SAMPADA DESHPANDE

Thriller

4  

SAMPADA DESHPANDE

Thriller

व्हॅनिश (भाग पहिला)

व्हॅनिश (भाग पहिला)

8 mins
1.0K


(भाग पहिला)

अमेरिकेत न्यू जर्सी जवळ केप मे नावाच्या छोट्याशा गावात ब्राउन फॅमिली राहत होती. त्यांचा फर्निचर बनवायचा छोटासा व्यवसाय होता. जेकब, लिझा या दोघांना ३ मुले होती. मोठे दोघे जुळे होते. शॉन आणि जॉन ते १८ वर्षांचे होते आणि छोटी मुलगी लिली १२ वर्षांची होती. मुलगे गावात शक्य होते तिकडे शिकून आता वडिलांना आपल्या व्यवसायात मदत करत होते. लिझा मेणबत्त्या बनवून संसाराला हातभार लावत होती.लिली शाळेत जात होती. ते दर रविवारी चर्च मध्ये जात असत. सर्वजण येशू आणि मेरीचे भक्त होते. त्याच्या कृपेने आपल्या संसारात सगळे चांगले आहे अशी जेकब आणि लिझाची भावना होती. आता लिझाचे काम वाढले होते कारण ख्रिसमस जवळ आला होता. तिला मेणबत्त्यांची मोठी ऑर्डर मिळाली होती. जेकबलाही फर्निचर बनवून द्यायचे होते. सगळे खूप कामात होते. मग एक दिवस जेकब आणि लिझा यांनी न्यू जर्सी ला जायचे ठरवले. त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी सामान तर घ्यायचे होतेच. पण मुलांसाठी ख्रिसमसचे गिफ्ट्स सुद्धा घ्यायचे होते. मग ठरल्या दिवशी दोघे त्याची गाडी घेऊन निघाले. गाडी म्हणजे एक छोटा टेम्पो होता. ते दिसेनासे होईपर्यंत तिन्ही मुले हात हलवून बाय करत राहिली. मग परत फिरली. दोघे मुलगे वर्कशॉपमध्ये कामाला गेले आणि छोटी लिली तिच्या खेळण्यांबरोबर खेळू लागली. मॉम - डॅड संध्यकाळपर्यंत फारफार तर रात्रीपर्यंत काम संपवून येतील अशी त्यांना खात्री होती. खूप रात्र झाली तरी ते आले नाहीत. मग तिन्ही मुले वाट पाहून झोपली. 

सकाळी उठून बघतात तर काय आई वडील अजून आले नव्हते. हे पाहिल्यावर छोटी लिली रडायला लागली. इकडे शॉन आणि जॉन यांनाही काय करावे हे कळेनासे झाले. मग ते शेजारी असलेल्या पिंटो फॅमिलीकडे गेले. ते आणि जेकबची फॅमिली खूप चांगला घरोबा होता. "पिंटो अंकल, मॉम आणि डॅड काळ सकाळी गेले होते न्यू जर्सीला अजून आले नाहीत. काय करू सुचत नाहीए. please help अस." शॉन रडत म्हणाला. त्याचा आवाज ऐकून आसपासच्या घरातले लोक जमा झाले. तो सगळ्यांना परत परत मॉम डॅड बद्दल सांगत होता. मदत मागत होता पण सगळे विचित्र नजरेनी त्याला बघत होते. "काय झालं? तुम्ही सगळे असे का बघता? प्लिज आपण पोलिसात जाऊया प्लिज." तिकडून आलेला जॉन म्हणाला. पिंटो अंकल म्हणाले," बेटा, जरा ऐकून घे. तुम्ही हे काय म्हणताय मला हेच समजत नाहीए. आपण गेली पाच वर्षांपासून शेजारी आहोत पण मी तुमच्या तिघांशिवाय कोणालाच पाहिलं नाही. तुम्ही आलात तेंव्हापासून तिघेच आहात. तुमच्याबरोबर तुमचे आई-वडील कधीच नव्हते." सगळे आपापसात कुजबुज करू लागले. पिंटो अंकल बोललेले ऐकून छोटी लिली जोरजोरात रडू लागली. मग पिंटो च्या बायकोनी तिला आत नेले. जॉन आणि शॉन आता सगळ्यांना विचारू लागले. त्याची आई मेणबत्या बनवायची वडील फर्निचर बनवायचे. कोणालाच कसे आठवत नाही याचे त्यांना आश्यर्य वाटत होते.  सगळे त्यांना म्हणू लागले कि मेणबत्त्या आणि फर्निचर बनवायचा व्यवसाय त्यांचाच होता. गावातल्या लोकांनी त्यांना काढून दिला होता. ते गावात आले तेंव्हा त्यांच्याकडे कमाईचे काहीच साधन नव्हते., बहीणही लहान होती म्हणून लोकांनी त्यांना मदत केली होती. जॉन आणि शॉनला हि गोष्ट पटत नव्हती.

आपल्याला आई - वडील असून हे लोक नाही कसे म्हणत आहेत, त्याचे त्यांना आश्यर्य वाटत होते. मग त्या दोघांनी फादरना भेटायचे ठरवले. ते धावत चर्च मध्ये गेले आणि फादरना घडलेली हकीगत सांगितली. फादरनीसुद्धा गावातल्या लोकांप्रमाणेच त्यांना सांगितले. मग मात्र त्यांचा धीर सुटला. ते तिथेच बसून रडू लागले. शॉन म्हणाला," असं कसं होईल फादर ? बाकी कोणत्या बाबतीत भास झाले असते तर ठीक होते. आमचे आई-वडील ज्यांच्याबरोबर आम्ही जन्मापासून राहतो आहोत त्यांच्या बाबतीत आम्हाला कसे भास होतील? काहीच समजत नाहीए. काल सकाळपर्यंत आम्ही त्यांच्याजवळ हसत होतो बोलत होतो. हे अचानक काय झाले?" मग फादर म्हणाले," हे बघ शॉन तुम्ही दोघे शांतपणे घरी जा आणि घरात तुमच्या मॉम-डॅडच्या काही खुणा मिळतात का बघा. जर ते तुमच्याबरोबर असले तर त्यांचे फोटो कपडे वगैरे असतील ना ? जर ते तुम्हाला सापडले तर तुम्ही इकडे या, मग आपण पोलिसात तक्रार करूया." जॉन म्हणाला ," फोटो खूप आहेत आम्ही घराच्या वॉल वर लावलेत. मॉम-डॅड च्या लग्नातले, फॅमिलीचे फोटो आम्ही रोज पहातो. आम्ही नक्की पुरावे घेऊन येतो." मग ते दोघे निघाले. धावतच घरी आले. घराला ख्रिसमस आधी पेंटिंग केले होते आणि भिंतीवर त्यांचे फॅमिली फोटो लावले होते. जॉन आणि शॉनला खात्री होती कि आपण पुरावा नक्की आणू. घरी येऊन बघतात तो काय ! फोटो तर होते पण त्यात त्यांचे आईवडील नव्हते. सगळीकडे फक्त त्या तीघांचेच फोटो होते. आता मात्र त्यांना रडू येऊ लागले. गावातले लोक म्हणत होते कि ते पाच वर्षांपूर्वी या गावात आले होते, मग त्यापूर्वी ते कुठे राहायचे हे आठवण्याचा ते प्रयत्न करू लागले. पण त्यांना हेच आठवत होतं कि हेच त्यांचं जन्मगाव आहे. त्यांचं डोकं सुन्न झालं होतं. आता काय करायचं? त्यांना आपल्या आईवडिलांबद्दल पूर्ण खात्री होती. या गावातले लोक काहीतरी वेगळंच सांगत होते. जसे काही त्यांचे मॉम-डॅड व्हॅनिश झाले होते. गावातले सगळेच लोक सांगत आहेत म्हणजे या गोष्टीत काहीतरी तथ्य आहे असे त्यांना वाटत होते. पण आईवडील आहेत याचीही त्यांना खात्री होती. आपल्याला या कामात कोणी मदत करणार नाही हे त्यांना कळून चुकले होते. त्यांच्या घरातही आईवडिलांच्या काहीच खुणा सापडल्या नाहीत. ते हताश झाले. मग त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. स्वतःच आईवडिलांचा शोध घेण्याचा.

त्यांनी मनावर दगड ठेऊन लिलीला पिंटो अंकल च्या स्वाधीन केले. त्या दोघांना माहित होते कि लिली पिंटो फॅमिलीची खूप लाडकी आहे त्यांनी तिला त्याच्या आईवडिलांकडे दत्तक मागितले होते. समजा जर आपण आलो नाही तर ते लिलीला मुलीप्रमाणे सांभाळतील. लिलीची समजूत काढून ते निघाले. तिला सोडून जाताना त्यांना यातना होत होत्या. असा त्यांनी काय गुन्हा केला होता कि त्यांना ही शिक्षा मिळत होती! दोन दिवसांपूर्वी ते एकत्र ख्रिसमस साजरा करायची स्वप्न बघत होते आणि आता त्यांचे संपूर्ण कुटुंब विखुरले गेले होते. ते निघाले. त्यांनी आईवडिलांना ज्या मार्गाने जाताना पहिले तिकडून ते निघाले. निघताना त्यांनी खाण्याचे सामान बरोबर घेतले होते. ते संपले कि मग काय करायचे त्यांना माहित नव्हते. खरंतर आपण कुठे शोधणार आहोत हेही त्यांना माहित नव्हते. ते चालत चालत गावापासून खूप दूर आले. लिलीच्या आठवणींनी ते कासावीस झाले होते. चालत चालत रात्र झाली. थंडी मी म्हणत होती. मग त्यांनी आसपासची लाकडे गोळा केली. तिथे जवळच एक तुटलेले घर होते. तिथे त्यांनी रात्रीपुरता आसरा घयायचे ठरवले. ते त्या घरात गेले शकोटी पेटवली. थोडेसे खाऊन घेतले. मग पाठीवरच्या बॅगमधले पांघरूण काढून झोपले. सकाळी उठून निघाले. समोर एक मोठे जंगल होते रस्ता जंगलातूनच जात होता. तिकडे त्यांना गाडीच्या चाकाच्या खुणा दिसल्या. त्यांच्या गावात फार थोड्या लोकांकडे गाड्या होत्या आणि त्या दिवशी त्यांचे आईवडील गेल्यावर दुसरे कोणी गेल्याचे त्यांना दिसले नाही कारण गावाबाहेर जाणारा रस्ता त्यांच्या घरासमोरूनच जात होता. म्हणजे ते आपल्याच गाडीच्या चाकाचे ठसे आहेत याची त्यांना खात्री पटली. उत्साहात ते पुढे निघाले. ते बराच वेळ चालले. मग ते ठसे त्यांना रस्ता सोडून जंगलात अदृश्य झालेले दिसले. ते रस्ता सोडून त्या ठशांच्या मागावर निघाले. तिकडची झाडे खूप उंच होती. सूर्यप्रकाश खालपर्यंत पोहोचत नव्हता. ते हातातल्या खडूने झाडांवर खुणा करत निघाले. चालत चालत ते एका तळ्याकाठी आले. ते तळे दाट झाडीने वेढले होते. जवळच एक टेकडीसारखा उंचवटा होता. रस्ता संपला होता.

इतक्यात शॉनला एक लेडीज चप्पल पडलेली दिसली. ती पाहिल्यावर ती आपल्या आईची आहे हे त्यांनी ओळखले. मग ते हाका मारू लागले. आपले आईवडील नक्कीच संकटात आहेत याची त्यांना जाणीव झाली. हळू हळू ते त्या उंचवट्याजवळ आले. तिकडे त्यांना वडिलांच्या वस्तू दिसल्या. पाकीट, शूज, बेल्ट जॉन नी पाकीट उघडून पहिले त्यात पैसे जसेच्या तसे होते. त्याचबरोबर त्यांचा सगळ्यांचा एकत्र फोटोसुद्धा होता. शॉनला आता गावातल्या लोकांचा खूप राग येऊ लागला होता. त्याला ओरडून सगळ्यांना सांगावंसं वाटत होतं," बघा ! आम्ही खोटं बोलत नव्हतो. आमचे आई-वडील आहेत. पहा त्यांच्या खुणा." पण इथे कोणीच नव्हते. ते त्या उंचवट्यावर चढले. तिकडे त्यांच्या वडिलांचा कॅमेरा सापडला. हौस म्हणून घेतलेला. व्हिडिओ शूटिंग चे कॅमेरे नुकतेच निघाले होते. वडिलांना दोन्ही मुलांनी वाढदिवसाला सरप्राईझ गिफ्ट म्हणून कॅमेरा घेऊन दिला होता. तो चांगल्या अवस्थेत होता. जवळच बॅटरी पडल्या होत्या. कोरे सेल होते. मग शॉन नी जुने सेल काढून टाकून नवीन घातले. त्यांनी कॅमेरा चालू केला. त्यात आधी तर त्यांनी एकत्र घालवलेले क्षण होते. आईचं गोड हसणं, लिलीचं मस्ती करणं, बाबानी बनवलेले सुंदर फर्निचर असे काही कौटुंबिक क्षण. मग त्या दिवशीचं जेंव्हा ते निघाले तेंव्हा आई शूट करत होती. तिन्ही मुले बाय करताना दिसत होती. लांब लांब जाताना दिसत होती. मग समोरच दृश्य दिसत होतं. जंगल चालू झालं आणि अचानक वडिलांनी गाडीला ब्रेक लावला. त्यांचा घाबरलेला आवाज येत होता. ते काहीतरी बघायला सांगत होते. मग चुकून कॅमेरा चालूच राहिला. ते दोघे धावत असल्यामुळे कॅमेरा खूप हालत होता. मग ते एका जागी लपून बसले. कदाचित तो तळ्याकाठचा उंचवटा होता. आसपास एखादं श्वापद ओरडावे तसे आवाज येत होते. मग दोन मोठ्या किंकाळ्यांचे आवाज आले आणि कॅमेरा बंद झाला. आपल्या आई-वडिलांना नक्कीच एखाद्या श्वापदाने मारले असावे असे त्यांना वाटले. ते खूप रडले. श्वापदाने मारले, हा एक अपघात मानला तर मग लोक त्यांना कसे विसरले? हे कोडे काही त्यांना सुटत नव्हते. मग त्यांनी आईवडिलांच्या अवशेषांचा शोध घ्यायचा ठरवले. त्यांना आता गावात जाऊन काहीच सिद्ध करायचे नव्हते. आपले मॉम डॅड आहेत हि त्यांना आधीही खात्री होती. आता त्यांचा शोध घेऊन त्यांना दफन करायचे होते. तिथून काही अंतरावर त्यांना हाडे सापडली. ती नक्कीच माणसाची होती त्यांच्या आकारावरून वाटत होते. मग पुढे मानवी कवट्या होत्या. २ कवट्या होत्या एक थोडीशी ब्रॉड ती एखाद्या पुरुषाची आणि दुसरी एकाद्या बाईची जरा लहान आणि जिवणी थोडी निमुळती होती. हे पाहून जॉन आणि शॉन ढसाढसा रडू लागले. आपले आई - वडील आता आपल्याला परत कधीच दिसणार नाहीत,त्यांचा शेवट याच ठिकाणी झाला हे त्यांना समजले. मग त्यांनी तिथेच एक खड्डा खणून दोघांचे अवशेष त्यात पुरले. समोरच्या एका झाडाची फांदी तोडून त्याचा क्रॉस बनवून त्यावर लावला. त्यांच्या शोधाचा अशाप्रकारे शेवट झाला होता. त्यांचे आई-वडील कायमसाठी त्यांच्या आयुष्यातून व्हॅनिश झाले होते. 

आता यापुढचा निर्णय त्यांना घ्यायचा होता. कि आईवडिलांचा मृत्यू कसा झाला याचा शोध घ्यायचा कि परत गावात जाऊन आपले आयुष्य सुरु करायचे ? मग ते परत कॅमेरा पाहू लागले. त्यात त्यांचे आईवडील खूप घाबरलेले आणि मदतीसाठी हाका मारताना दिसत होते. नंतर ते घाबरून गप्प झालेले दिसत होते. ते कशापासून तरी लपत असल्यासारखे वाटत होते. मग अचानक त्यांच्या किंकाळ्यांचा आवाज आला आणि मग सगळे शांत झाले. या सर्वात एक नवलाची गोष्ट होती ती म्हणजे त्यांना त्यांची गाडी दिसली नाही. मग नीट पाहिल्यावर त्यांना नदीत जाणारे चाकाचे ठसे दिसले. म्हणजे गाडी नदीत बुडाली तर ! जॉन मनात म्हणाला. आता त्यांचे आई-वडील नव्हते, त्यांचे सगळे जागाच उलटपालट झाले होते तर त्यांना गाडीचा मोह काय वाटणार !  त्यांनी पुढे जाऊन शोध घ्यायचा निश्चय केला. त्यांना लिलीची काळजी नव्हती. रात्र झाल्यामुळे त्यांनी जवळच एक आडोसा बनवून मुक्काम केला. थोडंसं खाऊन घेतलं. आता त्यांच्याजवळचा ब्रेड संपला होता.

दुसऱ्या दिवशी ते निघाले. समोर नदी होती. तिचे पात्र खूप रुंद होते. मग ते नदी पात्राच्या वरच्या बाजूने निघाले. जाताना रस्त्यावरच्या झाडाची खाण्यालायक फळे घेऊन ते आपल्या बॅगमध्ये ठेवत होते. ते फर्निचरसाठी लाकडे घ्यायला याच जंगलात येत. तेंव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना जंगली फळांची माहिती करून दिली होती. पण जंगलाच्या या भागात ते कधीच आले नव्हते. हा भाग खूपच आत होता. मग त्यांना प्रवाह जरा अरुंद झालेला दिसला. ते पलीकडे पार करून गेले. पलीकडचे जंगल तर यापेक्षाही दाट होते. का कोणास ठाऊक आपल्या प्रश्नाची उत्तरे आपल्याला इकडेच मिळतील असे त्यांचे मन त्यांना सांगत होते. पलीकडची झाडे आणि वातावरण वेगळे होते. त्या बाजूला गेल्यावर त्यांना कळले कि अजूनपर्यंत आपण किती घुसमटलो होतो. त्या बाजूच्या वातावरणात एक विचित्र कोंदटपणा होता आणि याबाजूच्या वातावरणात एक मोकळेपणा. मग त्यांनी पुढे पाऊल ठेवले ...........................

क्रमशः


टीप - हि कथा पूर्णपणे काल्पनिक आहे

आपल्या आईवडिलांचे काय झाले याचा शोध जॉन आणि शॉन घेऊ शकतील का? नदीच्या त्या बाजूला काय होते? जॉन आणि शॉन गावात परत येतील का ? वाचा पुढील भागात.                                                                            


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller