कळत नकळत (प्रेमकथा)
कळत नकळत (प्रेमकथा)
सावीने एक गिफ्ट आणि फ्रेंडशिप बँड वीणाच्या हातात दिल आणि हे गाडीवाल्या अंकलने तुला दिलय एवढ सांगून बेडरुममध्ये निघून गेली.. वीणाने गिफ्ट उघडल पाहते तर काय त्यात एक लाल रंगाच्या छोट्याश्या टेडीच कीचेन होत..
अगदी गोंडस असा लाल रंगाचा टेडी आणि त्या टेडीच्या पोटावर छोट्याश्या हार्ट शेपची उशी.. ? त्यावर ” I ❤ U ” चा मेसेज..वीणा तर त्या टेडीच्या प्रेमातच पडली.. सोबत इंद्रधनुच्या रंगाची रबराची फ्रेंडशिप बँड.. तिच्या चेहर्यावर नकळतच हासू उमटले.. गालातल्या गालात हलकेच हसली..
पण दुसऱ्याच क्षणी भानावर आली.. त्या गाडीवाल्याने मलाच का दिल आपल तर साध बोलणही नाही त्याच्याबरोबर.. सावीला शाळेत गाडीने ने आण करतो तो, तेवढीच काय ती ओळख.. आपण बाईसाहेबांना सांगाव का? ? की नको??? आधी आपण त्याच्याशी स्पष्ट बोलू आणि मग काय ते ठरवू.. तस गिफ्ट खरच खुप छान आहे.. पहिल्यांदाच कुणीतरी आपल्याला दिलय.. असे अनेक विचार तिच्या मनात सुरू होते..
वीणा… दिसायला देखणी अशी की बघताच क्षणी कोणीही तिच्या प्रेमात पडेल.. गोरीपान, सालस अशी मुलगी, शिक्षण जेमतेम… सहा महिने झाले सावीला सांभाळण्याची नोकरी करतेय.. आईबाबा गावी रहायला.. घरची परिस्थिती हलाखीची म्हणून वीणा मुंबईत सावी ची देखभाल करण्याची नोकरी करतेय.. महिना चार हजार पगारावर..
सावीला शाळेत ने आण करण्यासाठी सावीच्या आईबाबांनी एक खाजगी गाडी ठरवली होती.. त्याच गाडीचा ड्रायव्हर म्हणजे भूषण, सावीचा गाडीवाला.. ऊंच, सावळा पण रुबाबदार दिसणारा, राहणीमान अगदीच साधे… सावीचा आधीचा गाडीवाला थोडा स्त्री लंपट होता.. मुलीची जबाबदारी योग्य हातात असावी म्हणून त्याच्या जागी भूषणची गाडी निवडली कारण बर्याच पालकांकडून त्याची रीतसर चौकशी करूनच निवड केली होती.. हे वीणाला बाईसाहेबांकडून माहित होतं.. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे भूषण सावीला शाळेसाठी पिक करायला आला असता.. वीणाने अगदी शांतपणे त्यास समजावले..
वीणा : अहो तुम्ही अस गिफ्टवैगरे देऊ नका..
भूषण : ठिक आहे.. अस म्हणत उशीर होत असल्या कारणाने सावीला घेऊन शाळेत निघून गेला..
मग पुढचा आठवडाभर भूषण नेहमीप्रमाणे सकाळी सावीला शाळेत घेऊन जायचा आणि दुपारी शाळा सुटल्यावर परत घरी सोडायचा.. एक दिवस वीणा स्वतः सावीला आणायला शाळेत गेली.. भूषणही मागून गाडी घेऊन आला.. शाळा सुटल्यावर आपली नेहमीची पाच मुल गाडीत बसवली सोबत सावी आणि वीणाही गाडीत बसले आणि सर्वांना घरी सोडायला तो निघाला.. वीणा ड्रायव्हर सीटच्या बाजूलाच बसली होती.. तो काहीच बोलत नाही हे बघून तीनेच सरळ बोलायला सुरुवात केली..
वीणा : अहो मला गिफ्ट आवडल नाही अस काही नाहीये.. छान होत गिफ्ट, पण ना अस गिफ्ट वैगरे नका देत जाऊ..
(त्या दिवशी घाईत असल्याने त्याने तिच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नव्हत पण आज मात्र त्याने पलटून विचारलच)
भूषण : (आश्चर्याने) कोणत गिफ्ट??
वीणा : हे काय… (स्वतःकडच्या घरच्या किल्लीला अडकवलेल कीचेन दाखवत)
भूषण : हे तुमच्याकडे कस?? मी दोन दिवस झाले माझ्या गाडीत शोधतोय.. माझ्या गाडीतल्या मुलाने इथे फ्रंट मीररला लावण्यासाठी मला दिल होत..
इतक्यात सावीच घर येत आणि बोलन अर्धवट सोडून वीणा आणि सावी गाडीतून उतरून घरी जातात.. दुसर्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत जाताना त्याने गाडीतल्या मुलांना विचारले की इथे डेस्कबोर्डवर ठेवलेल टेडीच कीचेन कुठे गेल.. तेव्हा सावी म्हणाली की ते तिने वीणाला दिल.. गाडीतली इतर मुले त्याला कारण सांगू लागली..
मुलगा १ : अरे अंकल वो रोझ आपको देखती है ना| ☺
भूषण : हा तो ??? ? 🤔
मुलगा २ : आपको स्माईल देती है, आप भी उसको स्माईल देते हो| 🤗
सावी : म्हणून आम्ही तुमची सेटिंग लावत होतो. . ?
भूषण : ए बाई हे नसते उद्योग कोणी करायला सांगितले?? 🤨 घरी सांगु का तुमच्या?? तुम्ही हे काय उद्योग करता ते.. अभ्यासात लक्ष द्या थोड..
तशी सगळी मुलं घरी न सांगण्याची विनंती करतात.. भूषण त्या दिवसापासून वीणाला टाळण्याचाच प्रयत्न करायचा पण ती मात्र त्याच्या अशा टाळण्याने अजूनच त्याजवळ ओढली जात होती.. दिसायला देखणी असल्याने सतत तिच्या मागे मुलांची रांग असायची.. तिच्याशी बोलण्यासाठी कारणे शोधायची.. पण ती मात्र अगदीच साधी सरळ होती..
भूषण सरळ मुलगा आहे, मेहनती आहे, कामधंदा नीट सांभाळणारा आहे, शिवाय सावी आणि आजूबाजूचे त्याच्या ओळखीचे पालकही त्याची तारीफ करत असे… त्याने तिला कधी नजर वर उचलून सुद्धा पाहिले नव्हते.. नकळत त्याच्या चांगुलपणावर ती भाळली होती..
एके दिवशी तिने घरच्या डायरीतून त्याचा मोबाईल नंबर मिळवला आणि त्याला घराच्या बाहेरच्या पीसीओ वरून नेहमी फोन करु लागली.. ओळख तर होतीच पण त्याच्या बोलक्या स्वभावामुळे मैत्रीही झाली.. त्यांच्या मैत्रीला आता जवळपास दिड वर्ष पूर्ण झाल… भूषण तिच्याकडे फक्त एक चांगली मैत्रीण म्हणूनच पहात होता.. आता हळूहळू वीणाला भूषण आवडायला लागला होता.. त्याच्याच स्वप्नात ती गुंतलेली असायची..
शाळा संपून मे महिन्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या.. शाळा सुरू असताना सावीच्या निमित्ताने तीला त्याला बघता तरी येत होते पण आता तर ते मुश्किल होते.. शाळा पुन्हा सुरु होण्याची ती आतुरतेने वाट पाहत होती.. तो दिसत नसल्याने ती खूप बैचेन असायची..
🎶 कुछ तो हुवा है, कुछ हो गया है
कुछ तो हुवा है, कुछ हो गया है
कुछ तो हुवा है, कुछ हो गया है
दो चार दिन से लगता है जैसे
सब कुछ अलग है, सब कुछ नया है
कुछ तो हुवा है, कुछ हो गया है 🎶
एक दिवस तिने नेहमीप्रमाणे संध्याकाळी त्याला घराच्या बाहेरच्या पीसीओ वरून फोन केला.. आणि अर्धा तासासाठी भेटण्याची विनंती केली.. नुकताच जुलै महिना सुरू झाला होता.. बाहेर रिमझिम पाऊस सुरू होता.. वीणा मार्केटच कारण सांगून घराबाहेर पडली खरी पण नेमकी घाई घाईत छत्री विसरली आणि अर्ध्या रस्त्यात पाऊस लागल्याने पूर्ण भिजली..
मुलांना घरी सोडता सोडता ट्रॅफिकमध्ये भूषणला उशीर झाला.. त्याला वाटले पाऊस आहे तर कदाचित ती येणार नाही म्हणून तो परतीच्या दिशेने निघाला तरी मनात शंका येऊन तो त्याच रस्त्याने निघाला जिथे वीणाने भेटायचे ठरवले होते.. थोड्या अंतरावर त्याला ठरलेल्या ठिकाणी वीणा उभी दिसली.. त्याने हॉर्न वाजवून तिला गाडीत येण्याचा इशारा दिला..
वीणा गाडीत येऊन बसली.. पावसात पूर्ण भिजल्यामूळे कपडे जवळ जवळ अंगाला चिटकून बसले होते तिला थोडे लाजल्यासारखे झाले.. पण आज स्पष्ट बोलायचच हे मनात पक्क करून आली होती ती.. त्यामुळे हलकेच हसून तिने त्याला प्रतिसाद दिला. भूषणने एकदाच तिला पाहिले.. तिला अशा भिजलेल्या अवस्थेत बघून त्याने आपली नजर दुसरीकडे वळवली.. उगाच तिला uncomfortable होउ नये म्हणून.. त्याला पण थोडी लाजच वाटत होती.. अस गाडीत , भरपावसात दोघेच बसून फारच अवघडल्यासारखे झाले होते भूषणला… तो नजर चोरून शांतच होता.. शेवटी वीणानेच थेट बोलायला सुरवात केली..
वीणा : भूषण तु मला आवडतो.. ? मला आवडेल तुझ्याशी लग्न करायला..
(आज अहोजाहोची जागा अरे तू रेने घेतली होती)
भूषणसाठी हे unexpected होत.. नुकताच तो करियरमध्ये सेटल होण्यासाठी प्रयत्न करत होता.. वडिलोपार्जित गाडीचा मुलांना ने आण करण्याचा व्यवसाय वाढवत होता.. गाडीधंद्याच टेंशन, त्यामुळे घरी होणारे वाद, व्यवसायासाठी अर्धवट सोडायला लागलेल शिक्षण, आईच आजारपण यासर्वात वीणासोबत मारलेल्या गप्पा त्याला सुखावत होत्या.. तिच्यासोबत गप्पा मारताना तो बाकीच्या गोष्टी त्या वेळापुर्ततरी विसरत होता… आज अस अचानक वीणाच्या बोलण्याने तो गोंधळून गेला.. तस तर वीणाला नाही म्हणण्यासारख काही नव्हत पण त्याने तसा कधी विचारच केला नव्हता..
भूषण : वीणा तू खरच खुप चांगली मुलगी आहेस.. तुला माझ्यापेक्षाही चांगला मुलगा मिळेल.. मी तुझ्या तोडीचा नाही ग.. तु इतकी सुंदर आणि गोड आहेस.. मी हा असा रंगाने सावळा.. आपल्याच टेंशनमध्ये असणारा..
वीणा : मला तुझा स्वभाव आवडला.. साध सरळ राहणीमान आवडल.. खुप मुल माझ्या मागे मागे करतात पण तुम्ही आजपर्यंत कधीही मला नजर उचलून सुद्धा पाहिले नाही.. आताही बघ ना माझाशी बोलतोयस पण नजर मात्र चोरत आहेस..
भूषण : (काहीच न सुटल्याने) आईवडील म्हणतील तस.. मला त्यांना दुखवून काही करायच नाही.. तू आधी तुझ्या घरी सांग, तुझ्या घरी होकार असेल तर मीही माझ्याघरी बोलतो.. पण निदान तो पर्यंत तरी आपल मित्रमैत्रिणीच जस नात आहे ते असच असू देत उगाच तू गैरसमज करुन घेऊ नकोस…
थोड्या वेळाने त्याने तिला घराजवळ सोडले.. वीणा मनोमन खूप खुश होती होकार दिला नसला तरी नकारही दिला नव्हता त्याने.. तिने दुसऱ्या दिवशी सकाळी गावी आपल्या आईला फोन केला आणि भूषण बद्दल सगळं सांगुन टाकल.. आईने बर म्हणत विचार करून सांगते म्हणून फोन ठेवला..
पंधरा वीस दिवस असेच निघून गेले.. एक दिवस अचानक वीणाची आई मुंबईत आली.. कसलस कारण देऊन वीणाला गावी घेऊन गेली.. पाच सहा दिवस झाले वीणा गावी जाऊन.. त्या दिवसापासून भूषणला तिचा फोनच नाही आला.. तो तरी कसा फोन करणार होता कारण वीणा नेहमी पीसीओ वरून कॉल करत होती.. सावी कडून त्याला एवढच कळाल की तिची आई तिला गावी घेऊन गेली आहे..
एक दिवस घरी परतताना भूषणला अनोळखी नंबरवरून कॉल आला…
भूषण: हॅलो..
वीणा : (पलीकडून दबक्या आवाजात) मी वीणा बोलतेय..
भूषण : अग तू आहेस कुठे??? अचानक गावी गेलीस काही सांगितल पण नाही..
वीणा : (रडवेल्या आवाजात) आज माझ लग्न आहे.. आईने खोट फसवून मला गावी आणल.. मी आत्ता मुंबई ची गाडी पकडून तिथे येतेय.. मला तुझ्याशीच लग्न करायच आहे..
भूषण : (मनात वाइट तर खूप वाटत होतं तरी) वीणा असा मूर्ख विचार करू नकोस.. तु मला फक्त दिड वर्ष ओळखतेस.. माझ्यासाठी तू तुझ्या जन्मदात्या आईवडीलांच मन मोडू नकोस… ते तुझ्या भल्याचाच विचार करतील.. त्यांची निवड तुझ्यासाठी योग्यच असेल.. त्यामुळे विसरून जा की तु कधी मला ओळखत होतीस.. आणि हसतमुखाने नव्या आयुष्याला सुरुवात कर…
वीणा फक्त हुंदका देऊन रडत होती.. फोन ठेवताना येवढच म्हणाली, तु म्हणशील तस.. फक्त तुझ्यासाठी… आज नकळत त्याच्याही डोळ्यात अश्रू अनावर झाले होते.. सहा महिन्यांनी एक दिवस सावीच्या आईने भूषणला थांबवून घेतले.. त्याने वीणासोबत लग्न करायला हवे होते, वीणा खूप दुःखी आहे तिचा नवरा एक नंबर दारुडा आहे, आईवडिलांनी चौकशी केली तेव्हा सगळं नीटच दिसल पण लग्नानंतर त्याचे खरे गुण कळले.. कालच मी तिच्या आईला फोन केला होता तेव्हा त्यांनीच मला हे सांगितले..
भूषण काही न बोलता निघून गेला.. आपल नेमक काय चुकलं, आपल्या आधी तिचा विचार केला ते का तिच्या आईवडिलांचा विचार केला ते?? त्याला तिचे फोन वरचे शेवटचे बोल आठवले , “तु म्हणशील तस.. फक्त तुझ्यासाठी… ” आणि त्याच्या मनात हुंदका दाटून आला.. तिच्या सोबत फोन वर घालवलेला एकूण एक क्षण आठवला आणि मनाचा बांध फुटला… गाडीत बसून खूप रडला, आपण हेे काय करून बसलो.. नकळतपणे आपल्या हातुन वीणाच्या आयुष्याची वाट लागली, तिच्या या परिस्थितीला आपण जबाबर आहोत ही सल कायमची त्याच्या मनात घर करून केली..
🎶🎶पेटलं आभाळ सार पेटला हा प्राण रे
उठला हा जाळ आतून करपल रान रे
उजळ्तांना जळून गेलो राहील ना भान
डोळ्यातल्या पाण्याने हि भिजेना तहान
दूर दूर चालली आज माझी सावली………२
कशी सांज हि उरी गोठली
उरलो हरलो दुःख झाले सोबती ………….२
काय मी बोलून गेलो श्वास माझा थांबला
मी इथे अन तो तिथे हा खेळ आता संपला
मी स्वतःच्या काळजावर घातलेला घाव हा
रोज आतून जाळतो मी वेदनेचा गाव हा
आपुलाच तो रस्ता जुना…….२ मी एकटा चालू किती
उरलो हरलो दुखः झाले सोबती ………….2🎶🎶
समाप्त

