Supriya Devkar

Abstract Children Stories

3  

Supriya Devkar

Abstract Children Stories

आणखी एक मिनिट

आणखी एक मिनिट

3 mins
33


ही कथा आहे जेरीची जेरी हा आठ दहा वर्षाचा मुलगा होता. सकाळची शाळा त्याला नको वाटायची. रोज सकाळी लवकर उठून तयार होऊन शाळेला जायचं म्हणजे त्याला भलताच कंटाळा यायचा.

आजही अलार्म क्लॉक चा आवाज मोठ मोठ्याने होत होता जेरी मात्र ऐकून कुस वळवून पुन्हा झोपी गेला. झोपी जाताना तो हाच विचार करत होता की आणखी एक मिनिट आपण झोपूया त्याने काय होणार आहे ,आपल्याला काही खूप उशीर नाही होणार असं म्हणून तो झोपी गेला .थोड्यावेळाने आईने त्याला उठवले तसा तो उठला आणि पटापटा तोंड धुवून आंघोळ करून ब्रेकफास्ट करू लागला, थोडासा उशीर झाला होता खरा मग त्याने पटकन आपली स्कूल बॅग घेतली एका हातात टिफिन बॉक्स घेतला आणि स्वारी शाळेकडे निघाली.

शाळेमध्ये जाताना रस्ता क्रॉस करायचा होता तेव्हा त्याने पाहिलं की ग्रीन सिग्नल ची लाईट आता बंद होणार आहे आणि आपल्याला तर रस्ता क्रॉस करायचा आहे तेव्हा त्याच्या मनात आले की आणखी एक मिनिट हा सिग्नल ग्रीनच राहावा म्हणजे मी पटकन रस्ता क्रॉस करेन पण तसे झाले नाही ग्रीन सिग्नल चा रेड सिग्नल झाला आणि जेरीला तिथेच थांबावं लागलं .त्यामुळे त्याची खूपच चलबिचल होऊ लागली होती त्याच्या मनात आलं आपण एक मिनिट लवकर उठलो असतो तर हा उशीर झाला नसता.

हिरवा सिग्नल लागताच तो बस स्टेशन कडे पळत सुटला पण हाय रे नशीब तो येईपर्यंत बस निघून गेली होती .पुन्हा एकदा तो विचार करू लागला की आपण थोडे लवकर आलो असतो तर बरं झालं असतं, आपली बस चुकली नसती .मग त्याने शाळेला चालत जायचे ठरवले आणि तो भराभर शाळेकडे चालू लागला .मोठमोठ्याने उसासे टाकत जेरी चालत चालत शाळेत पोहोचला. शाळेत पोहोचताच त्याने पाहिले की ग्राउंड वरती कोणी मुले नाहीत म्हणजे शाळा भरलेली आहे. आता आपल्याला काहीतरी शिक्षा नक्कीच मिळणार. समोरच जेरीच्या शिक्षिका उभ्या होत्या त्यांनी घड्याळाकडे पाहिले तर जेरी तब्बल वीस मिनिटे उशिरा आला होता.

त्यांनी जेरीला उशिरा येण्याचे कारण विचारले तेव्हा मात्र जेरीला खूप वाईट वाटले आपण जर अलार्म क्लॉक बंद न करता उठलो असतो तर आज मला एवढा उशीर नक्कीच झाला नसता. जेरीला शिक्षा म्हणून त्याच्या शिक्षकांनी ग्राउंड वरील कागद गोळा करण्यास सांगितले .पडलेले तोंड घेऊन जेरी ग्राउंड वरील कागद गोळा करत होता त्याला त्याचे खूप वाईट वाटले कागद गोळा केल्यानंतर तो वर्गात गेला शाळा सुटल्यानंतर तो घरी निघून गेला.

अभ्यास झाला, जेवण झाले आणि झोपण्यापूर्वी त्याने पाच मिनिटे लवकर चा गजर लावला आणि झोपण्याआधी त्याने निश्चय केला की उद्या सकाळी आपण अलार्म वाजताच उठायचे असे म्हणत झोपी गेला दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे अलार्म क्लॉक वाजू लागला पुन्हा एकदा जेरीने आपली कुस बदलली मात्र त्याला काल घडलेला प्रसंग आठवला आणि तो ताडकन उठून बसला आज त्याने ठरवले होते काहीही झाले तरी आज शाळेत वेळेवरच पोहोचायचे.

वाजणारा अलार्म बंद करून जेरी पटापट आपली कामे करू लागला. लवकर लवकर आंघोळ करून कपडे घालून तो नाश्ता करण्यासाठी टेबलवर आला .आई तर आज आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती. पटापट नाश्ता करून त्याने आपला टिफिन बॅगमध्ये ठेवला आणि बॅग उचलून तो शाळेसाठी तयार झाला .नेहमीप्रमाणे तो रस्त्याच्या कडेला उभा राहिला हिरवा सिग्नल लागताच त्याने रस्ता ओलांडला आणि बससाठी जाऊन उभा राहिला. बस येताच तो बस मध्ये चढला आणि शाळेमध्ये पोहोचला. आज मात्र जेरी शाळेमध्ये वेळेच्या आधी पोहोचला होता.

शाळेमध्ये जेरीला लवकर आलेले पाहून शिक्षिका खुश झाल्या आणि त्याला म्हणाल्या आज तू वेळेच्या आधीच आला आहेस असेच वेळ पाळत जा आणि तुझ्या वर्तनात असाच बदल घडवून आण जेरी हसत हसत आपल्या वर्गात निघून गेला शिक्षकांनी बोललेली वाक्य त्याला आनंद देऊन गेली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract