Sandip Kamble

Horror

3.7  

Sandip Kamble

Horror

रूममेट

रूममेट

2 mins
2.3K


2011 साली श्वेता ने पुण्याचे इंजीनीरिंग कॉलेज जॉइन केले. श्वेता मुळची पुण्याबाहेरील असल्याने पुण्यात तिने आपल्या कॉलेज चे हॉस्टेल घेण्याचा निर्णय घेतला. हे गर्ल’स हॉस्टेल कॉलेज च्या कॅम्पस जवळच होते.


श्वेताला प्रिया बरोबर रूम मिळाली , दूसरा मजला, ‘C’ बिल्डिंग . रूम 3 जंनींसाठी होती , पण काही कारणाने तिसरी मुलगी या रूम मध्ये assign नवती केली. त्यामुळे तिसरा बेड आणि कपाट श्वेता जॉइन झाल्यापासून रिकामेच होते.


पहिला एक आठवडा छान होता. नवीन class, नवीन मित्र-मैत्रिणी,नवीन जागा ,नवीन शहर. श्वेता खूप खुश होती. घरापासून दूर असली तरी इथे तिचे मन छान रामायला लागले होते. पण अचानक दुसर्‍या आठवड्यात प्रिया (श्वेता ची roommate) थोडी विचित्र वागायला लागली. प्रियाने अचानक रोज सकाळचे झोपायला सुरू केले. दिवसभर ती बेड वर झोपून असे. आणि सकाळी श्वेता कॉलेज ला जात असे. त्यामुळे श्वेताला प्रिया शी बोलायला वेळच मिळत नसे. जेव्हा कधी प्रिया जागी असेल तेव्हाही ती खूप कमी बोलत असे. श्वेता ने तिच्याशी बोलायचा खूप प्रयत्न केला, तिला वाटले प्रिया आजारी असेल किंवा कसल्यातरी काळजीत असेल म्हणून बोलून पहावे, पण प्रिया खूप कमी बोलत.


एक दिवस रात्री श्वेता ला तहान लागल्यामुळे अचानक जाग आली. आणि तिने पहिले , की रूम च्या lights ON आहेत आणि प्रिया तिच्या स्टडी टेबलवर बसली आहे. प्रिया चे केस मोकळे होते आणि तिच्या समोरील पुस्तक उलटे होते.


श्वेताने प्रिया ला हाक मारली. एकदा , दोनदा , तीनदा , अनेकदा ... पण काहीच उत्तर नाही. श्वेताने एकदा खूप जोरात हाक मारली इतकी जोरात की रूम बाहेरही तिचा आवाज गेला, तेव्हा प्रियाने श्वेतकडे पहिले पण प्रिया ची नजर काळीज चिरून नेणारी होती. प्रियाचे डोळे मोठे झाले होते आणि लाल रक्ता सारखे दिसत होते आणि श्वेता कडे रागाने पाहून ती श्वेताला म्हणाली , “झोप”.


श्वेता हे ऐकून आणि पाहून भीतीने थरथरत होती. काय करावे हे तिला सुचत नवते. कसेबसे सकाळचे 6 वाजेपर्यंत श्वेता ने डोळे मिटून घेतले. सकाळी उठल्यावर लवकर आवरून ती कॉलेज ला पळाली आणि lecture संपल्या संपल्या , ती warden च्या ऑफिस मध्ये आपली रूम चेंज करण्याची प्रोसेस करण्यासाठी गेली.

Warden ने जेव्हा तिला रूम चेंज करण्याचे कारण विचारले , तेव्हा श्वेता ने घडलेली हकीकत warden ला सांगितली. हे ऐकून warden चे तोंड उघडे च राहिले. श्वेता ने काय झाले विचारले असता तिला warden ने जे संगितले ते ऐकून श्वेताचा जीव जायचाच बाकी राहिला होता. Warden म्हणाल्या,

“त्या रूम मध्ये तू सोडलीस तर कोणीच राहत नाही श्वेता... तू जॉइन झाल्यापासून दुसरी कोणतीच पार्टनर तुला assign नव्हती केली”


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror