kanchan chabukswar

Drama Thriller

4.4  

kanchan chabukswar

Drama Thriller

फसलेला डाव

फसलेला डाव

11 mins
916


जानेवारी 1960


रात्रीचा एक वाजून गेला होता, अचानक Owl पर्वताच्या कोपऱ्यात बसलेल्या खेडेगावातल्या एका जुन्या घरापाशी warsaw लायसन्स प्लेट असलेली प्रचंड वॅगनार उभी राहिली.

दरवाजावर दस्तक झाली, म्हातारा जॉन क्रूगर आपल्या बिछान्यावर झोपला होता. त्याच्या पत्नीचे चार वर्षांपूर्वीच देहावसान झाले होते, त्याचा मुलगा आपल्या कुटुंबासोबत जॉनबरोबरच राहत होता. जॉन चा मुलगा रॉबर्ट ने दरवाजा उघडला. जर्मन मिलिटरीच्या वेषातले दोन ऑफिसर्स, दरवाजा ढकलून आत आले, त्यांच्याबरोबर साध्या वेशातले दोन माणसे होती. ऑफिसर्स जॉनची चौकशी केली आणि त्याला बाजूच्या खोलीत नेऊन काही प्रश्न-उत्तरे केली. थरथरत्या आवाजात जॉन छताकडे बोट दाखवले, साध्या वेषातले ऑफिसर्स पुढे झाले, जॉन आणि त्याच्या कुटुंबाला त्यांनी दुसऱ्या खोलीत जायला सांगितले, त्यांच्याजवळील बॅग उघडून त्यांनी हत्यारे काढली, छताला ठोकायला सुरुवात केली. एक पोकळ आवाजाला त्यासरशी त्यांनी तिथे भोक पाडले आणि दोघातला एक माणूस त्या भोकातून वर चढला.

जॉन च्या घराचा तो एक बंद केलेल्या माळा होता. वरती चढलेल्या माणसांनी माळ्यावरून काही निगेटिव्ह, काही नकाशे, काही सिगरेटच्या डब्या आणि एक चुरगळलेला युनिफॉर्म खाली टाकला, त्याने टॉर्चच्या उजेडात, मिळालेले सामान बरोबर आहे का याची खात्री केली आणि ते चौघेजण वॅगनार मध्ये बसून निघून गेले.

                ती माणसं जाता क्षणी जॉनने आपल्या मुलाला रॉबर्टला आपल्याजवळ बोलावले, जॉन ने आपला पलंग ढकलला, आणि त्याच्या खाली असलेल्या तळ घरामध्ये तो आणि रॉबर्ट उतरले.

तळ घरामध्ये जाड कापडी पिशव्यांमध्ये काही नकाशे आणि काही फाइल्स होत्या. जॉन रॉबर्ट ला सांगितले किती सगळे सामान उचलून त्याच्या बायकोच्या कबरी मध्ये लपवून ठेव.

घुबड OWL पर्वताची सीमा, पोलंड जर्मनी आणि चेक रिपब्लिक यांना लागून होती. जॉन राहत असलेलं खेड, महायुद्धानंतर पोलंड देशामध्ये जमा झाले होतं, पण महायुद्धाच्या पूर्वी घुबड पर्वता सकट तो संपूर्ण भाग जर्मनीच्या अखत्यारीत होता.

कोण होता जॉन? कोण होती ती माणसं? काय घडलं होतं त्या फाइल्स मध्ये? कसली होते ते नकाशे?


जानेवारी 1943.

जर्मनी हे अतिशय प्रगत राष्ट्र होत, त्याकाळचे त्यांचे रस्ते देखील एखाद्या विमानाला उतरवण्यात यशस्वी ठरले असते. त्यांचे ज्ञान आणि विज्ञान अतिशय प्रगत चाललं होतं, जरी राष्ट्र छोटे असलं तरी त्यांची जिद्द आणि त्यांचा अधिकार वाखाणण्यासारखा होता. उत्तम प्रतीचे वैज्ञानिक, उत्तम प्रतीचे डॉक्टर्स, आणि प्रयोग करण्यासाठी पकडून आणलेले ज्यू समाजातले लोक.

सगळ्या युद्धाचा शेवट हा पहिल्या महायुद्धात झाला हे म्हणजे शेवटी खोटं ठरलं. मित्र राष्ट्रांनी जर्मनी आणि जपान वरती बंधन टाकले, त्यांची सैनिकी क्षमता कमी करण्याचे आदेश आले, जर्मनीने कुठलेही नवीन अस्त्र तयार करू नये असा कायदा झाला. त्याच्या बदल्यांमध्ये Versailles चा तह आणि करारनामा याच्यावरती विजयी राष्ट्र म्हणजेच अमेरिका फ्रान्स इंग्लंड यांनी सह्या केल्या, जपान जर्मनी आणि इटली यांचे पूर्ण खच्चीकरण करून त्यांची सैनिकी क्षमता कमी करून त्यांच्यावरती वेगवेगळे निर्बंध घालून हा तह म्हणजे तोंडाला पुसलेली पाने होती. पहिल्या महायुद्धानंतर सगळे जगच एक डबघाईला आलेल्या व्यवसाय सारखं होतं, मित्र राष्ट्रांकडे फौजफाटा, पैसा-अडका, मानवी ताकद बऱ्याच प्रमाणात कमी झाली होती. वरील तहानुसार जर्मन भाषा बोलणारे सगळे प्रांत जर्मनी मध्ये समाविष्ट करण्यात येणार होते तस युद्धातील आणि भरून काढण्यासाठी जपानला पण मुभा देण्यात आली होती. जरी ब्रिटिश साम्राज्य सगळ्या जगावरती होते तरीही ते आता संपुष्टात येत होते, हळूहळू सगळ्या कॉलनी आत्मनिर्भर होत होत्या, त्यांनी ब्रिटिशांचा राज्य नियम धुडकावून लावायला सुरुवात केली होती. भारत साऊथ आफ्रिका आणि इतर काही प्रदेश हे स्वतंत्र होऊ लागले होते.

पहिल्या महायुद्धानंतर मित्र राष्ट्रांना सर्वात जास्त धोका कम्युनिस्ट असलेल्या सोवियत युनियन चा होता, अमेरिकेच्या तंत्रज्ञानाला टक्कर देईल असे त्यांचे जर्मनीचे जपानचे तंत्रज्ञान होतं. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनी आणि जपान ला इतके निर्बंध घालण्यात आले की जर्मनीने शेवटी आपल्या प्रदेशांमध्ये भुयार खणून आपल्या प्रयोगशाळा स्थापन केल्या. अतिशय उच्च बुद्धिमत्तेचे जर्मन लोक पहिल्या महायुद्धातील अपमानाचा बदला घेण्यासाठी सज्ज होत होते. धाडसी बुद्धिमान, पराक्रमी, कमालीच्या देशप्रेमाने भारलेले जर्मन लोक, त्यांच्या लोकप्रिय नेत्याच्या आदेशानुसार आपल्या देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी सज्ज झाले.

जर्मनीचा जमिनीखालचा कारभार, यांचा खटाटोप, फ्रान्स आणि ब्रिटन यांना अवगत होता, तरीपण त्यांनी जर्मनी कडे दुर्लक्ष केले. त्याची दोन कारणं होती, अमेरिकेचा वाढता प्रादुर्भाव, आणि डबघाईला आलेली फ्रान्स आणि ब्रिटन ची व्यवस्था. युरोपियन युनियन करण्यासाठी त्यांना इटाली आणि जर्मनी आपल्या युनियनमध्ये हवे होते. तसेच सोवियत युनियनच्या कम्युनिस्ट तंत्रज्ञानाला रोखण्यासाठी जर्मनीचे तंत्रज्ञान आवश्यक होते. फ्रान्स आणि ब्रिटन यांच्या ढिलेपणा चा फायदा जर्मनीने पुरेपूर घेतला, आणि संपूर्ण शक्तीनिशी शस्त्र, औषध, अस्त्र, अनुअस्त्र, सिद्धांत भौतिक, रसायन शास्त्र जोरदार प्रगती करण्यास सुरुवात केली. जर्मनीच्या देशवासीयांनी देखील आपले बटवे खुले सोडले, कारण त्यांना काही इलाज नव्हता. ज्यू समाज ने जर्मनी बरोबर गद्दारी केली, त्यांना एकतर कॉन्सन्ट्रेशन कॅम्प मध्ये पाठवण्यात आले, नाहीतर त्यांच्याकडून प्रचंड प्रमाणात काम करून घेण्यात आले.

1936 पासूनच त्यांची तयारी चालू होती, जर्मनी जवळ असलेल्या ऑल पर्वताची [घुबड पर्वताची] अतिशय जोखमीचे कामासाठी निवड करण्यात आली. अमेरिका आणि लंडन ची विमान, क्षेपणास्त्र ही लांब पल्ल्याची असल्यामुळे जर्मनी धोका होता. जर्मन अधिकाऱ्यांना आपले संशोधन आणि आपले प्रयोग करण्यासाठी सुरक्षित जागा हवी होती. एक प्रचंड प्रोजेक्ट अस्तित्वात येत होता. त्याला नाव दिलं रईस प्रोजेक्ट. रईस चा अर्थ जर्मन भाषेमध्ये राक्षसी किंवा प्रचंड हा होता. काय होतं बरं हा प्रोजेक्ट?

रईस प्रोजेक्टमध्ये ऑल पर्वतामध्ये असलेल्या जिप्सम च्या खाणी उपयोगात आणल्या गेल्या. जिप्सम च्या खोदकामामुळे, पर्वताच्या आतील भागांची आणि जमिनीच्या क्षेत्रांची, विविध दृष्टिकोनातून माहिती काढण्यात आली होती. प्रचंड आकाराचे एकमेकांशी संलग्न असणारे सात बोगदे येथे करण्यात येणार होते. प्रत्येक बोगदा हा दुसऱ्या बघण्याला काटकोना मध्ये जोडण्यात आला होता. बोगद्यात मध्ये शिरण्यासाठी मोठे मोठे दरवाजे केले होते, वरिष्ठ अधिकाऱ्यांना ये-जा करण्यासाठी, त्यांच्या गाडी सकट येण्यासाठी दुसऱ्या बाजूने बोगदे केले होते. या कामावरती जर्मनीचा क्रूर अधिकारी मॅक्स वेबर यांना नियुक्त करण्यात आले होता. मॅक्स स्वतः आर्किटेक्ट होता, रात्रंदिवस काम करून मॅक्स ने रईस प्रोजेक्ट ची बाराखडी केली. त्याच्या हाताखाली त्याच्यासारखेच क्रूरकर्मा असलेले दोन इंजिनियर्स सायमन आणि न्यूमन हे आपल्या वर्कर्स कडून काम करून घेत होते. लोकांकडून गुलामासारखे काम करून घेण्यात येत होते. बारा ते चौदा तास सलग काम करण्यात यायचे.

आजूबाजूंच्या गावांच्या, खिडक्या पार बंद करून टाकण्यात होत्या, कोणीही रस्त्यावरती येणाऱ्या वाहनांकडे बघण्याचे नाही असे आदेश देण्यात आले होते. कोणी जर खिडकीमध्ये दिसला तर त्याला गोळी घेण्यात येत होती.

न्यू मन बरोबर जॉन क्रूगर हा त्याचा अतिशय विश्वासू म्हणून काम करत होता. संपूर्ण नकाशे, आणि काही गुप्त माहिती न्यूमन आणि जॉन यांनाच माहिती होती.

रईस बोगदे

प्रत्येक बोगदा हा पाच ते सात किलोमीटर खणला गेला, बोगद्याचे छत कोसळू नये म्हणून दगडांच्या आणि सिमेंटच्या कमानी उभ्या केल्या. यामध्ये ताजी हवा येण्यासाठी हवेचे पाईप आणि त्याच्या बाजूने पाण्याचे पाईप घालण्यात आले. संपूर्ण बोगद्यामध्ये विजेच्या तारा घालण्यात आल्या तशाच दूरध्वनीच्या तारा काढण्यात आल्या. ठिकाणी ठीक ठिकाणी गुप्त खलबतं करण्यासाठी कक्ष उभारण्यात आले. रईस बोगदे इतके भक्कम होते की वरुन कोणी अनुबॉम जरी टाकला असता तरीही कुठलीही हानी झाली नसते.

या बोगद्यामध्ये नवीन विमाने, युद्धामध्ये वापरण्याचे अस्त्र शस्त्र यांची मोठ्या प्रमाणावर ती निर्मिती करण्यावर भर देण्यात आला. एका वर्षाच्या आत रईस चे बांधकाम पूर्ण करण्यात आले आणि तिथे ठरल्याप्रमाणे युद्धामध्ये वापरण्यासाठी लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र, आणि बाकीचे अस्त्र यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्यास सुरुवात झाली. बोगदा क्रमांक तीनझेड मध्ये रेल्वेची लाईन टाकण्यात आली, आलेली अस्त्र आणि शस्त्र रेल्वेच्या वाघिणी मधून बाहेर नेण्यात येत होती. रेल्वे रस्त्याच्या दोन्ही बाजूला जाणून-बुजून घनदाट जंगलउभे केले होते. रेल्वेच्या वाघिणी ना हिरवा रंग दिला होता त्यामुळे वरून जाणाऱ्या विमानांना देखील रेल्वे चा पत्ता लागायचा नाही. कच्चामाल आत आणणे आणि तयार बाहेर नेणे यासाठी रेल्वे फार उपयुक्त ठरली. जर्मनी किंवा अजून कुठल्याही दोस्त राष्ट्रांच्या विमानांना Owl पर्वतावरून विमानांना काढण्याची परवानगी नव्हती.

अतिशय गुप्तपणे नवीन शस्त्रांची निर्मिती करण्यात येत होती.

सगळी कामं यथास्थित पणे चालू असताना अचानक एक दिवशी

  डॉक्टर बेन बरोबर डॉक्टर लिऑन आणि डॉक्टर मिया प्रोजेक्ट वर येऊन धडकले. त्यांची मॅक्स बरोबर काही चर्चा झाली आणि ताबडतोब काही गुलामांना घेऊन एका बोगद्यामध्ये एका प्रयोगशाळेची निर्मिती करण्याची सुरुवात झाली.

प्रयोग

बोगदा क्रमांक 4q.


सरळ घडलेल्या भुयाराच्या दोन्ही बाजूला लहान लहान खोल्या निर्मिलेल्या होत्या. तिथे काही चित्रकलेमध्ये हुशार असणारे गुलाम. मोठमोठ्या नकाशांचे अतिशय बारीक चित्र काढण्यामध्ये मग्न होते. नकाशांमध्ये काही घरे आणि काही वस्त्या दिसत होत्या. घराच्या बाजूला देण्यासाठी त्यांना काही नंबर देण्यात आले होते. हे सगळे गुप्त दूरध्वनी क्रमांक छापण्याचे काम चालू होते. नकाशा मध्ये चिन्ह देखील विचित्र होती. गोल म्हणजे दरवाजा, त्रिकोण म्हणजे औषधालय, पंचकोन म्हणजे लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र. घरांमध्ये असलेल्या दूरध्वनी क्रमांक देखील काही कोड मध्ये लिहिले होते, दोन गोल, म्हणजे 28 आणि त्याला गुणिले दोन म्हणजे 56, त्या घराचा दूरध्वनी क्रमांक 565. त्रिकोण म्हणजे तीन, प्रत्येक गुप्त लिपीला काही ठराव अंकांनी गुणाकार करून त्याच्यामध्ये काही ठराविक अंक मिळवले जायचंय. कोणालाही दूरध्वनी क्रमांक सहजासहजी मिळायचा नाही. ही सगळी घर म्हणजे काही प्रयोग शाळा होत्या. त्यांचेच नकाशे बारीक-बारीक खड्यान वरती करून त्याला अंक देण्याचे काम काही खोल्यांमध्ये चालले होते. कामावरच्या अधिकाऱ्याकडे एक सिगरेट्स बॉक्स देण्यात येत होता, ज्यामध्ये काही छोटे क्रिस्टल्स ठेवलेले होते. क्रिस्टल मध्ये सगळी गुप्त माहिती संकेतिक नकाशा काढून भरलेली होती.

बॉक्स दिसण्यास सिगरेट बॉक्स सारखी असली तरी सिगरेट म्हणजे एक गुंडाळलेल्या प्रचंड नकाशा होता असे आणि त्यात ठेवलेली क्रिस्टल्स वरती काही नकाशांची अतिशय बारकाईने तयार केलेली प्रत होती.

अधिकाऱ्यांना त्यांच्या कामा नुसारच ह्या बॉक्सेस दिल्या जायच्या, पण सगळ्यांच्या प्रति मात्र जॉनकडे असायच्या. कुठल्या बोगद्यामध्ये जर पाणी भरले, किंवा काही दुसर संकट उभे राहील तर त्याच्यावरती उपाय शोधण्यासाठी नकाशा यांची मदत घेऊन ताबडतोब माणसांना दुसऱ्या बोगद्यामध्ये हलवण्यात येत असे.


बोगदा क्रमांक 5s

ह्या भुयार मध्ये, प्रचंड प्रमाणामध्ये औषध निर्मिती चे काम चालू होते. त्याच्या साठी लागणारे पाणी, वनौषधी, रसायने, त्यांची द्रावणे, त्याच्यावरती अहोरात्र प्रयोग चालू होते. कसली औषध बनवत होते? पहिल्या महायुद्धात मध्ये जर्मन सैनिक प्रचंड प्रमाणामध्ये मारले गेले होते, सैनिकांची संख्या बऱ्याच प्रमाणात कमी झाली होती. रोजच्या व्यवहारांसाठी आणि सुरक्षेसाठी बरेच सैनिक तैनात होते त्यामुळे युद्ध वरती जाणारे सैनिक सैनिकांचे प्रमाण खालावलं होतं . पूर्वीच्या युरोपियन युनियन मध्ये पार्थ देशांमध्ये त्यांच्या सैनिकांवर ती काही प्रयोग केले होते, पार्थ सैनिक कितीतरी दिवस बिना अन्न पाण्याचे लढाई करू शकत होते, त्यांचे घोडे बिना पाण्याचे देखील डोंगराची चढण चढू शकत होते, कठीण तयारीमुळे मुळे पार्थ सैनिक अतिशय तेजस्वी म्हणून गणले गेले होते. जर्मन लोकांनी तसेच प्रयोग आपल्या सैनिकांवर करायचे ठरवले आणि त्याच्या साठी औषध उपचार बोगदा क्रमांक 5s मध्ये चालू होते.

बोगदा क्रमांक 5 पी.

इथे तुटलेले अवयव जोडण्याचे काम चालू होते, नवीन अवयवांची निर्मिती, नवीन कृत्रिम अवयव, या सगळ्यांवरती संशोधन चालू होत आहे. एखादा सैनिक जर पांगळा झाला तर तो युद्धातून अतिशय निकामी ठरत असे, त्यापेक्षा पांगळ्या सैनिकांना देखील कृत्रिम अवयव देऊन किंवा त्यांच्यासाठी काही वाहन निर्माण करून त्यांचा उपयोग युद्धामध्ये केला जाईल का याचे संशोधन या बोगद्यामध्ये केले होते.

जू लोकांवरील अत्याचारामुळे सगळ्या देशाची सहानुभूती लोकांकडे होते, त्या कारणाने पण जर्मनीला कुठूनही मदत मिळण्याची शक्यता नव्हती

. जर्मनी इटली आणि जपान स्वतःहून जे काय करतील तीच त्यांची स्वतःची मदत होते

प्रयोगशाळा जरा विचित्र होती, तिथे ऑपरेशन टेबल सारखे काही साचे बनवण्यात आले, त्याच्या बाजूला काही टब आकाराचे उथळ हाऊद करण्यात आले. धडाधड सामान येऊन पडलं.

डॉक्टर आणि डॉक्टर मिया जखमी गुलामांना वरती काही प्रयोग करत होते, काम करताना एका गुलामचा हात पूर्णपणे चिरडला गेला तेव्हा डॉक्टर मीयां नी, त्याला कृत्रिम हात लावून दिला. डॉक्टर मिया काही औषध निर्मिती करत होती, ती आपल्या साथीदारांना बरोबर काही वेगळीच औषध आणि इंजेक्शन तयार करत होती. सैनिकांना देण्यासाठी शक्तीची इंजेक्शने आणि काही संप्रेरके ती तयार करत होती. Pervitin + cocain + Painkiller याचा एकत्र फायदा काय होतो याची चाचपणी काही गुलामान वर केली होती. ही औषधे घेतल्यावर गुलाम तीन तीन दिवस बिना पाणी आणि खाणे काम करत होते, त्यांच्या कामांमध्ये पण वेग आला होता. इंजेक्शन सैनिकांना दिली तर त्यांना पण उपयोग होईल असे काहीसे प्रयोग बोगदा नंबर 3 झेड तिथे चालू होते.


                          कुठल्याही बोगद्यामध्ये कुठल्याही माणसाला विनाकारण प्रवेश नव्हता. कामाच्या सगळ्या फाइल्स गुप्त ठेवण्यात येत होत्या, असेही संशोधन चालू होते ज्यामुळे तुटलेला हात किंवा पाय नैसर्गिक रीत्या नवीन निर्माण होईल. काही गुलामांचे हात आणि पाय तोडून त्यांना काही औषध देऊन त्यांच्यावर ती काय परिणाम होतो याची पाहणी चालू होते होती.


कामावरच्या अधिकाऱ्याकडे एक सिगरेट्स बॉक्स देण्यात येत होता, ज्यामध्ये काही छोटे क्रिस्टल्स ठेवलेले होते. क्रिस्टल मध्ये सगळी गुप्त माहिती संकेतिक नकाशा काढून भरलेली होती.


बोगदा7x

एक नवीन बोगदा कडून त्याचं नाव 7x ठेवण्यात आलं, तिथे प्रयोग चालू झाले. युरेनियमचा साठा कडेकोट बंदोबस्त मध्ये सातX बोगद्यामध्ये येऊ लागला. युरेनियमपासून वीज उत्पादन करणे ही तर कला जर्मन लोकांना माहिती होते पण युद्धांमध्ये विजय मिळवण्यासाठी जर काही विनाशकारी बॉम्ब करता आले तर त्याची चाचणी 7 एक्स बोगद्यामध्ये चालू झाली. 7X च्या बाजूला एक खोल विहीर करण्यात आली विहिरीचे भिंत सहा फूट काँक्रीटची करण्यात आली मध्ये मध्ये लोखंडाच्या आणि स्टीलच्या फळ्या टाकून विहिरीची भिंत पक्की करण्यात आली. प्रयोग करताना जी उष्णता निर्माण होत होती ती शोषून घेण्यासाठी या विहिरीची निर्मिती करण्यात आली. विहिरीमध्ये पाणी भरण्यासाठी ऑल पर्वतावरून येणाऱ्या झरयांचा उपयोग करण्यात आला

   सगळे काही आलबेल चालू होते, दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटले होते, तोपर्यंत जगामध्ये कुठल्याच देशाकडे अनुबॉम्ब चाअनुभव नव्हता. ऑल पर्वत जर्मनी आणि पोलांड यांच्या सीमेवर असल्यामुळे कुणाला संशय पण येत नव्हता की त्याच्या खाली इतक्या साऱ्या बोगद्यामध्ये इतके प्रयोग चालू आहेत.

शिस्तबद्ध काम, महत्त्वाकांक्षी अधिकारी, अतिशय कष्टाळू गुलाम यांच्या जोरावरती जग जिंकण्याची स्वप्ने जर्मनी पाहत होती.


1945

पण कुठेतरी काहीतरी चुकले, कुठलीतरी माहिती कमी पडली, सर्व तयारी ची परिस्थिती न बघता जपान ने पल हार्बर वरती हल्ला केला, त्यामुळे अमेरिका हादरून गेली, एवढा एवढासा नखा एवढा जपान आणि त्याची हिंमत! पल हार्बरच्या पराभवामुळे अमेरिका चिथावून उठले, अमेरिका आणि ब्रिटन ला वाटले की जर्मनी जपान आणि इटली परत उठाव करणार आणि काहीही संधी न देता अमेरिकेने जपान वरती अणुबॉंब अस्त्र डागले.

 जर्मनीच्या आधी अमेरिकेने अणुबॉंब तयार केला आणि त्याचा प्रयोग जपान वर केला, आणि तिथे युद्धाचे पारडे फिरले, जर्मनीचे सैनिक हळूहळू कमी होत होते, नवनिर्मित केलेल्या औषधांचे काहीही फायदे होत नव्हते, अमेरिकेचे वर्चस्व दिवसेंदिवस वाढतच होते . तरीपण जर्मन अधिकारी आपल्या जनतेला आपण केलेल्या शस्त्रांचे काहीतरी अद्भुत परिणाम होतील असे पटवून देत होते, काही शस्त्रे खरोखरच निर्मिली होती पण काही फक्त स्वप्नातच होती.


तोडी हेडक्वार्टर

संध्याकाळी एके दिवशी संध्याकाळी कामावरच्या सर्व जर्मन ऑफिसर्स ना वरिष्ठांकडून जेवण्याचे निमंत्रण आले. सर्व डॉक्टर, सर्व आर्किटेक्ट, इंजीनियर्स ज्यांनी ज्यांनी रईस च्या बोगद्याची निर्मिती केली होती त्यांना सगळ्यांना आमंत्रण देण्यात आले. एका मोठ्या गोल टेबलाभोवती जेवणाची व्यवस्था करण्यात आली. मंद संगीत, घमघमणारा सुवास, उच्चप्रती ची सिगरेटआणि शॅम्‍पेन याचा मुक्तहस्त संचार चालू होता. आपण युद्ध जिंकणार याची सगळ्यांनाच खात्री होती. जॉन क्रुगर ची तब्येत बरी नसल्यामुळे त्याला समारंभाला यायला थोडा उशीर झाला. तोपर्यंत जेवणात सुरुवात झाली होती. त्याने शांतपणे दारू न पिता आपल्या ताटामध्ये थोडासा भात वाढून घेतला आणि तो सगळ्यांबरोबर टेबलावर जाऊन बसला. दहा-पंधरा मिनिटात काय झाले माहित नाही पण त्याच्या आजूबाजूचे ऑफिसर्स हळूहळू बेशुद्ध व्हायला लागले, ज्यांनी जास्त दारू प्यायली होती ते तर फटाफट कोसळत होते. जॉन च्या लक्षा मध्ये सगळा डाव आला. ही शुद्ध हरकिरी होती, आत्महत्या होती, याचा अर्थ जर्मनी युद्ध हरली होती?

हार-जीत चालणारच, पण एवढे महत्त्वाचे संशोधन, एवढे लावलेले शोध, एवढ्या गुलामांचे बलिदान, एवढे विकसित झालेले तंत्रज्ञान, काय सारे फुकट जाणार होते? का संपूर्ण संशोधन आयतेच अमेरिकेला मिळणार होते?

जपान वर अणुबॉंब टाकल्याचे एवढे भयानक परिणाम की सगळे जगच अमेरिकेत गुलाम झालं? कि आपले सगळे तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक शत्रूच्या ताब्यात जाऊ नये म्हणून त्यांना आत्महत्या करायला भाग पाडले? या सगळ्यांना माहिती होते का, की ही जी महागडी दारू, दारू नसून विष आहे?

जॉन ने पण बेशुद्ध झाल्याची सोंग घेतले आणि तो खुर्चीवरुन खाली कोसळला. अर्ध्या तासात मिलिटरीच्या ट्रक मध्ये सगळ्या ऑफिसरची मृत शरीर कोंबण्यात आली, जॉन पण मेल्याचे सोंग करून पडून राहिला आणि रस्त्यावरती आल्यावर ट्रकच्या बाहेर उडी मारून तो आपल्या घराच्या दिशेने पळत सुटला., जॉन तोडीच्या हेडक्वार्टर मधून बाहेर सटकला. रात्रीच्या अंधारात आपल्या जवळ असलेली सगळी कागदपत्र त्यांनी आपल्या मुलांच्या घरी नेऊन ठेवली आणि रातोरात आपल्या घराचा माळा तकडबंद करून टाकला.

जगज्जेत्या चे स्वप्न भंगले, अमेरिकेने युद्धाचा ताबा घेतला, जर्मनीच्या हुकूमशहा ने जनतेची माफी मागून आत्महत्या केली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama