Prakash Patil

Horror

2.8  

Prakash Patil

Horror

"रोलिंग हिल्स"

"रोलिंग हिल्स"

7 mins
21.2K


सुमारे ४०० मैलांचा प्रवास करून त्यांची टॉयटो प्रायस कार रोलिंग हिल्सला पोहोचली तेव्हा संध्याकाळ झाली होती. या प्रवासात अमितला आवडला तो “सॅन फ्रांसिस्को-ओकलैंड बे ब्रिज” ! खोल समुद्रावरून जाणाऱ्या ८ मैलाहुन जास्त लांबीच्या या पुलाच्या मधोमध येर्बा ब्यूएन्ना बेट लागल्यानंतरचा लांबलचक बोगद्यातला प्रवास तर अतिशय रोमहर्षक होता.

"हमित, Treasure island is an artificial island.. which is build in 1936-37 for Golden Gate International Exhibition organized in 1939." कार ड्राइव करता करता डॅनियल अमितला येर्बा ब्यूएन्ना बेटाच्या पलीकडे असलेल्या ट्रेझर आइलैंडची माहिती देत होता. "quite interesting….." अमित पुटपुटला. आपल्या नावाचा डॅनियलने "हमित" असा उच्चार केल्याचे त्याला हसू येत होते.

ओकलैंड मधील गुगल मुख्यालयाच्या आसपास असलेल्या Imagine Systems मधे एका आठवड्यापूर्वीच अमित असिस्टेंट प्रोजेक्ट मेनेजर म्हणून जॉईन झाला होता. सिनियर प्रोजेक्ट मेनेजरने काल त्यांच्या केबिन मधे बोलावून डॅनियल आणि अमितला त्यांच्या नविन प्रोजेक्टची कल्पना दिली होती. पाच वर्षांपूर्वी कंपनीने “पालोस व्हर्देस” द्वीपकल्पावरील रोलिंग हिल्सवर सुमारे २५ एकर कुरणाची जागा एका पडक्या बंगल्यासहित मिलियन डॉलरला विकत घेतली होती. प्रॉपर्टी विकत घेतांना त्या पडक्या बंगल्यात भूतांचे वास्तव्य आहे अशी कुणकुण कंपनीचे सी.ई.ओ.जोसेफ स्मिथ यांच्या कानावर आली होती, पण त्यांचा असल्या गोष्टींवर विश्वास नव्हता. त्या जागेवर एक Imagine Park बनवायचा ५०० मिलियन डॉलरचा प्रोजेक्ट त्यांच्या मनात घोळत होता. भूतांच्या अफवेमुळेच त्यांना ही जागा एवढ्या कमी किमतीत मिळाली होती. त्या पडक्या बंगल्याची कंपनीने तात्पुरती डागडुज्जी केली होती, जेणेकरुन कधी कुणाला राहायचे झाल्यास सोय होईल. पण ती प्रॉपर्टी घेतल्यापासून त्या बंगल्यात अजुनपर्यंत कुणी वस्तीला राहीले नव्हते.

....आणि आज त्या फ़ार्म हाऊसच्या प्रवेशद्वाराजवळ त्यांची कार पोहोचली होती .आता अंधार खुपच दाट झाला होता...आणि अत्यंत भयाण शांतता पसरली होती. कारच्या हॉर्न चा आवाज ऐकून दोन सिक्यूरिटी गार्ड लगबगीने समोर आले व त्यांनी गेट उघडले.

"वेलकम सर!" सिक्यूरिटी गार्ड्सनी त्यांचे स्वागत केले.

गेट लावून त्यांचे सामान घेऊन ते बंगल्याच्या प्रवेशद्वाराजवळ आले. दरवाजा उघडून सामान हॉलमधे ठेवल्यावर एक सिक्यूरिटी गार्ड विनवणीच्या सूरात म्हणाला, "Sir, please don't go towards back side of this home …..there is something horrible" आणि ते दोन्ही सिक्यूरिटी गार्ड पुन्हा गेटजवळ निघुन गेले.

"काय वाटते, इथे भूते असावित?" अमितने डॅनियलला हसत हसत विचारले.

"No. Not at all. I don't believe.." डॅनियल अंग झटकत उदगारला.

"I too..." अमितने दुजोरा दिला.

"Then we must go to backside and find out what is horrible there.." डॅनियल एकदम उत्तेजित झाला होता, भुताटकीचा शोध घ्यायला."Yeah!Sure! But we will have bath and some food first.." म्हणत अमित एका बाथरूमच्या दिशेने वळला.आंघोळ केल्यावर प्रवासाचा सारा शीण दूर झाला.एकदम ताजे तवाने वाटू लागले. मग दोघांनी जेवण केले.ते दोघे इथे आल्यापासून वातावरणात कमालीची शांतता होती.जेवल्यानंतर फ्रूट सलाड घेत असतांना अचानक मागच्या बाजूला जोराजोरात खिडक्याची तावदाने आदळू लागली. हॉलच्या खिडक्या मात्र उघड्या असूनही जराही हलत नव्हत्या. मग मागच्या बाजूच्याच् खिडक्या का आदळत होत्या? त्यांनी या बंगल्याच्या बाबतीत जे ऐकले होते ते खरे ठरत होते....मागच्या बाजूच्या खिडक्यांची आदळा आपट वाढतच होती.एकाएकी एक पुरुषी घोगरा आवाजही मागच्या बाजूला घुमू लागला. दोघांनी प्रश्नार्थक नजरेने एकमेकांकडे पाहिले आणि ते न घाबरता आवाजाच्या दिशेने धावले. मागचा दरवाजा उघडला तर तिथे काही नव्हते. खिडक्यांचा आवाज व पुरुषांच्या हसण्याचा आवाज बंद झाला होता. आजुबाजुला कोणी नाही याची खात्री करून त्यांनी पाठचा दरवाजा लावला व ते पुन्हा हॉलमधे आले."हमित,या बंगल्याच्या बाबतीत खूप गोष्टी, अफवा आहेत. पूर्वी इथे काम करणारी बरीच माणसे काम सोडून पळून गेली आहेत. असे म्हणतात या फार्मचा मालक डेविड कार्टर हा खूप धीट माणूस होता. पण ते एक गूढ व्यक्तिमत्व होते. तो जख्ख् म्हातारा होईपर्यंत इथेच रहात होता. या फार्ममधे बऱ्याच लोकांचा गूढ़रित्या मृत्यु झाला होता. पण डेविड कार्टर मात्र नैसर्गीक मृत्युने मरण पावला. त्याला वारस फ़क्त एक भाचा होता, जो स्वतः तिथे कधी राहिला नाही. मामाच्या मृत्यूनंतर लगेच त्याने ही प्रॉपर्टी विकावयास काढली होती. पण भुताटकीच्या अफवेमुळे कुणी खरेदीदार पुढे येत नव्हता.अशावेळी आपले सीईओ जोसेफ स्मिथ यांनी एकाच बैठकीत या प्रॉपर्टीचे डील फाइनल केले. गेल्या पाच वर्षात इथे घडलेल्या काहीविचित्र घटनांमुळे घाबरुन इथून १०-१५ सिक्यूरिटी गार्ड्स काम सोडून पळून गेलेत. पण स्मिथ साहेबांनी त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिलेले नाही. आता त्यांच्या डोक्यातल्या Imagine Park च्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करायची आहे. उदया सकाळी आपण सुरुवात करू या..let's go to bed now.." ते दोघे वेगवेगळ्या बेडरूम मधे गेलरात्री एकच्या सुमारास कुत्र्यांचा जोरजोरात भूंकण्याचा आवाज येऊ लागला. पुन्हा मागच्या बाजूच्या खिडक्या जोराजोरात आदळू लागल्या. अमितने टॉर्च घेतली. मागच्या बाजुचा दरवाजा उघडला. खिडक्या आदळतच होत्या. वारा इतका जोरात येत होता की आपण उडून जाऊ की काय असे वाटत होते. इतक्यात पाठून कुणाचा तरी हात खांद्यावर पडला. अमितने दचकुन मागे पाहिले तर तो डॅनियल होता. कुत्र्यांच्या भूंकण्याचा आवाज साधारण शंभरेक फुटावरून येत होता. पुन्हा कालच्या सारखाच पुरुषी हसण्याचा आवाज त्या दिशेने येऊ लागला. ते त्या आवाजाच्या दिशेने पुढे सरसावले. जरा पुढे गेल्यावर त्यांच्या लक्षात आले... पुढचा भाग एकदम उंच टेकड़ीसारखा होता. चढ़ता चढ़ता त्यांची दमछाक झाली. टेकडी चढल्यानंतर तीस-चाळीस फुट पुढे गेल्यावर पुन्हा खोलगट भाग होता... आणि त्या पलिकडच्या टेकडीवर भूंकणाऱ्या कुत्र्यांच्या आकृत्या दिसत होत्या. भेसुर हसण्याचा आवाजही तिथुनच येत होता. दोघेही टेकडी उतरण्याच्या प्रयत्नात खाली घसरले. गडगडत खाली आले. कसे बसे अंग झटकत उभे राहिले. आता पुढे डॅनियल होता, अमित त्याच्या मागे होता. समोर एक ओढ़ा होता. पण सुकलेला….. नुसत्या दगड गोट्यांचा... डॅनियलने ओढ़ा पार करण्यासाठी एक पाय उचलला ... आणि...तो हवेतच राहिला... दूसरा पाय उचलला तोही हवेतच.. डॅनियल हवेतच अधांतरी लटकला....थंडीबरोबरच डॅनियल भीतीनेही गारठला. आपल्याला कोणत्यातरी अदृश्य, अज्ञात शक्तीने हवेतल्या हवेत अधांतरी लटकत ठेवले आहे हे त्याच्या कल्पनेपलीकडचे तर होतेच पण या रात्रीच्या वातावरणात अत्यंत भीतीने तो वरच्या वर थरथरत होता. हे सगळं डोळ्यासमोर दिसत असतांना अमितच्या तोंडून शब्दच फूटत नव्हता…. त्याच्या समोर डॅनियल हवेत लटकत होता. जसे कुणी त्याला उचलून धरले होते. पाय जमिनीवर टेकवण्याचा तो केविलवाणा प्रयत्न करत होता.....मनाचा हिय्या करून डॅनियलच्या मदतीसाठी अमित पुढे सरसावला....त्याने पाऊल उचलले आणि त्याचेही पाय वर उचलले गेले.. हे काय होतेय... दोघेही भयभीत होऊन एकमेकांकडे पाहात होते.....आणि पुन्हा अचानक ते खाली आले. त्यांचे पाय जमिनीला आले. प्रसंगावधान पाहून अमित मागे वळला. डॅनियलनेही त्याचेच अनुकरण केले. दोघांनी पुन्हा पाय उचलले आणि पुन्हा तेच झाले. पुन्हा ते वर हवेत तरंगले. पण २०-२५ सेकंदांनी पुन्हा खाली जमिनीला पाय टेकताक्षणीच त्यांनी समोरच्या बाजूला झेप घेतली. ते जमिनीवर पडले आणि बंगल्याच्या जीव मुठीत धरून धावत सुटले.

दुसऱ्या दिवशी Imagine Farms च्या गेटच्या सभोवताली हजारो लोकांची गर्दी झाली होती. लोक दाटी वाटीने उभे राहून एकमेकांना रेटत होते आणि पोलिसांनी त्यांना थोपवून धरून ठेवले होते.फार्मच्या चारही बाजूंना पोलिसांचा वेढा होता.

नासाचे हेडक्वार्टर असलेल्या वॊशिंग्टन डीसी येथील नऊ मजल्याच्या इमारतीतील एका कॉन्फरेन्स रूम मध्ये काही अधिकारयांसोबत Imagine Systems चे सी.ई.ओ. जोसेफ स्मिथ, अमित आणि डॅनियल बसले होते. तो अधिकारी त्यांना माहिती देत होता.

"ग्रेस" (GRACE) i.e. Gravity Recovery and Climate Experiment हा उपक्रम नासा आणि जर्मनीतील DLR या संस्थेद्वारे संयुक्तपणे राबविण्यात आला होता. मार्च २००२ पासून या कार्यक्रमांतर्गत कार्यरत असलेल्या GRACE चा कार्यकाल सुरुवातीस पाच वर्षासाठी निश्चित करण्यांत आला होता. परंतु २०१७ पर्यंत ही दोन्ही याने सुस्थितीत कार्यरत होती. सप्टेंबर २०१७ नंतर एका यानातील बॅटरी मधील बिघाडानंतर ते बंद करण्यात आले. पृथ्वीच्या वरील ५०० किलोमीटर ध्रुवीय कक्षा मध्ये २२० किलोमीटर अंतरावर उडणाऱ्या दोन समान अंतराळयानांनी GRACE बनले आहे. पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भिन्न भिन्न असू शकते. कारण पृथ्वीचे वस्तुमान सर्व ठिकाणी एकसमान नाही. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील काही ठिकाणे दाट घनतेची, तर काही ठिकाणे ही कमी घनतेची आहेत. या विसंगतींची निरीक्षणे नोंदण्यासाठी GRACE चे डिझाइन केले गेले होते. ग्रेस हे गुरुत्वाकर्षण विसंगतींच्या तत्त्वावर आधारित असून पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण क्षेत्रातील बदलांचे अचूकपणे निरीक्षण करण्यासाठी GRACE उपक्रम सुरु करण्यांत आला होता. दाट वस्तुमान असलेल्या कक्षेच्या क्षेत्रावरून GRACE जात असल्यास त्याची गती वाढते आणि तिथून दूर जाताना त्याची गती मंद होत जाते. कॅनडातील हडसन बे च्या आसपासच्या परिसरात अशी विसंगती गेल्या ४० पेक्षा जास्त वर्षांपासून आहे. आता तुमच्या लक्षात आले असेलच की तुम्ही जे अनुभवले ते काय हो“Ẅhat? You mean to say there is low gravity in our Rolling Hills ofiice area?"

"yes! खरे पाहता आम्हीही या विसंगतीने चक्रावून गेलो आहोत. GRACE ने या निरीक्षणांची नोंद कशी केली नाही हे एक कोडे आहे आणि फक्त दोन ते तीन हेक्टर परिसरातच अशी गुरुत्वाकर्षणाची विसंगती कशी असू शकते हा प्रश्न आम्हाला पडला आहे. पण विज्ञानाच्या आधीच्या निष्कर्षांत नेहमीच सखोल संशोधनाने काहीतरी नवीन सापडत असते तसेच हे असावे. तिथल्या नदीच्या पात्रात असलेल्या दगडांमध्ये गुरुत्व विरोधी लहरी असाव्यात असा देखील प्राथमिक अंदाज आहे."

रात्री अंधारात बंगल्यात परतल्यावरही त्या दोघांनी धीर सोडला नव्हता. ते विचार करत बसले. जे काही घडले ते विचित्र आणि अनाकलनीय असले तरी त्यात भूतप्रेत असला काही प्रकार नव्हता या बाबतीत दोघांचेही एकमत झाले. या मागे काहीतरी शास्त्रीय कारण असावे हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच सीईओ बरोबर संपर्क साधला आणि पुढची चक्रे वेगाने फिरली.

ओढ्याच्या ठिकाणी अतिशय कमी गुरुत्वाकर्षण होते हे खरे शास्त्रीय कारण होते त्यांच्या हवेत तरंगण्याचे! एखादा कुत्रा इथे हवेत तरंगल्यावर तो व इतर कुत्री जोरजोरात भुंकायला लागली असावित...आणि तो भेसुर हसण्याचा आवाज...त्याचेही गूढ़ उकलण्यास मग वेळ नाही लागला. बंगल्यापर्यंतचा सपाट भाग, त्यानंतर उंच टेकडी, ओढ़ा व पुन्हा उंच टेकडी अशा विचित्र भौगोलिक परीसरामुळे वारा उलट सुलट फिरून एक वावटळ तयार होत होते. ओढ्याच्या पलिकडच्या टेकडीवर असलेल्या मोठ मोठ्या झाडांच्या व झुडुपांच्या मधे वारा घोंगावतांना कुणीतरी जोराजोरात हसण्यासारखा आवाज व्हायचा...आणि रात्रीच्या शांततेत ते खूप भीतिदायक वाटायचे. ओढ्यामध्ये असलेली गुरुत्व कमी करणारी कंपनेही स्थिर नव्हती. त्यामुळे ते काही सेकंदानी हळू हळू खाली आले. पुन्हा पाय उचलल्यावर ते वर गेले. काही सेकंदांनी पुन्हा खाली आले. *** Imagine Systems चे सीईओ नासाच्या चीफ साएंटिस्टबरोबर त्या ओढयाजवळ उभे होते. नासाचे अनेक शास्त्रज्ञ, फोटोग्राफर ओढ्याच्या दोन्ही बाजूने कार्यरत होते. समोरून येणाऱ्या डॅनियल व अमितला पाहुन जोसेफ स्मिथ खुश झाले. त्यांच्याशी हस्तांदोलन करीत त्यांनी त्यांची नासाच्या चीफ साएंटिस्ट बरोबर ओळख करून दिली. "Mr.Amit and Mr.Daniel"

"Well done boys.." नासाच्या चीफ सायंटिस्टने कौतुकाने दोघांचीही पाठ थोपटली. अमित आणि डॅनियल त्या कौतुकाने भारावुन गेले.

"I am proud of you. You have invented low-gravity point on the earth…" नासा चीफने पुन्हा एकदा त्या दोघांची पाठ थोपटली......पटापट कॅमेऱ्यांचे फ्लॅश पडले. इतकी वर्षे पृथ्वीवर दडलेल्या एका मोठ्या रहस्याचा उलगडा झाल्याचे समाधान मिश्रित हास्य सर्वांच्या चेहऱ्यावर झळकत होते.....

(समाप्त).


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror