SAMPADA DESHPANDE

Horror

3  

SAMPADA DESHPANDE

Horror

व्हॅनिश - अंतिम भाग

व्हॅनिश - अंतिम भाग

9 mins
479


जॉन आणि शॉन त्या जंगलाचे निरीक्षण करत पुढे जात होते. खूप दाट जंगल होते. त्या बाजूची झाडेही फळांनी लगडलेली होती. पक्षांचा किलबिलाट ऐकू येत होता. त्या बाजूला इतकी झाडे असूनही एकही पक्षाचा आवाज त्यांना ऐकू आला नव्हता. थोडे अंतर चालून गेल्यावर त्यांना खूप मोठा उतार लागला. त्यांच्या लक्षात आले कि ते एका पर्वतावर उभे आहे.त या बाजूला इतका मोठा उतार कसा काय याचे त्यांना आश्यर्य वाटले. ते खाली खाली उतरू लागले उतार खूप कठीण होता. शेवटी एकदाचे ते खाली उतरले. इतक्यात काही लोकांनी त्यांना वेढले,"तिथेच थांबा नाही तर आम्ही तुम्हाला मारू." त्यांचा म्होरक्या म्हणाला. या दोघांनी हात वर केले आणि खाली बसले. त्या लोकांपैकी एकाने त्यांची झडती घेतली. त्यांच्याजवळ काहीच हानिकारक नसल्याचे त्यांना दिसल्यावर मग त्यांना त्यांनी गावात नेले. दोघे खूप थकले होते. त्यांचे कपडे फाटले होते. अंगावर जखमा झाल्या होत्या. मग त्यांना एका माणसाच्या ताब्यात दिले. त्यांनी त्यांना अंघोळ करायला सांगितले. मग त्याच्या जखमांवर पानांचा लेप लावला. हे लोक जंगलात राहणारे आदिवासी असावे असे जॉन आणि शॉनला वाटले.


या लोकांचा बाहेरच्या जगाशी फार संबंध नसावा असा तर्क त्यांनी केला. मग त्यांना पातळ सूप सारखा भात दिला. आणि तिकडेच त्यांना झोपायला सांगितले. ते रात्रीपर्यंत झोपून राहिले. रात्री त्यांना प्रमुखाने बोलवले. गावाच्या मध्यावर सगळे लोक जमलेले होते. तो प्रमुख म्हणाला," अजूनपर्यंत त्या रस्त्यानी कोणीच आले नाही कधीच. तुम्ही कसे आलात ? रस्ता खूप कठीण आहे. खरं सांगा. जर तुम्ही आम्हला काही हानी करायला आला असाल तर तुम्ही इकडून जिवंत जाणार नाही हे लक्षात ठेवा. मग शॉन एकदम म्हणाला," नाही नाही आम्ही कोणाला काय मारणार ? आमचेच आयुष्य उध्वस्त झालंय." मग दोघांनी काही लपवून न ठेवता आपली कहाणी त्यांना सांगितली. ते जसे जसे सांगत गेले तसं त्यांना खूप हलकं वाटलं. कोणाजवळतरी मन मोकळं करायची किती गरज होती हे त्यांना समजलं. ते जसे सांगत होते तसे गावातले लोक घाबरून त्यांच्याकडे बघत होते. त्यांनी सांगणं पूर्ण केलं. मग जॉन म्हणाला," केप मे मधल्या लोकांना आमचे आईवडील आठवत नाहीत. असं का झालंय समजत नाहीए. या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाल्याप्रमाणे त्यांच्यावर एखाद्या श्वापदाने हल्ला केला असावा असे वाटते.


हा एखादा अपघात मानला तर गावातले लोक त्यांचे अस्तित्व मान्य का करत नाहीत? हा मोठा प्रश्न आमच्यापुढे आहे. का कोणास ठाऊक पण आमचे पाय आम्हाला इकडे घेऊन आले. आमच्या प्रश्नांची उत्तरे आम्हाला इकडे मिळतील असे वाटते. प्लिज आमची मदत करा." "म्हणजे ते खरं आहे तर !" साधारण विशीतला तरुण बोलला. "ते ? काय ते ?" जॉनने विचारले. " ती एक दंत कथा आहे. जी आमच्या गावात पिढ्यानपिढ्या सांगितली जाते. तुम्ही जेंव्हा त्या वरच्या गावातून आल्याचे सांगितलेत तेंव्हा काहीतरी अपशकुन झाला असे वाटले. मग तुमच्या चेहऱ्याकडे बघून असे वाटले कि तुम्ही निरागस आहात म्हणून तुम्हाला गावात येऊन दिले." गावचा प्रमुख बोलला. "कोणती कथा ?" जॉन आणि शॉन एकदमच बोलले. " "या माझ्यामागे." असे बोलून तो प्रमुख निघाला. गावातले काही लोक त्यांच्यामागे गेले. चालत चालत ते गावाच्या शेवटच्या टोकाला गेले. तिकडे एका अखंड दगडात बांधलेले मंदिर होते. ते चर्चसारखे बिलकुल नव्हते. त्याचा विस्तार खूप मोठा होता. एकाच दगडात ते कोरायला किती वर्ष गेली असतील? जॉन मनात म्हणाला.


मग ते आत गेले. आत खूप मोठे गर्भगृह होते. त्या जागी २०० माणसे सहज बसू शकली असती. तिथे जागोजागी मशाली तेवत होत्या. मंदिरात भरपूर उजेड होता. त्या ठिकाणी एका चौथऱ्यावर एका प्रचंड गरुडाची मूर्ती होती. गावप्रमुखाने त्या मूर्तीच्या पायाकडे बोट दाखवले. त्या गरुडाने पायात एक ड्रॅगन पकडला होता. त्या ड्रॅगनकडे बोट दाखवून तो गावप्रमुख म्हणाला," याने मारले तुमच्या आईवडिलांना." जॉन आणि शॉन दचकले. ड्रॅगन हा मुळात काल्पनिक प्राणी आहे आणि त्यासदृश डायनोसॉर हे प्राणी नष्ट होऊनही लाखो वर्षे झाली असे त्यांना शाळेत शिकवले होते. मग हे लोक असे कसे म्हणत होते? मग प्रमुख खाली बसला. त्याच्याबरोबर सगळे लोकही बसले. तो म्हणाला," मला माहित आहे तुम्हाला काय वाटतंय ते ? कि असा प्राणी अस्तित्वात असणं शक्य नाही. हो ना? पण आपल्या जगाबाहेरची, विश्वासाला हादरून टाकणारी हि शक्ती आहे. हा खरंच ड्रॅगन आहे कि नाही माहित नाही पण आमच्या पूर्वजांनी जे पाहिलं ऐकलं त्यानुसार त्यानुसार त्याचे रूप असेच आहे. एका ड्रॅगन प्रमाणे.


तेंव्हा आमचा प्रदेश आणि तुम्ही आला तो प्रदेश एकाच उंचीवर होते. जी नदी तुम्ही पार करून आला असे सांगता, ती पूर्वी खूप मोठी होती. ती नदी म्हणजे डेव्हिल चं घर मानली जायची. दर वर्षी काही ठराविक दिवशी त्या नदीतून प्रचंड मोठे आवाज यायचे पाण्याला उकळ्या फुटायच्या आणि त्यातून डेव्हिल ड्रॅगनच्या रूपात प्रकट व्हायचा. तो आला कि खूप भुकेला असायचा हा संपूर्ण प्रदेश त्याच्या मालकीचा होता. तो प्रकट झाला कि हाताला लागतील ते सर्व प्राणी त्याचे भक्ष व्हायचे. त्यामुळे इकडची मनुष्य जमात नष्ट होऊ लागली. मग आमच्या पूर्वजांनी खूप प्रयत्नाने त्या डेव्हीलवर जिकंण्याचा मार्ग शोधून काढला. पक्षिराज गरुड. तो दूर आकाशात राहत होता. तो अत्यंत शक्तिशाली होता. मग आमच्यातले दोन शूर योद्धे त्याला शोधायला बाहेर पडले. त्यांची नावे मे आणि हॅरी अशी होती. त्यांनी अथक प्रयत्नांनी गरुडराजांच्या स्थानाचा शोध लावला. त्यांना प्रसन्न करून घेतले व डेव्हिलबरोबर लढून प्राण्यांचे रक्षण करायची विनंती केली. गरुडराजानी ती मान्य केली. परंतु गरुडराजानी त्या दोघांना एक अट घातली. त्यानंतर मे आणि हॅरी कायमसाठी व्हॅनिश झाले.

 

इकडे दुसऱ्या बाजूच्या लोकांनी डेव्हिलला प्रसन्न करून घेतले आणि दर वर्षी जेंव्हा तो येईल तेंव्हा त्याला स्वतःहुन काही माणसे बळी देण्याचे कबूल केले. त्याच्याबद्ल्यात त्याने त्या गावातील लोकांना अभय दिले कि तो त्यांचे रक्षण करेल. ती जमीन त्या गावातल्या लोकांना राहण्यास त्याने बक्षीस दिली. तसेच जे लोक डेव्हिल घेऊन जाईल ते गावातल्या लोकांच्या स्मृतीतून कायमचे पुसले जावेत म्हणजे त्या लोकांना अपराधीपणची भावना खाणार नाही, तसेच स्वतःच्या लोकांच्या मृत्यूचे दुःख त्यांना होणार नाही असाही आशीर्वाद दिला.

 

इकडे गरुडराज आणि ड्रॅगन यांच्यात तुंबळ युद्ध झाले आणि ड्रॅगनचा पराभव झाला. गरुडराज त्याला त्याच्या जगात पाठवण्यात सफल झाले. पण त्यांनी गावातल्या लोकांना हेही सांगितले कि आता जरी तो गेला असला तरी तो परत येईल. वर्षातून एकदा नाही पण सत्तर वर्षांनी एकदा आणि मग तो त्यांची भूक भागवण्यासाठी माणसांचे बळी घेईल. काही ठराविक कालावधीनंतर तो परत जाईल , पुढील सत्तर वर्षांसाठी. तो आला कि त्या बाजूच्या गावातल्या लोकांना त्यांनी मागितलेले बळी द्यावेच लागतील. जर ते नाही मिळाले तर तो तुम्हालाही मारून टाकेल. मग आमच्या पूर्वजांनी इथे गरुडराजाचे मंदिर बांधले. ते आमचे रक्षण करतात. आम्ही देवाचे पुजारी आहोत तर त्या बाजूचे तुम्ही लोक सैतानाचे पुजारी आहात. मला एका गोष्टीचे नवल वाटते कि तुमच्या मनातून तुमच्या आईवडिलांची आठवण कशी पुसली गेली नाही?" " कारण आम्ही त्या गावचे नाही. आम्ही बाहेरून येऊन इथे स्थायिक झालो. आमचा कोणाचाही फक्त जन्म या गावातला नाही. फक्त लिली त्या गावात जन्माला आली. म्हणजे आतापर्यंत तीही आपल्याला विसरली असेल." बोलता बोलता शॉनच्या डोळ्यातून पाणी वाहायला लागले. 


इतक्यात एक प्रचंड आवाज आला. त्यांनी धावत बाहेर जाऊन पहिले जॉन आणि शॉन बसून अवाक झाले वर एक मोठा ड्रॅगन होता. तो त्यांच्यासमोरच गावातल्या कितीतरी लोकांना उचलून घेऊन गेला. ड्रॅगनला गावातल्या लोकांना नेताना पाहून सर्वानाच खूप वाईट वाटले. ते काहीच करू शकत नव्हते. गावात एकाच हाहाकार मजला. अजूनपर्यंत फक्त त्याच्याबद्दल ऐकून असलेल्या ड्रॅगनचे रूप पाहून सगळे हबकले होते. यावेळी काहीतरी चुकले होते. तो गरुडराजांपेक्षा शक्तिशाली झाला होता. तो डेव्हिल होता कि नाही कोणास ठाऊक परंतु ती एक बाहेरची शक्ती होती जी त्यांना ड्रॅगनच्या रूपात दिसत होती. कदाचित दुसऱ्या जगातली. तिकडे तिचे रूप वेगळेही असेल. काहीतरी कारणामुळे ती शक्ती फक्त त्या परिसरापुरती बांधली गेली होती. जर ती बाहेर गेली तर किती हाहाकार माजेल ! गावप्रमुखांच्या मनात आले. मग त्यांनी गावातल्या सगळ्या लोकांना त्या गरुडाच्या मंदिरात जमा व्हायला सांगितले ते तिकडे सुरक्षित होते.


यावर काहीतरी उपाय शोधावा लागणार होता. मग ते चर्चा करू लागले. गावातले लोक त्यालाच दोष देऊ लागले. त्यांनीच जॉन आणि शॉन यांना गावात घेऊन अपशकुन गावात आणला असे सगळे बोलू लागले. जॉन आणि शॉन एका कोपऱ्यात गप्प बसले होते.  त्यांना काय करावे समजत नव्हते. मग गावप्रमुखाने सगळ्यांना शांत करून. आता यावर उपाय शोधायला हवे असे सांगितले. मग त्याने आपल्या दोघा मुलांना गरुडराजाच्या मंदिराच्या शोधासाठी जायला सांगितले. ते लगेच तयार झाले. हे पाहून जॉन म्हणाला," आम्ही विनंति करतो कि जर हे संकट आमच्यामुळे आलंय तर त्यावर उपायही आम्हालाच शोधावा लागेल. गरुडराजाकडे आम्ही दोघे जाऊ. तुम्ही आमची इतकी काळजी घेतलीत आता आम्हाला त्याची परतफेड करू द्या." गावप्रमुख खूप विनवणी केल्यावर शेवटी तयार झाला. मग तो त्यांना गरुडाच्या मूर्तीमागे असलेल्या एका छोट्या खोलीत घेऊन गेला. तिकडे एका भिंतीवर नकाशा कोरला होता. जिथे गरुडराजाचे स्थान होते. मग त्याच खोलीतून बाहेर जाण्याचा रास्ता होता. जॉन आणि शॉन निरोप घेऊन निघाले. त्यांना उत्तरेकडे चालत जायचे होते. 


ते प्रमुखाने सांगितलेल्या दिशेनी निघाले. जाताना त्यांना खूप आश्यर्य वाटत होते, कारण ते त्या दारातून निघाल्यापासून त्यांना कुठेही मानवी वस्ती दिसली नाही. जणू ते तो पर्वत उतरल्यापासून एका वेगळ्याच जगात आले होते. जॉन म्हणाला," शॉन तुला त्या इगल गॉड ची स्टोरी खरी वाटते का? मला तर सगळंच खोटं वाटतंय. आताच्या मॉडर्न काळात हे कसं खरं असेल? त्या प्रमुखाने आपल्याला फसवलं तर नाही ना? हे कुठे पाठ्वलंय? इथे एकही माणूस नाही. जसे या अर्थ वर फक्त आपणच आहोत.मागे सुद्धा जाऊ शकत नाही काय करायचं रे ? " शॉन हसून म्हणाला," आपल्या आयुष्यात अनेक अशा घटना घडल्यात कि ज्यावर विश्वास बसणार नाही. काही दिवस आधीपर्यंत आपण आपल्या फॅमिली सोबत किती सुखात होतो? हे ड्रॅगन ,इगल गॉड कोणी सांगितलं असतं तर मिथ समजून हसलो असतो. 


आता आपल्या आयुष्याचा मार्ग एकच इगल गॉड ला शोधून त्यांना गावाच्या रक्षणासाठी घेऊन यायचं. ते चालतच होते. असे किती दिवस गेले. मग त्यांनी पाहिलं कि ते एका पर्वतांनी वेढलेल्या जागेत आहेत. तिथे खूप थंडी होती . सर्वत्र बर्फ पसरला होता. इतक्यात शॉन ने एका ठिकाणी बोट दाखवले. एक मोठा पर्वत गरुडाच्या आकाराचा होता. त्यांनी तो पर्वत चढायला सुरवात केली. तो उंच आणि सरळ सुळका होता. तिकडे चढणे सामान्य माणसाला केवळ अशक्य होते. फक्त दुर्दम्य इच्छाशक्ती म्हणूनच ते तो सुळका चढू शकले. सुळक्याच्या टोकावर गेल्यावर त्याना एक मोठे घरटे दिसले. इतके मोठे कि त्यात शंभर माणसे आरामात बसू शकली असती. किंवा एक फुटबॉल मॅच सहज झाली असती. ते पुढे पाऊल ठेवणार इतक्यात कानठळ्या बसवणारा एक आवाज झाला. एक मोठा पर्वताच्या आकाराचा पक्षी उडत येऊन घरट्यावर बसला. तो इतका मोठा होता कि त्या घरट्यात जेमतेम मावत होता. जॉन आणि शॉन खूप घाबरले होते. तो एक गरुड होता त्याचे डोळे जॉन आणि शॉनच्या शरीराच्या आकारापेक्षा मोठे होते. ते दोघे गुढघे टेकून त्याच्यासमोर बसले आणि म्हणाले,"इगल गॉड ! आम्ही केप मे गावातून आहोत. आमच्या आई-वडिलांना ड्रॅगन नि मारले आहे. आम्हाला आदिवासी लोकांकडून आपली स्टोरी समजली.


पण आता ड्रॅगन बेछूट झाला आहे. तो तुमची पूजा करणाऱ्या लोकांवर हल्ला करत आहे. आपण आमच्याबरोबर येऊन त्या लोकांची मदत करा. जशी आपण पूर्वी केलेली. हे महान गॉड ! आपण आणि फक्त आपणच मानवजातीला वाचवू शकता." खरंतर या दोघांना हा इगल गॉड बिल्कुल आवडला नव्हता. साधारणपणे देवाचं रूप किती प्रसन्न असतं ? परंतु हा भयावह वाटत होता. ते भितीनी थरथर कापत होते. मग शेवटी तो इगल गॉड त्यांच्या भाषेत म्हणाला," ठीक आहे मी मदत करीन त्यांना, पण माझी एक अट आहे."


इकडे गावातले लोक प्राण डोळ्यात आणून त्यांच्या गरुडदेवाची वाट बघत होते. तो ड्रॅगन रोज गावावर घिरट्या घालून जे मिळतील ते प्राणी उचलून नेत होता. आजचाही दिवस असाच जाणार. प्रमुख मनात म्हणत होता. देवळाच्या खिडकीतून त्याला ड्रॅगन आलेला दिसत होता. इतक्यात उत्तरेकडून एक मोठी वावटळ उठली. आणि आपले आकाशाइतके पंख पसरून गरुडराज आले. ड्रॅगन त्यांना पाहून तोंडातून आगीचे लोळ सोडू लागला. या तुंबळ युद्धात केप मे गावाचा भूभाग खाली खचला. अनेक वृक्ष नष्ट झाले. भूकंप झाला. ड्रॅगनच्या तोंडातून निघणाऱ्या आगीमुळे आसपासचा परिसर जाळून खाक झाला. दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले पंधरा दिवस-रात्र ते चालूच होते. शेवटी ड्रॅगन नदीत नाहीसा झाला. गरुडराजांचा विजय झाला. गरुडराज त्या ड्रॅगनरूपी डेव्हिलला त्याच्या जगात परत पाठवण्यात यशस्वी झाले. दोन्ही गावातल्या लोकांनी परस्पर सहमतीने नदी बुजविण्याचा निर्णय घेतला. गरुडराजांनी मोठमोठ्या शिळा नदीत टाकून ड्रॅगन येण्याचे स्थान कायमचे बंद केले. गावातल्या लोकांनी एकच जल्लोष केला.

 

गरुडराज आपल्या स्थानी निघून गेले. यात जॉन आणि शॉन परत आलेच नाहीत हे सर्वजण विसरले. इकडे काही दिवस गेल्यावर एका मध्यरात्री गावाचा प्रमुख गुपचूप गरुडराजाच्या देवळात आला. त्याच्या हातात दोन पुतळे होते. जॉन आणि शॉन सारखे. त्यानी गरुडाच्या मूर्तीमागची एक गुप्त कळ फिरवली. तळघर उघडले गेले. त्यानी ते पुतळे तळघरात ठेवले. तिथे अजून दोन पुतळे होते मे आणि हॅरी चे. ते दोघे गरुड राजाकडे जाऊन जसे व्हॅनिश झाले होते तसेच हे दोघेही झाले. त्यांची आठवण म्हणून हे पुतळे इथे ठेवले होते.


गरुडराजानी जी अट घातली ती फक्त मे आणि हॅरी त्यानंतर जॉन आणि शॉन यांनाच माहित होती. "जर मी तुमच्या गावाला वाचवायला हवे असेल तर तुम्ही माझं भक्ष व्हा. जर तुम्ही स्वतःचं बलिदान दिलत तरच मी तुमच्या गावाला वाचवीन." हीच इगल गॉड ची अट होती. तो तरी ड्रॅगन पेक्षा काय वेगळा होता ! ड्रॅगन सुद्धा हेच तर करत होता. एक मात्र झालं एक सुंदर हसतमुख कुटुंब या जगातून कायमचं व्हॅनिश झालं.   

(समाप्त)


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror