kanchan chabukswar

Others

4.0  

kanchan chabukswar

Others

आजीची नजर

आजीची नजर

4 mins
169



निहारिका [ निहार] आणि मल्हार दोघं जुळी भावंडं. बाबा, आजी लाडानि निहार मल्हार अशी हाक मारायचे. 


खरेतर शाळेमध्ये खरच जास्त हुशार होती निहार, मल्हारच सगळं लक्ष बास्केटबॉलमध्ये नाहीतर मित्रां मध्ये. त्यामुळे नववी मध्ये मल्हार पेक्षा खूपच चांगले मार्क मिळाले होते. विद्यार्थ्यांच्या दुर्दैवाने का सुदैवाने covid-19 लहर देशामध्ये आली आणि दहावीची परीक्षा रद्द झाली. शाळेनी घेतलेल्या परीक्षेवर निकाल लागला. त्यामुळे निहार आणि मल्हारला उत्तम मार्क मिळून सायन्स साईडला ऍडमिशन मिळाली. 

     वडील मिलिटरी मध्ये असल्यामुळे ते भारताच्या सीमेवरती रुजू होते, आई आणि आजी दोघीजणी घरी आणि निहार मल्हार. 

सगळं काही ऑनलाईन चालू होतं, मुलांचा अभ्यास आणि व्यवस्थित चालू होता. करता करता अकरावी पण ऑनलाईन झाली बारावीची परीक्षा पण थातूरमातूर झाली. दोघांनी पण वडिलांच्या इच्छेप्रमाणे "नीट" परीक्षेची जोरदार तयारी चालवली होती. 


   केमिस्ट्री चे अवघड प्रश्न मल्हार सहज सोडवत होता तर बायोलॉजी चे वेगवेगळे प्रश्न चुटकीसरशी सुटत होते. फिजिक्स मात्र दोघेजण मिळूनच करत होते. दोघांचाही जोरदार अभ्यास अगदी मन लावून चालला होता. 


    मधून मधून आईच त्यांच्या आवडीचे बाहेरचे पदार्थ मागवून त्यांचे लाड पुरवीत होती. 


आजीचे पण नातवंडांवर ती बारकाईने लक्ष ठेवणे चालू होते. डोक्याला तेल लावून दे, सकाळी लवकर उठून दे, रात्री झोपताना दूध हळद हे असले बारीक-बारीक प्रेमपूर्वक काम आजी हौसेने करत होती. रोज संध्याकाळी तिच्या थरथरत्या आवाजातले आहे रामदासांचे मनाचे श्लोक ऐकताना दोघही नातवंडांना खूप मजा येई. बऱ्याच वेळेला मल्हार निहार ला अजून चिडवायचा की "तुझेच मन अचपळ आहे, तुझ्या डोक्यात शिरत नाही, तुझा अभ्यास होत नाही" असं म्हणून दोघांची गमतीशीर भांडाभांडी पण चालू असते. 


    दोघांनी पण मन लावून अभ्यास करून" नीट " ची परीक्षा उत्तम रित्या दिली. 

निहार तर अगदी शंभर टक्के म्हणत होती की तिला नक्कीच चांगल्या मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल. मल्हार असं काही म्हणणं नव्हतं त्याला कळत नव्हतं की त्यांनी बरोबर उत्तरे दिली का चुकीची. 


    रिझल्ट च्या वेळेला बाबा मुद्दामच सुट्टी काढून घरी आलेले होते. 

ऑनलाईन रिझल्ट च्या वेळेला सगळ्यांच्या उत्सुकता अगदी ताणल्या गेलेल्या होत्या. बघतात तो काय मल्हार चा नंबर सायन हॉस्पिटल ला लागलेला आणि निहार च कुठे नावच नव्हतं. अगदी थोडक्याने निहार नीट च्या लिस्ट मध्ये आलेली नव्हती. 


आई-बाबांना प्रश्नच पडला की मल्हार साठीआनंद मानवा की निहार ची सीट हुकली म्हणून दुःख मानावं. 


जो तो नातेवाईक भेटायला येईल तो आधी मल्हारला मिठी मारे, त्याचे सगळे तोंडभरून अभिनंदन करत होते, भावी डॉक्टर म्हणून आदराने त्याच्याकडे बघत होते. अचानक आई-बाबांचे प्रतिष्ठा अतिशय उंचावली. लोकांनी भरीस पाडून आई-बाबांना मेजवानीचा बेत करायला लावला त्यांच्या जमातींमध्ये मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळणारा मल्हार हा पहिलाच मुलगा होता. 

   निहारनी ठरवले की ती अभ्यास करून पुढच्या वर्षी नक्कीच नीट ची परीक्षा पास होईल. तरीपण आलेल्या मेळ्यामध्ये ती जणूकाही बाजूला पडली होती. ठरल्याप्रमाणे कॉलनीच्या जवळच एक छोटा हॉल घेऊन सर्व नातेवाईकांनी मस्त मटणाचा बेत करून मल्हार च्या ऍडमिशन चा जल्लोष केला. बायकांमध्ये एवढी शिकायची पद्धतच नव्हती त्याच्यामुळे 

निहार चि हार ,कोणाला फारसं लक्ष पण गेलं नाही. वरकरणी जरी हसून दाखवत होती तरी पण मनातून ती फारच नाराज झाली होती.  

रात्री आजी पाणी प्यायला उठले तेव्हा निहार अंथरूण रिकामं होतं. घरामध्ये शोध घेतला निहार कुठेच नव्हती, अचानक बाहेरचा दरवाजा आजीला उघडा दिसला. गच्ची वरती हवा खायला तर गेली नसेल म्हणून दबक्या पावलाने आजी देखील गच्चीवर ती गेली. 


    रात्रीच्या शांत वातावरणामध्ये निहार पाण्याच्या टाकी वरती उभी होती. आजीला तिचा चेहरा स्पष्ट दिसत होता. रडलेले डोळे, लाल झालेले नाक, आणि मनाशी काहीतरी केलेला निश्चय. आजीच्या हृदयामध्ये एकदम कळ उठली. 


" काय करतेस बाळ निहार? आधी खाली उतर." आजी कळवळून म्हणाली. 

निहार ने आजीचे बोलणे ऐकलेच नाही. आजीने परत परत प्रेमळ आवाजात नीहारला हाका घातल्या. 


आजीचा आवाज, उघडा दरवाजा, हे सर्व बघून मल्हार धावतच गच्चीवर आला. 

झटकन पाण्याच्या टाकीवर चढून, निहरला आपल्या कुशीत घेतले आणि अलगदपणे खाली आणले. 

निहार रडू वेगळ्याच विश्वात होती. " मला जगायचं नाही." 


" अगं पण का?" एक परीक्षा चुकली म्हणून कोणी जीवन संपतं का? आणि एक नाही तर दुसर्‍या वर्षी तुला ऍडमिशन मिळेल तुला जर ऍडमिशन मिळाली असती तर मला सगळ्यात जास्त आनंद झाला असता कारण माझ्यापेक्षा हुशार तूच आहेस हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे." मल्हार तिला मिठीमध्ये घेऊन समजावून सांगत होता. 

आजीने निहार ची पापी घेतली आणि म्हणाली," बाई ग, मेहनत करणे आपल्या हातात असतं, यश अपयश नाही. आणि एवढं तू मनाला का लावून घेतेस? तू हुशार आहेस आपल्या घराण्यांमध्ये सगळ्यात हुशार मुलगी तूच आहेस तुला नक्कीच ऍडमिशन मिळेल पण हे असं वेडवाकडं करणं तुला अजिबात शोभत नाही." तुझ्या बाबाचा आदर्श डोळ्यापुढे ठेवत का नाही, सीमेवरती लढणाऱ्या तो किंवा कुठून गोळी येईल आणि प्राण निघून जातील त्याला माहित नाही तरीपण तो धाडसाने आपल्या सर्वांसाठी तिथे उभा आहे, आणि तू अशी वेड्या सारखी स्वतःचा जीव द्यायला निघालीस! मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. चल खाली, देवाला नमस्कार कर, आई-वडिलांची क्षमा मIग आणि चुकले म्हण". अजीच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. 

     तिघेजण जिना उतरून खाली आले तर समोर आई बाबा. 

रडवेली आजी बघून त्यांना नवल वाटले. आजीने डोळ्यानेच मल्हारला चुप राहण्यासाठी सांगितले. 


आजीने सांगितल्या प्रमाणे निहारीकेने देवाला आणि आई-वडिलांना, आजीच्या पायाला घट्ट मिठी मारून ती म्हणाली" आजी मी चुकले परत असा वेडेपणा मी करणार नाही." 

" माझी गुणाची बाय , सोन्यासारखं लेकरू माझं." आजीने अला बला घेत आपल्या कानशिलं पाशी कडाकडा बोटे मोडली. 


     बाबांचा परतीचा दिवस उजाडला. एका डोळ्यांमध्ये मल्हारचे सुख तर दुसऱ्या डोळ्यामध्ये चिंता बघून आजी म्हणाली " तू बिनघोर जा, आम्ही एकमेकांना सांभाळून राहू." 


  तेवढ्या मध्ये रजिस्टर पत्र घरांमध्ये आले. आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी तर्फे पत्र आलेले होते. सुरुवातीला सगळ्यांना पत्र मल्हार संबंधी असे वाटले, बाबांनी पत्र उघडून बघितले तो काय! निहारिका ला आर्मी मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालेली होती. तिच्या उत्तम गुणांमुळे तिला स्टेट मेडिकल कॉलेज ऐवजी डायरेक्टली आर्मीच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश देण्यात आला होता. 


     आई-बाबांनी निहारला प्रेमाने जवळ घेतले, तिच्या कपाळाचे प्रेमभराने चुंबन घेत बाबा म्हणाले," मला खात्री होते बाळ, तुझी हुशारी अशी कमी पडणार नाही. मला तुम्हा दोघांचा अतिशय अभिमान आहे." 


     आता त्या घरामध्ये आनंदाचे अगदी उधाण आलेले आहे, तुम्ही पण सर्व पेढे खा आणि सगळ्यांच्या आनंदात सहभागी व्हा.



Rate this content
Log in