत झोपायला आवडे. टोनी चे मित्र अन्नपदार्थ कसे मिळवावे याचे शिक्षण घेत होते ते नेहमी टोनीला त्यांच्यासोबत येण्याचा आग्रह करत असत मात्र दोन्ही नेहमी त्यांना तोऱ्यात सांगत असे की "माझे आई-बाबा मला पुष्कळ खायला आणून देतात तेव्हा मला काही हे सगळं शिकायची गरज वाटत नाही".

"तुम्ही सगळे ही तुमचा वेळ का वाया घालवत आहात माझ्यासारखे खाऊन घेऊन आनंदी राहायचे ",टोनी त्यांना वेडावत म्हणायचा.

सर्वच्या सर्व मित्र मानाडूला व तिथून निघून जायचे आणि पुन्हा पुन्हा अन्नपदार्थ मिळवण्याचा सराव करत राहायचे. इकडे टोनी मात्र दिवसभर खात राहायचा खेळायचा आणि मस्त झोपून राहायचा.

काही दिवसांनी टोनी चे मित्र पुन्हा एकदा टोनी कडे जमले होते आजवर आपण काय काय शिकले ते सांगायला पण ते जेव्हा टोनी कडे आले तेव्हा त्यांनी पाहिले त्यावर त्यांचा विश्वासच बसला नाही टोनी खाऊन खाऊन चांगलाच गोल गरगरीत झाला होता त्याला धड चालता येत नव्हते पण त्याला त्याची काहीच फिकीर वाटत नव्हती मित्र भेटायला आले आहेत हे पाहून सुद्धा तो पुन्हा झोपायला गेला.

बिचारी मित्र पुन्हा एकदा टोनी चे हे वागणे पाहून झाडावर उडून गेले काही दिवसांनी टोनी घरात एकटाच होता त्याला खूप भूक लागली होती त्याने स्वयंपाक घरात सर्व काही पाहिले पण त्याला खाण्यासाठी काहीच भेटले नाही आई-बाबा ही घरात नव्हते त्यामुळे त्याला काय करत हेच कळेना.

दोन्हीने घरातून बाहेर पाहिले तर त्याचे मित्र सहजरित्या खाण्याचे पदार्थ मिळवताना झाडावरती दिसले. टोनीला वाटले की आपणही आपल्या मित्रांप्रमाणे सहजपणे अन्नपदार्थ मिळू शकतो आणि म्हणून त्याने घरट्यातून जोरात झेप घेतली मात्र त्याला उडण्याचा अंदाज आला नाही आणि तो खाली असलेल्या तलावातल्या पाण्यात पडला.

पाण्यात पडल्यामुळे सुरुवातीला तर त्याला काहीच कळाले नाही त्याचे पंख पूर्णपणे भिजले होते आणि त्यामुळे त्याला पाण्यातून बाहेर येता येत नव्हते त्याच्या नाका तोंडात पाणी गेले होते. टोनी चा आवाज ऐकून त्याचे मित्र उडत आले आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता टोनीला पाण्याबाहेर काढले.

टोनी आता थोडासा सावरला होता. आपल्या मित्रांचे आभार मानले आणि पूर्वी च्या वागणुकीबद्दल त्यांनी सर्वांची माफी मागितली. टोनीने मित्रांना एक विनवणी केली तुम्ही मला अन्न मिळवण्याचे प्रशिक्षण द्याल का?

मित्रांनी टोनीकडे आश्चर्याने पाहिले,थोडा विचार करून त्याला होकारही दिला मात्र "तुझे वजनही खूप वाढले आहे त्यामुळे तुला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे हे सुद्धा सांगितले". थोडा वेळ टोनीला खूप वाईट वाटले मात्र जी सत्य परिस्थिती होती ती त्याने स्वीकारली होती आणि त्यातूनच आपण प्रयत्न करायचे हे त्याने ठरवले होते

टोनी खूप कष्ट करत होता खूपदा पडला लागले तरीही तो शिकत राहिला आणि स्वतःचे अन्न स्वतः मिळवू लागला टोनीच्या आई-बाबांना खूप आनंद झाला त्यांच्यासाठी हा एक सुखद धक्काच होता.


Rate this content
Log in